* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HITLER & INDIA
  • Availability : Available
  • Translators : G.B. DESHMUKH
  • ISBN : 9789357202909
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2024
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PURANDARE’S VOLUME IS EXTREMELY READABLE... FINALLY, SOMEONE HAS WRITTEN THE DECISIVE BOOK. – C. CHRISTINE FAIR, PROFESSOR, SECURITY STUDIES, GEORGETOWN UNIVERSITY‘THE INDIANS CAN THINK THEMSELVES LUCKY THAT WE DO NOT RULE INDIA. WE SHOULD MAKE THEIR LIVES A MISERY!’ – ADOLF HITLER IN 1942 HITLER’S AUTOBIOGRAPHY, MEIN KAMPF, IS A PERENNIAL BESTSELLER IN INDIA, WITH EVEN STREET-SIDE BOOKSTALLS PROMINENTLY DISPLAYING STACKS OF IT. THE NAME ‘HITLER’ —ANATHEMA ALMOST EVERYWHERE ELSE IN THE WORLD—IS TOSSED ABOUT CASUALLY IN THE INDIAN SUBCONTINENT, NOT INFREQUENTLY INVOKED IN PRAISE. MANY INDIANS STILL HARBOUR THE NOTION THAT THE FÜHRER WAS A FRIEND OF THE INDIAN PEOPLE AND HAD EXTENDED WHOLEHEARTED SUPPORT TO THEIR FREEDOM STRUGGLE. TO JOURNALIST AND HISTORIAN VAIBHAV PURANDARE, THIS CLEARLY SUGGESTED THAT INDIANS CONTINUED TO BE LARGELY UNAWARE OF THE GERMAN DICTATOR’S VIEWS ON INDIA, IN SPITE OF THE FACT THAT THEY ARE UNAMBIGUOUSLY EXPRESSED IN HIS OWN WRITINGS. THIS LACUNA SPURRED HIM ON TO DELVE INTO THE ARCHIVES—IN GERMANY, INDIA AND ELSEWHERE.THE RESULT OF PURANDARE’S RESEARCH IS THIS COMPREHENSIVE AND PAINSTAKING PORTRAIT AND ANALYSIS OF HITLER’S OUTLOOK ON INDIA AND ITS PEOPLE, HIS OPINION OF THEIR STRUGGLE AGAINST THE BRITISH RAJ, AND HIS TAKE ON INDIAN HISTORY, CULTURE AND CIVILIZATION. ALSO WITHIN THESE PAGES ARE SURPRISING DETAILS OF NETAJI BOSE’S ENTANGLEMENT WITH THE REICH, THE EXPERIENCE OF OTHER INDIANS LIVING IN NAZI GERMANY, THE MISSION THAT HITLER SENT TO THE HIMALAYAS IN SEARCH OF ‘PURE-BLOOD ARYANS’, AND A NUMBER OF OTHER LITTLE-KNOWN HISTORICAL NUGGETS. ACCESSIBLE AND RICH IN DETAIL, HITLER AND INDIA IS THE VERY FIRST EXAMINATION OF WHAT INDIA MEANT TO A FIGURE WHO, PERPLEXINGLY, REMAINS QUITE ALIVE IN THE COUNTRY.
हिटलर - जगात सर्वत्र अत्यंत तिरस्कारानं उच्च्चारल्या जाणारं नाव – भारतीय उपखंडात मात्र काही वेळा हा गैरसमज पाहायला मिळतो की फ्युहरर हा भारतीयांचा मित्र होता. पत्रकार वैभव पुरंदरेंना जाणवलं की या जर्मन हुकूमशहानं स्वत:च्या लिखाणात भारताविषयी त्याचं खरं मत बेधडकपणे मांडून ठेवलेलं असूनही या विषयी भारतीय जनमानसात घोर अज्ञान आहे. ही उणीव भरून काढण्याच्या निकडीतून त्यांना जर्मनी, भारत आणि इतर जागची अभिलेखागारं खंगाळून काढण्याची प्रेरणा मिळाली. हिटलरची भारत देश आणि इथल्या लोकांबद्दलची धारणा, ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी केलेल्या संघर्षाविषयी त्याची मतं आणि भारताचा इतिहास, संस्कृती आणि सभ्यते विषयी त्याचा अभिप्राय ह्यांचं समर्पक विश्लेषण या पुस्तकात आहे. या शिवाय हे पुस्तक नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांची तिसर्‍या साम्राज्याशी झालेली गुंतागुंत, नाझी जर्मनीत राहिलेल्या इतर भारतीयांचे अनुभव, हिटलरद्वारे हिमालयात ‘शुद्ध रक्ताचे आर्यन’ शोधण्यासाठी चालवली गेलेली मोहीम आणि या संदर्भातील अनेक अप्रचलीत घटनांवरदेखील प्रकाश टाकतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#ऐतिहासिक#हिटलरआणिभारत#वैभवपुरंदरे#जी.बी.देशमुख#जागतिकमहायुद्ध१#MEHTAPUBLISHINGHOUSE#TRANSLATEDMARATHIBOOKS#HISTORICAL#HITLLER&INDIA#VAIBHAVPURANDARE#G.B.DESHMUKH#WORLDWAR
Customer Reviews
  • Rating Starशोभना शरद देशमुख, येवदा.

    साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

  • Rating Starप्रभाकर गावंडे, अमरावती

    मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more