* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW STARBUCKS SAVED MY LIFE
  • Availability : Available
  • Translators : NEELA CHANDORKAR
  • ISBN : 9789353171414
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 272
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :NEELA CHANDORKAR COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN HIS FIFTIES, MICHAEL GATES GILL HAD IT ALL: A MANSION IN THE SUBURBS, A WIFE AND LOVING CHILDREN, A SIX-FIGURE SALARY, AND AN IVY LEAGUE EDUCATION. BUT IN A FEW SHORT YEARS, HE LOST HIS JOB, GOT DIVORCED, AND WAS DIAGNOSED WITH A BRAIN TUMOR. WITH NO MONEY OR HEALTH INSURANCE, HE WAS FORCED TO GET A JOB AT STARBUCKS. HAVING GONE FROM POWER LUNCHES TO SCRUBBING TOILETS, FROM BEING SERVED TO SERVING, MICHAEL WAS A TRUE FISH OUT OF WATER. BUT FATE BRINGS AN UNEXPECTED TEACHER INTO HIS LIFE WHO OPENS HIS EYES TO WHAT LIVING WELL REALLY LOOKS LIKE. THE TWO SEEM TO HAVE NOTHING IN COMMON: SHE IS A YOUNG AFRICAN AMERICAN, THE DAUGHTER OF A DRUG ADDICT; HE IS USED TO BEING THE BOSS BUT REPORTS TO HER NOW. FOR THE FIRST TIME IN HIS LIFE HE EXPERIENCES BEING A MEMBER OF A MINORITY TRYING HARD TO SURVIVE IN A CHALLENGING NEW JOB. HE LEARNS THE VALUE OF HARD WORK AND HUMILITY, AS WELL AS WHAT IT TRULY MEANS TO RESPECT ANOTHER PERSON. BEHIND THE SCENES AT ONE OF AMERICA’S MOST INTRIGUING BUSINESSES, AN INSPIRING FRIENDSHIP IS BORN, A FAMILY BEGINS TO HEAL, AND, THANKS TO HIS UNLIKELY MENTOR, MICHAEL GILL AT LAST EXPERIENCES A SENSE OF SELF-WORTH AND HAPPINESS HE HAS NEVER KNOWN BEFORE.
अत्यंत सधन कुटुंबात जन्मलेले मायकेल गेट्स गिल तडजोडी आणि दुःख यांपासून नेहमीच लांब होते. लग्नानंतरही उपनगरात प्रशस्त घर, पत्नी, चार मुले, जाहिरात क्षेत्रात उच्च पदावर नोकरी, सहा आकडी पगार असं सुखी आयुष्य ते जगत होते. त्याच दरम्यान अचानकपणे त्यांना एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. अशा परिस्थितीचा त्यांनी कधीही विचारच केला नव्हता. त्या दृष्टीनं त्यांनी कधी काही तजवीजही करून ठेवली नव्हती. त्याचदरम्यान त्यांचा घटस्फोट झाला. त्यांनी दुसरं लग्नही केलं. परंतु आर्थिकदृष्ट्या मात्र ते सावरू शकले नाहीत. त्याच वेळी त्यांच्या मेंदूमध्ये एक छोटी गाठ असल्याचं त्यांना समजलं. आर्थिक तंगी आणि आरोग्यविम्याअभावी उपचार घेणं त्यांना शक्य नव्हतं. परंतु एक दिवस ‘स्टारबक्स’ कॉफी शॉपमध्ये बसलेले असताना तिथल्या व्यवस्थापनाचं काम सांभाळणाऱ्या क्रिस्टल नावाच्या एका कृष्णवर्णीय मुलीनं त्यांना ‘स्टारबक्स’मध्येच नोकरी देऊ केली. ज्या ठिकाणी कॉफी प्यायची त्याच ठिकाणी मायकेल आता लोकांना कॉफी देण्याचं काम करू लागले. गौरवर्णीय मायकेल आता एका कृष्णवर्णीय मुलीच्या आज्ञा पाळू लागले. प्रसाधनगृहाची साफसफाईही करू लागले. स्टारबक्समध्ये काम करणारे सर्वच जण एकमेकांना भागीदार किंवा पार्टनर अशी हाक मारत असत. सर्व जण समान आहेत ही भावना मायकेलमध्येही दृढ झाली. ‘श्रमप्रतिष्ठा’, ‘विनम्रता’ या मूल्यांचं महत्त्व त्यांना समजलं. सहकाऱ्यांमधील आपुलकीनं त्यांच्यात मोठं परिवर्तन घडवून आणलं. जीवन जगण्याची नवी दृष्टी ‘स्टारबक्स’नं त्यांना दिली. आयुष्यात पैसा सर्वकाही नाही, तर त्याशिवायही अनेक गोष्टींनी जीवन समृद्ध करता येतं, हे त्यांना समजलं. जिवाभावाचे मित्र आणि क्रिस्टलसारखी मार्गदर्शिका यांनी त्यांना जगण्याचं बळ मिळालं. गमावलेला आत्मविश्वास त्यांना परत देण्याचं काम ‘स्टारबक्स’नं केलं, हे मायकेल गेट्स गिल मान्य करतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HOW STARBUCKS SAVED MY LIFE# MICHAEL GATES GILL# NEELA CHANDORKAR #नीला चांदोरकर#हाऊ स्टारबक्स सेव्ह्ड माय लाइफ# मायकेल गेट्स गिल
Customer Reviews
  • Rating Starसंतोष रंगापुरे

    मागील आठवड्यात मेहता पब्लिशिंग चा मेसेज आला `How Starbucks saved my life` या पुस्तकाच्या मराठी अनुवादा बद्दल... पुस्तकाचे नाव काहीतरी वेगळे आणि अनोखे वाटलं आणि लागलीच पुस्तक घेऊन आलो आणि काय सांगू मित्रांनो पुस्तक जसे वाचायला सुरुवात केले तसे गुंतत गलो पुस्तकात... एक अद्भुत अनुभव आहे हे पुस्तक वाचणे म्हणजे... छोट्याच पुस्तकात जीवनाचा केवढा गहन अर्थ सांगितला आहे लेखकाने... खरच प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे अप्रतिम पुस्तक... वाचताना कधी टचकन डोळ्यात पाणी आले कळलेच नाही. जाहिरात क्षेत्रात उच्च पदावर काम करणार्‍या माईक ला जवळजवळ 25 वर्षांच्या नोकरी नंतर अचानक कामावरून काढले जाते, नेहमीच उच्च वर्तुळात वावरणाऱ्या आणि अशी परिस्थिती उद्भवेल याची कल्पना देखील न केलेल्या माईकला हा खूप मोठा धक्का असतो. नोकरी जाते तसेच घटस्फोट देखील होतो आणि त्यातच मेंदू मध्ये कर्करोगाची गाठ आहे असे जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा तर माईक वर अक्षरशः आभाळ कोसळते. भविष्याची कसलीही तरतूद न केल्याने माईक अक्षरशः रस्त्यावर येतो आणि अशाच विमनस्क अवस्थेत असताना क्रिस्टल हि Starbucks मधील मॅनेजर माईकला जॉब ऑफर करते आणि कसलाही विचार न करता माईक हि नोकरी स्वीकारतो. Starbucks मधील नोकरी मध्ये सुरुवातीला धांदरलेला माईक थोड्याच दिवसात रुळतो आणि अनवधानाने मिळालेली हि नोकरी अगदी मनापासून करायला लागतो अगदी मग ते स्वच्छतागृह साफ करण्याचे काम देखील... परंतु नोकरी करता करताच माईकला अनेक गोष्टी गवसत जातात, समोरच्या व्यक्तीला आदराने वागवणे, कुठल्याही कामाला कमी न लेखणे, नव नवीन आव्हाने स्वीकारणे अशा एक नाही तर अनेक गोष्टी माईक शिकत जातो आणि त्यातूनच त्याला जीवनातील खरा आनंद खरे सुख उलगडत जाते. याच नोकरीत त्याला अगदी जीवाभावाचे मित्र भेटतात, मुलांसोबत निर्माण झालेला दुरावा कमी होतो.... अशी कलाकलाने फुलणारी माईकची सत्यकथा आपल्याला जखडून ठेवते आणि खूप काही विचार करायला लावते आपल्या जीवना बद्दल देखील.... मित्रांनो तुम्ही आत्ता जे काही काम करत असाल त्यात तुम्हाला आत्मिक समाधान लाभत आहे का? नसेल तर नक्कीच विचार करा आणि स्वतः ला आवडेल तेच काम करा जेणेकरुन वेळ निघून गेल्यावर हळहळ वाटू नये. पैसा खूप महत्वाचा आहे परंतु सर्वस्व नाही. पैसा, कीर्ती या गोष्टी तुमच्या आंतरिक समाधाना पेक्षा आणि आनंदा पेक्षा नक्कीच जास्त नाहियेत फक्त हि गोष्ट माणसाला वेळ निघून गेल्यावर लक्षात येते.... म्हणुनच म्हणतोय.... जिओ जिंदगी जी भर के... क्या पता कल हो ना हो... ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more