* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HUBEHUB
  • Availability : Available
  • ISBN : 9878184985085
  • Edition : 11
  • Publishing Year : 1960
  • Weight : 125.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BABAN COULD MIMIC ANYONE PERFECTLY (‘HUBEHOOB’), BUT FINALLY HIS LIFE ITSELF BECAME AN IMITATION… THIS MAN IN HIS SELFISHNESS, AND STRUGGLE TO HAVE A SQUARE MEAL MADE GOD SWEAT (‘GHAAM’)! MEET TATYA MHATARA WHO LOVED DUMB ANIMALS WITH HIS HEART, MORE THAN HE LOVED HIS OWN LIFE… ANNA BHAGWAT – THE MAN WHO MADE IT HIS MISSION TO TEACH A LESSON TO EVERY CORRUPT REVENUE OFFICIAL (‘TAGAI’) – A LESSON HE WOULD NEVER FORGET… ABA HAD A HABIT OF SPENDING HIS LUNCHTIME (‘JEVANVEL’) UNDER THE NEEM TREE AND HE WAS RESPONSIBLE FOR A LOT OF INCIDENTS – BOTH GOOD, AND BAD… WHATEVER THE MERITS OR OTHERWISE, OF A CASE – IF DIGUANNA WAS A WITNESS (‘SAKSHIDAAR’), A VERDICT WAS A CERTAINTY! EXPERIENCE THE VAGARIES, AND VARIETY OF HUMAN NATURE IN ‘DA MA’S’ INIMITABLE STYLE!
‘हुबेहूब’ नक्कल करणाया बबनचे वास्तविक आयुष्यही नकलेसारखेच झाले... पोटाची खळगी भरण्यासाठी स्वार्थी माणसाने देवालाही ‘घाम’ फोडायला लावला... स्वत:च्या जिवापेक्षाही मुक्या जनावरांवर जिवापाड प्रेम करणारा तात्या म्हातारा... ‘तगई’साठी पैसे खाणाया प्रत्येक माणसाला जन्मभराची अद्दल घडविणारा अण्णा भागवत... ‘जेवणवेळ’ झाली की, लिंबाखाली बसणाया आबामुळे कितीतरी चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या... केस कोणती अन् कशीही असू दे; दिगुअण्णा ‘साक्षीदार’ असले की, निकाल लागलाच म्हणून समजा... मानवी स्वभावाच्या अशा नाना कळा... अनुभवा द.मांच्या खुमासदार शैलीत!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HUBEHUB #D. #M #MIRASDAR #KATHASANGRAH #GHAM #JODI #TAGAI #SAKSHIDAR #JEWANAVEL #EK #SUKYA #NHAVI #YACHI #GOST #NAKATE #BHUT #TANK #DHADPADNARI #MULE #हुबेहूब #द. #मा. #मिरासदार #कथासंग्रह #घाम #जोडी #तगई #साक्षीदार #जेवणवेळ #एक #सुक्या #न्हावी #ह्याची #गोष्ट #नकटे #भूत #टांक #धडपडणारी #मुले
Customer Reviews
  • Rating StarKrishna Diwate

    विनोदी लेखक द. मा. मिरासदार लिखित विनोदी कथा संग्रह हुबेहूब. दत्तात्रय मारुती मिरासदार यांचा जन्म अकलूज येथला. त्यांचे शिक्षण पंढरपूर आणि पुणे येथे झाले. असे म्हणतात की मराठीत विनोदी गद्यकाव्य लिहिणारे वि.रा. भाटकर हे म्हणजे द.मा. मिरासदारच होते, किंहुना वि.रा. भाटकर हे त्यांचेच टोपणनाव होते. अत्यंत इरसाल गांवरान भाषेत खुसखुशीत विनोद निर्माण करणारे मिरासदार सर हे एक बहू आयामी व्यक्तिमत्व! भुताचा जन्म, भोकरवाडीच्या गोष्टी ,माझ्या बापाची पेंड, भोकरवाडीतील रसवंतीगृह हे त्यांचे सुप्रसिद्ध विनोदी कथा संग्रह त्याव्यतिरिक्त अनेक लेख आणि ललित लेख संग्रह त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. शिक्षक,प्राध्यापक अशा निरनिराळ्या पेशांमध्ये रममाण होत असताना लेखनाची कास त्यांनी सोडली नाही. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्या सोबत सातत्याने *कथा कथनाचे* कार्यक्रम त्यांनी केले. *व्यंकुची शिकवणी,भुताचा जन्म,माझी पहिली चोरी,शिवाजीचे हस्ताक्षर* या त्यांच्या कथांनी महाराष्ट्राला अगदी खळाळून हसायला भाग पाडले. कथाकथन त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यात तसेच परदेशात पण यशस्वीपणे केले. २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. एक डाव भुताचा, ठकास महाठक या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचे पटकथा लेखन यांनी केले आहे. पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८३ वर्षांच्या द.मा. मिरासदारांनी `भुताची गोष्ट` ऐकवली. ही गोष्ट दीड तासाहून अधिक काळ रंगली होती. अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. परळी येथे भरलेल्या ७१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. एकूण दहा कथा असलेला त्यांचा हा विनोदी कथा संग्रह असला तरी त्याला कारुण्याची किनार आहे. गावाकडल्या लोकांच्या स्वभावाचा बारकाईने केलेला अभ्यास, त्यांच्या लकबी शहरात घडत असलेल्या घडामोडिंसोबत स्वताला रीलेट करायचा प्रयत्न या साऱ्यांचा आरसा आपल्याला या कथांमध्ये बघायला आणि अनुभवायला मिळतो. *हुबेहूब* *घाम* *जोडी* *तगई* *साक्षीदार* *जेवणवेळ* *एक सुक्या न्हावी त्याची गोष्ट* *नकटे भूत* *टांक* *धडपडणारी मुले* या दहा गोष्टीं मधून गावातल्या निरनिराळ्या गावकऱ्यांच्या कथा आपल्या समोर येतात. आणि मध्येच ओठावर हसू आणताना डोळ्यांच्या कडांना किंचित पाणी येते आणि मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचे मनस्वी दर्शन आपल्याला या शंभर पानांमधून घडत राहाते. *हुबेहूब* गावात नकला करण्यासाठी प्रसिद्ध असलेला बबन, अगदी कोणाचीही नक्कल उत्तम वठवत असतो. आलवण घातलेल्या स्त्रीची, वारकऱ्यांची अशा वेगवेगळ्या माणसांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या बबनचे आयुष्य नकलेसारखेच होऊन जाते. अगदी लांडगा आला रे आला या गोष्टीची आठवण ही कथा वाचताना येते. *घाम* कथेत गावातल्या मारुतीला घाम यायला लागल्यावर लोक कोणत्या तऱ्हेने प्रतिक्रिया देतात हे दमा मोठ्या रंजक पद्धतीने सांगतात. गावातल्या घडणाऱ्या बारीक सारीक घटना त्यांचे गावाच्या जीवनावर होणारे परिणाम, उमटणारे पडसाद, प्रत्येक माणसाचे वेगळेपण, विचार करायची पद्धत हे एव्हढे परिणामकारक रीतीने मांडले आहे की घटना समोरच घडत आहेत असे वाटायला लागते आणि आपण कथेचाच एक भाग होऊन जातो. पोटासाठी देवालाही घाम फोडायला लावणाऱ्या माणसाचे एक वेगळे रूप समोर येते *जोडी* या कठेत एकीकडे देवाला घाम फोडणारा माणूस आपल्या जनावरं वर प्राणा पलीकडे प्रेम करताना दिसतो. म्हणून पैशांची आत्यंतिक निकड असूनही दोघेही बापलेक बाजारात बैलांची जोडी विकायला बसतात पण जनावरांच्या जिव्हाळ्या पोटी पराकोटीच्या अडचणीमध्ये सुद्धा जनावरे विकू शकत नाहीत. लेकीचे लग्न ठरवताना बाप जसा सासरची माणसे आजमावून बघतो तसा म्हातारा तात्या गिऱ्हाइकाला कुठलेही व्यसन नाही म्हणता मालक चिमूटभर पान तंबाखू साठी पण विश्रांती घेणार नाही आणि आपल्या बैलांना राबवून घेईल या काळजीपोटी अपेक्षित सौदा होऊन पण बैल विकत नाही. *तगाई* सरकारी कार्यालयात पैसे खाणे अगदी सार्वत्रिक अनुभव! थोडा का होईना पैसा हाती येईल या आशेवर तलाठी,तहसीलदार, प्रांत अधिकारी यांच्या कचेरीची पायरी चढून मिळालेल्या शंभरातले सत्तर खाऊ घालून तीस रुपये पदरी पाडून घेणारा केविलवाणा शेतकरी मनाला पिळ पाडतो. पण या साऱ्या खाबुना वठणीवर आणणारा अण्णा भागवत ओलांवलेल्या डोळ्यांना किंचित का होईना हसवून जातो. *जेवणवेळ* शेताच्या बांधावर बसून गावाच्या पंचाईती करणारा परमार्थी आबा माणसामधला निराळाच पैलू दाखवतो. हा परमार्थ करता करता कधी कधी हा स्वता उपाशी पण राहातो. पण यातूनच जगण्याची चांगली मूल्ये मनाला आधार देऊ जातात, आणि कुठेतरी खळखळणारा हा माणुसकीचा इवलासा जरा जग किती सुंदर आहे याचा दाखला देऊन जातो. *साक्षीदार* कोर्ट कज्जे, न्यायालय हे एक निराळेच जग आहे. म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कितीही खरे असले तरी कधी ना कधी ही वेळ कोणावर तरी येतेच आणि मग गावात असणारा एक कायमचा इरसाल साक्षीदार पैसे घेऊन केस कशी जिंकून देतो हे पुस्तकात वाचणे उत्तम. पण मग न्याय, न्याय प्रक्रिया यातले खरे किती आणि खोटे किती हा प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. *नकटे भूत* ही भोकरवाडी मध्ये घडणारी गोष्ट. भोकरवाडी म्हटले कि आपसूक नाना चेंगट, रामा न्हावी, शिवा जमदाडे, गणा मास्तर ,बाबू पैलवान आणि आनशी ही सारी बेरकी, इरसाल पात्रे डोळ्यांसामोर येतात. आनशी वर जीव टाकणारा बारकासा नाना चेंगट, त्याला या ना त्या कारणाने झोडपून काढणारा बाबू, पेपर वाचून गावाला शहाणे करण्याचा प्रयत्न करणारे गणा मास्तर याना प्रत्यक्ष न बघताही या प्रत्येकाबाबत एक जिव्हाळा निर्माण होतो. आणि अगदी गावाची चावडी डोळ्यांसामोर उभी राहाते. या गावात येणारे नकट्या रावळाचे भूत बाबूला घोळसून काढते पण आपल्याला मात्र नक्कीच हसवून जाते. *टांक* कथेत अत्यंत हुशार तरीही नाठाळ बादशाह सोनार म्हातारीला हातोहात फसवतो आणि तीही सहजगत्या फसते आणि शेवटी हातात आलेल्या पैशाचा घरासाठी विनियोग करायचं सोडून बादशाह सोनार आम्ही नरहर सोनारांच्या वंशाचे म्हणून आपली पावले बासुंदीच्या दुकानाकडे वळवतो. अतिरेक कशाचाही असो ते शेवटी व्यसनाच मग ते खायचे असो कि प्यायचे पण त्यांच्या विळख्यातून सहजी सुटका नाही हे या कथेतून उद्धृत होते आणि भोळेपणा आणि इरसालकी या दोन स्वभावांचे मनोज्ञ दर्शन घडते. पुन्हा एकदा म्हातारी फसली तरी मन बादशहाच्या चाणाक्ष स्वाभावाला दाद दिल्याशिवाय राहात नाही. शेवटच्या *धडपडणारी मुले* या कथेमध्ये दोघ चौघ पोर चोरून बिडी ओढायचा प्रयत्न करतात त्यांचे ते बालसुलभ वागणे त्यावर मोठ्यांच्या प्रतिक्रिया आणि समाजात शेवटी बळी तो कानपिळी हा न्याय रास्त आहे हे दाखवत पुस्तक संपते. द. मा. मिरासदार यांच्या अचूक निरीक्षणशक्तीने सर्व व्यक्ति ते इतक्या चपखल पणाने रंगावतात कि हे नाट्य आपल्या अवती भोवती घडत असल्याचा भास होतो आणि एका निखळ वेगळ्याच आनंदाचा अनुभव त्यांच्या पुस्तकातून वाचकाला मिळतो हीच त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. हसणे जितके सोपे सखये हासवणे ते अवघड ग लपवून पाणी नयन मधले सुखा शोधणे मुश्किल ग ||१|| मीच मला बघ विदूषक करतो मुखवटा धारण करतो ग माझ्या मधले व्यंग पाहुनी मीच स्वताला हसतो ग ||२|| शब्द संपदा न्यारी घेऊन दुख कमी मी करतो ग विसंगतीतून सुसंगती मी जगण्यामध्ये बघतो ग ||३|| खळी पाहता तूझिया गाली आसवास मी त्यजितो ग दुखाला मी भिडवून डोळे सुख जगाला देतो ग || ४|| निर्मळ माझे मन हे आता निर्मळ सारे करतो ग निखळ विनोद माझा देऊन जगास मी हसवितो ग || ५|| इति रसिकावाणी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more