* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I DARE
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788177663556
  • Edition : 13
  • Publishing Year : FEBRUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 404
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :KIRAN BEDI COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
REVISED & ENLARGED EDITION WITH UNPUBLISHED MATERIAL AND BEHIND THE SCENES DETAILS OF THE CRUSADE AGAINST CORRUPTION: CHANGING PEOPLES DESITINY; THE SAGA OF INDIA`S FIRST AND THE HIGHEST RANKED WOMAN OFFICER IN THE INDIAN POLICE SERVICE WHO PIONEERED A HUMANE METHOD OF POLICING MARKED BY WILL POWER, DEVOTION TO DUTY, INNOVATION, COMPASSION AND, ABOVE ALL, A `NEVER SAY DIE` ATTITUDE .THE EYEWITNESS ACCOUNT FORTHRIGHT AND UNSPARING IN THIS FULLY REVISED AND UPDATED EDITION PROVIDES A WELL DOCUMENTED EXPOSURE OF THE SABOTAGE OF POLICE REFORMS (TO BE IMPLEMENTED AS PER A VERDICT OF THE SUPREME COURT OF INDIA) BY CERTAIN BUREAUCRATS AND BY SOME MEMBERS OF OWN SERVICE. THESE PERSONS ALSO BLOCKED HER APPOINTMENT AS POLICE COMMISSIONER. THIS KIND OF SABOTAGE WAS THE PROVERBIAL LAST STRAW THAT COMPELLED HER TO SHAKE OFF THE SHACKLES. AFTER A LONG AND REWARDING INNINGS (35 YEARS IN ALL),DECIDED TO MOVE ON. SHE BELIEVED THAT SHE COULD NO LONGER WORK WITH PERSONS WHO WERE KEEPING THE SYSTEM ENSLAVED. SHE WAS CLEAR IN HER MIND THAT SHE WAS NOT GOING TO BE SUBORDINATED BY THIS TEAM OF SABOTEURS. WHAT DIRECTION AND LEADERSHIP WOULD SUCH PERSONS PROVIDE EXCEPT TO CREATE PYGMIES AND STIFLE INITIATIVE AND CRUSH MORALE? SHE DID NOT WANT TO BE A PART OF SUCH DUBIOUS HISTORY AS SHE ASSERTS:MY SELF RESPECT, MY INNATE SENSE OF JUSTICE AND MY BELIEFS AND VALUES IN LIFE PROPELLED ME TO THROW OFF THE “YOKES” THAT WERE ALREADY OBSTRUCTING MY GROWTH AND I NOW MADE UP MY MIND TO SET MYSELF FREE AND BE A MASTER OF MY OWN TIME.THIS IS A NOHOLDSBARRED NARRATIVE PACKED WITH PUNCH, SPIRIT AND VITALITY.
या सुधारित आणि विस्तारित आवृत्तीत, नोकरशहा आणि अधिकारी यांनीच पोलीसयंत्रणेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या मार्गात अडथळे कसे निर्माण केले, याचे तपशीलवार कथन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. परंतु तसे न करता त्या व्यक्तींनी बेदी यांची पोलीस कमिशनरपदी नियुक्ती होऊ नये, यासाठी अडथळे निर्माण केले. या अडथळ्यांवर मात करत, ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बेदी यांनी, सत्तेचा गैरवापर करणायांसोबत काम न करण्याचे ठरवले. अशा लोकांसमोर मान तुकवायची नाही, असा त्यांनी निर्धार केला. पण खरेच या व्यक्तींनी विकासाच्या मार्गात अडथळेअडचणी निर्माण करून, मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करून काय मिळवले? असे अनेक प्रश्न मागे उरतातच. किरण बेदी म्हणतात, ‘माझा आत्मसन्मान, न्यायबुद्धी आणि माझा विश्वास व मूल्ये यांनी माझ्या आत्मविकासामध्ये अडथळे निर्माण करणायांवर मात करण्याची प्रेरणा मला दिली. म्हणूनच मी कोणाच्याही बंधनात न राहण्याचा निर्णय घेतला.’ प्रेरक, अंतर्दृष्टी देणारे आणि जागरूक करणारे कथन!
राज्य पुरस्कार १९९६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#9TH JUNE #I DARE #ITS ALWAYS POSSIBLE #WHAT WENT WRONG AND WHY #MAJAL DARMAJAL #AS I SEE STRIYANCHE SAKSHAMIKARAN #AS I SEE BHARTIYA POLICE SEVA #AS I SEE NETRUTVA AANI PRASHASAN #BE THE CHANGE FIGHTING CORRUPTION #KIRAN BEDI #SUPRIYA VAKIL #आय डेअर #इट्स ऑलवेज पॉसिबल #व्हॉट वेंट राँग अ‍ॅण्ड व्हाय #मजल दरमजल #अ‍ॅज आय सी...-स्त्रियांचे सक्षमीकरण...#भारतीय पोलीस सेवा...#नेतृत्व आणि प्रशासन...#भ्रष्टाचाराशी लढा #किरण बेदी #सुप्रिया वकील
Customer Reviews
  • Rating StarRajendra Kavathekar

    एक पोलिस अधिकारी म्हणून आपल्या संपूर्ण कारकिर्दीत डॉ. किरण बेदी यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कामाची नेहमी नवीन क्षेत्रं स्विकारण्याची हिंमत दाखवली. पोलिसांनी केवळ गुन्हा शोधून काढण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय आणि सुधारणांना सर्वाधिक महत्त्व द्यवे, या आपल्या मताचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. सरकारमधील तसेच त्याबाहेरच्याही अनेक मोठमोठ्या प्रस्थांना त्यांनी हादरा दिला. आपल्या कामाला विशाल आणि व्यापक परिमाण देण्याची किरण बेदी यांची वृत्ती सत्तेवरील लोकांनाही दिसून आलेली होती. डॉ. किरण बेदी यांची अभिनव कार्यपद्धती आणि त्यातून निर्माण झालेली वाद-वादळे यांमुळेच सर्व प्रसारमाध्यमांनी त्यांना सतत केंद्रस्थानी ठेवले. हे त्यांना त्यांच्या कामातील पारदर्शकतेचे मूल्यमापन वाटते, तर इतर काही जणांना मात्र तो प्रसिद्धीच्या हव्यास वाटतो. सामान्य जनतेला मात्र किरण बेदी `मसिहा` वाटतात. देशात तसेच परदेशातही अनेकांनी त्यांचा आदर्श समोर ठेवला आहे.तथापी नाण्याची दुसरी बाजू म्‌हणून बघता, एखाद्याला असेही वाटू शकेल की त्यांच्याबद्दल प्रसृत झालेल्या त्यांच्या मूळच्याच आत्मप्रेमी प्रवृत्तीत ही आणखी एक भर आहे. किरण बेदी कोणत्याही पदावर काम करित असोत, कामावर रुजू होण्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढताच असतो. काही काळानंतर चर्या अशा काही वादळात सापडतात की त्यांचे ते पदच जाते. त्यांना दिल्लीच्या बाहेर पाठवले आले, त्यांनी मिझोराम सोडावे म्हणून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, गोव्यातून फरार म्हणून घोषित करण्यात आले आणि तिहार कारागृहाची सुरक्षिता धोक्यात आणली असा त्यांच्यावल आरोप देखील करण्यात आला. फक्त किरण बेदी `आय् डेअर!` असं म्हणू शकतात. त्या असं का म्हणू शकतात याचा शोध घेणारे हे पुस्तक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (YUVA) 24-01-2002

    हे वाचायलाच हवं... आजच्या युवा पिढीबद्दल कोणीही बोलायला लागलं, की अगदी हमखास ऐकू येणारी वाक्य, ‘आजच्या तरुणांना कसलाही आदर्श नाही. कसलीही मूल्य नाहीत’ त्याचं सगळं आयुष्य स्वत:पुरतं पाहण्यातच जातं. ‘देशप्रेम, समाजाची बांधिलकी या गोष्टी नव्या पिढीला शकवायला हव्यात. आमच्या वेळी, आमच्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळात वगैरे वगैरे वगैरे. कोणत्याही समाजाला स्वत:च्या तरुण पिढीबद्दल अगदी हेच म्हणायचं असतं आणि गमतीची गोष्ट की, त्यांच्या आधीची पिढी त्यांच्याबद्दलही अगदी हेच म्हणत असते. उदा. ‘चांगली सरकारी नोकरी सोडून त्या गांधीच्या मागे धावायला निघालेत’ किंवा ‘माझ्या हपिसात चिकटवून देतो म्हटलं तर नको म्हणताहेत चिरंजीव’ किंवा ‘पैशाची किंमत नाही’ वगैरे वगैरे वगैरे थोडक्यात काय, कोणत्याच तरुण पिढीला हे चुकलेलं नाही. आणि तरीही एका बाबतीत मात्र आपल्या आधीची पिढी आपल्यापेक्षा अधिक भाग्यवान होती हे मात्र कबूल करावंच लागेल. समोर आदर्श ठेवावी, ज्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा, ज्यांची मूल्यं, जीवननिष्ठ अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा अशी पहाडासारखी माणसं आपल्या आधीच्या पिढीला पाहायला मिळाली. आपल्याला आदर्शवत वाटतील अशी माणसं आज दुर्दैवाने फार थोडी आहेत. या अगदी हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या माणसांमध्ये एक स्वयंप्रकाशित नाव ताबडतोब उठून दिसणारं आहे डॉ. किरण बेदी. किरण बेदी यांचं नाव आपण खूप वेळा, खूप ठिकाणी आणि वेगवेगळ्या संदर्भात ऐकतो. वृत्तपत्रांमधून त्यांच्याबद्दल खूप वाचतोही त्यांच्या ठोस वागण्यामुळे निर्माण झालेले वादही आपल्या माहितीचे आहेत, परंतु हे निर्भय, कणखर व्यक्तिमत्व घडलं तरी कसं याबद्दल मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. ही उणीव भरून काढणारं पुस्तक म्हणजे ‘आय डेअर’ हे किरण बेदीचं चरित्र. आशा कर्दळे यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अतिशय सुरेख अनुवाद केला आहे. आशा कर्दळे यांना किरण बेदी यांच्याबद्दल वाटत असलेला आदर, कौतुक, अभिमान हा या सरस अनुवादाच्या पाठीशी असलेला प्रमुख आधार आहे, असं लगेच जाणवतं. किरण बेदीचं बालपण घरातली कठीण आर्थिक परिस्थती आई-वडिलांनी दिलेलं भरपूर प्रेम, मूल्यं आणि उत्तेजन, आई-वडिलांनी मुलींमध्ये संक्रमित केलेल्या जबरदस्त महत्त्वकांक्षा या सर्व गोष्टींबद्दलची सखोल माहिती मिळाली की मग किरण बेदीचं तडफदार, बाणेदार व्यक्तिमत्त्व कसं कसं घडत गेलं हे आपल्याला समजू लागतं. घरातल्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे किरणनं लहानपणीच ठरवलं, की आई-वडिलांनी आपल्यासाठी गुंतवलेल्या प्रत्येक पैशाचा जास्तीत जास्त उपयोग व्हायलाच हवा आणि मग तिनं शाळा-कॉलेजमधील टेनिस, एनसीसी, वादविवाद, भाषणे, नाटक, क्रीडास्पर्धा या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या हिरीरीनं भाग घेतला. किरणच्या शालेय जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पुढच्या आयुष्याचा नीट विचार करून आवश्यक तो विषय अभ्यासाला निवडता यावा म्हणून तिनं स्वत:च्या हिमतीवर शाळा बदलण्याचा घेतलेला निर्णय यामध्ये तिची जबाबदारीची जाणीव आणि त्या लहान वयातही पुढच्या आयुष्याचा तयार केलेला आराखडा हे तर जाणवतंच; शिवाय स्वत:च्या निर्णयक्षमतेचा आणि पुढच्या परिणामांना तोंड देण्याचा आत्मविश्वास हेही जाणवतं. गणवेषाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि किरणनं पोलिसात भरती होण्याचा निर्णय घेतला. १९७२मध्ये आशियाई महिला विजेतेपद टेनिसमध्ये मिळवल्यानंतर हा खेळ कायम खेळता येणार नाही याची जाणीव ठेवून आपल्या व्यवसायाकडं लक्ष केंद्रित करण्याचा शहाणपणाही किरणनं दाखवला. पोलिसांसारख्या संपूर्णतया पुरुषी क्षेत्राच्या व्यवसायात प्रवेश घेतल्यानंतरचे किरणचे बरेवाईट अनुभव आणि त्या अनुभवांशी त्यांनी दिलेला सामना हे सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. किरण बेदीचा विवाह आणि सहजीवन हेही सर्वसामान्य सहजीवनापेक्षा खूपच वेगळं आहे. त्यांच्या पोलिससेवेतील अत्युच्च पदापर्यंतचा प्रवास, मिळालेले धकके आणि पारितोषिकं त्यांच्यावर केले गेलेले आरोप, खटले आणि असंख्य मान-सन्मान, तिहार तुरुंगातील त्यांचे अनुभव आणि प्रयोग या सर्व गोष्टींबद्दलची अतिशय रंजक आणि तरीही विचारांना चालना देणारी माहिती ‘आय डेअर’ या त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळते आणि आजच्या खुज्या कोत्या समाजातील फार थोड्या उत्तुंग व्यक्तिमत्वापैकी एकाची ओळख झाल्याचा आनंद वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more