Vikram Kaduskarली आयकोका,यांचे आत्मचरित्र असलेले हे पुस्तक, अक्षरशः खिळवून ठेवणारं, ज्या फोर्डमध्ये एक कामगारापासुन सुरुवात करुन त्या कंपनी चा अध्यक्ष होईपर्यंत सुवर्ण 32 वर्षे त्या कंपनीत घालवली, आपल्या 8 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी mastyang, koogr, markvis इ गाड्या बनवून फोर्ड ला प्रगतीच्या शिखरावर बसवलं, फोर्डसाठी 32 वर्षे दिवसरात्र एक करून, नंतर तोच माणुस हेन्री फोर्ड ने कटकारस्थान करून त्यांना काढलं,54 व्या वर्षी, ते बाकी आयुष्य आनंदाने घालवू शकत होते, पण नाही,त्यांच्यातल्या उद्योजकाने त्यांना गप्प बसु नाही नाही दिले,अन ते craysler मध्ये रूजू झाले,ते रुजु झालेल्या पहिल्याच दिवशी craysler ने त्यांचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा तोटा दाखवला होता, कंपनी मरण पंथाला लागली होती,दिवाळे जाहीर करण्याच्या काठावर होती,म्हणजे पहिल्या दिवशीपासुनच त्यांचं अग्निदिव्या सुरु झालं, पण त्यांनी प्रचंड मेहनत करून ,संघटन करून,वेळप्रसंगी कामगार कपात करून,स्वतः वर्षाला 1 डॉलर पगार घेऊन,डायरेक्टर इ चे पगार कमी केले,पण खालच्या स्तरावरच्या लोकांचें आहे तेच ठेवले, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये असलेली गडबड फोर्ड मधली ,इथली तिथली माणसे हाताशी धरून तिथली व्यवस्था नीट केली,100 लाख कोटी डॉलर्स च्या कर्जाची गरज होती, कंपनीचे सगळे पैसे संपले होतें, सहा लाख कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न होता,100 लाख डॉलर च्या हमीकर्जासाठी सरकारकडे गेले, पण गेले न मंजूर केले असे ते सरकार कुठले, शिवाय दिवाळखोरीला आलेल्या कंपनीसाठी कोण कर्ज देणार?प्रचंड दमछाक, बॅंकांची देणेदारी, दररोजचा विमानाने प्रवास,मोठ्या मोठ्या लोकांना भेटून फक्त आश्वासने घेऊन, मोकळ्या हातानें परत येऊन,बँकांशी बोलून ,सरकारशी बोलून,लढून झगडून शेवटी हमीकर्ज मिळवले, पण कागदपत्रे जुळवल्यानंतर अक्षरशः त्यांचा ढीग 7 मजले इमारतीएवढा किंवा त्यापेक्षा मोठा,होता, फोर्ड मध्ये 32 वर्षात एवढे शिकले नाही, तेव्हढे ते kraysler मध्ये 3 वर्षात शिकले होते, लोकांचा craysler वरचा विश्वास उडाला,तो मिळवला,के कार, मिनीं व्हॅन, इ गाड्या बनवून प्रचंड नफा कमवून 7 वर्षासाठी घेतलेलं कर्ज 3 वर्षात फेडले, न craysler लाअमेरिकेची 3 नंबर ची कार कंपनी बनवले, लोक फक्त ली आय कोका चा फोटो पाहून कार बुक करायला लागले, त्यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी जोर होऊ लागला, पण त्यांनी ते नाही स्वीकारल,मला आय कोकाशी जोडुन द्या, फोर्ड ने डिअर ली, प्लिज परत ये,सगळं maf केलंय, असे मथळे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले,स्वतःही राखेतून उभे राहिले, न craysler ला सुद्धा त्यांनी राखेतून उभ केलं,अशी झपाटून गेलेली ,अन धेयवेडी माणसे खिजगणतितच,सर्वांनी नक्की वाचावे असे हें ध्येयवेड्या लढाऊ बाण्याच्या ली आय कोका यांचं पुस्तक, लिहु तेवढ कमीच.................................. ...Read more
MAHARASHTRA TIMES 22-04-2018प्रेरणादायी जीवनप्रवास...
शालेय जीवनात घडलेल्या एका घटनेमुळे, ‘हे जीवन जगत असताना सत्याने चालतानाही यश मिळेलच असे नाही’ अशी खूणगाठ मनात बांधली असली तरी सत्याच्याच मार्गाने चालत राहून एका स्थलांतरिताचा मुलगा म्हणून जीवनप्रवास सुरू करून वाहन उद्योगात च्च पदे भूषविणारे ‘ली आयकोका’ यांनी त्यांचे सहलेखक विल्यम नोव्हाक यांच्या सहयोगाने लिहिलेल्या ‘आयकोका - एक आत्मचरित्र’ या पुस्तकातून आपल्या संपूर्ण जीवनप्रवासाचे वर्णन केले आहे.
आयकोका यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना त्याची चार भागांत विभागणी केली आहे. प्रथम कौटुंबिक व शालेय जीवन, नंतर फोर्ड कंपनीत केलेली सेवा, ‘क्रायस्लर’ या कंपनीमधील दिवस आणि शेवटी ‘सीधी बात’ या भागातून सामाजिक प्रबोधनपर कार्य आणि अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न अशा बाबींचा परामर्श घेतला आहे.
ली आयकोको यांनी आत्मकथनातून मांडलेली कौटुंबिक स्थिती आणि इंजिनिअर होण्यापर्यंत केलेला प्रवास यामधून त्यांनी शिक्षणादरम्यान आलेल्या अनुभवांचे चित्रण केले आहे.
‘फोर्डची कहाणी’ या भागामधून, सर्वसामान्य कामगार म्हणून फोर्ड कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर अगदी कमी अवधीत सर्वच आघाड्यांवर आपला ठसा कसा उमटवला, हे सांगताना हितशत्रूंशी दिलेल्या त्रासाची वर्णने येथे केली आहेत. यातून ‘मॅस्टंग नावाची कार बाजारात आणून वाहन उद्योगाचा चेहरामोहरा कसा बदलून टाकला याची वर्णने येथे केली आहेत.
‘हेन्री फोर्ड’ यांच्यासह काम करताना त्यांना आलेल्या अनेक विदारक अनुभवांची जंत्री येथे दिली आहे. यश मिळवण्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मानसिक संषर्घ करावा लागला आहे हे यातून दिसून येते.
‘क्रायस्लरची कथा’ या भागामधून ‘ली आयकोका’ फोर्डमधून बाहेर पडल्यानंतर, त्यांनी बाहेर पडलेल्या अन्य व्यक्ती आणि काही निवृत्त अधिकारी यांना एकत्र घेऊन ‘क्रायस्लर’ या डबघाईला आलेल्या कंपनीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे प्रयत्न करताना सरकारला साकडे घालून आणि स्वत:मधील जिद्द आणि कल्पकता यांना परिश्रमाची जोड देऊन प्राप्त केलेल्या यशाची गाथा सांगितली आहे.
वाहन उद्योगातील तत्कालीन महत्त्वाच्या ‘फोर्ड’ आणि ‘क्रायस्लर’ या दोन्ही कंपन्यांचे अध्यक्षपद भूषविण्याचे भाग्य लाभल्याचे नमूद करून आयकोका यांनी व्यवसायातील त्रुटी, सरकारी नियंत्रणाचा अतिरेक, ऊर्जेचे संकट आणि बाजारातील मंदी या कारणांमुळे तोट्यात गेलेल्या क्रायस्लर कंपनीला उभारी देण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनांच्या वर्णनातून त्यांची कामावर असलेली निष्ठा व दूरदृष्टी दिसून येते.
‘सीधी बात’ या शेवटच्या भागातून रस्ता सुरक्षेची उपाययोजना, समाजप्रबोधनासाठी केलेले कार्य आणि अमेरिकेला दिलेले आर्थिक सल्ले अशा विषयांचा ऊहापोह येथे केला आहे. सरकारने वेगवेगळ्या उद्योगांना दिलेली कर्जमाफी, संरक्षण क्षेत्रात होत असलेला खर्च, नासाचा अंतराळ कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा सर्व बाबी सविस्तरपणे स्पष्ट करून सरकारने करावयाच्या उपाययोजना सांगितल्या आहेत.
आयकोका यांच्या या चरित्रातून कोणत्याही प्रसंगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, परिस्थिती हाताळण्याचे त्यांचे कसब आणि व्यवसाय करण्याचे त्यांचे तंत्र यांची मिळत असलेली माहिती उद्योजकांना प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
आयकोका यांचे व्यक्तिमत्त्व ठळकपणे साकार होणाऱ्या या आत्मकथनाचा मराठी अनुवाद अतिशय वाचनीय आहेच परंतु स्वत: आयकोका रसिक वाचकांशी संवाद साधीत आहेत असे वाटणे यातच या अनुवादाचे यश आहे.
-कमलाकर राऊत ...Read more