* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IMAGINING INDIA – IDEAS FOR A NEW CENTURY
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788184984262
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 744
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IMAGINING INDIA OFFERS A VISIONARY OUTLOOK ABOUT INDIA AND ITS BURGEONING FUTURE THROUGH THE EYES OF ITS AUTHOR NANDAN NILEKANI, WHO IS AN ACCOMPLISHED BUSINESS LEADER. AN ORIGINAL AND BALANCED PERSPECTIVE ON INDIA’S PAST, PRESENT, AND FUTURE IS PRESENTED IN AN ENGAGING MANNER. THE CENTRAL IDEAS THAT HAVE SHAPED INDIA’S GROWTH ARE REVIEWED STRONGLY INIMAGINING INDIA. INDIA’S EARLIER SOCIALIST POLICIES, WHICH STUNTED ITS GROWTH, IS LOOKED AT CRITICALLY. THE BOOK TRACES THE POLICIES AND EFFORTS OF THE PAST AND PRESENT LEADERS, WHEREIN THEY TRIED TO DEVELOP NEW FRAMEWORKS TO SUIT INDIA’S CHALLENGES. THE AUTHOR LAYS EMPHASIS ON THE ROLE PLAYED BY THE YOUTH OF THE COUNTRY IN ITS DEVELOPMENT. FURTHER, HE THROWS LIGHT ON THE IMPACT OF INFORMATION TECHNOLOGY ON BUSINESS AND GOVERNANCE. OTHER TOPICS COVERED INCLUDE LABOUR REFORM, CASTE POLITICS, URBANISATION, INFRASTRUCTURE, HIGHER EDUCATION, ENGLISH LANGUAGE, AND GLOBALISATION. HE CHARTS IDEAS THAT ARE PIVOTAL TO INDIA’S FUTURE GROWTH, AND STRESSES THAT NEW IDEAS FOR SOCIAL SECURITY, ENVIRONMENT, PUBLIC HEALTH, ETC. ARE REQUIRED TO SECURE INDIA’S FUTURE.
समकालीन संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशा या पुस्तकात भारताचा प्रदीर्घ इतिहास, गुंतागुंतीचे वर्तमान आणि अनेक शक्यतांना जन्माला घालणारे भविष्य यांचा एक सुसंगत असा अन्वय लावण्याचा प्रयत्न नंदन निलेकणी यांनी केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातल्या समाजवादी धोरणांमागचे तत्कालीन उद्देश कितीही चांगले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या धोरणांची परिणती लोकशाही खिळखिळी करणाNया कुचंबल्या वर्तमानात कशी आणि का झाली, याचे सखोल विवेचन निलेकणी यांनी केले आहे. वर्तमान आणि भविष्य यांचा खंबीर आधार म्हणून उदयाला आलेली भारतातील तरुण लोकसंख्येची दमदार शक्ती हा कळीचा मुद्दा का आहे; याचे विश्लेषण हा या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होत जाणाNया क्रांतीमुळे केवळ व्यापार, उद्योग आणि सरकारी कारभारातच नव्हे; तर बहुसंख्य भारतीयांच्या आयुष्यात किती रोमांचक परिवर्तन घडते आहे; याचे अत्यंत रोचक वर्णन या पुस्तकात आहे. जातीच्या गणितांवर बेतलेले राजकारण, कामगार क्षेत्रात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या सुधारणा, पायाभूत सुविधांची उभारणी, उच्च शिक्षणाचे क्षेत्र आणि भारतातला इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव यांसारख्या कळीच्या वादग्रस्त मुद्द्यांचे नंदन निलेकणी यांनी विस्ताराने आणि संपूर्णत: नव्या दृष्टिकोनांसह विस्तृत विवेचन केले आहे.
उत्कृष्ट अनुवादासाठी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार २०१६ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #IMAGININGINDIA #IMAGININGINDIA–IDEASFORTHENEWCENTURY #इमॅजिनिंगइंडिया #REFERENCEANDGENERAL #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #APARNAVELANKAR #अपर्णावेलणकर #NANDANNILEKANI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 12-6-16

    नंदन निलेकणी हे नाव आधारकार्डमुळे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. कारण ती संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय नि:संशयपणे त्यांचेच आहे. मात्र ते इन्फोसिसचे सहसंस्थापक काही काळ सी.ई.ओ. अध्यक्ष होते. आंतराष्ट्रीय आर्थिक संबंधाच्या संशोधन संस्थेच्या कौन्सिचे सदस्य आणि एनसीएईआर चे अध्यक्ष ही त्यांची ओळख अनेकांना माहित नसेल, एक यशस्वी उद्योजक विचारवंत म्हणूनही ते आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्तीप्राप्त आहेत. लौकिकार्थाने यशस्वी असूनही भारताच्या उज्वल भवितव्याचाच विचार सातत्याने ते करीत आले आहेत. त्यासाठी प्रत्यक्षातही त्याच विविधप्रकारे निर्लोभी वृत्तीने मोठे काम केले आहे या त्यांच्या अनुभवातूनच त्यांनी भारताच्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि प्रशासनाच्या स्थिती स्थित्यंतरे आणि भावी दिशा असा सर्वंकष आढावा घेणारे ‘इमॅजिनिंग इंडिया’ हे पुस्तक प्रदीर्घ अभ्यास करून २००८ साली लिहिले. त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिशादर्शक म्हणून खूप कौतुकही झाले. त्याचा सुरेख मराठी अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी त्याच नावाने केला असून मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. हे पुस्तक १) उत्क्रांत भारत २) नव्या प्रवासाला निघताना ३) वाद आणि निवास आणि ४) किस रास्ते जाना है अशा चार भागात विभागला असून शेवटी १५ पानांचे निष्कर्ष हे प्रकरण आहे. पहिल्या भागांत स्वातंत्र्यानंतर पं. नेहरूंचे औद्योगिक धोरण, समाजवादाचे आकर्षण सार्वजनिक क्षेत्राला उत्तेजन, खाजगी क्षेत्राकडे पाहण्याचा नफेखोर दृष्टिकोन त्यावरील बंधने यांचा उहापोह आहे. नोकरशाहीची बाबूगिरी आणि तिचे अडथळे यांचाही त्यांनी आढावा घेतला आहे. इंग्रजीचा प्रारंभी दुस्वास, तिचे महत्त्व, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उदय, त्याला झालेला विरोध आणि नंतरचा सहर्ष स्वीकार, तरूणांची लक्षणीय संख्या आणि सुस्थिर झालेली लोकशाही यांची मार्गक्रमणा आणि त्यावरील विचार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात बदलत्या शैक्षणिक संकल्पना, ग्रामीण लोकसंख्येचे मोठ्याप्रमाणात शहरांकडे स्थलांतर, त्याचे तोटे आणि फायदे इन्फ्रास्ट्रक्चरची प्रगती सरकारी आणि खाजगी क्षेत्रांचे सहकार्य करकायद्यातील सुधारणा, खुले आर्थिक धोरण आणि त्याचे फायदे तोटे या सर्वावर साधक बाधक चर्चा आहे. चौथ्या भागात भारताचे रक्षण, कुपोषणाचा प्रश्न, समाजातील आर्थिक विषमता, सामाजिक सुरक्षा, ऊर्जेची कमतरता आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा विचार आणि त्या सर्वांसाठी आवश्यक असलेले सत्ता आणि संपत्ती आणि सुबत्तेचेही विकेंद्रीकरण यांची सूक्ष्म निरीक्षणे, वस्तुस्थिती आणि त्यावरील उपाययोजना विस्ताराने मोडली गेली आहे. शेवटच्या निष्कर्ष या प्रकरणात त्यांनी भारताची स्थिती सर्वंकष सुधारून तो महासत्ता बनण्याच्या दिशेने कसा गतिमान होईल याचे निष्कर्ष सकारात्मक पद्धतीने मांडले आहेत. त्याचा सकारात्मक शेवट करताना ते त्यांनी लिहिले आहे. एका नैराश्याच्या क्षणी पं. नेहरू विषादाने म्हणाले होते, ‘‘आपण सारे भारतीय नि:सत्व दुर्बल, निर्जीव इतके शांत आहोत की, आपल्याला कशाचेच काही वाटेनासे झाले आहे कां?’’ पण नव्याने उदयाला आलेला भारत आज असा नाही. तो याच्या पूर्ण विरूद्ध आहे, तरूण, अस्वस्थ अधीर चैतन्याने शिगोशीग भरलेला आणि टक्क जागा! हे लिहिताना त्यांनी अनेक क्षेत्रातील दिग्गज विचारवंतांशी विचारविनिमय चर्चा केल्या आणि त्यांचे संदर्भ ठिकठिकाणी आले आहेत. ‘‘Hole in the Wall’’ सारख्या प्रयोगातून झोपडपट्टीतील सामान्य मुलांनी संगणकीय ज्ञान कसे झपाट्याने प्राप्त केले अशी अनेक उदाहरणे ही आहेत. शेवटी संदर्भसूची आणि अनुवादात मराठी प्रतिशब्द असल्याने उपयुक्तता वार्धिष्कसाठी आहे. अपर्णा वेलणकर या सिद्धहस्त लेखिकेने त्याचा अप्रतिम आणि प्रवाही अनुवाद केला आहे. त्यामुळे मराठी वाचकांना हा ज्ञान ठेवा उपलब्ध झाला आहे. त्यासाठी त्यांचे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे विशेष अभिनंदन करावयास हवे. ज्याला भारताच्या आर्थिक, औद्योगिक यशाच्या वाटचालीला रस आहे. अशा प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. सहज जाता जाता दोन हलक्या फुलक्या गोष्टी आठवल्या, पहिलं म्हणजे २००८ मध्ये मूळ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याची सुरूवात त्यांना तुमच्यासारखी चांगली माणसे राजकारणात का जात नाहीत? या प्रश्नाने झाली. त्याला त्यांनी दिलेल्या ‘‘मी उद्योजक असल्याने त्या आखाड्यात मी अस्पृश्य आहे आणि ते केलं तर टीकेचा धनी होईन.’’ या उत्तराने झाली आहे. प्रत्यक्षात पुढे २०१४ मध्ये त्यांनी बंगलोरमधून लोकसभेची निवडणूक लढविली आणि त्याचा त्यांना पराभूत होऊन प्रत्ययही आला. आणि दुसरी म्हणजे त्यांच्या पत्नी सौ. रोहिणी, पूर्वाश्रमीच्या सोमण असल्याचा उल्लेख आला आहे. म्हणजेच ते आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more