* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KHALI JAMIN VAR AAKASH
  • Availability : Available
  • Translators : DR. SHUCHITA NANDAPURKAR-PHADKE
  • ISBN : 9789353174712
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 284
  • Language : ENGLISH
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HE WAS BORN IN AN ORPHANAGE, WAS BROUGHT UP IN A REMAND HOME. HE HAD NO RELATIONS, NO FATHER, NO MOTHER, NO CASTE, NO RELIGION, NO CULTURE, AND NO ANCESTRY, NOTHING TO CLAIM HIM. HE HAD NO TRADITIONAL MARKINGS TO PROVE HIS BEING INTO EXISTENCE. HE WAS BORN WITH `NAME NOT KNOWN`. HE HAD NO NAME; HE JUST HAD A NUMBER, JUST LIKE THE PRISONERS. HIS CHILDHOOD WAS FULL OF QUESTIONS. HIS ADOLESCENCE WAS SPOILED, HIS YOUTH WAS SNUBBED. WHEN HE GREW INTO ADULTHOOD, HIS QUESTION ALSO GREW WITH HIM. THESE QUESTIONS MADE HIM AN ADULT. THEY SHOULDERED HIS PARENTING. THEY TAUGHT HIM, THEY HELPED HIM TO RECOVER. TODAY, HE IS AT SUCH A STAGE WHERE LIFE UNFOLDS BEAUTIFULLY IN FRONT OF HIM. THIS IS A STORY FOR THOSE WHO HAVE EVERYTHING YET WHO DO NOT STOP COMPLAINING AND ARE EXTREMELY INCOMPETENT.
अनाथाश्रमात जन्मलेला, रिमांड होममध्ये वाढलेला तो. त्यास आई-वडील नव्हते. जात, धर्म, कुल, गोत्र, वंश, नातेवाईक अशा पारंपरिक अस्तित्वाच्या कसल्याही खुणा न घेता, जन्मलेला तो एक ‘नेम नॉट नोन’ होता. त्याला नाव नव्हतं. होता, एक नंबर. (वैÂद्याला असतो तसा!) त्याचं बालपण प्रश्नग्रस्त होतं. कौमार्य कुस्करलेलं. तारुण्य अव्हेरलं गेलेलं. तो वयात आला तसे त्याचे प्रश्नही वयात आले. प्रश्नांनी त्याला प्रौढ केलं. प्रश्नांनीच त्याचं पालकत्त्व पेललं. प्रश्नांनीच तो शिकला-सवरला नि सावरलाही! आज त्याच्या पुढे आहे पर्यायांच्या प्राजक्तांचा सडा! सर्व काही असताना काही न करणाNयांना आपल्या नाकर्तेपणाची जाण देणारी ही कर्मकहाणी आहे – ‘खाली जमीन वर आकाश.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KHALIJAMINVARAAKASH # INBETWEEN #SUNILKUMARLAWATE #SUCHITANANDAPURKAR-PHADAKE #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more