IN THE HEART OF ITALY, HARVARD PROFESSOR OF SYMBOLOGY ROBERT LANGDON IS DRAWN INTO A HARROWING WORLD CENTERED ON ONE OF HISTORY’S MOST ENDURING AND MYSTERIOUS LITERARY MASTERPIECES . . . DANTE’S INFERNO.
AGAINST THIS BACKDROP, LANGDON BATTLES A CHILLING ADVERSARY AND GRAPPLES WITH AN INGENIOUS RIDDLE THAT PULLS HIM INTO A LANDSCAPE OF CLASSIC ART, SECRET PASSAGEWAYS, AND FUTURISTIC SCIENCE. DRAWING FROM DANTE’S DARK EPIC POEM, LANGDON RACES TO FIND ANSWERS AND DECIDE WHOM TO TRUST . . . BEFORE THE WORLD IS IRREVOCABLY ALTERED.
‘शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल’ हे शब्द चिन्हशास्त्रज्ञ रॉबर्ट लँग्डन याच्या डोक्यात घोळत असताना तो रुग्णालयात जागा झाला. आपण कुठे आहोत, येथे कसे आलोत, हे त्याला आठवेना. जी एक गूढ वस्तू त्याच्याजवळ होती, त्याबद्दलही त्याला सांगता येईना.
त्याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याने सिएना ब्रुक्स या तरुण डॉक्टरणीसोबत त्याने पलायन केले. मग इटलीच्या फ्लॉरेन्स शहरात त्याचा पाठलाग सुरू झाला. प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंच्या खाचाखोचा माहीत असल्यामुळे आपला पाठलाग करणाNयांना तो गुंगारा देऊ शकत होता.
डान्टेचे महाकाव्य ‘इन्फर्नो’मधील काही काव्यपंक्तींच्या साहाय्याने तो रहस्याचा मागोवा घेत चालला होता. ते रहस्य प्राचीन शिल्पे, चित्रे, इत्यादींमध्ये सांकेतिक स्वरूपात लपलेले होते. ते उलगडले तर जगाला एका भयानक संकटातून वाचवता येणार होते...
युरोपातील पाश्र्वभूमीवर लिहिलेली डॅन ब्राउनची रहस्यमय व थरारक कादंबरी! चोवीस तासात घडणाNया या घटना वाचताना वाचकाला अक्षरश: भोवळ येऊ लागते; ही कादंबरी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचकाला खिळवून ठेवते!