THE ASTONISHING AND BESTSELLING LIFE STORY OF THE RENOWNED CAMPAIGNER FOR RELIGIOUS TOLERANCE AND WOMEN`S RIGHTS, AYAAN HIRSI ALI.
आयान हिरसी अली– एक झुंझार वृत्तीची इस्लामधर्मीय स्त्री...
आईवडिलांकडून झुंजार वृत्तीचं बाळकडू मिळालेली आयान वडिलांच्या पसंतीच्या तरूणाशी लग्न करायला नकार देते.
तिच्या अनुपस्थितीत झालेल्या निकाहला ती जिवाच्या आकांतानं विरोध करते तो हॉलंडमधील निर्वासितांच्या छावणीत.
मुस्लिमांच्या धर्मपंचायतीसमोर ती धीटपणे सांगते,
‘‘मला हा निकाह मंजूर नाही. कारण माझे मन तो मान्य करत नाही.’’
या तिच्या निर्भीड जबाबाला धर्ममार्तंड थोर मनानं स्वीकारतात आणि तिला या बेडीतून मुक्तता मिळते...
हॉलंडमध्ये राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षणानंतर
तेथील नागरिकत्व... आयानचा निवडणुकीच्या रिंगणातून प्रवेश.
तिच्या दुर्दैवानं तिच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण होतो आणि नागरिकत्वही रद्द होण्याची भीती समोर ठाकते...
त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर
आता आयाननं अमेरिकेत राहाण्याचा निर्णय घेतला आहे...
परंपरावादी इस्लामनं स्त्रीच्या तनमनावर आणि स्वातंत्र्यावर
ज्या बेड्या ठोकल्या आहेत त्या तोडण्यासाठी
प्राणपणानं लढणाऱ्या आधुनिक लढवय्या स्त्रीची कहाणी
म्हणजेच इन्फीडेल.
तिनं अशा धर्माचा त्याग केला जो तिच्या समाजातील
पन्नास टक्के लोकांना कुठलंही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही...
त्या झुंजार स्त्रीला जाणून घेण्यासाठी प्रत्येक स्त्रीनं
हे पुस्तक वाचायलाच हवं...