THE INTERVIEW SAID THAT SPEAKING IN ENGLISH, WEARING A TIE, GIVING A FIRM SHAKEHAND, SUCH THINGS ARE GIVEN UNNECESSARY IMPORTANCE. CHILDREN EDUCATED IN ENGLISH MEDIUM SCHOOLS AND COLLEGES SPEAK LITTLE ENGLISH, SO THE BOYS AND GIRLS FROM SMALL TOWNS AND VILLAGES ARE OVERWHELMED. THEY DEVELOP A MISCONCEPTION THAT THEY CANNOT SPEAK ENGLISH.... THEY ARE IGNORANT OF EVERYTHING FROM HOW TO WRITE A JOB APPLICATION, HOW TO PREPARE FOR A GROUP DISCUSSION FOR A COMPETITIVE EXAM.
इंटरव्ह्यू म्हटले की, इंग्रजीतून बोलणे, टाय लावणे, कडक शेकहँड करणे, अशा गोष्टींनाच अनावश्यक महत्त्व दिले जाते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा-कॉलेजांत शिकलेली मुले जे काही इंग्रजी बोलतात, त्यामुळे लहान शहरांतील, गावांतील मुले-मुली भारावून जातात. आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही याचा न्यूनगंड त्यांच्या मनात तयार होतो.... नोकरीसाठी अर्ज कसा लिहायचा, स्पर्धा परीक्षेसाठी ग्रुप डिस्कशनची तयारी कशी करायची या सर्व गोष्टींबद्दल त्यांच्यामध्ये अनभिज्ञता असते; त्यामुळे अनेकदा ते आपली माहिती प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. म्हणूनच हे पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्व लहान-मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये राहणाऱ्या; स्पर्धा परीक्षांची, इंटरव्ह्यूची तयारी करत असलेल्या मुला-मुलींसाठी लिहिलेले आहे. इंटरव्ह्यूच्या वेळेला विविध प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, इंटरव्ह्यूच्या वेळेला पाळायचे शिष्टाचार आणि आवश्यक देहबोली (ँद्ब् थ्Aहुल्Aुा) या बद्दलची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे.