* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BETRAYED
  • Availability : Notify Me
     
  • Translators : SINDHU JOSHI
  • ISBN : 9788184984330
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 225
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN IRAG LATIFA HAS NO ALLIES, AS A MUSLIM WOMAN SHE HAS NO LIBERTY, AND SHE IS UNABLE TO GAIN ACROSS TO THE AUSTRALIAN CONSULATE. IN 2003 AS THE WAR ON TERROR RAGES AROUND HER, LATIFA IS AT WAR WITH HER CULTURE AND CUSTOMERS. IMPRISONED, ABUSED AND VIOLATED, HER EFFORTS TO ESCAPE IRAQ FAIL AND HER DEATH LOOMS CLOSER. WORKING AS SPY, CONSORTING WITH THE UN AND RACING FOR THE BORDER, LATIFA KNOWS THAT THE ONLY WAY TO SAVE HER LIFE IS TO KEEP HER SECRET AND MAKE AN ESCAPE. A HARROWING STORY OF INDEPENDENCE AND PERSEVERANCE. FIND OUT WHY LATIFA STILL LIVES IN FEAR FOR HER LIFE.
सनातन कौटुंबिक चालीरीतींमुळे जन्मदात्यांनीच तिला जबरदस्तीने इराकमध्ये नेले आणि मृत्यूच्या छायेत जगण्यास भाग पाडले. एका तरुणीच्या जीवनाची अंगावर शहारे आणणारी सत्यकथा. ‘बिट्रेड’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #IRAQHUNSUTAKA #BETRAYED #इराकहूनसुटका #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SINDHUJOSHI #LATIFAALI #लतीफा अली"
Customer Reviews
  • Rating StarSachin Patil

    Khup chan pustak aahe

  • Rating StarAditya Wajage, Pustak Bistak

    सनातनी परंपरा, पुरुषी मानसिकता, फसवणूक, महिलांचे समाजातील दुय्यम स्थान, धर्माचा लोकांवर असलेला पगडा, अनिष्ठ चालीरीती या सत्यकथेतून आपल्याला कळून येतात व लतीफाची इराकहून सुटका किती महत्वाची होती हे आपल्याला समजते.

  • Rating StarVijay Gokhale

    जबरदस्त...!!!!

  • Rating StarKiran Borkar

    मुळातच लतिफा सनातन कुर्दी जमातीतील होती . सद्दाम हुसेनने त्यांच्या कुटुंबाचा वध करायचा आदेश दिल्यावर ते पळून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले.,मग त्या खुल्या वातावरणातच लतिफाचे तरुणपण गेले .पुढे तिच्या कुटुंबाने जर्मनीत स्थलांतर केले आणि वडील परत इराकला परते . सनातन मुस्लिम चालीरीतीविरुद्ध वागल्याने तिला इराकला वडिलांकडे पाठविण्यात आले आणि तिथेच जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले .एक मुस्लिम स्त्री म्हणून ती कोणाशी बोलू शकत नव्हती ,ना कोणत्याही दूतावसाशी संपर्क करू शकत होती . तिच्या सुटकेच्या धडपडीमुळे तिचा छळ वाढत गेला. तसे तिने इराकी रूढी परंपरा आणि संस्कृती विरुद्ध जणू युद्धच पुकारले . तिचे सुटकेचे सारे प्रयत्न फोल ठरू लागले पण त्याही परिस्थितीत तिने हार न मानता युनो च्या लोकांशी जवळीक साधली आणि देशाच्या सीमेपर्यंत पोचली ,इराकच्या जुलमी चालीरीती आणि स्त्रियांना मिळणाऱ्या जुलमी वागणुकीची अंगावर शहारे आणणारी सत्यकथा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more