IN THIS TOUCHING, HEARTBREAKING MEMOIR, NEWMAN BRINGS TO LIFE THE UNIQUE FRIENDSHIP THAT DEVELOPED BETWEEN AN ECCENTRIC, ALOOF WHITE MATHEMATICAL GENIUS AND AN ILLITERATE, UNEDUCATED AFRICAN-AMERICAN HOUSEKEEPER DURING THE 1940S AND 1950S.
एक गोरा गणितज्ञ जेम्स आणि त्याच्या घरातील कृष्णवर्णीय मोलकरीण जेनिमा यांच्यातील अकृत्रिम, पवित्र स्नेहाचं हळुवार दर्शन घडविणारं हे व्यक्तिचित्रण. जेनिमा अडाणी असली तरी भावनिक शहाणपण आहे तिच्याकडे. एकदा तिच्यावर बलात्कार होतो, तेव्हा जेम्स तिच्या पाठीशी उभा राहतो. बलात्कारातून जन्मलेली जेनिमाची दोन वर्षांची मुलगी भाजते, तेव्हाही जेम्स जेनिमाला खंबीर आधार देतो. आकड्यांच्या आकर्षणामुळे जेनिमाला लॉटरी खेळायची सवय लागते. ती जिंकतही असते. त्यामुळे लॉटरीसाठी कोणते नंबर घ्यावेत याविषयी विचारणा करणारे फोन तिला येत असतात. आपली पायरी ओळखून जेम्सशी आणि त्याच्या कुटुंबाशी एकरूप होणारी जेनिमा, भ्रमरवृत्तीच्या जेम्सला आणि त्याच्या पत्नीला जवळ आणू पाहणारी जेनिमा, जेम्सला हार्टअॅटॅक आलेला असताना त्याची काळजी घेणारी जेनिमा...जेनिमाचं लोभस व्यक्तिमत्त्व आणि जेम्सच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वातून प्रकटणारा जेनिमाविषयीचा स्नेह यांचं हळुवार दर्शन घडविणारं वाचनीय व्यक्तिचित्रण.