* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JIDNYASAPURTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662894
  • Edition : 5
  • Publishing Year : MARCH 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 236
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :NIRANJAN GHATE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TODAY WE SEE COMPETITION IN EACH AND EVERY FIELD OF LIFE. IF YOU WANT TO SUSTAIN IN THIS WORLD THEN YOU NEED TO HAVE KNOWLEDGE ABOUT EACH AND EVERYTHING. IN TODAY`S WORLD GENERAL KNOWLEDGE IS BECOME THE KEY WORLD, THE VARIOUS COMPETITIVE EXAMS, THE VARIOUS QUIZ PROGRAMMES ORGANISED ON THE T.V. ARE ALSO RESPONSIBLE TO THIS. GENERAL KNOWLEDGE IS NOT SOMETHING THAT WE CAN LEARN BY HEART IN A DAY OR TWO. ESPECIALLY, WHEN YOU WANT TO LEARN SOMETHING THAT IS RELATED TO SCIENCE AND IF YOU ACQUIRE KNOWLEDGE OF OTHER THINGS RELATED TO THE TOPIC THAT YOU ARE INTERESTED IN, THEN IT BECOMES EASIER TO LEARN AND REMEMBER THE MAIN INFORMATION. WE USE MANY THINGS, WE COME ACROSS MANY THINGS, WE MAKE USE OF THE VARIOUS PROPERTIES OF SUBSTANCES, BUT HOW MANY OF US CAN ANSWER QUESTIONS RELATED TO THESE PROPERTIES? DO YOU KNOW HOW THE HOTNESS OF CHILLY IS COUNTED? THOSE WHO USE CHILLY POWDER WON`T BE ABLE TO ANSWER THIS QUESTION, BUT IF YOU HAVE READ THIS BOOK THEN YOU SURELY WILL BE ABLE TO ANSWER THIS.THIS BOOK IS A COLLECTION OF MANY STRANGE, PECULIAR, QUEER THINGS. IT CONSISTS OF SCIENTIFIC INFORMATION AND ANSWERS TO MANY QUESTIONS RELATED TO GEOGRAPHY.
सध्याच्या स्पर्धात्मक जगात चौफेर ज्ञानास खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. स्पर्धापरीक्षा, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील प्रश्नोत्तराचे कार्यक्रम यांमुळं सामान्यज्ञान हा परवलीचा शब्द बनला आहे. जनरल नॉलेज हे काही एका दिवसात पाठ करून प्राप्त होणारं ज्ञान नव्हे. विशेषत: वैज्ञानिक माहिती मिळवताना अगदी एकाच प्रश्नाचं उत्तर माहिती करून घेताना आजूबाजूचे संदर्भ माहिती झाले, तर उत्तर लक्षात ठेवणं सोपं जातं. तिखटाचा तिखटपणा मोजण्याचं परिमाण कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तिखट खाणायांना देता येणार नाही; पण हे पुस्तक वाचणारा ते उत्तर नक्कीच देऊ शकेल. हे पुस्तक म्हणजे अशा बयाच चित्रविचित्र वैज्ञानिक माहितीचे आणि भौगोलिक प्रश्नांच्या उत्तरांचे भांडार असल्याने ते घरोघरी नक्कीच उपयुक्त ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 10-06

    असंख्य ज्ञानक्षेत्रांची ओळख करून देणारे पुस्तक... कौन बनेगा करोडपतीमुळे सध्या सामान्य ज्ञान किंवा आपल्या नेहमीच्या सोप्या मराठीत जनरल नॉलेजला एकदम बरकतीचे दिवस आले आहेत. करोडपतीच्या चालीवर इतर नटांचेही तसेच कार्यक्रम चालू झाले आहेत. हे सगळे कार्यक्र न चुकता पाहून आणि विविध नियतकालीकांनी तत्परतेने सुरू केलेले जनरल नॉलेजचे स्तंभ वाचून करोडपती बनण्याची स्वप्ने बघणारे लोक घरोघर आहेत. या असल्या जनरल नॉलेजमधून कदाचित माहिती वाढत असेल, पण ज्ञान वाढत नाही. ‘यू.एफ.ओ. म्हणजे काय,’ या प्रश्नाच्या उत्तरातून अनआयडेंटिफाईड फ्लार्इंग आब्जेक्ट हे त्या शब्दाचं दीर्घरूप म्हणजेच उडत्या तबकड्या एवढीच माहिती मिळेल; पण उडत्या तबकड्या ही काय भानगड आहे, हे अजिबात कळणार नाही. आणि प्रश्नोत्तरांच्या असल्या ठरीव कार्यक्रमांमध्ये बसूदेखील शकणार नाही असं ज्ञानाचं क्षेत्र तर अफाट आहे. उदाहरणार्थ, माणसांच्या अंगावर प्राण्यांप्रमाणे केस का नसतात? कुत्री झोपण्यापूर्वी स्वत:भोवती वर्तुळाकार का फिरतात? जाड माणसं अधाशी असतात का? उचकी कशामुळे लागते? पैसा कसा जन्मला? बेडूक फक्त चिखलात राहतात का? या झाल्या आपल्या सभोवतालच्या जगात हरघडी दिसणाऱ्या घटना. शिवाय आज आपल्या नित्य परिचयाच्या झालेल्या, पण दोन-तीनशे वर्षांपूर्वी अस्तित्वातच नसलेल्या वैज्ञानिक शोधांबद्दलचे ज्ञान, ऐतिहासिक काळापासून आजपर्यंत सतत घडत असलेल्या घटनांबद्दलचे ज्ञान, मानवाच्या काही स्वभावैशिष्ट्यांचे ज्ञान, असे ज्ञानाचे क्षेत्र सतत वाढतच जाते. एखाद्या क्षेत्राबद्दलचे ज्ञान आपण मिळवायला लागलो की लक्षात येते, आपले अज्ञानच अफाट आहे. म्हणूनच न्यूटनसारखा महान शास्त्रज्ञही एकदा म्हणाला होता की, मी आजवर मिळवलेले ज्ञान म्हणजे ज्ञानाच्या अफाट पसरलेल्या सागराच्या काठावरचा वाळूचा एक कण आहे. विविध विषयांवर सतत लिखाण करणारे सुप्रसिद्ध स्तंभलेखक निरंजन घाटे यांचे प्रस्तुत ‘जिज्ञासापूर्ती’ हे पुस्तक म्हाजे माणसाला नेहमीच कुतूहल वाटणाऱ्या विविध क्षेत्रांमधल्या नाना प्रकारच्या ज्ञानाचा संग्रह आहे. या पुस्तकात दिलेली माहिती वाचल्यानंतर केवळ प्रश्नोत्तरांच्या पोपटपंचीपेक्षा बराच जास्त, बराच सखोल असा ज्ञानाचा खजिना वाचकाला मिळतो. अर्थात या सखोलतेला मर्यादा आहेच. लेखक सर्वसामान्य वाचकासाठी लिहितो आहे. त्यामुळे त्या वाचकाला पचेल, रुचेल, ज्ञानाबरोबरच त्याचं मनोरंजनही होईल, त्या त्या विषयातले वाचकांचे कुतुहल वाढून त्या विषयावरचं आणखी मोठे आणि तपशीलवार पुस्तक वाचण्याची इच्छा वाचकाच्या ठायी निर्माण होईल, अशा रोखाने हे लेखन केलेले आहे. दाढीचा इतिहास, वस्तऱ्यांचा इतिहास, कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला, इजिप्तची प्रसिद्ध राणी क्लिओपात्रा, येशू खिस्त खरोखरच खिसमसच्या दिवशी जन्मला का? असे ऐतिहासिक विषय यात आहेत. पृथ्वीचे दिवसेंदिवस तापत जाणारे वातावरण, पृथ्वीवर येणारे हिमयुग, प्लास्टिकचे प्रदूषण, ट्रान्झिस्टर, मंगळावरची सजीव सृष्टी, चंद्रावरचे पाणी, विश्वाचे वय असे वैज्ञानिक विषय आहेत. माणसाच्या अंगावर केस नसणे, माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहणे, माणसाला टक्कल पडणे, माणसाला गुलाबाचे फूल सर्वाधिक आवडणे असे मानवी वर्तनाशी संबंधित विषय आहेत. आपले हे विश्व : म्हणजे कल्पनातीत चित्रविचित्र वस्तूंचा एक अफलातून अजबखाना आहे ही गोष्ट जिज्ञासापूर्तीमधल्या तऱ्हेतऱ्हेच्या विचित्र गोष्टी वाचल्यावर अधिकच पटू लागते. अशा विचित्र गोष्टी आणखी माहिती करून घ्याव्यात आणि आपले सामान्य ज्ञान अद्ययावत करावे अशी जिज्ञासा वाचकांच्या मनात निर्माण होते. आपल्याकडची शिक्षणपद्धती ही पोटार्थी माणसे निर्माण करते. आपल्याला विविध प्रकारचे, विविध क्षेत्रांचे ज्ञान मिळावे ही माणसाची नैसर्गिक इच्छा या शिक्षण पद्धतीत मारून टाकली जाते. या शिक्षणपद्धतीचा कर्ता लॉर्ड मेकॉले याचे तेच उद्दिष्ट होते. म्हणून तर स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाल्यानंतरही आमच्या समाजात ज्ञानवंतांपेक्षा पोटभरून लोकच जास्त आहेत. युरोप आणि अमेरिका आमच्यापेक्षा प्रगत आहेत याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिथल्या समाजाची अफाट ज्ञानपिपासा. तिथल्या शाळा-महाविद्यालयांमधून अक्षरश: असंख्य ज्ञानक्षेत्रांचा सखोल अभ्यास सतत सुरू असतो. त्यांचे वैज्ञानिक चंद्रावर पाय ठेवतात हे उगीच नाही. आमच्याकडचे हुशार लोक चंद्राची तुलना आपल्या प्रेयसीच्या मुखड्याशी करण्यातच सगळी बुद्धी वाया घालवीत असतात. अशा पोटभरू मानसिकतेतून वाचकाला बाहेर काढून त्याला असंख्य ज्ञानक्षेत्रांची ओळख करून देणारे, त्या ज्ञानक्षेत्रांबद्दलचे कुतूहल त्यांच्या मनात जागवून आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात आणखी खोल शिरण्याची इच्छा त्याच्या मनात जागवणारे असे हे पुस्तक आहे. मुखपृष्ठ, मांडणी, मुद्रण आदी तांत्रिक बाबी उत्कृष्ट. मेहता पब्लिशिंग हाऊसची आणखी एक उत्तम, दर्जेदार निर्मिती. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Rating StarDAINIK KESARI 06-06-2004

    बहुविध विषयांमधील ‘जिज्ञासापूर्ती’... जिज्ञासा हा मनुष्यस्वभावाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला सतत काही ना काही प्रश्न पडत असतात. ते विज्ञानाशी संबंधित असतात, इतिहासाशी, भूगोलाशी वा संस्कृतीशी नि प्रश्न पडला की त्याचे उत्तर शोधण्यासाठी तो धडपडतो. अा सर्व जिज्ञासूंसाठी निरंजन घाटे यांनी ‘जिज्ञासूपूर्ती’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. केवळ प्रश्न नि त्याचे ठोकळेबाज उत्तर असला हा प्रकार नव्हे. तर साठ वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देताना त्या विषयाशी निगडीत अन्य माहितीही घाटे देतात. घाटे हे आघाडीचे विज्ञानलेखक असले तरी प्रस्तुत पुस्तकात केवळ विज्ञान विषयकच माहिती आहे असे नव्हे. म्हणजे प्राणवायू कोठून येतो, हे सांगतानाच घाटे दुसऱ्या एखाद्या प्रकरणात ‘दाढी महात्म्य’ ही सांगतात. पृथ्वीच्या वातावरणाच्या वाढत्या तापमानापासून मंगळवार सजीव आहेत की नाही, येथपर्यंत बहुविध विषयांना लेखकाने स्पर्श केला आहे. नोबेल पारितोषिक सर्वांना ठाऊक असते; पण इग्नोबल पारितोषिकाविषयी या पुस्तकात वाचायला मिळेल. इव्हच्या ‘सफरचंदा’च्या गोष्टीतील. अन्वयार्थ ते उलगडून दाखवितात. येशू खिस्ताचा जन्म २५ डिसेंबर नव्हे, तर जुलै किंवा ऑक्टोंबरमध्ये झाला असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे, त्याविषयी ते लिहितात (पृ. ७९) तेथेच ट्रान्झिस्टरने जग बदलल्याचे दाखलेही देतात. (पृ. १११) विषयांमधील वैविध्यतेमुळे प्रत्येकाला त्यात आपल्याला हवे ते काही ना काही अवश्य मिळेल. जिज्ञासूंना आपली जिज्ञासापूर्ती झाल्याचा अनुभव येईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more