* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GIVING AN ACCOUNT OF THE LIFE OF A SURGEON, THIS BOOK LOOKS AT WHAT IT IS LIKE TO CUT INTO PEOPLE`S BODIES AND THE - LITERALLY LIFE AND DEATH - DECISIONS THAT HAVE TO BE MADE. IT INCLUDES CHRONICLES OF OPERATIONS THAT GO WRONG; OF DOCTORS WHO GO TO THE BAD; WHY AUTOPSIES ARE NECESSARY; AND WHAT IT FEELS LIKE TO INSERT YOUR KNIFE INTO SOMEONE.
सत्य घटनांबद्दल लिहिताना डॉ. अतुल गवांदे आपल्या मनाची अशी काही पकड घेतात की वाटते, वैद्यकशास्त्रविषयाची माहिती मिळवण्यासाठी ते त्याचीच चिरफाड करत आहेत. खरं पाहता, सर्वसामान्यांच्या मनात या शास्त्राविषयी एक प्रकारची उदात्ततेची भावना असते. गवांदे मात्र आपल्यासमोर वास्तव ठेवतात, ते त्याच्या मूळ स्वरूपात. हे वास्तव अत्यंत गुंतागुंतीचे असते, गोंधळात टाकणारे असते आणि कमालीचे मानवी असते. ज्या वेळी हे शास्त्र संदिग्ध स्वरूपाचे असते, उपलब्ध माहिती अगदी मर्यादित असते, जोखमीचे प्रमाण मोठे असते अन् तरीही निर्णय घेणे अपरिहार्य होऊन बसते, तेव्हा गवांदे आपल्यापुढे सगळी परिाQस्थती उघडपणे मांडतात, कसलीही लपवा-छपवी करत नाहीत. रुग्णांच्याच नव्हेत; तर डॉक्टरांच्या नाट्यपूर्ण कथाही ते आपल्याला सांगतात तेव्हा त्यामागचा हेतू सत्यशोधनाचा आहे, असे जाणवते. डॉक्टरांच्या हातून घडणाNया चुकांमागची कारणे ते आपल्याला प्रामाणिकपणे सांगतात, चांगल्या शल्यविशारदांना रसातळाला नेण्यामागील कारणांची ते शहानिशा करतात, अनाकलनीय असे वास्तव समोर ठाकल्यानंतर वैद्यकीयशास्त्र त्याला कशा प्रकारे तोंड देते, हे प्रश्न सामान्य वाचकांना गवांदे यांनी सांगितल्यामुळेच कळतात, असे म्हणता येईल. ‘कॉम्प्लीकेशन्स’ हे पुस्तक वाचताना एका बाजूला अतिशय कणखर मनोवृत्तीचे दर्शन घडते, तर दुस-या बाजूला मानवतेचा ओलावाही जाणवतो. वैद्यकीय विषयावरील हे पुस्तक एका वेगळ्याच पठडीतले आहे, असेही मनात येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JIVJITHEGUNTALELA #COMPLICATIONS #जीवजिथेगुंतलेला #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR नीला चांदोरकर DR.ATUL GAWANDE डॉ.अतुल गवांदे"
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 7-9-2013

    `जीव जिथे गुंतलेला...’ हे डॉ. अतुल गवांदे यांचे मूळ इंग्रजी अनुभवकथन. त्याचा मराठीत अनुवाद नीला चांदोरकर यांनी केला आहे. वैद्यकीय व्यवसायात तंत्रज्ञानाचा कितीही शिरकाव झाला असला, तरी त्याचा पाया अजूनही अधांतरीच आहे. रुग्णाचा जीव वाचवणेहे डॉक्टरचे कामअसले, तरी तोही माणूस असतो. त्याच्या कडूनही चुका होऊ शकतात किंवा कधी कधी काही विचित्र गोष्टींना डॉक्टरांना सामोरे जावे लागते. अशा वेळी समोर असलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने केलेले प्रयत्न योग्य ठरल्यास रुग्ण आनंदाने घरी जातो किंवा ते प्रयत्न चुकल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. वैद्यकीय क्षेत्रात अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी सातत्याने घडत असतात. डॉ. अतुल गवांदे यांनीही त्यांच्या आजवरच्या प्रवासात अशा गुंतागुंतीच्या गोष्टी अनुभवल्या. त्यांचेच कथन म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकाचे तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात डॉक्टरांच्या चुका कशामुळे होतात, एक नवशिका डॉक्टर हातात सुरी घेऊन कापाकापी करायला कसा शिकतो, कोणाला चांगला डॉक्टर म्हणता येईल याबद्दल उदाहरणांच्या साहाय्याने चर्चा केली आहे. दुसऱ्या भागात वैद्यकशास्त्रातील गूढ आणि अज्ञात गोष्टींचा उल्लेख केला आहे. अशा गोष्टींना सामोरे जाताना डॉक्टर काय प्रयत्न करतात याबाबत चर्चा आहे. चुकांमधून काहीही न शिकता येणं हे अपयश असतं, त्यामुळे तुम्ही चुका सुधारुन कसा मार्ग काढता, यावर यश अवलंबून असते, असे लेखक म्हणतात. लेखकाला आजवर भेटलेल्या रुग्णांच्या (नावे बदलून) सत्यघटना या पुस्तकात दिल्यामुळे पुस्तक अधिक वाचनीय होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more