* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JOHAR MAI BAAP JOHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981964
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 350.00 gms
  • Pages : 352
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MANJUSHREE GOKHALE COMBO SET -11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK TRULY PROVES TO ITS TYPE OF BEING A NOVEL. WHILE AS A NOUN IT IS NOVEL, AS AN ADJECTIVE IT IS NOVEL TOO; SIMPLY SUPERB. `JOHAR`IS THE SYNONYM OF `HAYAT`, IT IS THE WAY IN WHICH THE LOWCASTE PEOPLE USED TO GREET THE HIGHCASTE AND HIGHCLASS PEOPLE BY BOWING DOWN BEFORE THEM AND OFFERING A `NAMASKAR`USING THEIR RIGHT HAND. CENTURIES BEFORE, THERE WAS A TERRIBLE DISCRIMINATION BETWEEN THE CLASSES AND MASSES. CASTEISM PREVAILED IN THE SOCIETY THEN. IT WAS BELIEVED THAT ONLY THE HIGHCASTE PEOPLE HAVE THE RIGHT TO ENTER THE TEMPLES. UNTOUCHABILITY WAS THE MOST AGHAST WAY OF MISTREATMENT. SANT CHOKHA MELA WAS BORN THEN. JOHAR… THE TRUE STORY OF CHOKHA MELA, WHO WAS BORN IN THE `MAHAR`COMMUNITY IN THE 16TH CENTURY. THE INTIMACY HE FELT TOWARDS LORD VITTHALA TOOK HIM TO SUCH HEIGHTS THAT EVEN THE GOD HIMSELF HAD TO COME TO VISIT HIM…. OFTEN. ONE OF THE MOST DEDICATED DEVOTEES, CHOKHA HAD TO PROVE HIS TRUE INTENTIONS TOWARDS THE GOD AGAIN AND AGAIN. HE HAD TO ENDURE WORST HARDSHIPS WHILE DOING SO. THOUGH BORN IN A MAHAR FAMILY, HE WAS SUPPORTED BY HIS PARENTS AND LATER BY HIS WIFE. THEY ALSO DEVOTED THEMSELVES TO LORD VITTHALA. BUT CHOKHA WAS LAST TO LEAVE THIS WORLD. IT WAS ONLY WHEN HE HAD NO OTHER THOUGHT BUT THAT OF LORD VITTHALA THAT HIS SOUL WAS ALLOWED TO LEAVE THE BODY, THAT TO AFTER EXPERIENCING THE UTMOST SORROW OF LIFE AND HARDSHIPS. HE HAD FALLEN PREY IN THE CLUTCHES OF DESTINY. IT WAS ONLY AFTER HIS DEATH THAT HIS SOUL WAS PRAISED AND COULD BECOME ONE WITH THAT OF THE GOD HIMSELF. THIS NOVEL IS THE MIRROR TO THE CONTEMPORARY THINKING, THE STRICT DIVISION OF THE SOCIETY BASED ON CASTE, THE ADVERSITY, AND THE MISFORTUNE THAT THE LOWERCLASS PEOPLE HAD TO SUFFER. THE AUTHOR HAS AN ENDLESS POWER TO CAPTIVATE THE MINDS OF THE READERS. HER ASTUTE THOUGHTS REFLECT A CONTINUOUS FLOW OF EMOTIONS. SHE SUCCEEDS IN CARRYING OUR MINDS INTO THE PERIOD OF THE LAST CENTURIES. ONCE A `TRUE READER`STARTS READING THIS BOOK, HE OR SHE WILL NEITHER BE ABLE TO CONTROL THE GUSH OF EMOTIONS NOR THE TEARS.
चोखोबा तर कधीपासून या दिवसाची प्रतीक्षा करत होता. दीपमाळ तर कधीच बांधून झाली होती. सगळ्या पणत्यांतून तेलवात घालून झाली, तेव्हा शुक्राची चांदणी आकाशात दिसत होती. दोन्ही दीपमाळांवरच्या सगळ्या पणत्यांच्या वाती त्यानं पेटवल्या आणि क्षणार्धात सारा आसमंत तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाला. त्या गहिया अंधारात त्याची आभा क्षितिजापर्यंत पोहोचली आणि क्षितीजही प्रकाशमान झालं. चंद्रभागेच्या पाण्यावर उठणाया तरंगांमध्ये त्या पणत्यांची लक्षावधी प्रतििंबबं हिंदकळून परावर्तित झाली आणि त्यांच्या तेजानं चंद्रभागा नदीचा कणन्कण जणू थरारला. दोन्ही काठ लख्ख उजळून निघाले. चंद्रभागेचं सगळं पाणी लखलखत होतं आणि चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर अंगभर पणत्यांचं प्रकाशमंडळ लेवून लखलखणाया दोन दीपमाळा उभ्या होत्या. त्या पणत्यांच्या प्रकाशानं चंद्रभागेचं पाणी तेजाळलं होतं. परिसरातल्या साNया अंधकाराला छेदत प्रकाशाची ती रेषा सगळा आसमंत उजळून टाकत होती. अंधकाराला छेदत ती प्रकाशरेषा चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर वसलेल्या पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराच्या गाभायापर्यंत पोहोचली. विठ्ठलाची अवघी मूर्ती उजळली. विठ्ठलाच्या सावळ्या मूर्तीवर तर ते प्रकाशाचे बिंदू अंगभर लेवून जणू दिमाख मिरवीत होते. पूजा बांधण्याच्या आधीच विठ्ठलाची ती सावळी मूर्ती विलक्षण देखणेपणा घेऊन उजळली होती. त्या तेजस्वी कणात न्हाऊन निघालेल्या विठ्ठलाच्या सावळ्या चेहयावर एक विलक्षण हास्य विलसत होतं. काय नव्हतं त्या हास्यात? विलक्षण समाधान, विजयाचा कैफ, लाडक्या भक्ताबद्दलचा ओसंडून वाहणारा अभिमान, त्याचा संकल्प सिद्धीस गेल्याबद्दलचा आनंद आणि चिकाटीनं त्यानं ते काम पूर्ण केलं, त्याबद्दलचं कौतुक!
* खामगाव येथील `कै.वरणगावकर` स्मृती पुरस्कार, २०१२. * संत गाडगेमहाराज अध्यासन पुरस्कार २०१४.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MANJUSHRIGOKHALE #TUKYACHIAVALI #JOHARMYBAAPJOHAR #OMKARACHIREKHJANA #DNYANSURYACHISAVALI
Customer Reviews
  • Rating StarUjjwala Dharma

    आताच संत चोखामेळा यांच्या जीवनावरील कादंबरी "जोहार मायबाप जोहार"ही वाचून संपवली। मंजुश्री गोखले यांनी ही सुंदर,मनोवेधक कादंबरी लिहिली आहे।मला संत चोखामेळा यांच्याबद्दल फारच थोडी माहिती होती। अगदी मोजके अभंग माहिती होते।पण या कादंबरीने त्यांचा मनाला पळ पाडणारा,डोळ्यात वेळोवेळी पाणी उभे करणारा जीवनपट उभा केला।लहानपणची अंधुक आठवण आहे-गावातील संडास स्वच्छ करायला माणसे यायची त्याची।आता आठवले तरी काटा येतो अंगावर आणिएक माणूस दुसरया माणसाला इतका हीन कसा लेखू शकतो याची शरम वाटते।लेखिकेने तो सगळा काळ इतका सुंदर चितारले आहे।चोखोबांचं रोजचं जीवन,पदोपदी आलेल्या अडचणी, समाजाकडून झालेले भयंकर हाल आणि या सगळ्यातून त्यांचा विठ्ठलावरचा अढळ विश्वास आणि ती निस्वार्थ ,निष्पाप,निर्मळ भक्ती। नमन,शतशहा नमन चोखोबा तुम्हाला। ...Read more

  • Rating Starशुचिता फडके

    हे पुस्तक विक्रीकरता उपलब्ध झाल्यावर केवळ आठ दिवसातच वाचायला मिळालं. लोकसखा ज्ञानेश्वर वाचलं असल्यामुळे संतांबद्दल पुस्तकं वाचावीशी वाटत होतीच. त्या उत्सुकतेपोटी जोहार मायबाप जोहारदेखील हाताळायला घेतलं आणि पहिल्या पानापासून जाणवली ती लेखिकेची आत्मियत, तळमळ. एकदा हातात घेतलेलं पुस्तक खाली ठेवलं, तेच मुळी अर्धा प्रहर रात्र उलटून गेल्यावर. सरळसोप्या भाषेत लिहिलेली चोखामेळ्याची ही गोष्ट काळजाला स्पर्शून गेली. सारखं वाटत राहिलं, की का अशी जीवघेणी उपेक्षा त्यांच्या वाट्याला यावी? का अशी जन्माने जात ठरावी? अनंत प्रश्न, रडून थकलेले डोळे आणि चोखामेळोबद्दलच्या तीव्र सहानुभूतीने गच्च भरलेले मन यापैकी कुणाचं पारडं जड होतं ते जाणण्यात उरली रात्र सरली. पहाटे मात्र जाणवलं एक समाधान. एक सुंदर कलाकृती वाचायला मिळाल्याचा आनंद. विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या या भक्तश्रेष्ठाच्या जीवनाबद्दल अतिशय सुरेख माहिती मिळाली आणि प्रकर्षाने जाणवलं की समाजव्यवस्थेमुळे काही विशिष्ट जातीच्या लोकांना काय काय सोसावं लागलं. पुस्तकातील वेदनेचा भाग जितका भिडतो तितकाच विठोबा-रुक्मिणीमधील बंध भावतो. मंजुश्रीतार्इंनी इतकी सुंदर कलाकृती निर्माण केली आहे. भक्तीचा इतका अप्रतिम अविष्कार प्रसवला आहे, की वाटतं, त्यांनी संत चरित्र हा एकमेव उद्देश समोर ठेवावा आणि बहुप्रसवा व्हावे. ...Read more

  • Rating Starसौ. कांचन साठ्ये, पुणे

    नुकतेच एक चांगले पुस्तक वाचनात आले, `जोहार माय बाप जोहार`. या कादंबरीत चोखामेळा यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवला आहे. भारताच्या संतपरंपरेतील एक रत्न म्हणजे संत चोखामेळा. अस्पृश्य समाजात जन्म घेऊन विठ्ठल या देवतेची निस्सीम भक्ती करणारा हा संत. त्याकळात पुरोहित वर्गाचे विशेषत: बडव्यांचे प्राबल्य असताना कुठलीही कटुता न येऊ देता मरेपर्यंत आपली विठ्ठलाशी असलेली तन्मयता त्याच्या जीवनपटात दिसते. विठ्ठलाचा हार चोरल्याचा आरोप हा चोख्याच्या आयुष्यातला सर्वात दु:खद प्रसंग. दलित असूनही त्याच्या अभंगातून डोकावणारा अभ्यास थक्क करून जातो. अविनाशी आत्मा हा विषय त्याच्या अभंगातून अतिशय सहजपणे हाताळलेला दिसतो. त्याच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत वर्णन केला आहे. त्याचे अभंग, सेवा, संत सहवास, संतांनी केलेली पाठराखण या सर्वच गोष्टींचा उल्लेख यात आला आहे. कादंबरीचा हृद्य शेवट वाचताना मन भरून आले. प्रकाशकांनी चांगले साहित्य मूल्य असलेली अशी पुस्तके वाचकांना द्यावीत ही अपेक्षा. ...Read more

  • Rating StarPROF B. V. CHOUKHANDE

    आपण लिहिलेलं ‘जोहार मायबाप जोहार’ पुस्तक वाचलं. वाचता वाचता वेचता येणारं लिखाण भासलं. वाचकाला पुढे खेचत नेणारी लेखणी आपली शैली सुखावणारी. त्याच वेळी डोळ्याला धारा लावणारी. चोखोबा मुळात एक उपेक्षित वर्णातील त्यामुळे त्यांचेवर लिहिणारे आजच्या परिस्थिती कमी. बरं आपण हातात घेतलेला हा विषय आपला परिचय करून देणारा भावतो. आपली मांडणी, प्रत्येक प्रसंग शिवाय कोल्हापूरचे असून त्यांचे मूळगाव (मेहुणा) बुलढाणा जिल्ह्यातील शब्दाची मांडणी लिहिताना ‘डफ’ झाली त्यामुळेच भक्तीचा रंग चढला. कालातीत ग्रंथावर भाष्य करणारे लेखक पुढे येतात अन् अप्रतिम दस्तऐवज वाचकासमोर मांडतात यात त्यांचं अभिनंदनीय कर्म श्रेष्ठ ठरतं. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more