* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
S STORY TAKES PLACE IN THE CITY OF MYSORE. SOMESHWAR, OUR HERO IS AN ARCHITECT WHO HAS LOST HIS WIFE A FEW YEARS BACK. INTENDING TO START ANEW HE SHIFTS HIS BASE FROM MUMBAI TO MYSORE; FROM A WELLSETTLED BUSINESS TO A FRESH START.AMRITA, A MARRIED WOMAN WITH TWO YOUNG CHILDREN STAYS ALONE IN HER FARM HOUSE WITH THE TWO CHILDREN AND IS A LECTURER IN THE COLLEGE. DESTINY BRINGS SOMESHWAR AND AMRITA TOGETHER. THOUGH MARRIED, AMRITA DOES NOT LIVE WITH HER HUSBAND RANGA. RANGA’S SISTER IS AMRITA’S AUNT. AMRITA HAS LOST HER MOTHER WHEN SHE WAS VERY YOUNG. HER AUNT GRADUALLY TAKES POSSESSION OF AMRITA’S HOUSEHOLD AND HER FATHER TOO. SHE CONCEIVES A CHILD FROM HIM. AMRITA AND SOMESHWAR GET TIED UP IN A BOND. BUT THERE ARE TOO MANY HURDLES IN THEIR WAY. THE WORST OF ALL IS HER NATURE. SHE IS TOO HOT TEMPERED AND POSSESSIVE ABOUT HIM. MANY A TIMES, SOMESHWAR DECIDES TO LEAVE HER FOR BETTER, WIND UP EVERYTHING FROM MYSORE AND GO BACK TO MUMBAI. ONE DAY, HE DOES SO. BUT HE COMES BACK TO MYSORE. HOW, WHY, WHEN…………….. READ THIS IN KAATH.
अमृता आणि सोमशेखर यांच्या नात्याच्या माध्यमातून लेखक काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. व्यक्तीला आयुष्यात नक्की काय हवे असते? स्त्रीपुरुषांना परस्परांकडून नक्की काय हवे असते? खरे प्रेम म्हणजे काय? मनोविकारांना आरंभ कसा होतो? अशा प्रकारच्या नात्यांना आपण एका साच्यात किंवा विवाहाच्या चौकटीत बसवू शकतो का? असे असेल, तर मग या नात्यांचे भवितव्य काय? अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा विचार करायला लावण्यातच या कादंबरीच्या यशाचे खरे गमक आहे! डॉ. अंजली जोशी मानसोपचार तज्ज्ञ
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating Starवाचक

    डॉ. एस. एल.भैरप्पा यांची कन्नड कादंबरी, अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे ... डॉ. अमृता आणि सोमशेखर या दोघांची ही गोष्ट आहे , सध्या संदीप रेड्डी वांगा या दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या चित्रपटांवर वाद सुरू आहे की तो Toxic Masculinity ला promote करतो, Toic femininity काय असू शकते हे अमृताच्या कॅरेक्टर वरून समजून जाईल, तिच्या स्वभावाचे विविध पेलू आपणास पाहायला मिळतात त्याउलट सोमशेखर अगदी शांत संयमी , दोघांची फुलत जाणारी प्रेमकहाणी त्यात नैतिक आणि अनैतिकतेचे पेलू खूप चांगल्या प्रकारे मांडले आहेत. Anxiety, depression, suicidal ideation, sadism, mood swings हे सर्व अमृताच्या character मध्ये दिसून येते ... शेवट अगदी अनपेक्षित आहे नक्की वाचावी अशी कादंबरी... #वाचनवेडा #भैरप्पा ...Read more

  • Rating StarPinesh Jadhav

    काठ - स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कट, मनोवेधक मांडणी ! म्हैसूरमध्ये, गावाच्या अगदी बाहेर अत्यंत विरळ वस्तीत असलेली जुनी बंगली. एकदा बांधल्यावर दुसऱ्यांदा कधीही रंगरंगोटीचा हात न फिरल्याची स्पष्ट लक्षणं दखवणाऱ्या, पण कधीकाळचं जुनं वैभव अभिमामानाने मिरवणाऱ्या त्या घराची मालकीण आहे डॉ. अमृता..! अमृता कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.ती आणि तिची दोन मुले त्या घरात राहत आहेत ! अमृता सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू होतो. मोठा कॉफीचा मळा आणि जमीन-जुमला या इस्टेटीच्या लोभाने तिची काकू त्यांच्या घरात प्रवेश करते. "आता,अमृताला मी सोडून कोण आहे?" असा प्रश्न करत अमृताला सांभाळण्याची जबाबदारी काकू स्वतःवर घेते. पुढे,जाऊन अमृता वीस वर्षाची होताच, काकू तिचे लग्न रंगनाथबरोबर लावून देते. रंगनाथ काकूचा सख्खा भाऊ असतो ! इस्टेटीच्या पैशातूनच डोनेशन भरून रंगनाथला काकूने इंजिनियर केलेले असते ! त्याच गावात अलीकडेच, सोमशेखर नावाचा आर्किटेक्ट राहायला आलेला असतो. मुंबईमधलं वास्तव्य आणि तिथली कामं यांचा पराकोटीचा कंटाळा आल्यामुळे मुंबईमधल्या दहा वर्षाची फिकीर न करता तो म्हैसूरला आला होता. डोके वर करून आकाशात पाहिले असता, नजरेस पडणारे निळेशार आकाश, गावाच्या थोडे बाहेर गेल्यावर हिरव्यागार झाडांनी वेढलेली चामुंडी टेकडी....! - त्याला घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटत होता. आपल्या जुन्या बंगल्याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्या निमित्ताने डॉ.अमृता आणि सोमशेखरची भेट होते.. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड, `साहित्य अकादमी पुरस्कार विजेते` कादंबरीकार आहेत.त्यांनी तत्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. `आवरण` या त्यांच्या कादंबरीचे चार वर्षांत 34 आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दिवाळीत पुस्तक खरेदीच्या वेळी यादीत त्यांचे एक तरी पुस्तक असणार- हे नक्की केले होते. मानसशास्त्र आवडीचा विषय आणि लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक या दोन गोष्टींमुळे हे पुस्तक अंतिम यादीत निश्चित केले होते. या कादंबरीची नायिका अमृता मुळात खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी, आपले स्वतःचे ठाम मत असणारी आहे. पण, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले असताना, काकूंकडून झालेल्या अनपेक्षित फसवणुकीमुळे तिचे अंतरंग ढवळून निघाले आहे. ` आपण ज्याला अगदी जवळचं मानतो, ती व्यक्ती अशीही वागू शकते?` या प्रश्नाने तिच्या मनात कायमच वेदनेचे काहूर दाटून राहतात. दोन जीवांच्या विश्वासावर लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते ! अमृताचा हा प्रवासही अविश्वासाच्या पायरीने सुरू होतो ! कादंबरीचा आवाका जास्त मोठा नाही. पात्रेही मोजकीच आहेत. दोन प्रमुख पात्र आणि थोडे अजून सहकलाकार घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अशावेळी संवादांना अर्थातच महत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे, अमृता आणि सोमशेखर यांच्यातील अगदी सहज आणि चपखल अशा संवादातून ही कादंबरी पुढे जाते. या जगात सगळयात गूढ गोष्ट कोणती असेल ,तर ती माणसाचे `मन` आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. काही गोष्टी अगदी सुखद अनुभव देणाऱ्या असतात.काही गोष्टींची आठवन सुद्धा आपल्याला नको असते. पण, हे झालं सर्वसामान्य आयुष्य. केव्हा केव्हा आयुष्यात अशा घटना घडतात, की आपले हृदय, मन पिळवटून निघते.मन पोखरून निघते. नैराश्याची भावना तीव्र होत जाते.सगळीकडे विषाद भरून राहतो. नैराश्याच्या भावना योग्य वेळी, योग्य प्रकारे कमी झाली नाही तर मनोविकाराला प्रारंभ होतो. अमृता आणि सोमशेखर यांच्यामधील नात्याचा प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. वर ,आलेल्या पार्श्वभूमीवर हा प्रवास सहजसोपा नसणार हे स्पष्टच आहे. पण लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे.लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याने कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगी पात्र जे ` युक्तिवाद` करतात, तो अतिशय चपखल ठरतो.कादंबरी वाचताना `असाही कोणी विचार करू शकतो?` `माणसाचे मन असेही असू शकते?` असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पात्रांमध्ये एक `मानसिक गुंता` आहे. त्यांच्या मनात जे द्वंद्व चालू आहे त्यामध्ये आपणही सहजरित्या गुरफटून जातो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याही मनाची घालमेल सुरू होते. हा मनाचा गुंता कसा सुटणार ? हे जाणून घेण्यासाठी, कदाचित स्वतःच्याही मनाच्या अंतरंगात बुडून जाण्यासाठी, तुम्हांला ही कादंबरी वाचायलाच हवी ...Read more

  • Rating StarPinesh Jadhav

    काठ - स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कट, मनोवेधक मांडणी ! म्हैसूरमध्ये, गावाच्या अगदी बाहेर अत्यंत विरळ वस्तीत असलेली जुनी बंगली. एकदा बांधल्यावर दुसऱ्यांदा कधीही रंगरंगोटीचा हात न फिरल्याची स्पष्ट लक्षणं दाखणाऱ्या, पण कधीकाळचं जुनं वैभव अभिमामानाने मिरवणाऱ्या त्या घराची मालकीण आहे डॉ. अमृता..! अमृता कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.ती आणि तिची दोन मुले त्या घरात राहत आहेत ! अमृता सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू होतो. मोठा कॉफीचा मळा आणि जमीन-जुमला या इस्टेटीच्या लोभाने तिची काकू त्यांच्या घरात प्रवेश करते. "आता,अमृताला मी सोडून कोण आहे?" असा प्रश्न करत अमृताला सांभाळण्याची जबाबदारी काकू स्वतःवर घेते. पुढे,जाऊन अमृता वीस वर्षाची होताच, काकू तिचे लग्न रंगनाथबरोबर लावून देते. रंगनाथ काकूचा सख्खा भाऊ असतो ! इस्टेटीच्या पैशातूनच डोनेशन भरून रंगनाथला काकूने इंजिनियर केलेले असते ! त्याच गावात अलीकडेच, सोमशेखर नावाचा आर्किटेक्ट राहायला आलेला असतो. मुंबईमधलं वास्तव्य आणि तिथली कामं यांचा पराकोटीचा कंटाळा आल्यामुळे मुंबईमधल्या दहा वर्षाची फिकीर न करता तो म्हैसूरला आला होता. डोके वर करून आकाशात पाहिले असता, नजरेस पडणारे निळेशार आकाश, गावाच्या थोडे बाहेर गेल्यावर हिरव्यागार झाडांनी वेढलेली चामुंडी टेकडी....! - त्याला घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटत होता. आपल्या जुन्या बंगल्याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्या निमित्ताने डॉ.अमृता आणि सोमशेखरची भेट होते.. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड, `साहित्य अकादमी पुरस्कार विजेते` कादंबरीकार आहेत.त्यांनी तत्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. `आवरण` या त्यांच्या कादंबरीचे चार वर्षांत 34 आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दिवाळीत पुस्तक खरेदीच्या वेळी यादीत त्यांचे एक तरी पुस्तक असणार- हे नक्की केले होते. मानसशास्त्र आवडीचा विषय आणि लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक या दोन गोष्टींमुळे हे पुस्तक अंतिम यादीत निश्चित केले होते. या कादंबरीची नायिका अमृता मुळात खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी, आपले स्वतःचे ठाम मत असणारी आहे. पण, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले असताना, काकूंकडून झालेल्या अनपेक्षित फसवणुकीमुळे तिचे अंतरंग ढवळून निघाले आहे. ` आपण ज्याला अगदी जवळचं मानतो, ती व्यक्ती अशीही वागू शकते?` या प्रश्नाने तिच्या मनात कायमच वेदनेचे काहूर दाटून राहतात. दोन जीवांच्या विश्वासावर लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते ! अमृताचा हा प्रवासही अविश्वासाच्या पायरीने सुरू होतो ! कादंबरीचा आवाका जास्त मोठा नाही. पात्रेही मोजकीच आहेत. दोन प्रमुख पात्र आणि थोडे अजून सहकलाकार घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अशावेळी संवादांना अर्थातच महत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे, अमृता आणि सोमशेखर यांच्यातील अगदी सहज आणि चपखल अशा संवादातून ही कादंबरी पुढे जाते. या जगात सगळयात गूढ गोष्ट कोणती असेल ,तर ती माणसाचे `मन` आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. काही गोष्टी अगदी सुखद अनुभव देणाऱ्या असतात.काही गोष्टींची आठवन सुद्धा आपल्याला नको असते. पण, हे झालं सर्वसामान्य आयुष्य. केव्हा केव्हा आयुष्यात अशा घटना घडतात, की आपले हृदय, मन पिळवटून निघते.मन पोखरून निघते. नैराश्याची भावना तीव्र होत जाते.सगळीकडे विषाद भरून राहतो. नैराश्याच्या भावना योग्य वेळी, योग्य प्रकारे कमी झाली नाही तर मनोविकाराला प्रारंभ होतो. अमृता आणि सोमशेखर यांच्यामधील नात्याचा प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. वर ,आलेल्या पार्श्वभूमीवर हा प्रवास सहजसोपा नसणार हे स्पष्टच आहे. पण लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे.लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याने कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगी पात्र जे ` युक्तिवाद` करतात, तो अतिशय चपखल ठरतो.कादंबरी वाचताना `असाही कोणी विचार करू शकतो?` `माणसाचे मन असेही असू शकते?` असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पात्रांमध्ये एक `मानसिक गुंता` आहे. त्यांच्या मनात जे द्वंद्व चालू आहे त्यामध्ये आपणही सहजरित्या गुरफटून जातो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याही मनाची घालमेल सुरू होते. हा मनाचा गुंता कसा सुटणार ? हे जाणून घेण्यासाठी, कदाचित स्वतःच्याही मनाच्या अंतरंगात बुडून जाण्यासाठी, तुम्हांला ही कादंबरी वाचायलाच हवी.....! ...Read more

  • Rating StarVIJAY SARAVATE

    तशी कथा अगदी साधी आहे, पण आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या व्यक्तीच्या मनोविचार आणि विकार खूप विस्तृत पणे मांडले आहेत. त्यामुळे थोडी पुनरुक्ती आढळते, बाकी उत्त्तम.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more