* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KABULIWALAR BANGALI BAHU
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177664492
  • Edition : 3
  • Publishing Year : MARCH 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ONE WELL EDUCATED GIRL FROM A BENGALI BRAHMIN FAMILY MARRIED A FOREIGNER MUSLIM YOUTH AGAINST THE WISHES OF HER FAMILY. SHE WENT TO VISIT HER IN-LAWS STAYING IN A SMALL VILLAGE IN AFGHANISTAN WITH HIGH HOPES AND FAITH. ONCE SHE REACHED THE VILLAGE SHE REALISED THE FACT THAT THERE WERE ROADS TO ENTER THIS COUNTRY BUT NOT TO MOVE OUT OF THE COUNTRY.ALL THE PEOPLE WERE NOT BAD BUT SOME WERE MEAN, SOME WERE SELFISH. SHE WAS IMPRISONED THERE BECAUSE OF SUCH PEOPLE. SHE SUFFERED A LOT DURING THE 8 YEARS OF HER IMPRISONMENT; SHE EXPERIENCED MANY A GOOD AND BAD THINGS. THIS STORY PRESENTS THE HAIR-RAISING EXPERIENCES WHEN SHE TRIED TO RUN AWAY TO INDIA, AWAY FROM HER STAGNANT LIFE THERE, AWAY FROM THE TALIBANI FANATICS AFTER FACING THEIR OPPOSITION COURAGEOUSLY. WE SHIVER TO OUR BONES WHILE READING HER STORY.
बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलींन, सर्वाचा विरोध झुगारून, एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं, आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती मोठ्या विश्वासानं गेली. पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आल कि ह्या देशात येण्यासाठी रस्ता आहे, पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणस वाईट नव्हती, पण काही लबाड, स्वार्थी माणसामुळे तिला तिथे बंदी होऊन राहावा लागल. आठ वर्षाच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव, तिथल साकळलेले जीवन आणि तालिबानसारख्या धर्माणधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची हि कहाणी. तिच्या जीवनाची हि करून कहाणी वाचताना आपणही गोठून जातो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #LEENASOHONI #KABULIVALYACHIBANGALIBAYAKO #MRUNALINIGADKARI #BIOGRAPHYA&TRUESTORIES#SUSHMITABANERJEE
Customer Reviews
  • Rating StarBHAUSAHEB PAWAR

    "काबुलीवाल्याची बंगाली बायको" काल हे पुस्तक वाचायला घेतले आणि पुस्तकं वाचूनच पूर्ण झाले. एका भारतीय महिलेली कहाणी आणि ती ही अफगाणिस्तान सारखा देशामधील खेड्यातील. बंगाल मधील हिंदू कुटुंबातील एक सुशिक्षित मुलींनी सर्वांचा विरोध झुगारून एका परदेश अफगाणिस्तान मधील तरुणाशी लग्न केलं. सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानमधील एका छोट्याशा गावात मोठ्या विश्वासाने ती तिकडे गेली आणि साधारण आठ वर्ष बंदिवासात तिला अफगाणिस्तानमध्ये राहावे लागले. तिला आलेले अनेक बरे भुरे अनुभव या पुस्तकांमध्ये सांगितले आहेत. अफगाणिस्तानतील जीवन, शेती पद्धती, जीवनमान कसे आहे.तालिबान परिस्थितीत हे सर्व या पुस्तकात सांगितलेला आहे आणि आठ वर्षानंतर परत सुस्मिता बॅनर्जी ( भारतात आलेले आहे दोन-तीन वेळेस पळून जाण्याचा प्रयत्न भारतात येण्यासाठी केलेले प्रयत्न या पुस्तकात दिलेले आहेत. ...Read more

  • Rating StarSamir Chavan

    बंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलींन, सर्वाचा विरोध झुगारून, एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं, आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती मोठ्या विश्वासानं गेली. पण तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आल कि ह्या देात येण्यासाठी रस्ता आहे, पण जाण्यासाठी नाही. तिथली सगळीच माणस वाईट नव्हती, पण काही लबाड, स्वार्थी माणसामुळे तिला तिथे बंदी होऊन राहावा लागल. आठ वर्षाच्या ह्या बंदिवासात तिला आलेले भलेबुरे अनुभव, तिथल साकळलेले जीवन आणि तालिबानसारख्या धर्माणधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार ह्यांची हि कहाणी. तिच्या जीवनाची हि करून कहाणी वाचताना आपणही गोठून जातो. ...Read more

  • Rating Starसंदीप रामचंद्र चव्हाण

    घरातील सर्वाचा विरोध झुगारून २ जुलै १९८८ साली बंगाली कुटुंबातील एका सुशिक्षित हिंदू मुलीने एका अफगाणी मुसलमान तरुणाशी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील एका लहानश्या गावात ती नवऱ्याबरोबर मोठ्या विश्वासानंगेली. त्यानंतर थोड्या अवधीतच तिला काहीही पूर्वकल्पना न देता तिचा नवरा तिला अफगाणिस्तानातच सोडून भारतात आला. त्यावेळी तिच्या लक्षात आले की या देशात येण्यासाठीचा मार्ग आहे, पण बाहेर जाण्यासाठीचा नाही. सासरच्या लोकांना भेटायला म्हणून गेलेली ती तरुणी संपूर्ण देशच जणू तुरुंग असलेल्या अफगाणिस्तानात जवळपास आठ वर्षे अडकून पडते. या बंदिवासात तिला अनेक भलेबुरे अनुभव येतात. अफगाणिस्तानातील स्त्रियांचे यातनामय जीवन, अंधारात चाचपडणाऱ्या लहानग्यांचे बालपण, मोठ्या कुटुंबातील गुंतागुंतीचे नातेसंबंध इत्यादी गोष्टी तिला समजतात. तिथल्या आठ वर्षाच्या काळात तिने अनेक हालअपेष्टा, शारीरिक मानसिक छळ सोसला तरीही तिची भारतात परत जाण्याची तीव्र आकांक्षा मात्र कमी झाली नाही. भारतात पळून जाण्याचा फसलेला तिचा पहिला प्रयत्न आणि तरीही हार न मानता जीव धोक्यात घालून पुन्हा पळून जाण्याचा केलेला प्रयत्न यातून तिच्या धैर्याची कल्पना येते. भारतात पळून जाताना शत्रू समजलेल्या (पाकिस्तानी) लोकांनी तीला केलेली मदत आणि पाकिस्तानातील आपल्या (भारतीय) लोकांनी तिला दिलेली मानहानीकारक वागणूक तिच्यासह वाचकालाही अस्वस्थ करते. तालिबानसारख्या धर्मांधाबरोबर निकराचा विरोध करून भारतात पळून येताना सोसावा लागलेला भयंकर थरार अनुभवलेल्या सुश्मिता बॅनर्जी यांच्या जीवनचरित्रातील एक संघर्षपूर्ण भाग म्हणजे `काबुलीवाल्याची बंगाली बायको` हे पुस्तक होय. त्याकाळी अनेक बंगाली मुली लग्न करून अफगाणिस्तान गेल्याने तिथे अडकून पडल्या होत्या असे या आत्मचरित्रातून समजते. सध्या लव्ह जिहादबद्दल देशात खूप चर्चा आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तीस-पस्तीस वर्षांपूर्वीही हा प्रकार चालू होता याची खात्री पटते. शिवाय अफगाणिस्तानातील विदारक स्त्री-जीवनाच्या सत्याचे दर्शनही घडते!! अफगाणिस्तानातील स्त्रियांच्या हक्कासाठी चळवळ उभारण्याचा प्रयत्न केल्यामुळे तालिबानने ५ सप्टेंबर २०१३ रोजी अफगाणिस्तानातील राहत्या घराबाहेर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या केली. या पुस्तकात फक्त अफगाणिस्तानातून भारतात पलायन करण्यापर्यंतच्या घडामोडींचा उल्लेख आहे. भारतात परत आल्यानंतर काय होते? त्या पुन्हा अफगाणिस्तान का जातात? परक्या देशात सोडून गेलेल्या नवऱ्याबरोबर पुन्हा त्या का जुळवून घेतात? इत्यादी माहिती या पुस्तकात नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. ~संदीप रामचंद्र चव्हाण ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 02-05-2004

    सुस्मिता बॅनर्जी यांच्या ‘काबुलीवाला बंगाली बरू’ या बंगाली पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. या पुस्तकात लेखिकेने आपल्या आयुष्यातील काही घटना मांडल्या आहेत. एका अर्थाने हा तिच्या चारित्र्याचा काही अशं आहे. बंगालमधील या हिंदू ब्राह्मण कुुंबातील तरुणीने अफगाणिस्तानातील मुसलमान तरुणाशी विवाह केला. पतीप्रेमापोटी लेखिका सासरच्यांना भेटायला अफगाणिस्तानात गेली. पण तिथे तिची अवस्था तुरुंगातील कैद्याप्रमाणे झाली. हिंदुस्थानातील सुशिक्षित तरुणीची मानसिकता आणि आधुनिक जगापासून खूप दूर असलेल्या असंस्कृत अशिक्षित माणसांमधील संघर्षाची ही कहाणी आहे. आठ वर्षे कैद्याप्रमाणे काढून शेवटी तालिबान्यांना शौर्याने तोंड देऊन ती हिंदुस्थानात परतली. धर्माला जीवनात आणि समाजात श्रेष्ठ स्थान आहे या विचारावर लेखिकेचा विश्वास आहे. पण धर्माच्या नावाखाली पराकोटीची बिर्भत्सता आणि दहशत निर्माण करणाऱ्या निर्विकारपणे माणसांची हत्या करणाऱ्याचे खरे रूप समाजासमोर यावे या हेतूने तिने हे अनुभव लिहिले आहेत. पुस्तक वाचताना तिच्या अपार मनोधैर्याने वाचक थक्क होतो. वागणूक तिथे मिळाली त्या परिस्थितीत सर्वसामान्य स्त्री जगूच शकली नसती. परत येण्याची गोष्टच सोडा. असामान्य धैर्याने मिळेल ते सहकार्य घेत खऱ्याखोट्याचा आधार घेत घेत ती अखेर हिंदुस्थानात येऊन पोहोचते. या कथानकाचा ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ हा चित्रपट यापूर्वीच येऊन गेला आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more