* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386175403
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A PLAYWRIGHT PENS DOWN THE PROBLEMS IN THE SOCIETY AND A VETERAN ACTOR LIKE GANPATRAO JOSHI PERFORMS THE ROLE APTLY. I STRONGLY BELIEVE THAT A GOOD ACTOR IS EQUALLY IMPORTANT LIKE A GOOD WRITER. GANPATRAO WAS ONE SUCH ACTOR. YEARS BACK, ACTORS WERE LOOKED DOWN BY THE SOCIETY. GANPATRAO STOOD FIRMLY TO PROVE HIS ABILITY AND HELPED THE ACTORS TO GAIN PRESTIGE IN THE SOCIETY. FOR THE THIRTY-SIX LONG YEARS THAT HE PERFORMED ON THE STAGE, HE SUCCEEDED IN KEEPING HIS PROBLEMS AT BAY. HE MIGHT HAVE EMBRACED A PEG OR TWO DURING THIS JOURNEY, BUT IT NEVER HAMPERED HIS ACTING SKILLS. ALL THE WHILE, EACH OF HIS PERFORMANCES GAVE IMMENSE HAPPINESS TO PEOPLE ALL AROUND. HE ENJOYED THEATER AND SPREAD HAPPINESS DURING HIS CAREER AS AN ACTOR WHICH ITSELF IS A HERCULEAN TASK. STICKING AROUND TO THE THEATRE IS NOT AN EASY JOB, IT CAN BE COMPARED ONLY WITH THE DILIGENCE THAT ONE TAKES TO FEEL THE PRESENCE OF ALMIGHTY. THE ONCE WHO PERFORMANCE IT IS SIMPLE GREAT. GANPATRAO JOSHI WAS INDEED ONE SUCH PERSON.
लेखक वुंÂभोजकरांचा पहिलाच व्यक्तिचित्र संग्रह. यात जसे चित्रपटांत भूमिका करणारे नट आहेत, तसे नाटकात नामवंत ठरलेले कलावंत आहेत आणि गायिकाही आहेत. उषा चव्हाणसारखी नर्तिकाही आहे. कथालेखक, नाटककार, कवी सर्वांचे व्यक्तिचित्र आत्मीयतेने व रसिकतेने साकारले आहे. जे लिहायचे ते ललित अंगाने लिहायचे, असा कटाक्ष त्यांनी ठेवला आहे. नाटककार हा समाजाची दु:खे मांडतो आणि गणपतराव जोशी यांच्यासारखा कलावंत ती तेवढ्याच ताकदीने प्रेक्षकांच्या मनात उतरवतो. म्हणून मला वाटते, चांगला नट चांगल्या नाटककाराइतकाच श्रेष्ठ असतो. गणपतराव ही तेवढेच श्रेष्ठ होते. नटांना समाज जेव्हा मानत नव्हता, तेव्हा त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती गणपतरावांनी. ज्या रंगभूमीच्या जगात ते सतत छत्तीस वर्षे वावरले, त्या जगात शिरताना स्वत:चे कौटुंबिक दु:ख ते विसरले. कधीतरी हे दु:ख मदिरेच्या प्याल्यात त्यांनी बुडविले असेल; नाही असे नाही. पण लाखो लोकांना कलेचा निर्भेळ आनंद त्यांनी दिला. त्यांचे जीवन आनंदी बनविले. असा आनंद देणे आणि घेणे, ही सामान्य गोष्ट नव्हे. परमेश्वराच्या साधनेइतकीही श्रेष्ठ साधना आहे. अशी साधना करणाNया कलावंताला श्रेष्ठ म्हणायचे नाही, तर काय! गणपतराव जोशी यांना तो मान दिलाच पाहिजे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
PRABHAT FILM #BABURAOPENDHARKAR #GANPATRAO JOSHI #DAJI BHAATVADEKAR #APPA TIPANIS #DINKAR KAMANNA #ANANT DHUMAL #DAMUANNA MALWANKAR #MANIK VERMA #ARTI ANKALIKAR-TIKEKAR #VASANT DESHPANDE #GANGADHARAPANTA LONDHE #MRS. USHA KHANDEKAR #MA. #AVINASH USHA CHAVAN #HANS PICTURES #KALAKAR, R.A. KUMBHOJKAR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL SAPTRANG 18-12-2016

    रा.अ.कुंभोजकर यांनी वेगवेगळ्या कलाकारांविषयी केलेलं हे लेखन. जुन्या काळातले अनेक कलाकार या पुस्तकातून भेटतात, नवी माहिती मिळते. प्रभात फिल्म कंपनी, बाबूराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दिनकर कामण्णा अशा कलाकारांविषयी कुंभोजकर यांनी लिहिलं आहे. उषा चव्हाण,आरती अंकलीकर-टिकेकर अशा कलाकारांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या आहेत. केवळ जंत्री न मांडता त्या त्या कलाकाराचं सामर्थ्य, त्याचं वैशिष्ट्य, त्याच्यासंबंधीचे किस्से, त्या काळचं वातावरण अशा गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत. नाटक, मराठी-हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ या लेखनातून उभा राहतो. ...Read more

  • Rating StarDAINIK MAHARASHTRA TIMES 4-12-2016

    सिनेमा-नाटकांतल्या कलावंतांच्या आयुष्याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता असते. ही उत्सुकता जशी कलावंत म्हणून असते, तशीच त्यांच्या माणूसपणाचीही असते. या उत्सुकतेच्या पुरेपूर कसोटीला उतरणारं पुस्तक म्हणजे रा. अ. कुंभोजकर यांचं अलीकडेच प्रकाशित झालेलं ‘कलाकार :सर्जनशील मनांचा व्यक्तिवेध’. कुंभोजकर यांनी आपल्या या पुस्तकात बाबुराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दिनकर कामण्णा, दामुअण्णा मालवणकर, अनंत धुमाळ, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, दाजी भाटवडेकर, उषा चव्हाण अशा एक काळ गाजवणाऱ्या कलावंतांच्या आयुष्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचाही अतिशय रसाळ वेध घेतला आहे. यातली बहुतेक व्यक्तिमत्त्व ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट जमान्यातली आहेत. कदाचित आजच्या पिढीला यातली अनेक नावं ठाऊकही नसतील. परंतु म्हणूनच आजच्या पिढीसाठी हे पुस्तक अधिक उपयुक्त आहे. आजचं नाटक-सिनेमाचं ग्लॅमर तेव्हाच्या कलावंताना नसेल, परंतु माणूस म्हणून ही कलावंत मंडळी किती मोठी होती, ते कुंभोजकरांनी रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्रणातून अलवार उलगडत जातं. ...Read more

  • Rating StarSMITA PATWARDHAN, SANGLI 22-11-2016

    ‘कलाकार : सर्जनशील मनांचा व्यक्तीवेध’ हे श्री. रा.अ. कुंभोजकर यांचे पुस्तक वाचनीय ललित लेखसंग्रह आहे. महाराष्ट्रातील मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, त्यांची आपल्या व्यवसायाशी असलेली निष्ठा, त्यासाठी त्यांनी केलेले श्रम यांची रोचक आणि वाचनी माहिती या पुस्तकातून मिळते. आताच्या पिढीला ज्ञात नसलेले अनेक कलाकार, त्यांची असामान्य अभिनय क्षमता, दिग्दर्शकांची कल्पकता आणि चित्रपट संस्थाचालकांची कलाकारांना समजून घ्यायची मनोवृत्ती व व्यावसायिक शिस्त या पुस्तकातून वाचकांना समजते. श्री. कुंभोजकर हे सुरुवातीला वि.स. खांडेकरांकडे लेखनिकाचे काम करत होते. खांडेकरांना जवळचे लोक ‘भाऊ’ म्हणत. भाऊंकडे बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, कवी यशवंत यांसारखे अनेक लेखक-कवी भेटायला येत. त्यांच्या साहित्यिक गप्पांतून लेखक बहुश्रुत झाले. त्याच प्रमाणे भाऊंकडून लेखकाला लेखनाचे तंत्र आणि मंत्रही मिळाले. त्याचाच परिणाम म्हणून हे लेख वाचताना वाचक पुस्तकाला चिकटून बसतो. ओघवती भाषाशैली हे या लेखांचे वैशिष्ट्य आहे. कुंभोजकरांनी ‘अमृत’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ या प्रसिद्ध मासिकांमधे सहाय्यक संपादक किंवा कार्यकारी संपादक अशी पदे भूषवली आहेत. बेळगावच्या तरुण भारतच्या रविवारच्या अक्षरयात्रा पुरवणीचे संपादकपदही भूषवले आहे. या वाटचालीत त्यांचा चित्रपट, नाटक आणि संगीत क्षेत्रातील दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर संपर्क आला. त्यातूनच ही व्यक्तीचित्रणे निर्माण झाली. सदर पुस्तकात एकूण १५ व्यक्तीचित्रणे आहेत. ‘प्रभात फिल्म कंपनी’ हा लेख म्हणजे प्रभात फिल्म कंपनीशी जोडलेल्या अनेकांचे एकत्रित व्यक्तीचित्रण आहे. प्रभातचे मुख्य चालक विष्णुपंत दामले, फत्तेलाल, व्ही.शांताराम तसेच प्रभातच्या प्रसिद्ध कलाकारांशी संबंधित घटना पुस्तकात वाचायला मिळतात. प्रभातने सामाजिक महत्वाचे विषय जसे जरठ-कुमारी विवाह हे आपल्या चित्रपटातून मांडले. दिग्दर्शक म्हणून शांतारामबापू कसे होते त्याचे चित्रण प्रभात फिल्म कंपनी या लेखात वाचायला मिळते. प्रभात मधे काम करणार्‍या कलाकारांना आपल्या भूमिकेचे इथे सोने होत आहे याची जाणीव असायची. सध्याच्या तरुण पिढीला यातील बरीचशी नावे माहिती नाहीत. या पुस्तकामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील चित्रपट आणि नाट्यसृष्टीबद्दल बर्‍यापैकी माहिती मिळते. त्यातून अभ्यासूंची उत्सुकता वाढेल. बाबुराव आणि भालजी पेंढारकर यांनी पार्श्वनाथ आळतेकरांच्या सोबत ‘वंदे मातरम’ हा त्याच नावाचा त्यांच्या संस्थेचा पहिला बोलपट काढला. इंग्रजी राजवटीत हा चित्रपट ४ वेळा सेन्सॉर झाला. यावरची लेखकाची टिप्पणी चपखल आहे. ते म्हणतात, ‘चार-पाच वेळा गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची जी अवस्था होईल तीच या चित्रपटाची झाली. तो सपशेल आपटला.’ बाबुरावांनी मुख्यत: खलपुरुष साकारला. पण त्याबरोबर ‘भक्त दामाजी’ मधील विठू महार, ‘अमृत’ मधील कृष्णा चांभार, ‘श्यामची आई’ मधील भाऊराव, ‘महात्मा फुले’तील जोतिबा अशा विविधांगी आणि अभिनयाचा कस लावणार्‍या भूमिका त्यांनी केल्या. बाबुराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दाजी भाटवडेकर, अप्पा टिपणीस, दिनकर कामण्णा, धुमाळ असे जुने कलाकार आणि आरती अंकलीकर-टिकेकर या सध्याच्या प्रसिद्ध गायिका आपल्याला या पुस्तकात भेटतात. विशेष म्हणजे वि.स.खांडेकरांच्या पत्नी उषाताईंचेही व्यक्तीचित्रण यात अंतर्भूत केले आहे. एका साहित्यिकाचा संसार चालवायची कसरत ही देखील कलाच म्हणली पाहिजे असा त्यामागचा दृष्टीकोन असावा. खरतर रोचक ललित लेखन ही देखील एक कलाच आहे. त्यामुळे एक वाचनीय ललितलेखांचा संग्रह देणारे लेखक श्री. कुंभोजकर हेही एक कलाकारच म्हणले पाहिजेत. एका कलाकाराने इतर कलाकारांना दिलेली ही मानवंदनाच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more