* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184988734
  • Edition : 2
  • Publishing Year : 1982
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 150
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH ONE OF US IS A DROP OF DARKNESS. EACH DROP TREMBLES FOR A WHILE AS IT SHAPES THE DARKNESS WITHIN US. DURING THIS PROCESS OF GIVING MEANING IT SOMETIMES SLUMPS DOWN SOMEWHERE. NOT ALL OF US CAN UNDERSTAND THE DARKNESS IN A TRUE SENSE. THOSE FEW WHO ARE ABLE TO FEEL IT REALISE HELPLESSNESS AND INEXORABILITY OF THEIR VERY BEING. FOR THEM, THERE IS ONLY ONE WAY OUT OF THIS SITUATION. HOWEVER TEMPORARY IT SEEMS, THEY HAVE TO TRY TO REMAIN ON THE SURFACE IN AN ATTEMPT TO BE ALIVE WHILE FURTHER PUTTING THE EXPERIENCE INTO WORDS.
एक एक व्यक्ती म्हणजे काळोखाचा एक एक थेंब. आपल्यातल्या काळोखाला आकार देत, ‘अर्थ’ देत, प्रत्येक थेंब काही क्षण थरथरत राहातो आणि कधीतरी अचानकपणे ओघळून जातो. पण सगळ्यांनाच आपल्यातला अंधार आकळतो असं नाही. ज्यांना तो आकळतो त्यांना आपली असहायता उमगते, असहायतेतली अपरिहार्यता जाणवते. आपल्या असहायतेवर, तात्पुरती का होईना, मात करायचा एकच उपाय त्यांना दिसत असतो. धडपडत, हातपाय मारत, जगत राहणं आणि त्या जगण्याचा आविष्कार शब्दबद्ध करणं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KALOKHACHETHEMB #KALOKHACHETHEMB #काळोखाचेथेंब #SHORTSTORIES #MARATHI #PRABHAKARN.PARANJAPE "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK MAHARASHTRA TIMES 7-3-2016

    ‘रात्रीच्या काळोखात गाडलेल्या स्मृती एक एक करून जमा व्हायला लागतात. मनात एक वैराण वाळवंट हेलावू लागतं आणि सावलीप्रमाणे शरीरहीन असलेल्या त्या स्मृती मृगजळाप्रमाणे मला बोलावू लागतात,’ ‘उसळी मारून वर येतात अचानक डोह संपावा तशी झोप संपली,’ ‘ते सगळं अधांती हलतं, डुचमळतं वाटत होतं,’ ‘दृष्टीला गरगरवणारी रंगीबेरंगी वर्तुळे पापण्यांच्या फटकाऱ्याने उडवीत तो दरवाज्याकडे गेला,’ अशी प्रतिकात्मक आणि रुपकात्मक भाषा प्रभाकर नारायण परांजपे यांच्या या कथासंग्रहात अनुभवायला मिळते. वास्तवाला भिडणाऱ्या एकूण १६ कथांचा हा संग्रह. ‘टँहा’ ही वेगळ्या विषयावरील कथा, तर ‘मातीच्या मूर्ती’ या कथेतील धक्का तंत्राचा वापर परिणाम साधतो. संवादांपेक्षा वर्णनात्मकतेतून उलगडणाऱ्या या कथा कधी कधी गूढतेच्या वाटेनेही जातात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 5-6-2016

    १९६७ ते १९७१ या काळात लिहिल्या गेलेल्या या कथा ‘सत्यकथा’, ‘अभिरुची’, ‘राजस’, ‘किर्लोस्कर’, ‘नवयुग’, ‘युगवाणी’, ‘मनोहर’ या त्या वेळच्या नव्या वाटेवरच्या साहित्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नियतकालिकांत प्रसिद्धही झाल्या आहेत. विशेष हे मानायला हवे, की इतक्यावर्षांनंतरही त्या कालबाह्य वाटत नाहीत. आज भूतलावर सगळ्यात सामर्थ्यवान कोण असेल तर माणूस. त्याची विचार करण्याची, भावना व्यक्त करण्याची शक्ती, त्याची बुद्धी, नवनवीन शोधांची त्याची लालसा यामुळे त्याला हे सामर्थ्य प्राप्त झालंय असं म्हटलं जातं. बुद्धीच्या आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही करू शकतो असं माणसालाही वाटत असतं. पण प्रत्यक्षात हे खरं आहे का? निसर्गापुढे माणूस किती थिटा आहे हे तर आपण अनुभवतोच आहोत आणि तसंही या विश्वाच्या पसाऱ्यात एक व्यक्ती म्हणजे कुणीच नाही. जणू काळोखाचा थेंब. आपले अस्तित्व किती नगण्य आहे हे जेव्हा आणि ज्यांच्या लक्षात येते त्यांना जगण्यातला फोलपणा जाणवतो. पण आयुष्याची आसक्ती इतकी मोठी असते, की परिस्थितीवर मात करत जगायचा प्रयत्न प्रत्येक जणच करतो. काही त्यात यश मिळवतात. बाकीचे हातपाय मारत धडपड करत राहतात. या कथासंग्रहात अशाच व्यक्तीरेखा वाचकांना भेटत राहतात. ‘लाक्षागृहा’मधल्या शाळकरी सदूचे भावविश्व अशा घटनेने ढवळून निघते की ज्याचा त्याच्याशी प्रत्यक्षात काहीच संबंध नाही. पण तरीही काही नकोशा गोष्टींचा तो साक्षीदार होतो. ‘संध्याछाया’ ही अगदी परस्परविरोधी स्वभावाच्या दोन वृद्ध स्त्रियांची कथा सांगते. त्यातली एक परावलंबी आयुष्य पसंत करणारी, तर दुसरी हट्टाने स्वत:चे स्वातंत्र जपणारी. ‘काळोखाचे थेंब’ कथेची मांडणी वेगळीच आहे. नंदिनी आणि माधव यांचा एकमेकांचा अंदाज घेत बोलणे, प्रतिक्रीया देणे हे दुसऱ्यावर मात करण्यासाठी आहे. यातली तिसरी व्यक्तीरेखा अविनाश ही या दोघांच्या बोलण्यातून ‘दिसत’ राहते. या गोष्टीचा शेवट होतो तो नंदिनीसाठी जसा अकल्पित आहे तसा वाचकांसाठीही. ‘ट्याहा’ ही कथाही तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. यातल्या काही कथा गूढ वळणावरच्याही आहेत. ‘अंधाराच्या अरण्यात’मधला विश्वनाथ, ‘मातीच्या मूर्ती’मधला ‘तो’, ‘निर्जन किनारी’मधली ‘ती’ कथा संपल्यावरही लक्षात राहतात. माणूस हे एक अजब रसायन आहे. त्याच्या व्यक्त अव्यक्त भावनांचा ठाव घ्यायचा प्रयत्न लेखकाने ‘भोवळ’, ‘महारोगी’, ‘मन माळरान’, ‘कॅसिनो’ या कथात केला आहे. उदाहरणार्थ, ‘मन माळरान’मधला लेखक लेखनाच्या अनुभूतीचा, जीवनाच्या अस्सलतेचा साक्षात्कार घडतानाचा अनुभव सांगताना म्हणतो, ‘निर्लेप, निर्विकार व्हायचं, मरायचं मनात, कुठल्या तरी क्षणी ते जमेल क्वचित. पण तो क्षणच असायचा अनंताचा कण, इंद्रिय संवेदनांच्या पलीकडील अवकाशाचं ओझरतं दर्शन. देठ तोडून ओंजळीत घेतलेल्या कमलाप्रमाणे दिसायचं विश्व आपल्याला सामावून घेऊनही आपल्यापासून तुटलेलं.’ पुस्तकातल्या दोन अनुवादित कथांचाही उल्लेख करायलाच हवा. यातली पहिली आहे ती जेम्स जोइसची ‘द डेड’. त्यात गूढ छटा आहे. दुसरी त्याहूनही महत्त्वाची आहे ती ‘त्रयस्थ’. आंद्रेई सिन्यावस्की यांच्या मूळ कथेवर आधारलेली. ही कथा म्हणजे राजकीय रूपक आहे. त्याचबरोबर कलावंताना वाटणरी परकेपणाची, त्रयस्थपणाची भावनाही यात खूप प्रभावी पद्धतीने मांडली गेली आहे. त्यामुळेच एका बाजूला शहारा उमटवत असतानाच बराच काळ ती मनात रेंगाळत राहते. लेखकाची भाषा रुपकात्मक आहे. ‘उसळी मारून वर येताना अचानक डोह संपावा तशी झोप संपली’ अशी वाक्ये ते सहजपणे लिहून जातात. या कथा वर्णनात्मक जास्त आहेत. गाव, रस्ते, समुद्र, व्यक्ती यांची बारकाईने, तपशिलात जाऊन केलेली वर्णने आहेत. त्यामुळे तो तपशील डोळ्यांसमोर उभा राहायला मदत होते. त्यांच्या व्यक्तिरेखाही मोजक्या शब्दांत ठसठशीतपणे उभ्या राहतात. उदाहरणार्थ, ‘द रनिंग म्यान’मधली अनघा किंवा ‘लाक्षागृह’मधला विठ्ठल. अगदी ‘मातीच्या मूर्ती’मधला ‘तो’ आणि ‘संध्याछाया’मधल्या काकूही. आजार, पैशाची वानवा, अशांत मन, एकटेपणा यापैकी एका किंवा अनेक गोष्टींचा सामना करणारी ही सगळी माणसे. पण मग तरीही आयुष्याला बांधून ठेवणारा कुठला धागा असतो जो यांना तगवून ठेवतो? या कथांतला माणूस धडपडत, ठेचकाळत, जखमी होत का होईना पण जगत राहतो. परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न करत राहतो. त्याचे माणूसपण टिकवायचा प्रयत्न करत राहतो. अशा आपल्या आजूबाजूच्या, किंबहुना आपल्यातल्याच सामान्य माणसांच्या या कथा आहेत. वाचकाला अस्वस्थ करणे हा चांगल्या लेखनाचा निकष मानला जातो. हा कथासंग्रह त्यावर खरा उतरतो. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 7-2-2016

    एक एक व्यक्ती म्हणजे काळोखाचा एक एक थेंब. आपल्यातल्या काळोखाला आकार देत, ‘अर्थ’ देत; प्रत्येक थेंब काही क्षण थरथरत राहातो आणि कधीतरी अचानकपणे ओघळून जातो. पण सगळ्यांनाच आपल्यातला अंधार आकळतो असं नाही. ज्यांना तो आकळतो त्यांना आपली असहायता उमगते, असहायेतली अपरिहार्यता जाणवते. आपल्या असहाय्यतेवर तात्पुरती का होईना, मात करायचा एकच उपाय त्यांना दिसत असतो. धडपडत, हातपाय मारत, जगत राहणं आणि त्या जगण्याचा अविष्कार शब्दबद्ध करणं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more