‘...IMAGINATION IS THE CREEPER THAT INSTANTLY SATISFIES ALL THE LATENT DESIRES OF MAN – THE HEAVENLY CREEPER THAT CONVINCES HIM THAT YOU ARE INDEPENDENT...
...THERE IS NO DOUBT THAT OUR LOVING ANCESTORS HAVE SHOWN GREAT JUSTIFICATION IN ESTABLISHING THE IMAGINATION IN THE HEAVENS. IN HEAVEN THERE WILL BE NYMPHS, NECTAR, A THOUSAND OTHER BEAUTIFUL THINGS; BUT THE SOUL IS NEVER SATISFIED EVEN WITH THE UNLIMITED ENJOYMENT OF BEAUTY. CAN...`
‘...कल्पलता म्हणजे माणसाच्या मनातल्या सर्व सुप्त इच्छा तत्काळ तृप्त करणारी लता – तू स्वतंत्र आहेस असे त्याला पदोपदी पटवून देणारी स्वर्गीय लता...
...कल्पलतेची स्थापना स्वर्गात करण्यात आपल्या रसिक पूर्वजांनी फार मोठे औचित्य दाखविले आहे यात शंका नाही. स्वर्गात अप्सरा असतील, अमृत असेल, आणखी हजारो सुंदर गोष्टी असतील; पण सौंदर्याच्या अमर्याद उपभोगानेसुद्धा आत्मा कधीच संतुष्ट होत नाही. त्याची ही तळमळ शांत करण्याकरता अप्सरा आणि अमृत यांच्यापेक्षा श्रेष्ठ अशा गोष्टीची स्वर्गातही जरूर लागतेच! ते काम फक्त कल्पलताच करू शकते....’बांधेसूदपणा, लालित्य आणि चिंतन अशा गुणांनी संपृक्त असलेला लघुनिबंधसंग्रह.