* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAMBAKTH NINDAR
  • Availability : Available
  • Translators : YASHODHARA KATKAR
  • ISBN : 9789391151133
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2021
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KAMBAKHT NINDAR, THE FIRST VOLUME OF THE AUTOBIOGRAPHY OF EMINENT HINDI AUTHOR DR NARENDRA MOHAN, IS A LITERARY WORK REVOLVING AROUND SELF ; WHICH HE HAS INTERWOVEN WITH THE JOYS AND SORROWS OF HIS PERSONAL LIFE BY DEEPLY INTROSPECTING UPON ISSUES IN SOCIAL AND POLITICAL SPHERES OF HIS TIMES. HE DEPICTS THE PERIOD BETWEEN THE TWO EMERGENCIES WHERE THE FIRST EMERGENCY WAS THE MOMENT OF HIS BIRTH IN A DARKENED ALLY OF A CITY STRIFE WITH GUNSHOTS AND COMMUNAL VIOLENCE . PARTITION THAT SET INDIA FREE , WAS ALSO THE TRIGGER TO THE LARGEST EXODUS AND TRAGEDY IN HUMAN HISTORY AS MILLIONS MIGRATED AND DIED IN THE ENSUING VIOLENCE. AS YOUNG NARENDRA ( OR NINDAR AS HE WAS AFFECTIONATELY CALLED BY BEEJI,HIS MOTHER ) AND HIS FAMILY HAD TO FLEE AND ARRIVE AT AMRITSAR AS REFUGEES , THE STUNNING PERSONAL EXPERIENCES OF THOSE MOMENTS HAUNTED AND PUSHED HIM TOWARDS CREATIVE EXPRESSIONS THROUGHOUT HIS LIFE. KAMBAKHT NINDAR IS ONE OF THEM.
साहित्यिक नरेन्द्र मोहन यांची ही आत्मकथा त्यांचं लौकिक, व्यावसायिक जीवन उलगडते. आई-वडील, दोन भाऊ अशा कुटुंबासमवेतचं बालपण...तेराव्या वर्षी फाळणीमुळे अमृतसरला निर्वासितांच्या छावणीत स्थलांतर...या घटनेने बदललेले आयुष्य आणि भावविश्व...अर्थात हा प्रवास ते चित्रित करतात निंदर (त्यांची आई त्यांना लाडाने ‘निंदर’ असं म्हणत असे) या व्याQक्तरेखेच्या माध्यमातून...त्यांच्या मनाला पडलेला पीळ, अस्वस्थता व्यक्त करताना ते निंदरचा आधार घेतात आणि या आत्मकथेला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात...निंदर ते साहित्यिक नरेन्द्र मोहन हा महत्त्वपूर्ण प्रवास यात येतो...फाळणीच्या आणि १९७५च्या आणीबाणीच्या वेदना या आत्मकथेतून जाणवतात...लौकिक आणि व्यावसायिक जीवनातील वादळांचा, आनंदक्षणांचा, त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण, व्यामिश्र आविष्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#नरेन्द्रमोहन #यशोधराकाटकर #कमबख्तनिंदर #अपूर्वअलौकिकएकमेव #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मराठीमेहतापब्लिशिंगहाऊस #NARENDRAMOHAN #YASHODHARAKATKAR #KAMBAKTHNINDAR #APURVAALOUKIKEKMEV #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC#TRANSLATEDBOOKS@50%#MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 20-02-2022

    ‘मी’ ला वेगळं करून पारखणारी आत्मकथा... डॉ. नरेंद्र मोहन हे हिंदी साहित्यातील महत्त्वाचं नाव आहे. त्यांना आपण महत्त्वाचे कवी, समीक्षक आणि नाटककार म्हणून ओळखतो. त्यांचं सृजनात्मक तसेच शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्या नावावर ‘हद होगयी यारों’ आणि ‘मंच अंधेरे में’ या लोकप्रिय नाट्यकृतींसोबतच अनेक महत्त्वाची पुस्तके आहेत. ‘मि. जिन्ना’ हे त्यांचं नाटक विवादास्पद होतं आणि या नाटकानंतरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सृजनात्मकतेचा नवीन पैलू समोर आला. नरेंद्र मोहन हे भारत-पाकिस्तान फाळणीच्या दाहात प्रत्यक्ष होरपळलेल्यांपैकी एक होते. काही कविता आणि कथा लिहून आत्मलुब्ध होणाऱ्या साहित्यिकांचे समकालीन असूनही नरेंद्र मोहन, व्रतस्थ पद्धतीने साहित्यसेवा करणारे साहित्यिक होते. नरेंद्र मोहन यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला काळ, त्यातून केलेली साहित्यनिर्मितीबद्दलचा दस्तावेज त्यांच्या ‘कम्बख्त निंदर’ आणि ‘क्या हाल सुनावा’ या दोन खंडातील आत्मकथेतून समजून घेता येतो. ‘कम्बख्त निंदर’ हा नरेंद्र मोहन यांनी लिहिलेल्या आत्मकथेचा पहिला खंड, त्यात त्यांच्या लाहोर येथील जन्मापासून ते दिल्लीत येऊन स्थायिक होण्यापर्यंतचा प्रवास नोंदवला आहे. भारत-पाकिस्तान विभाजनापूर्वीच्या लाहोर शहरातील साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या मुलापासून ते साहित्यक्षेत्रातील ख्यातनाम लेखक बनण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. फाळणीपूर्वी रोवल्या गेलेल्या अस्वस्थतेच्या बीजातून धुमसत गेलेला काळ, जो कालांतराने भारतीय स्वातंत्र्याचा अभिशाप ठरला. तो धुमसता काळ, त्यातली अस्वस्थता, धुमसणं नरेंद्र मोहन यांनी अनुभवलंय. या अनुभवाशी समानधर्म असणारा मंटोही त्यांना त्यामुळेच जवळचा होता. दोघांच्या काळाशी संबंधित दु:खाची जातकुळी एकच होती. मंटोशी त्यांच्या आत्मीय आणि साहित्यिक नात्यालाही किनार होती. माझ्यातल्या ‘मी’ ला स्वत:पासून वेगळं करून पारखण्याचं वेगळं कौशल्य आहे. अशा पद्धतीचे अनुभवकथन प्रत्यक्षात फार होताना दिसत नाहीत. त्याला अपवाद म्हणून ‘कम्बख्त निंदर’कडे बघता येईल. नरेंद्र मोहन यांनी त्यांच्या अनुभवांची दाहकताही कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत संयमाने व्यक्त केली आहे. बालपणी शरणार्थी कॅम्पमध्ये लुटीपुटीचे नाटक खेळणाऱ्या निंदर दिल्लीत येऊन नाट्यप्रेमी आणि लेखक होतो. त्याला दिल्लीतील प्रत्येक दृश्यातलं नाट्य जाणवतं. प्रत्येक घटनेचं रंगमंचीय स्वरूप दिसतं. रंगमचावरचं नाट्य आणि दिल्लीतील राजनैतिक घटनाक्रमामध्ये अद्भुत साधर्म्य जाणवतं. नरेंद्र मोहन यांच्या संदर्भातील अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी लेखक म्हणून जी प्रसिद्धी प्राप्त केली ती केवळ आणि केवळ त्यांच्या सृजनात्मक निर्मितीच्याच बळावर. मूळ हिंदीत किताबीघर प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या या आत्मकथेच्या पहिल्या खंडाचा अनुवाद यशोधरा काटकर यांनी उत्तम केला आहे. असं पुस्तक मराठीत येणं हीच महत्त्वाची बाब आहे. हिंदीतील सगळी भाषिक वैशिष्ट्य आत्मसात करून त्याचा दरवळ मराठीतीलच पुस्तक वाटावे असा बेमालूमपणे पोहोचवला आहे. अनुवादक म्हणून हे मोठं यश आहे. – अंजली अंबेकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 06-02-2022

    अस्वस्थ जीवनसंघर्षाचे चित्रण... डॉ. नरेद्र मोहन हे भारतीय साहित्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व. फाळणीच्या तडाख्याने विद्ध होऊन लिहित्या झालेल्या भारतीय साहित्यिकांची फळी काळाच्या पडद्याआड गेलेली असताना, ‘कमबख्त निंदर’ या आत्मकथेचे विशेष मोल आहे. फाळणी रम्यान निर्वासित म्हणून भारतात आलेल्या नरेंद्र ‘निंदर’ने प्रचंड मेहनत आणि संघर्षातून साहित्यिक ओळख निर्माण केली. मूलत: कविवृत्तीचे असलेल्या नरेंद्र यांनी दीर्घ कविता/वैचारिक कवितेचे स्वरूप आणि शास्त्राविषयी मूलभूत चिंतन, भारतीय भाषांमधील फाळणीच्या कथांचे संपादन, मंटोचे चरित्र व कथांचे संपादन, नाटक, साहित्यशास्त्र, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र आणि डायरी असे वैविध्यपूर्ण लेखन सातत्याने केले. अशा दिग्गज साहित्यिकाचा जन्म, फाळणी आणि आणीबाणी या कालबिंदूंमधल्या अस्वस्थ वर्तमानातल्या जीवनसंघर्षाचे चित्रण ‘कमबख्त निंदर’ या आत्मकथेत उमटले आहे. निंदर त्यांच्या जीवनातील अनेक सत्यघटनांचे वर्णन करीत, आपल्याला फाळणीच्या कालखंडात घेऊन जातो. बलुचिस्तानमधल्या क्वेट्टा शहरातला भूकंप, जन्मघडीच्या रात्री लाहोरमध्ये लागलेला कर्फ्यू, गोळीबार आणि आईच्या प्रसववेदना अशा जन्म-मृत्यूच्या तांडवात हा जीवन जन्माला आला. त्या अतिंद्रिय अनुभवाच्या दहशतीची सावली त्यांच्या आयुष्यावर सदैव राहिली. वडिलांच्या बदलणाऱ्या नोकऱ्यांमुळे अस्थिरताही होती; परंतु आईचा धीर, वडिलांची जीजिविषा आणि लहानलहान गोष्टीत आनंद मिळविण्याच्या वृत्तीमुळेच अचानक आलेले मुकेपण, तोतरेपण, शक्ती शोषून घेणारा दीर्घकालीन आजार अशा विपरीत परिस्थितीवर ते मात करू शकले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, विदेशी कपड्यांची होळी, नेहरूंच्या सभेत वडिलांच्या खांद्यावर बसून दिलेली ‘जयहिंद’ची घोषणा; तसेच हिंदीचा प्रचार हा राष्ट्रीय मुद्दा असणाऱ्या ऐतिहासिक कालखंडात ते मोठे होत गेले. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय धुमश्चक्रीत मोठे होताना, संघर्ष त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव कसा बनला, याचे प्रत्ययकारी चित्रण येथे उमटले आहे. वयाच्या बाराव्या वर्षी फाळणीचा आघात सोसून, निंदर कुटुंबीयांबरोबर लाहोरहून अमृतसरला येऊन पोहोचला. मायभूमीतून उखडले जाण्याचे दु:ख, युसूफ मास्तर आणि शाळामित्र आफताब यांच्या ताटातुटीची वेदना व सत्ताधिशांविरुद्ध विद्रोहाची भावना तेव्हापासून त्यांच्या अंतरंगात ठाण मांडून बसली. त्यांच्या अंतरंगातली वेदना, विद्रोहाची भावना कधी शमली नाही, उलट तत्कालीन वास्तवातल्या उलथापालथींच्या संदर्भात ती अधिक तीव्र होत, बहुआयामी साहित्यनिर्मिती करायला प्रवृत्त करत गेली. स्वत: विस्थापित होण्याच्या दु:खाने होरपळले असल्याने, नागवल्या जाणाऱ्या आदिवासींचे दु:ख त्यांना आपलेसे वाटले. त्यांच्या आयुष्यातली दुसरी बिकट घडी होती आणीबाणीची. त्या कालखंडात दडपशाहीविरुद्ध उभ्या राहिलेल्या आंदोलनाचे विश्लेषण करताना, भारतीय भाषांमधल्या फाळणीविषयक कथांचे संपादन ‘सिक्का बदल गया’, दुसरे ‘लंबी कविताओंका रचना सिद्धान्त’ आणि तिसरे ‘विद्रोह और साहित्य’ अशा सर्जनशील कार्यातून कसा आवाज उमटवला, याचे चित्रण येथे दिसते. निंदरच्या बालपणीच्या पर्यावरणातले बोलीभाषेतले शब्द, आईच्या तोंडची स्त्रीसुलभ भाषा, म्हणी, वाक्प्रचार असा भाषिक ऐवज घेऊन आलेली भाषाशैली, पुढे निंदरच्या जाणिवांच्या कक्षा विकसित गेल्या, तसतसे या भाषेने प्रमाण हिंदीचे वळण आत्मसात करीत, आत्मकथन प्रवाहित ठेवलेले दिसते. हा अनुवादही प्रवाही झाला आहे. ‘कमबख्त’ मधून जाणवणाऱ्या दुर्दैवी, अभागी या शब्दछटा त्यांच्या जीवनाशी निगडित आहेत. निंदर ही त्यांच्या बिजींनी भूतकाळाच्या स्मृतींमधून दिलेली मृदुवत्सल हाक आहे. तो त्यांचा सदोहर, सखा; तसेच त्यांच्या आत्म्याचा आवाज आहे. निवेदनाला प्रवाहित ठेवणारे, सुफल-संपूर्ण करणारे बहुआयामी रूपक बनून अवतरलेला निंदर हे या आत्मकथेचे बलस्थान आहे. हे सगळे खूप तरल, संवेदनशील आहे. आशयानुकूल मुखपृष्ठ ही मेहता प्रकाशनाची खासियत आहे. पुस्तकातील छायाचित्रांमुळे डॉ. नरेंद्र मोहन यांचा जीवनपट अधिक जिवंत झाला आहे. – डॉ. वसुधा सहस्रबुद्धे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more