- Akash Balwante
अहिल्याबाई होळकर यांची पुण्यश्लोक ही ओळख बऱ्याच जणांनी रंगवली आहे. त्याला अनेक कारणे आहेत जसे त्यांचा श्रद्धाळू स्वभाव, त्यांनी केलेला बऱ्याच मंदिरांचा जीर्णोद्धार, त्यांनी केलेला दानधर्म आणि इतर बरेच काही.
पण लेखिकेने या पुस्तकात त्यांच्या पुण्यश्लक या प्रतिमेबरोबरच त्या कशा कर्मयोगिनी होत्या हे ही उत्तमरीत्या सांगितले आहे. त्यांचा मुत्सद्दी स्वभाव, फडणिशीत केलेले अतुल्य काम, राज्यकारभारी गुण, त्यांची न्यायदानी वृत्ती, राजपूत चंद्रावतांचा केलेला बिमोड, राघोबादादांना युद्ध न करताच घ्यायला लावलेली माघार, आप्त स्वकीय इहलोक सोडून जातानाही दाखवलेला खंबीरपणा अशा अनेक सद् गुणांचे दर्शन यात घडते.
पुस्तकाला दोन भागात विभागले आहे.
पहिल्या भागात त्यांचे बालपण, सासरकडचे सुरुवातीचे दिवस, सासरे मल्हाररावांकडून घेतलेले राजकारणाचे धडे, सासवांबरोबरची जवळीक, पती खंडेरावाकडून झालेला त्रास, स्वतःचे पोटच्या लेकरामुळे आलेली हतबलता लेखिकेने खूप उत्कृष्ठरित्या रंगवली आहे.
दुसऱ्या भागात त्यांचे उत्तर जीवन दाखवले आहे ज्यात सुभेदार तुकोजी बरोबरचे सुरुवातीला असलेले चांगले आणि नंतर बिनसलेले संबंध, दुसरे मल्हारराव , रखमाबाई, नारो गणेश, बापू होळकर आदींशी आलेले संबंध, त्यांनी केलेले राजकारण, महादजी शिंदे सोबत भावांसारखे संबंध असूनही शिंदे आणि होळकर यात भांडणे होत असताना आलेली विवशता ते त्यांचा इहलोकीपर्यंतचा प्रवास छानरीत्या मांडला आहे.
अहिल्याबाईनीं त्यांच्या जीवन काळात बरेच मृत्यू पाहिले. त्यांची सख्खी सासू , सासरे, सती गेलेल्या सावत्र सासवा, नवरा, सती गेलेल्या सवती, मुलगा मालेराव, सती गेलेल्या सुना , नातू नथोबा, सती गेलेल्या नातसूना, जावई यशवंतराव, सती गेलेली स्वतःची मुलगी मुक्ता आणि बरेच आप्तस्वकीय त्यांना सोडून गेले.
अहिल्याबाई सासरे मल्हाररावांच्या विनंतीमुळे सती गेल्या नाहीत पण इतर लोकांकरवी त्यामुळे लागलेले बोल तसेच त्यांचे सती आणि तत्सम रूढी परंपरेवरचे विचार लेखिकेने सुंदररित्या मांडले आहेत.
अहिल्याबाईंच्या जीवनकाळात बरेच पेशवे होऊन गेले. थोरले बाजीराव ज्यांनी छोट्या अहिल्येवर प्रभावित होऊन मल्हररावांना तिला सून करायला सांगितले त्यांपासून ते नानासाहेब, थोरले माधवराव , नारायणराव , रघुनाथराव आणि सवाई माधवरावांपर्यंत त्यांचे सर्वांशी कडूगोड सम्बन्ध राहिले.
पेशवाईतल्या घडामोडी अहिल्येला सुरुवातीला मल्हाररावांकडून, नंतर तुकोजी कडून आणि इतर हेरांकडून खलित्या मार्फत समजताना अहिल्याबाईंचे त्यावरील वैयक्तिक मते आणि विचार मात्र वाचकांना कळत राहतात.
अहिल्याबाईंनी जीवनात स्वकीयांबरोबर खूप झुंज दिली पण त्यांना बदलण्यात वा सुधारण्यात त्या सपशेल अपयशी ठरल्या जसे पती खंडेराव, मुलगा मालेराव, दुसरे सुभेदार तुकोजी, दुसरे मल्हारराव आणि इतर.
त्याकाळच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी केलेली मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांची नासधूस आणि या अवहेलनेने हिंदू सैनिक आणि लोकांमध्ये आलेली हतबलता रोखण्यासाठी सर्व प्रमुख धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करून त्यांना पुनः प्रेरित करणे ही अहिल्याबाईंची दूरदृष्टी दाखवते.
लेखिकेने पुस्तकात जुनी (18 व्या शतकातली मराठी) भाषा वापरली आहे त्यामुळे अहिल्याबाईंचे आणि इतर पात्रांचे संवाद हे खरे खरे वाटतात.
जुन्या मराठी भाषेचा साज चढवून लेखिकेने या पुस्तकाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. त्यामुळे हे चरित्र फक्त ऐतिहासिक कादंबरी न राहता अभ्यासपूर्ण इतिहासलेखन झाले आहे. या पुस्तकावर दोन जणांनी M. Phil. केले हे समजल्यावर आश्चर्य वाटायला नको.
एकंदरीत ऐतिहासिक कादंबरी आवडणाऱ्याबरोबर मराठी इतिहास संशोधक तसेच विद्यार्थी यांनी आवर्जून वाचावे असा हा अमूल्य ठेवा आहे. ...Read more
- Shrikant Adhav
KARMAYOGINI (AHILYABAI HOLKAR) by VIJAYA JAHAGIRDAR
एका योगिनीचा प्रवास... आपल्याला इतिहासावरून कायमच आकर्षण वाटत आले आहे. इतिहासातील व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला आदर्शवत वाटतात आणि त्या कायमच स्मरणात राहतात. छत्रपती शिवाजी महाराज तर यचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेुळे त्यांच्यावर अनेक उत्तमोत्तम पुस्तके, चरित्रे अनेक मान्यवरांनी लिहिली आहेत. परंतु इतिहासात अशा काही व्यक्ती आहेत की, त्यांच्याबद्दल अत्यंत अल्प परिचय आपल्याला आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याची माहिती आहे. पण ते वाचून त्यांच्या कार्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची उत्सुकता अधिक वाढते. अशा काही व्यक्तींपैकी एका अग्रणी असणारे नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांना आपण मराठेशाहीचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्हारराव होळकरांची स्नुषा आणि एक अत्यंत सत्शील, धार्मिक आचरणाची व्यक्ती म्हणून प्रत्येक मराठी माणूस ओळखतो. पण त्यांची ही ओळख म्हणजे त्यांच्या अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वातील काही अंशच म्हणावा लागेल. कारण अहिल्याबाई म्हणजे शिस्त, अहिल्याबाई म्हणजे एक मुत्सद्दी राजकारणी आणि समाजाकारणी, अहिल्याबाई म्हणजे एक खंबीर नेतृत्व, बाणेदारपणा अशी कितीतरी रूपं आपल्याला विजया जहागीरदार लिखित ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकातून बघायला मिळतात.अहिल्याबाई होळकरांचा ७० वर्षांचा जीवनपट विजया जहागीरदार यांनी ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडला आहे. अहिल्याबार्इंनी केवळ दानधर्म केला, ठिकठिकाणी घाट, देवळे, त्यांचा जीर्णोद्धारच केला असा आक्षेप त्यांच्यावर अनेक टीकाकारांनी घेतला आहे. लेखिकेने सदर पुस्तकाच्या माध्यमातून आहिल्याबार्इंवर घेण्यात आलेल्या आक्षेपांना चोख उत्तर दिले आहे. या पुस्तकातून त्यांनी अहिल्याबाई त्यांनी अहिल्याबार्इंची कधीही प्रकाशात न आलेली, कुणालाही फारशी ज्ञात नसलेली कर्तृत्वे अगदी समर्थपणे मांडली आहेत. अहिल्याबाई या जात्याच हुशार आणि अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या. याच त्यांच्या कुशाग्रबुद्धीमुळे त्यांनी आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेतले. अहिल्याबार्इंनी त्यांच्या जीवनात अनेक सुख-दु:खांचे चढउतार अनुभवले. यात प्रामुख्याने दु:खद प्रसंगच अधिक होते. अहिल्याबार्इंचा संसार म्हणजे वैशाखातील ऊन्हाप्रमाणेच होता. पतीचा विक्षिप्तपणा, त्यांचा मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती, गौतमाबाई आणि मल्हारराव यांचे मृत्यू, पुत्र मालोरावांचा नाकर्तेपणा, त्यांचा अकाली मृत्यू, तरुण नातवाचा दुर्दैवी मृत्यू, लहानग्या नातसुनांचे सती जाणे अशा कठीण प्रसंगांतही अहिल्याबाई खंबीर राहिल्या. आयुष्यामध्ये आलेल्या वेदनादायी प्रसंगामध्येही धीरोदात्तपणे उभे राहून संसाराचा गाडा अहिल्याबार्इंनी नेटाने रेटला. ज्या काळामध्ये अहिल्याबार्इंनी यशस्वी राजकारण आणि समाजकारण केले तो काळ लक्षात घेता त्यांचे हे कर्तृत्व किती महान होते हे लक्षात येते. पुरुषप्रधान वर्चस्व असलेल्या त्या काळामध्ये एका स्त्रीने एखाद्या संस्थानाचा कारभार बघायचा म्हणजे अत्यंत कठिण असे कर्म होते. राजकीय शत्रूंबरोबरच घरातील छुप्या शत्रूंनाही नामेहरम करण्याचे धारिष्ट्य अहिल्याबार्इंमध्ये होते. त्यांच्यातील कुशल राजकारणी आपल्याला या कादंबरीत अनेक ठिकाणी दिसतो. अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवनालेखाचा आढावा घेणं तसे कठीणच. पण हे लेखिकेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. अहिल्याबाई होळकरांचा जीवनपट उलगडणारी ही कादंबरी लिहिताना लेखिकेने इतिहासाशी कुठेही प्रतारणा केलेली नाही परंतु कादंबरीमध्ये लालित्य आणण्यासाठी काही प्रसंग दंतकथेवर आधारित असल्याचे लेखिकेने नमूद केले आहे मात्र हे प्रसंग कादंबरीमध्ये इतके चपखलपणे बसले आहेत की ते दंतकथांवर आधारित आहेत हे कुठेही जाणवत नाही. संपूर्ण कादंबरीमध्ये बखरींमध्ये जी भाषा वापरली गेली आहे ती वापरण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पानाच्या तळाला जे शब्द वाचकाला पटकन उमगणार नाहीत त्याचे अर्थ दिले आहेत. त्यामुळे ही भाषा कादंबरीचा आस्वाद घेताना कुठेही रसभंग होत नाही. अहिल्याबाई होळकरांचे कर्तृत्व खरोखरच देदीप्यमान आहे यात शंका नाही. अशा थोर आणि पुण्यश्लोक अहिल्याबार्इंचे चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि प्रत्येकाने वाचावे असेच आहे. ...Read more
- DAINIK TARUN BHARAT 30-01-2005
एका योगिनीचा प्रवास...
आपल्याला इतिहासावरून कायमच आकर्षण वाटत आले आहे. इतिहासातील व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला आदर्शवत वाटतात आणि त्या कायमच स्मरणात राहतात. छत्रपती शिवाजी महाराज तर याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेुळे त्यांच्यावर अनेक उत्तमोत्तम पुस्तके, चरित्रे अनेक मान्यवरांनी लिहिली आहेत. परंतु इतिहासात अशा काही व्यक्ती आहेत की, त्यांच्याबद्दल अत्यंत अल्प परिचय आपल्याला आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याची माहिती आहे. पण ते वाचून त्यांच्या कार्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची उत्सुकता अधिक वाढते. अशा काही व्यक्तींपैकी एका अग्रणी असणारे नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर.
अहिल्याबाई होळकर यांना आपण मराठेशाहीचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्हारराव होळकरांची स्नुषा आणि एक अत्यंत सत्शील, धार्मिक आचरणाची व्यक्ती म्हणून प्रत्येक मराठी माणूस ओळखतो. पण त्यांची ही ओळख म्हणजे त्यांच्या अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वातील काही अंशच म्हणावा लागेल. कारण अहिल्याबाई म्हणजे शिस्त, अहिल्याबाई म्हणजे एक मुत्सद्दी राजकारणी आणि समाजाकारणी, अहिल्याबाई म्हणजे एक खंबीर नेतृत्व, बाणेदारपणा अशी कितीतरी रूपं आपल्याला विजया जहागीरदार लिखित ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकातून बघायला मिळतात.
अहिल्याबाई होळकरांचा ७० वर्षांचा जीवनपट विजया जहागीरदार यांनी ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडला आहे. अहिल्याबार्इंनी केवळ दानधर्म केला, ठिकठिकाणी घाट, देवळे, त्यांचा जीर्णोद्धारच केला असा आक्षेप त्यांच्यावर अनेक टीकाकारांनी घेतला आहे. लेखिकेने सदर पुस्तकाच्या माध्यमातून आहिल्याबार्इंवर घेण्यात आलेल्या आक्षेपांना चोख उत्तर दिले आहे. या पुस्तकातून त्यांनी अहिल्याबाई त्यांनी अहिल्याबार्इंची कधीही प्रकाशात न आलेली, कुणालाही फारशी ज्ञात नसलेली कर्तृत्वे अगदी समर्थपणे मांडली आहेत.
अहिल्याबाई या जात्याच हुशार आणि अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या. याच त्यांच्या कुशाग्रबुद्धीमुळे त्यांनी आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेतले. अहिल्याबार्इंनी त्यांच्या जीवनात अनेक सुख-दु:खांचे चढउतार अनुभवले. यात प्रामुख्याने दु:खद प्रसंगच अधिक होते. अहिल्याबार्इंचा संसार म्हणजे वैशाखातील ऊन्हाप्रमाणेच होता. पतीचा विक्षिप्तपणा, त्यांचा मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती, गौतमाबाई आणि मल्हारराव यांचे मृत्यू, पुत्र मालोरावांचा नाकर्तेपणा, त्यांचा अकाली मृत्यू, तरुण नातवाचा दुर्दैवी मृत्यू, लहानग्या नातसुनांचे सती जाणे अशा कठीण प्रसंगांतही अहिल्याबाई खंबीर राहिल्या. आयुष्यामध्ये आलेल्या वेदनादायी प्रसंगामध्येही धीरोदात्तपणे उभे राहून संसाराचा गाडा अहिल्याबार्इंनी नेटाने रेटला. ज्या काळामध्ये अहिल्याबार्इंनी यशस्वी राजकारण आणि समाजकारण केले तो काळ लक्षात घेता त्यांचे हे कर्तृत्व किती महान होते हे लक्षात येते. पुरुषप्रधान वर्चस्व असलेल्या त्या काळामध्ये एका स्त्रीने एखाद्या संस्थानाचा कारभार बघायचा म्हणजे अत्यंत कठिण असे कर्म होते. राजकीय शत्रूंबरोबरच घरातील छुप्या शत्रूंनाही नामेहरम करण्याचे धारिष्ट्य अहिल्याबार्इंमध्ये होते. त्यांच्यातील कुशल राजकारणी आपल्याला या कादंबरीत अनेक ठिकाणी दिसतो.
अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवनालेखाचा आढावा घेणं तसे कठीणच. पण हे लेखिकेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. अहिल्याबाई होळकरांचा जीवनपट उलगडणारी ही कादंबरी लिहिताना लेखिकेने इतिहासाशी कुठेही प्रतारणा केलेली नाही परंतु कादंबरीमध्ये लालित्य आणण्यासाठी काही प्रसंग दंतकथेवर आधारित असल्याचे लेखिकेने नमूद केले आहे मात्र हे प्रसंग कादंबरीमध्ये इतके चपखलपणे बसले आहेत की ते दंतकथांवर आधारित आहेत हे कुठेही जाणवत नाही. संपूर्ण कादंबरीमध्ये बखरींमध्ये जी भाषा वापरली गेली आहे ती वापरण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पानाच्या तळाला जे शब्द वाचकाला पटकन उमगणार नाहीत त्याचे अर्थ दिले आहेत. त्यामुळे ही भाषा कादंबरीचा आस्वाद घेताना कुठेही रसभंग होत नाही.
अहिल्याबाई होळकरांचे कर्तृत्व खरोखरच देदीप्यमान आहे यात शंका नाही. अशा थोर आणि पुण्यश्लोक अहिल्याबार्इंचे चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि प्रत्येकाने वाचावे असेच आहे.
-अमिता जामखेडकर ...Read more
- DAINIK SAKAL 29-10-2006
एका कर्तृत्वसुंदर स्त्रीचा जीवनालेख...
इतिहासकालीन कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा परिचय वेगवेगळ्या कोनांमधून वाचकांसमोर येत असतो. अभ्यासकांच्या ध्यासातून त्यांच्या कर्तृत्वाचे आलेख मांडले जातात. अशाच एका संपन्न व्यक्तित्वाच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आले ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील चरित्रकादंबरी लिहिली आहे विजया जहागिरदार यांनी.
या कादंबरीच्या निमित्ताने अहिल्याबार्इंच्या समग्र कर्तृत्वाचा आढावा लेखिकेनं अभ्यासपूर्ण दृष्टीनं आणि त्या व्यक्तित्वावरील निष्ठेनं घेतल्याचं जाणवतं. अहिल्याबार्इंच्या अंगी असलेलं मुत्सदीपण, त्यांच्यातली ज्ञानलालसा, दूरदृष्टी, धर्मपरायणता तसंच प्रजावत्सलता, रणनीती निपुणता, राज्य कारभारातली कुशलता त्याचबरोबर कल्याणकारी वृत्ती, चारित्र्यातली निष्कलंकता, साधी राहणी अशा अनेकानेक गुणांनी लेखिका भारावून गेली असल्याचं सतत जाणवतं. त्यामुळे घसघशीत वाटावी अशी कादंबरी सिद्ध झालेली आहे. अंगणात चिमुरडी अहिल्या परकराचा घोळ सावरत रंगावली रेखत होती, या बालिकारूपापासून अहिल्याबार्इंचा वेध घेत जाणारी ही कादंबरी. त्यांच्यातल्या बाणेदार, तेजस्वी, धैर्यशील अशा विविध पैलूंचे दर्शन घडवत पुढे सरकते. एकामागोमाग येणारे अनेक कौटुंबिक आघात पचवण्याचं बळ या धीरादात्त मनस्विनीजवळ होतं म्हणून त्या कर्मगतीला सामोऱ्या जाऊ शकल्या आणि राज्यकारभार नीटपणे सांभाळू शकल्या. त्याची घडी विस्कटू दिली नाही. पती खंडेरावांनी आणि पुढे स्वपुत्र मालेरावांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यांनी अनेक अपराध केले, अन्याय केले. त्यातूनही त्या घट्टपणे उभ्या राहत गेल्या. त्यांना कर्तव्यकठोर व्हावंच लागलं. या कटकटींमध्ये गुंतून पडत्या, तर राजनीतीची, समाजनीतीची मशाल कशी हाती धरली असती? अहिल्याबार्इंना आधार होतो तो फक्त सासरे मल्हारराव होळकरांचा. त्या गुणग्राहक माणसानं तर अहिल्याबार्इंमधली प्रज्ञा अधिक तेजस्वी केली. त्यांच्यातली क्षमता ओळखली. राजनीतीचा पहिला वस्तुपाठ दिला. संकटग्रस्त अहिल्याबार्इंना ते एकदा म्हणाले ‘‘आपला आवाका मोठा. आपण आहात तर दौलत आहे. तुम्हाला पोरवयात या कुळी उचलून आणली आणि नुसती कामास जुंपली... खंडेराव ते तसे निघाले... मालेराव हे असे... काही काही सुख नाही.’’
अशी ही कर्मयोगिनी! प्रसंगी कर्तव्यकठोर झाली. कारण त्यांच्यातली सदसदविवेकबुद्धी खूप धारदार होती. एक लोकोत्तर स्त्री म्हणून इतिहास त्यांची नोंद घेतो. त्यांच्या मृत्यूनं महेश्वरचे ‘पुण्यशील महाद्वार’ कोसळले असा सार्थ उल्लेख आहे. संपूर्ण महेश्वर हळहळावं असं आकाशव्यापी कर्तृत्व त्यांनी केलं होतं.
अहिल्याबाई या तेजोमय स्त्रीचं दर्शन या कादंबरीत समग्रपणे होतं. तत्कालीन बोली भाषा वापरण्याचा चांगला प्रयत्न आहे. एक मात्र खरं, की राजनीतीकुशल अहिल्याबार्इंच्या प्रतिमेपेक्षा कौटुंबिक अहिल्याबार्इंची प्रतिमा यात अधिक ठसठशीतपणे उभी राहते. दोन्हींचा तोल सांभाळला जाता तर अधिक सशक्तपणा आला असता असे वाटते. वाचनाचा ओघ मात्र या कादंबरीत चांगला सांभाळलाय, ही नोंद घ्यायला हवी.
-नंदा सुर्वे ...Read more
- Read more reviews