* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL THE 13 STORIES HAVE BEEN WRITTEN DURING MY STAY IN THE SERENE VICINITY OF GOMANTAK SINCE LAST FOUR YEARS. EACH WOMAN APPEARED TO SOLVE THE LIFE PUZZLE IN HER OWN UNIQUE WAY. THOUGH THE CHARACTERS ARE FICTITIOUS, THE QUESTIONS THAT THEY HAVE ARE TRUE TO THEIR FULLEST. A FEW OF THESE WOMEN HAVE FACED LIFE SENSIBLY AND IN SANE MANNER. INDEED, THEY WERE CONFRONTED WITH A VICIOUS TURN IN LIFE WHICH THEY CROSSED IN A POISED MANNER. I GUESS THIS WAS POSSIBLE BECAUSE OF THE EQUILIBRIUM WITH WHICH THEY LED THEIR LIVES AND ALSO BECAUSE THEY WERE BASICALLY MATURED IN ALL ASPECTS. ‘LADY DIANA’ AND ‘JASWANDI’ PORTRAY TYPICAL WOMEN FROM GOMANTAK HAVING COMPLETE FAITH UPON LOVE. THE OTHERS LIKE ‘ASAWARI’, ‘POORVA’, ‘RESHMA’, OR THOSE WHOM WE COME ACROSS IN STORIES LIKE ‘MOKAL ZAAD’, ‘LEKURWALA’ OR ‘HARAVALELA CHANDRA’ HAVE THE ABILITY TO ANSWER THE QUESTIONS THAT THEY HAVE COME ACROSS. THEY HAVE INDEED REACHED THEIR FINAL DESTINATION. THE CHARACTER IN ‘KATHA SAWALICHI’ IS THE ONE WHO HAS WILLINGLY ACCEPTED TO BE A SHADOW. TO BE A SHADOW OR TO HAVE A SEPARATE IDENTITY IS AFTER ALL INDIVIDUAL PERSPECTIVE. I HAVE TRIED MY BEST TO PORTRAY THESE CHARACTERS IN SHADES I UNDERSTOOD.
गेली चार वर्षे, गोमंतकातल्या निसर्गरम्य गावी वास्तव्य झाले व याच कालखंडातील या कथांचा जन्म! यामधल्या तेराही कथा स्त्री-जीवनकथा आहेत. कथेमधली प्रत्येक स्त्री ही मला पडलेल्या स्त्री-जीवनाचे कोडे सोडवणारी स्त्री बनली. सर्व पात्रे काल्पनिक आहेत पण त्यांचे जीवन व प्रश्न मात्र वास्तव आहेत. काही स्त्रिया विलक्षण समजूतदारपणाने जीवनाला सामऱ्या जातात. त्यांच्या जीवनाला आलेले वाईट वळण, समंजसपणाने त्यांनी ओलांडलेले असते, याचे कारण त्यांच्या विचाराची मूळ बैठकच प्रौढ, समंजस असावी, असे मला वाटते. ‘लेडी डायना’ आणि ‘जास्वंदी’ या खास गोमंतकीय स्त्रिया, प्रेमावर अतूट विश्वास बाळगणाNया, तर ‘आसावरी’, ‘पूर्वा’, ‘रेशमा’ या कथानायिका अगर ‘मोकळं झाड’ किंवा ‘लेकुरवाळा’, ‘हरवलेला चंद्र’मधल्या कथानायिका यांनी स्वत:समोरची प्रश्नचिन्हे... स्वत:च सोडवून त्या पूर्णविरामाला पोहोचल्या आहेत. ‘कथा सावलीची’ ही एका सावलीची भूमिका स्वीकारणारी स्त्रीकथा! आपण सावलीची भूमिका स्वीकारावी की स्वत:ची स्वतंत्र सावली निर्माण करावी, हा पुन्हा जिचा तिचा स्वतंत्र प्रश्न आहे. माझ्या मगदुराप्रमाणे मी त्यांना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 07-08-1994

    एकाकी स्त्रीच्या कथा... ‘मुळाचा आणि सावलीचा चिरप्रवास सुरु झाला होता एकमेकांना आधार देत! एक स्थितप्रज्ञ प्रवास! प्रकाशाच्या शोधार्थ, एक साधना सुरु झाली होती.’ या शोधापाशी माधवी देसाई यांची पहिली कथा संपते, परंतु त्याचक्षणी वाचकाच्या मनात ती सुरु होत. वरकरणी पारंपरिक वाटणारं वृक्ष व सावली हे रुपक वापरुन लेखिकेने असामान्य पुरुष व त्याच्या पाठीशी असणारी स्त्री यांच्यातील नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या शोधयात्रेत स्वाभाविकपणे स्वत:च्या अस्तित्वाविषयी, भोवतालच्या विश्वविषयी चिंतन येतं, असं चिंतन हा माधवी देसाई यांच्या कथांत वारंवार येणारा भाग आहे. ‘कथा सावलीची’ हा त्यांचा स्त्रीविषयक कथांचा संग्रह असल्यानं या चिंतनाला स्त्रियांच्या व्यथा, वेदनांचे संदर्भ आहेत. तरीही हे चिंतन स्त्रियांपुरतं मर्यादित राहत नाही, हे या कथांचं यश आहे. म्हणूनच ‘मोकळं झाड’ या कथेतील प्राचीचं सुरक्षित, संपन्न आयुष्य सोडून कामेरी गावी येणं, शाळा उभारण्याचं स्वप्न पाहणं हे कोणताही संवेदनशील वाचक समजून घेऊ शकतो. या कथेतील आजी व प्राची आणि कामेरी गाव व प्राची यांच्यातील भावबंध वाचकाला स्पर्शून जातात. समान सूत्र भोवतालच्या व्यवहारी जगापासून तुटलेल्या स्त्रिया, त्यातून येणारं एकाकीपण हे जवळपास साऱ्या कथांमधील समान सूत्र आहे. हे एकाकीपण ‘कमळाची कविता’मधील कमळाच्या आयुष्यात जोडीदाराच्या अकाली निधुनामुळं येतं, तर जीवन, व्यवहार आणि काव्य यांसारख्या कथांत संवेदनाहीन जोडीदारापायी येतं. काव्य शिकवणारे, पण व्यवहार जगणारे समेळ सर, व्यवहारी पती आणि स्त्रीपुरुष संबंधांतून काव्य साकार करु पाहणारे सहकारी अशी या कथेतील विभागणी मात्र ढोबळ वाटते. या एकाकी स्त्रियांना निसर्ग साद घालतो, त्यांच्याशी हितगुज करतो. म्हणून माणसांपेक्षाही त्यांना तो जवळचा वाटतो. म्हणूनच ‘लेकुरवाळा’ कथेतील उर्वशी म्हणते, ‘या वृक्षांचं आणि माझं नातं जन्मजन्मांतरीचं, म्हणूनच स्थिर आहे. ना तो बदलला, ना मी! म्हणून या नात्याचे संदर्भही स्थिरच आहेत.’ याच दृष्टीने ‘हरवलेला चंद्र’ ही कथा पाहता येते. यातील लीनाला लहानपणी तूप-साखरेचा घास भरवणारा चंद्र तरुणपणी मात्र हरवतो. पुढे तो अचानक निसर्गाच्या सहवासात भेटतो. या कथांमधील प्रेमभावना वेगवेगळ्या अवस्थात व वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त होते. ‘लेडी डायना’चं एकनिष्ठ प्रेम गोमांतकीय भूमीवर व खास पोर्तुगीज वातावरणात व्यक्त होतं, तर ‘जास्वंदी’ मधील प्रियकर प्रेयसी हे माणुसकी हाच धर्म मानणारे आहेत. अशाच उत्कंट प्रेमापायी ‘जिजींचं’ वर्चस्व झुगारुन उंच झेपावू पाहणारी रेशमा ‘आकाशझेप’ कथेत दिसते. आईच्या नेहमीच्या प्रतिमेशी विसंगत असे यातील जिजींचं व्यक्तिमत्व त्यातील वेगळेपणामुळं लक्षात राहतं. तारुण्यातील अविचारी प्रेमानंतर उत्तरावस्थेत अनुभवायला येणाऱ्या संयत, परिपक्व प्रेमानुभवामुळं ‘आसावरी’ कथा वेधक ठरते, तर उत्तुंग व्यक्तिमत्व रेखाटण्याचा प्रयत्न केलेला असूनही ‘स्वरमयी’ ही कथा सामान्य वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more