SOME GLORIOUS MOMENTS OF FREEDOM STRUGGLE HAVE BEEN ALIVE IN THIS STORY. THESE STORIES HAVE BEEN CHOSEN BY THE EMPHASIS ON DRAMATIZATION OF EVENTS, ESPECIALLY FOR TODAY`S YOUNGER GENERATION. AS A RESULT, WE AGAIN EXPERIENCE THIS IMPORTANT PERIOD OF INDEPENDENCE FROM THE STORIES. ABORIGINAL MEN AND WOMEN IN FREEDOM STRUGGLE WILL ALWAYS BE REMEMBERED AS WELL, AND THEIR BRIGHT ASPECTS WILL ALWAYS BE REMEMBERED.
सिनॉप्सिस- भारतातले स्थानिक सत्ताधीश एकमेकांमध्ये लढायचे. ऐक्याचा विचार न केल्यानं या सत्ताधीशांनी भारताला दुबळं केलं. त्यातच ब्रिटिशांनी इथल्या राज्यकत्र्यांना एकमेकांविरुद्ध उभं केलं. एकेक करत हे राज्यकर्ते सर्वस्व गमावून बसले. आणि सत्ता ब्रिटिशांच्या हातांत गेली. भारतभूमी ब्रिटिशांची एक वसाहत झाली; स्वतःच्या भूमीतच स्वयंशासनाचा अधिकार भारतीय गमावून बसले.
इथल्या लोकांना स्वतःच्या या अवस्थेची जाणीव होईपर्यत उशीर झाला होता. कारण तोपर्यत ब्रिटिशांची सत्ता बळकट झाली होती. पण काही शूरवीरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अथक परिश्रम केले. इथल्या लोकांमध्ये एकी घडवून त्यांना स्वतंत्र भारताचं स्वप्न बघण्याचं बळ देण्याची कामगिरी अवघड होती.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पराक्रमगाथा अशी सुरू झाली. त्यात अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तर इतर अनेकांनी तुरुंगाच्या गजाआड वर्षानुवर्षं काढली. पण १८५७ मध्ये उफाळलेली स्वातंत्र्यज्योत विझली नाही. ती एका हातातून दुसऱ्या हाती जात राहिली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी या स्वातंत्र्यज्योतीनं बिटिशांना भारताबाहेरची वाट दाखवली. भारतानं स्वातंत्र्याच्या दिशेनं केलेल्या वाटचालीचीसुद्धा अशीच कहाणी आहे. स्वातंत्र्याच्या ऊर्मीनं तरुणांना आणि वृद्धांना सारखंच जागृत केलं.
स्वातंत्र्यलढ्यात असं कृतीमधलं वैविध्य अफाटच दिसून आलं. इंदिरा गांधींनी स्वातंत्र्याची प्रेरणा पसरवण्यासाठी ‘वानरसेना’ स्थापन केली, तेव्हा त्या फक्त चौदा वर्षांच्या होत्या. जानकीदास निष्णात सायकलपटू होते. १९४६ मध्ये त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज गुपचूप आपल्याबरोबर नेला आणि झुरिचमधल्या जागतिक क्रीडास्पर्धेत तो फडकावला. अशा प्रकारे मादाम कामांनी जे कार्य जवळजवळ चार दशकं
आधी स्टुटगार्ट इथं केल होतं, तेच जानकीदास यांनीही करून दाखवलं. आशुतोष मुखर्जी, पोयान जोसेफ आणि इतर कितीतरी जणांनी, ब्रिटिश आपल्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचं मान्य करायला नकार दिला. ब्रिटिशांनी जेव्हा मिजास दाखवायचा प्रयत्न केला, तेव्हा या लोकांनी त्यांना नरम आणलं.
चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, प्रीतिलता वड्डेदार, मदनलाल धिंग्रा आणि इतर कितीतरी जणांनी सशस्त्र व्रÂांतीचा मार्ग निवडला. ब्रिटिशाच्या कैदेत असतानाही आपलं धैर्य प्रकट करणाऱ्या अनेक लोकांमध्ये वीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे दोघंही होते. सावरकरांचं साहस फसलं; पण हे अपयश फार उदात्त असं होतं. नेताजी तर पिंजऱ्यातून पक्षी उडून जावा तसे निसटले. चिदंबरम् पिल्ले यांनी जहाज व्यवसायातल्या ब्रिटिशांच्या मत्तेदारीला आव्हान दिलं. बंकिमचंद्र चटर्जी, सुब्रह्मण्यम भारती आणि भारतेन्दू हरिश्चंद्र यांच्यासारख्या साहित्यिकांनी आपल्या गीतांनी लोकांना प्रेरणा दिली.
देशभक्तांनी भारतभूमीची तिच्या संकटकाळी सेवा केली आणि तिला स्वातंत्र्याप्रत नेलं. या पुस्तकात भारताला ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व वाहिलं, अशा काही देशभक्तांच्या जीवनातल्या गोष्टींचा हा संग्रह आहे. त्यांतली प्रत्येक घटना खरी, आपापल्या परीनं थरारक आहे आणि ती साध्या, वाचनसुलभ शैलीत सांगितलेली आहे.