* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KATHARUPI KHAGOLSHASTRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666205
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FROM ANCIENT TIMES, THE GLITTERING STARS IN THE HEAVENS HAVE INTRIGUED MAN. AFTER YEARS OF OBSERVATION AND STUDY, HE HAS TRIED TO RELATE THEIR SHAPES TO DIFFERENT ANIMALS AND OBJECTS AND NAME THEM ACCORDINGLY. THE ADVANCED STUDIES IN SCIENCE AND TECHNOLOGY HAVE SINCE IMPROVED OUR UNDERSTANDING OF THESE HEAVENLY BODIES. THE BOOK DESCRIBES DIFFERENT TYPES OF STARS AND VARIABLE STARS, NOVAE, SUPERNOVAE, NEBULAE, ETC. IT EXPLAINS THE PRECESSION OF EARTH IN DETAIL. SUN AND MOON TRY TO MAINTAIN THE EARTH UPRIGHT WITH THEIR GRAVITATIONAL PULL ON ITS SMALL EQUATORIAL BULGE. THE PULL GIVES EARTH`S AXIS A WOBBLE CALLED PRECESSION (PARANCHAN GATI IN SANSKRIT.) BECAUSE OF EARTH`S PRECESSION, OUR SO CALLED STATIONARY POLE STAR WILL NO MORE BE OUR POLE STAR AFTER A FEW THOUSAND YEARS. WHEN THE EGYPTIAN PYRAMIDS WERE BEING BUILT, THE STAR THUBAN FROM THE CONSTELLATION DRACO WAS OUR POLE STAR. THE STAR VEGA FROM THE CONSTELLATION LYRA NEAR SYGNUS WILL BE OUR FUTURE POLE STAR. MOST OF THE WESTERN BOOKS WRITTEN SO FAR ON ASTRONOMY REFER TO STORIES FROM THE GREEK, ROMAN, EGYPTIAN, KHALIDIAN AND ARABIC MYTHOLOGIES. HOWEVER, WHAT SETS THIS BOOK APART IS THE INNUMERABLE CITATIONS IT CONTAINS FROM THE HINDU MYTHOLOGY. THE AUTHOR HAS TRIED TO EXPLAIN DIFFERENT CONSTELLATIONS AND THEIR NAMES THROUGH MYTHOLOGICAL STORIES FROM DIFFERENT CIVILIZATIONS. ALSO, THE UNIQUE CONVERSATIONAL STYLE OF THE BOOK SHOULD KEEP THE READER ENGAGED THROUGHOUT.
खगोलशास्त्रासारख्या चित्तवेधक आणि मनोरंजक विषयाची मुलांना ओळख व्हावी तसेच या विषयात त्यांना आवड उत्पन्न व्हावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. कुठलेही शास्त्र कथारूपात सांगितले तर ते समजायला अधिक सोपे जाते. नकळत त्यातून त्या विषयात रुची निर्माण होते.
राजा केळकर राज्य पुरस्कार २००६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KATHARUPIKHAGOLSHASTRA #KATHARUPI KHAGOLSHASTRA #कथारूपीखगोलशास्त्र #SCIENCE 3MARATHI #LEENADAMALE #लीनादामले "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 22-05-2006

    वेध गच्चीवरच्या आकाशाचा… भारताने अवकाश युगात प्रवेश केल्याला बराच काळ लागला असला तरी त्याला आत्ता कुठे जागतिक मान्यता मिळू लागली आहे. २००८च्या भारतीय चांद्रयान मोहिमेत खुद्द अमेरिकेने सामील होऊन भारताच्या अवकाश तंत्रज्ञानाला सलामी दिली आहे. या पारश्वभूमीवर समाजात निव्वळ विज्ञाननिष्ठा रुजणंच आवश्यक नाही तर विज्ञानाच्या विविध अंगाउपांगाविषयी औत्स्युक्य निर्माण होणंही आवश्यक आहे. यासाठी शाळांतून प्राथामिक शिक्षणाची पातळीवरून जसे प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे तशीच प्रसार माध्यमं, ग्रंथमाध्यम यातूनही प्रसार होण्याची आवश्यकता आहे. भारतातल्या ग्रंथनिर्मितीत विज्ञानविषयक ग्रंथांना महत्त्वाचं स्थान आहे. मराठीतही असे प्रयत्न जाणीवपूर्वक होताना दिसतात. विज्ञानकथा, विज्ञानाच्या विविध शाखांची ढोबळ आणि विस्तृत चर्चा करणारी, माहिती देणारी पुस्तकं मराठीत नित्यनेमाने प्रसिद्ध होत असतात आणि ती खपतही असतात. विज्ञान शाखांतही खगोलशास्त्राचं मराठी वाचकांना विशेष आकर्षण वाटतं. हा विषय मराठीजनांमध्ये लोकप्रिय करण्याचं श्रेय जयंत नारळीकरांना द्यावं लागेल. त्यांनी ललित लिखाणातून हा विषय मराठी लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याची शास्त्रीय माहिती देण्याचं काम या क्षेत्रातल्या अन्य जाणकरांनी व तज्ज्ञांनी घेतली आहे. अलिकडेच प्रसिद्ध झालेली खगोलशास्त्रविषयक तीन पुस्तकं ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडतात. ‘तारकांच्या विश्वात’ (पराग अळवणी), ‘अंतरिक्षाचा वेध’ (सुधा रिसबुड) आणि ‘कथारुपी खगोलशास्त्र’ (लीना दामले) ही ती तीन पुस्तकं आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरच्या विद्यार्थ्याना खगोलशास्त्राविषयी जे कुतूहल वाटतं किंवा त्याबाबत त्यांना जे प्रश्न पडतात, शंका असतात त्यांचं समाधान करण्यास ही पुस्तकं समर्थ आहेत. ‘तारकांच्या विश्वात’ हे पुस्तक रात्री अंगणात झोपल्यावर दिसणाऱ्या चमचमणाऱ्या आकाशाविषयी मनात निर्माण होणाऱ्या हजोर प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतं. आकाशाचं निरीक्षण कसं करावं, कुठल्या दिशेला कुठला तारा, ग्रह केव्हा असतो, तो कसा ओळखावा, ताऱ्यांचे प्रकार किती, त्यांचं वर्गिकरण, नाव आदी विस्तृत माहिती नकाशा व चित्रासह या पुस्तकात देण्यात आली आहे. पुस्तकात प्रत्येक ताराकापुंजाचा पानभर आकाराचा नकाशा, त्यांची माहिती त्याच्याविषयी कथा आदी सर्व माहिती देण्यात आली आहे. ज्यांना आकाश निरीक्षणाची हौस आहे त्याच्या हाती कायम असावं असं हे पुस्तक आहे. एकदा ग्रह-ताऱ्यांची ओळख पटली की मन त्यांच्याजवळच थांबत नाही. त्यांच्या पलिकडेही या अवकाशात काय आहे, याचा शोध ते घेऊ लागतं. या विशाल अवकाशाची व्याप्ती किती, त्याच्या पोकळीत ग्रह-ताऱ्यांखेरीज आणखी काय दडलं आहे, आणखी सौरमाला आहेत का, अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे का, आपल्या सौरमालेतले ग्रह कसे आहेत, डोळ्यासमोर दिसणाऱ्या ताऱ्याचा प्रकाश किती अब्ज वर्षांपूर्वी निघाला आहे. उल्का, युफो हे काय आहेत. गॅलॅक्सी म्हणजे काय, धूमकेतूचं रहस्य काय, ब्लॅक होल म्हणजे काय, या विश्वाची रचना कशी झाली आहे असे ग्रह-तारकांसारखे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तर ‘अंतरिक्षाचा वेध’ या पुस्तकातून बऱ्याच प्रमाणात मिळतात. सुधा रिसबूड यांनी गोष्टीवेल्हाळपणे ही सर्व माहिती दिली आहे. हि दोन्ही पुस्तकं काहींना शास्त्रीय किंवा जड वाटत असतील तर हाच विषय अधिक सोप्या आणि पटकन समजेल अशा भाषेत म्हणजे गोष्टीरुपाने लीना दामले यांनी ‘कथारूपी खगोलशास्त्र’ या पुस्तकात मांडला आहे. आकाशातली नक्षत्रं, राशी, तारकासमूह, यांच्याबद्दलची माहिती लेखिकेने कथा व संवादाच्या माध्यमातून सांगितली आहे. त्यामुळे हे पुस्तक बोजड वाटत नाही. विशेषत: शाळकरी मुलांना ते वाचायला आवडेल व या विषयाची त्यांच्यात रुचीही निर्माण करेल. या पुस्तकातही नकाशे व चित्रं दिली असल्यामुळे विषय समजायला मदत होते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलींनी ही तिन्ही पुस्तकं वाचली तर त्यांचा वेळ मजेत जाईलच पण खगोलशास्त्राविषयीचं त्यांचं कुतूहलही वाढेल आणि अधिक माहिती मिळवायची ओढ लागेल. मेहता पब्लिशिंग हाऊसने या तिन्ही पुस्तकांची निर्मिती अत्यंत उत्कष्टपणे केली आहे. -दिवाकर देशपांडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more