WHAT DO YOU DO WHEN YOU ARE A TWENTY-FIVE-YEAR-OLD YALE GRADUATE MAKING HALF-A-MILLION DOLLARS A YEAR AS A HOTSHOT INVESTMENT BANKER ON WALL STREET? YOU BUST YOUR ASS AND BECOME A MILLIONAIRE BY THIRTY, OF COURSE. NOT IF YOU ARE SAMRAT RATAN, BORN IN THE USA TO IMMIGRANT INDIAN PARENTS; YOU QUIT AND ENROL IN BUSINESS SCHOOL IN INDIA INSTEAD. SAMRAT`S ROLLERCOASTER JOURNEY BEGINS AT THE INDIAN INSTITUTE OF MANAGEMENT (IIM) IN BANGALORE, WHERE HE SPENDS HIS TIME GETTING HIGH ON MARIJUANA WHILE HIS GRADES – AND SELF-CONFIDENCE – PLUMMET. SOON, SAMRAT`S QUEST FOR IDENTITY TURNS INCREASINGLY BIZARRE AS IT TAKES HIM PLACES HE HADN`T PLANNED ON VISITING – PRISON, FOR EXAMPLE – AND MAKES HIM DO THINGS HE HADN`T BANKED ON DOING: `MEDITATING` STONED WITH A SEXY DANISH HIPPIE IN THE HIMALAYAS, HANGING OUT WITH A CANNIBAL ON THE BANKS OF THE GANGA, AND PEDDLING SOAP TO THE FORMIDABLE RAJA BHAIYA IN BENARES. DOES SAMRAT – YALE VALEDICTORIAN, INVESTMENT BANKER, CONVICT, POTHEAD – SURVIVE HIS FALL FROM GRACE
तुम्ही जर वयाच्या पंचविसाव्या वर्षी येलसारख्या विद्यापीठातून पदवी घेऊन, वॉलस्ट्रीटवरील बँकेमधे वर्षाला पाच लाख डॉलर्स कमवू लागलात तर काय कराल?
तुम्ही तुमची घास घास घासून वयाच्या तिसाव्या वर्षी कोट्यधीश बनता.
पण तुम्ही जर सम्राट रतनसारखे स्थलांतरित भारतीय आईबापाच्या पोटी अमेरिकेत जन्माला आलेले असाल, तर तुम्ही हे सर्व सोडून भारतीय बीस्कुलमधे प्रवेश घ्याल....
सम्राटचा पुढचा चक्रावून टाकणारा प्रवास बंगलोरच्या आय.आय.एम.पासून सुरू होतो. तिथे तो आपला वेळ मारिजुआना ओढण्यात घालवतो आणि त्याच्या ग्रेड्स अन आत्मविश्वास घसरणीला लागतो. लवकरच स्वत:चा शोध घ्यायची त्याची मोहीम वेडीवाकडी वळणे घेते, त्याने कधी स्वप्नातही कल्पिली नसतील अशा जागी त्याला घेऊन जाते. उदा. तुरुंग... त्याशिवाय त्याने कधी कल्पिली नाहीत अशी कृत्ये त्याच्या हातून घडतात.. उदा. विपश्यना, ध्यानधारणा, सेक्सी डॅनिश हिप्पीबरोबर हिमालयात भटकणे, नरभक्षक साधूबरोबर बनारसच्या गंगाघाटावर बसणे आणि राजाभैय्याच्या प्रजेला साबण विकणे.
हा सगळा उतरणीचा प्रवास त्याला कुठे घेऊन जातो?... त्यातून तो सावरतो का?
करण बजाजच्या या पहिल्या वहिल्या गतिमान कादंबरीत तरुणाईची स्पंदने पकडलेली वाचकांना दिसतात, भिडतात आणि विचारही करायला लावतात.