* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666588
  • Edition : 8
  • Publishing Year : FEBRUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KHALI JAMEEN VAR AKASH (LITERALLY BETWEEN THE SKY AND THE EARTH) IS THE AUTOBIOGRAPHY OF DR. SUNILKUMAR LAWATE WHO AFTER BEING BORN TO AN UNWED MOTHER WAS DESERTED BY HER AND WHO SPENT HIS CHILDHOOD AS AN ORPHAN. HE WAS SHUNTED FROM AN ORPHANAGE TO A REMAND HOME (A DETENTION A PLACE) THOUGH HE WAS NOT AN OFFENDER. THE CHILD IN DR. LAWATE SUFFERED MENTALLY BEHIND THE HIGH WALLS. HIS NEW JOURNEY BEGAN WHEN HE JOINED A PRIVATE SCHOOL WHERE HE EXPERIENCED HUMANITY FOR THE FIRST TIME. ALL THROUGHOUT HIS STUDENT DAYS, HE HAD TO FACE THE STIGMA OF BEING AN ORPHAN AS ALSO TO DODGE RULES OF A RIGID BUREAUCRACY. AFTER COMPLETING SCHOOLING, HE CONTINUED HIS EDUCATION AND STUDIED UPTO HIS DOCTORATE. DR. LAWATE NOW TOOK TO TEACHING WHICH HE DID FOR ALMOST TWO DECADES. HE ALSO DECIDED TO DEVOTE HIMSELF TO THE CAUSE OF THE ORPHANS. HE CARRIED OUT VARIOUS EXPERIMENTS, VISITED FOREIGN COUNTRIES AND SOON ROSE TO THE POSITION OF A DECISION MAKER IN CHILD WELFARE. KHALEE JAMEEN VAR AKASH BRINGS OUT THE MANY FACETED PERSONALITY OF DR. LAWATE WHO HAS HAD A HARD AND PAINFUL JOURNEY OF LIFE STARTING FROM NNK (NAME NOT KNOWN) TO NWK (NAME WELL KNOWN).
अनाथाश्रमात जन्मलेला, रिमांड होममध्ये वाढलेला तो. त्यास आई-वडील नव्हते. जात, धर्म, कुल, गोत्र, वंश, नातेवाईक अशा पारंपरिक अस्तित्वाच्या कसल्याही खुणा न घेता, जन्मलेला तो एक ‘नेम नॉट नोन’ होता. त्याला नाव नव्हतं. होता, एक नंबर. (कैद्याला असतो तसा!) त्याचं बालपण प्रश्नग्रस्त होतं. कौमार्य कुस्करलेलं. तारुण्य अव्हेरलं गेलेलं. तो वयात आला तसे त्याचे प्रश्नही वयात आले. प्रश्नांनी त्याला प्रौढ केलं. प्रश्नांनीच त्याचं पालकत्त्व पेललं. प्रश्नांनीच तो शिकला-सवरला नि सावरलाही! आज त्याच्या पुढे आहे पर्यायांच्या प्राजक्तांचा सडा! सर्व काही असताना काही न करणा-यांना आपल्या नाकर्तेपणाची जाण देणारी ही कर्मकहाणी आहे – ‘खाली जमीन वर आकाश.’
* राज्य पुरस्कार-लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार २००६ * स्वामीकार रणजित देसाई पुरस्कार २००६ * महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार २००७
YOU TUBE
No Records Found
No Records Found
Keywords
#खालीजमीनवरआकाश #डॉसुनीलकुमारलवटे #आत्मकथन #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #KHALIJAMINVARAAKASH #SUNILKUMARLAVATE #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarAshok Chougale

    नमस्कार, मी अशोक चौगुले. पुस्तक परिचय मालिकेत तिसरे पुस्तकाची आज ओळख करुन देत आहे. पुस्तकांचं नाव आहे " खाली जमिन वर आकाश " "अनाथ आश्रमात जन्मलेला, रिमांड होममध्ये वाढलेला, आई वडील नाहीत, जात, धर्म, कुल याच्या कसल्याही खुणा नाहीत. जन्मलेला तो क `नेम नॉट नोन` होता. कैद्याला असतो तसा एक नंबर जन्मापासून प्रश्न घेऊन आलेला. वय वाढले तसे प्रश्न वाढले. त्या प्रश्नांनीच त्याच पालकत्व घेतले. कठोर परिश्रम आणि सदैव शिकण्याचीउमेद यामुळे त्यांच्यासमोर पर्यायांचा प्राजक्ताचा सडाच उभा राहिला." पुस्तकाच्या मल पृष्ठावर हा छोटासा परिचय दिलेला आहे. यातून डॉ सुनीलकुमार लवटे सर हे काय रसायन आहे, याची छोटीशी झलक दिसते. आज मी त्यांचे जीवन कहाणी असलेल्या `खाली जमीन वर आकाश` या पुस्तकाचा परिचय करून देत आहे. जन्मापासून प्रतिकूल परिस्थितीचा आणि संकटांचा सामना, लेखकाने वाचकासमोर मांडली आहे. या पुस्तकातून त्यांनी आपला जीवनपट स्पष्ट व सहजपणे उलगडून दाखविला आहे. लेखकाने भोगलेले प्रसंग वाचताना डोले कधी भरुन आले कळत नाही. आश्रु आवरणे कठीण जाते. अनेक कठिणं संकटाशी सामना, समाजाकडुन झालेली उपेक्षा, हेटाळ्नी, अवहेलना सहन करूनही लेखकाने त्याविषयी कुठेही कटुता व्यक्त केलेली नाही. आयुष्यात भेटलेली चांगली माणसे आणि परिस्थिती बद्दल आभार व्यक्त करताना त्यांनी सरळ, साध्या व सोप्या शब्दात मनापासून लिहिले आहे. मनाला खोलवर भिडेल असे हे पुस्तक आहे. लेखक रिमांड होममधील एक वेगळ्याच दुनियेची ओळख करून देतात. त्यांच्या शब्दांना धार आहे पण कोठेही कटुता नाही. शालेय जीवनात अतिशय खडतर प्रसंगात तावून सुलाखून निघालेल्या सरानी पुढे महाविद्यालयीन जीवनात सतत भरपूर वाचन, मनन, अभ्यास याद्वारे आपला विवेक सदृढ केला. स्वभिमान, मानवता, विवेक त्यांनी जीवनभर ढळू दिला नाही. हिंदी विषयात पीएचडी केलेल्या सरांना शिक्षण क्षेत्रात अत्युच्य स्थान प्राप्त करता आले. वि स खांडेकर यांची अनेक पुस्तके सरानी संपादित केली. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. जीवनमुल्याशी कधीही तडजोड केली नाही. जगण्याची आणि काही करून दाखविण्याची प्रेरणा देणारे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे मला वाटते. सर्व काही असताना काही न करणाऱ्या लोकांना धडा देणारी ही कर्मकहाणी आहे. जीवनात कोणत्याही अपयशा मुळे आलेले निराशेचे मळभ या पुस्तकाच्या वाचनाने दुर होतिल अस मला वाटते. या पुस्तकाने अनेक पुरस्कार मिळवले असुन हिंदी , गुजराथी भाषेत अनुवाद झाले आहे. ब्रेल लिपीत पण रुपांतर झाले आहे. तुम्ही ही वाचा. आवडेल तुम्हाला. अशोक चौगुले 020920 ...Read more

  • Rating Starधनाजी माळी.

    वंचितांच्या जीवनात प्रकाशाची पेरणी करणारे थोर- ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. सुनीलकुमार लवटे सरांचं आत्मचरित्र `खाली जमीन वर आकाश` नुकतंच वाचनात आलं. आदरणीय लवटे सरांना खूपदा भेटलो. त्यांचं चरित्र जाणण्याचीही खूप दिवसांपासूनची इच्छा होती. साहित्यिक मित् उत्तम पाटील सर यांच्याकडून मिळालेलं हे पुस्तक वाचून ती पूर्ण झाली. पुस्तकाची सुरुवातच एकदम धक्कादायक अशी आहे. वासनेची शिकार बनलेल्या एका कुमारी मातेच्या पोटी लेखकाचा जन्म झाला. इवलासा मांसाचा गोळा पंढरपुरच्या आश्रमात सोडून ती माता परागंदा झाली. पुढं दुसऱ्याच एका मातेनं लेखकाला मायेचा आधार दिला. पोटच्या मतिमंद पोरीला सांभाळत लेखकालाही त्या माऊलीनं सांभाळलं. वाढत्या वयाबरोबर लेखकाचं तिसरीपर्यंतचं शिक्षण पंढरपुरात झालं. तिथून पुढं कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये रवानगी झाली. अन् शिक्षणही कोल्हापुरातच सुरू झालं. लेखकाचं रिमांड होममधलं अनाथ- वंचित जगणं, सतत होणारी हेटाळणी- उपेक्षा. पुढं कळत्या-सवरत्या वयातही लेखकाने सोसलेले कटू अनुभव अन् या साऱ्या कटू गोष्टींना- अनुभवांना पुरून उरणारं लेखकाचं कर्तृत्व खरोखरच आचंबित करणारं आहे. रिमांड होममधलं अनाथ बालक ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा थोर विचारवंत असा लेखकाचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. समाजाचा वंचितांकडे बघण्याचा विचित्र दृष्टिकोन अन् वंचित म्हणून लेखकाला आलेला अनुभव.. निदान त्या बालकांना तरी यायला नको म्हणून लेखकाची धडपड, रिमांड होमचं नामकरण बाल- कल्याण संकुल, लेखकाने सेवाभावी- निस्वार्थी वृत्तीने केलेले... डोळे दिपवणारे समाजकार्य, त्यात येणारे अडथळे, तरीही लेखकाचा विवेकी दृष्टिकोन अन् त्याचीच फलश्रुती म्हणून परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेकडून लाभलेले राज्याध्यक्षपद. पुढे अनेक प्रगत देशांचे अभ्यास दौरे करण्याकरिता केंद्रीय समितीत लेखकाची झालेली निवड, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि.स. खांडेकर यांचे हिंदीतील अनुवादित साहित्य... त्यासाठी त्यांना दोनदा मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार अन् लवटे सरांच्याच पुढाकाराने शिवाजी विद्यापीठात वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयाची झालेली स्थापना.... हा साराच प्रवास थक्क करणारा आहे. यासाठीच ` खाली जमीन - वर आकाश ` हे पुस्तक जरूर वाचावे. ---- धनाजी माळी. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 02-04-2006

    कुणीच नसलेल्यांची कहाणी... ‘खाली जमीन, वर आकाश’ ही डॉ. सुनीलकुमार लवटे यांची जीवनकहाणी. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर अडगळीत विखुरलेल्या आठवणी मोठ्या हिमतीनं गोळा केल्या आहेत. त्यांनी त्या प्रयत्नांत हाती आलेलं बालपणीच्या आठवणींचं गाठोडं तर वलक्षणच आहे. समाजातल्या इतर मुलांना मोठं मधुर वाटणारं हे बालपण लहानग्या सुनीलकुमारांसाठी प्रश्नांचं एक मोहोळ होतं. या असंख्य प्रश्नांना तोंड देण्याच्या समर्थ प्रयत्नांचं सार्थ रूप म्हणजे हे पुस्तक. ज्यांना या जगात आपलं असं कुणीच नाही, अशा सर्वांचीच ही कहाणी आहे. या कहाणीची सुरुवात होते १९४९च्या सरत्या काळात पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमात एक माता बनू पाहणारी कुमारी मुलगी आपल्या वडिलांसह आली. वडील मुलीला आश्रामात ठेवून निघून गेले. मुलगी तिथंच राहिली. ११ एप्रिल १९५० ला तिनं एका तान्हुल्याला जन्म दिला. हा मुलगा जेमतेम दोन महिन्यांचा होतो, न होतो तोच मुलीचे वडील तिला न्यायला आले; पण त्या लहनग्या मातेला तोपर्यंत आपल्या बाळाचा चांगलाच लळा लागला होता. शेवटी मुलाला कोणीतरी सांभाळायला घ्यावं’ या अटीवर ती बाळाला सोडायला तयार झाली. ते दोन महिन्यांचं बाळ उमाबाई कस्तुरे नावाच्या एका आश्रमवासिनीच्या ओटीत घातलं गेलं. अशा तऱ्हेनं डॉ. सुनीलकुमार लवटे या नावानं पुढे कीर्तिवंत झालेल्या एका माणसाचा जीवनप्रवास सुरू झाला. वरवर पाहता ही डॉ. लवटे यांच्या जीवनाची कहाणी वाटली तरी पुस्तकाचा आवाका खूप मोठा आहे. डॉ. लवटे यांच्या लिखाणाला इतिहासाच्या स्पर्शाचं सातत्य तर असतंच; पण लिहिण्याची एकंदर ढब अतिशय ललित असल्यानं पुस्तकातील शतकाहूनही अधिक वर्षांचा प्रवास वाचक उत्कंठेनं पार करीत जातो. नवरंगे बालकाश्रमातील शाळा, परित्यक्त महिलांसाठी असलेलं ‘रेस्क्यू होम’ यांचं वाचकाला अंतर्मुख करणारं वर्णन तर पुस्तकात आहेच; शिवाय त्या अनुषंगानं आश्रमात रात्रंदिवस ऐकू येणारा प्रसूतिवेदनांचा आक्रोश आणि जन्माला आलेल्यांचं ट्यांहा, ट्यांहा यांची वर्णनं वाचताना वाचक सुन्न होऊन जातो. ६ जून १९५९ या दिवशी सुनीलकुमारची बदली नवरंगे आश्रमातून कोल्हापूरच्या रिमांड होमला झाली. टांग्यातून जायला मिळणार म्हणून आनंदलेल्या त्या दहा वर्षांच्या मुलाच्या नजरेतून रिमांड होमचं दर्शन घेताना या संस्थांच्या कमालीच्या निर्मम कारभाराची कल्पना वाचकाला येते. या निर्मम व्यवस्थेशी झगडत सुनीलचा डॉ. सुनीलकुमार झाला. हा प्रवास खडतर होता; पण त्यातही माणुसकीचे अनंत झरे लेखकाच्या वाट्याला आले. त्यामुळेच असेल, डॉ. लवटे यांनी जे आयुष्य भोगलं, पाहिलं त्याचा वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ दिला नाही; उलट त्या अनुभवाचं रूपांतर केवढ्या सकारात्मक आयुष्यात केलं! या प्रवासात आपला सद्सद्विवेक असा काही घडवला, की त्यानं कामाची दिशा दाखवली, बळ दिले. हे बळ साथीला घेऊन डॉ. सुनीलकुमार लवटे वयाची पंचावन्न वर्षं चालत राहिले. ‘नेम नॉन नोन’ ही आयुष्याची सुरुवात; पण पुढे कितीतरी पदं भूषवली, कितीतरी सन्मानांचे मानकरी ठरले. देश-विदेशात भ्रंमती झाली. तिथल्या सामाजिक कार्यांचे निरीक्षण करता आले. विपुल लेखनही हातून घडले; पण त्या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे जी अनाथपणाची वेदना स्वत: भोगली, त्याचा विसर कधीच पडला नाही. रिमांड होमचा प्रमुख या नात्यानं संस्थेचा संपूर्ण कायापालट तर केलाच, शिवाय अनेक मुलांना पितृत्वाच्या उबदार भावनेची ऊब दिली. डॉ. लवटे यांनी ही सारी कहाणी कधी त्या कहाणीतली प्रमुख भूमिका घेऊन मांडली आहे, तर कधी त्रयस्ताच्या नात्यानं मानवी जीवनातील संगती-विसंगती वाचकांच्या पुढे ठेवल्या आहेत. हा मांडणीचा दुरंगी गोफ, हेच या पुस्ताकचं मोठं यश आहे. अनुसधा ऊर्फ मारिया या मुलीची गोष्ट वाचताना डॉ. लवटे यांच्यातील सहृदय माणूस तर प्रत्ययाला येतोच, पण लिखाणाच्या सामर्थ्याचीही प्रचिती येते. -रेणू गावस्कर ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-04-2006

    शर्थीच्या प्रयत्नांची कर्म कहाणी... शून्यातून जग निर्माण करणाऱ्या या शर्थीच्या प्रयत्नांची कर्म कहाणी आता साहित्याच्या प्रांतात ‘खाली जमीन वर आकाश’ होऊन अवतरलीय. २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन. या पुस्तकदिनाच्या निमित्तानं जगावेगळं आयुष्य जगलेल्या या मणसाच्या जीवनकहाणीची आणि त्याच्या पुस्तकनिर्मितीचा घेतलेला धांडोळा... अनाथाश्रमात जन्मलेला... रिमांड होममध्ये वाढलेला तो. त्यास आई-वडील नव्हते... जात-धर्म-कुल-गोत्र-वंश नातेवाईक अशा पारंपरिक अस्तित्वाच्या कसल्याही खुणा न घेता जन्मलेला तो एक ‘नेम नॉट नॉन’ होता... त्याला नाव नव्हतं. होता एक नंबर. जसा कैद्यांना असतो तसा तो वयात आला तसा त्याचे प्रश्नही वाढत गेले. प्रश्नांनीच त्याला प्रौढ केलं. प्रश्नांनीच त्याचं पालकत्व स्विकारलं. प्रश्नानीच तो शिकला-सवरला. नि सावलाही. अस्तित्वाच्या, परिचयाच्या कोणत्याच पारंपरिक खुणा नसलेला तो, समाजानं दिलेल्या जमिनीवर स्वत:च आकाश आकारत डॉ. सुनिलकुमार लवटे म्हणून चमकले. आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख निर्माण केली. एक अनाथ मुलगा ते एका महाविद्यालयाचे प्राचार्य इथंपर्यंत झेप मारताना समाजतील अनेक विध क्षेत्रात प्रत्यक्ष काम केलं. प्रत्येकजण बालपणी देवाकडं एक मागणं मागत असतो. ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ मात्र लवटे सराचं जीवनचं वेगळं. त्याचं बालपण छोट्या प्रश्नाचं मोठं काहूर होतं. शालेय जीवन प्रश्नग्रस्त होतं. कुमारीमातेच्या पोटी जन्मलेल्या निरागस बालकाला ‘तुझं नाव काय? तुझे आई वडील कोण? गाव कुठलं? तू कुणापैकी?’ असे छोटे-छोटे प्रश्न थरकाप उडवून लावायचे. कारण या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नसायची. कुमारीमातेच्या पोटी जन्मलेल्या या मुलाला अनाश्रमात वाढावं लागलं. त्यामुळं त्याच्या बालवयात माणूसपणाचा मागमूसही नव्हता. लवटे सर आपली चित्तरकहानी सांगू लागतात, कधी काळी असा जन्मलेला मी... अनाथाश्रम, रिमांड होममध्ये, वाढलो, शिकलो, सावरलो आणि सावरलोही यामुळं माझे बालपण ‘अहा ते सुंदर दिन हरपले’ अशी हुरहूर लावणारेही नव्हते. माणूस सुजाण झाला की जमीन मागे पडते नि आकाश बार वर सरकत राहतं. आकाशात चंद्र-सूर्य असतात म्हणे. कळत्या उमलत्या वयात मी फक्त तळपणारा सूर्यच अनुभवला. कडाडणाऱ्या विजाच रात्री माझ्या सोबतीला असायच्या. ‘शुक्रतारा... मंद वारा’ मला कधी भावला, लाभला नाही. धु्रवपण नाही कधी आवडला. हा मात्र उल्का धुमकेतू का कुणास ठाऊक मला आपले वाटत आलेत, का ते नाही सांगता येत’ आयुष्यभर सोसलेल्या लवटे सरांनी आक्रोश, आक्रस्ताळेपणा, आरोप यांना बगल देत नि रचनात्मक मार्गाची कास धरत आपली जीवनकहाणी ‘खाली जमीन, वर आकाश’ मध्ये शब्दबद्ध केली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्यावतीने नुकतेच हे आत्मकथन बाजारात आलंय. अजून त्याचा प्रकाशन समारंभ सुद्धा झाला नाही. तरीसुद्धा जीवनविषयक चिंतन मांडणारी ही साहित्यकृती वाचकांच्या हृदयाला भिडलीय. साहित्यवर्तुळात त्याचा गाजावाजा होऊ लागलाय. ‘ललित’ने तर एक लक्षवेधी साहित्यकृती म्हणून याला गौरविलंय. या पुस्तकाविषयी सांगताना लवटे सर म्हणाले, ही कथा स्नेह आणि सहयोगातून उभारलेल्या एका नव्या जगात वाचकांना घेऊन जाईल. हे नवं जग माणुसकीच्या गहिवराचं खरं पण तुमच्या रोजच्या जिंदगीला छेद देणारं आहे. माझं जगणं सवर्ण - अवर्तणेच्या पलीकडचं असल्यानं जे जगलं, भोगलं ते लिहिलं. हे आत्मकथन रक्तसंबंध, जातपंचायत, धर्मसभा, संस्कार आदी पारंपरिकतेस भेदून घेतलेला माणूसपणाचा एक आत्मशोध आहे. -आप्पासाहेब माळी, कोल्हापूर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more