* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KHEKADA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665505
  • Edition : 15
  • Publishing Year : DECEMBER 1970
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`KHEKADA` MEANS CRAB, THE ONE WHOSE BITE STINGS, WHICH HURTS TREMENDOUSLY, EVERY SINGLE SOUL IS SCARED OF ITS BITE. ALL THE STORIES IN THIS COLLECTION ARE FULL OF FEAR, THIS FEAR ITSELF WILL BITE THE READER. THIS FEAR HAS THE CAPACITY TO CAPTURE ANY HUMAN MIND, TO MAKE A PERSON SHIVER WITH REAL AGITATION. THESE STORIES NEVER MOVE AWAY FROM THE ORIGINAL FACTS OF LIFE. IN HIS STORY `TUMCHI GOSHTA`, HE REMINDS US THAT THE EVENTS OCCURRING IN THIS STORY CAN TAKE PLACE IN YOUR LIFE TOO. AFTER READING THE STORY WE START TO IMAGINE THINGS WHICH WE SHOULD NOT AND ONCE AGAIN HE REMINDS US, `SEE THIS CAN HAPPEN WITH YOU TOO!` THE AUTHOR HAS SUCH COMMAND OVER WORDS THAT YOU FEEL THE ROPE HANGING AROUND YOUR NECK. THE AUTHOR IS AN EXCELLENT EXAMPLE OF GENUINENESS AND HIS WORK IS SIMPLY UNIQUE, IF IT IS TRANSLATED IN OTHER LANGUAGE THEN IT WILL NOT ONLY GRACE THE AUTHOR BUT ALSO GRACE THE MARATHI LITERATURE AS SUCH.
‘खेकडा’ या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे़ या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो, कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत. जसे ‘तुमची गोष्ट’ आरंभीच लेखक सांगतो, ‘ही तुमची गोष्ट आहे म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी’ आणि शेवटीही निक्षून सांगतो, ‘तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितलेली एवढेच.’ पण तरीही या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन आहे, त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श तुमच्या मनीमानसी नसूनही तुमच्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना तुम्ही अनुभवता. रत्नाकर मतकरी हे एक सिद्धहस्त कथाकार आहेत आणि या कथासंग्रहातील कथा मराठी भाषेत तरी दुर्मिळ अशा आहेत. या कथांचे अन्य भाषांतून अनुवाद झाले तर ते फक्त मतकरींचेच प्राप्त यश वृद्धिंगत करतील असे नव्हे, तर परिणामी मराठी भाषेलाही ललामभूत ठरतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarRahul Kamadi

    खेकडा🦀 या कथासंग्रहातील सर्वच कथांमधून जे भय जे दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी लागणारे आहे यात भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून वाचकांच्या अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो, तो दीर्घकळ तसाच टिकून राहतो. कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत. ...Read more

  • Rating StarSameer Vengurlekar

    रत्नाकर मतकरी हे गुढकथाकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे खेकडा हे पुस्तक वाचनात आले. निरनिराळ्या १० गुढकथा यात समाष्ट आहेत. यातील निमाची निमा, शाळेचा रस्ता या कथा वाचताना थक्क व्हायला होते.

  • Rating StarMeghana Rairikar

    आज पुस्तक साखळीतला तिसरा दिवस, नेहमी तिसरी घंटा झाली की अद्भुत, गूढ, रहस्य डोळ्यसमोर येते, काहीतरी विलक्षण घडणार असे मन सांगते, अगदी एकाग्रतेने आपण पडद्याची चाहूल घेतो, तसेच कायम आपल्या विलक्षण शैलीने, वाचकांवर परिस्थिती, पात्रे आणि शब्दांचे गारुड घलणारे वाचकप्रिय लेखक, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचे गाजलेले पुस्तक निवडले आहे खेकडा खेकडा कथासंग्रहात अकरा छोटया गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट गूढरम्य, थरार वाटणारी, काहीतरी वेगळी अनुभूती देणारी आहे. त्यांच्या गोष्टीत कमी पात्रे असतात, बघता बघता त्यातल्या कथानकात आपण गुंतून जातो, भीतीचा, रहस्याचा पगडा मनावर बसू लागतो आणि अतिशय वेगळाच धक्का बसून कथा संपते. त्यांच्या सगळ्याच गोष्टीत एक दृश्यमयता जाणवते, संपूर्ण कथा डोळ्यासमोर उभी राहते, काही दिवस झोप उडेल इतकी ताकद त्यांच्या लेखणीत जाणवते. त्यांचे सर्वच कथासंग्रह वाचनीय आहेत. त्यांची नावे, गहिरे पाणी, एक टोल वाजतायेत, रंगांधळा अशी लेखकांची वेगळी वाट सुचवणारी.मी ग्रंथालयात अगदी प्रतीक्षा यादीत नाव घालून एकापेक्षा एक मतकरींची पुस्तकं आणून वाचली आहेत. विलक्षण भीती, थरार आणि औत्सुक्य वाटून पुढे काय असे नेहमी त्यांच्या कथा वाचताना होते, कथा पुस्तकात आणि चलबिचल होणाऱ्या वाचकाच्या मनातही घडत असते. कधीतरी कॉलेज दिवसात वाचलेल्या या खेकड्याने अजूनही भयकथांची पकड आणि आवड कायम ठेवली आहे. दुर्दैवाने गूढ, रहस्यमय अशा कोविडमुळेच या प्रतिभावंत लेखकाने आपला निरोप घेतला हा विचित्र योगायोग. साहित्यविश्वात वेगळ्या धाटणीच्या कथांनी वाचकांना समृद्ध करणाऱ्या मतकरींचे कृतज्ञ स्मरण ...Read more

  • Rating StarVikas Doke

    ‘खेकडा’ या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे. या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाचटिकून राहतो, कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत. जसे ‘तुमची गोष्ट’ आरंभीच लेखक सांगतो, ‘ही तुमची गोष्ट आहे म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी’ आणि शेवटीही निक्षून सांगतो, ‘तुमची म्हणून सांगितलिली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितलेली एवढेच.’ पण तरीही या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन आहे, त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श तुमच्या मनीमानसी नसूनही तुमच्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना तुम्ही अनुभवता. रत्नाकर मतकरी हे एक सिध्दहस्त कथाकार आहेत आणि या कथासंग्रहातील कथा मराठी भाषेत तरी दुर्मिळ अशा आहेत. या कथांचे अन्य भाषांतून अनुवाद झाले तर ते फक्त मतकरींचेच प्राप्त यश वृध्दिंगत करतील असे नव्हे, तर परिणामी मराठी भाषेलाही ललामभूत ठरतील. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more