LAXMAN MANE, A PROFOUND THINKER OF THE MOVEMENT. HE HAS ALWAYS PENNED DOWN HIS THOUGHTS RELATED TO CURRENT QUESTIONS AND PROBLEMS. HE HAS USED HIS WRITING SKILLS TO BRING FORTH ISSUES AND QUESTIONS. HIS SAID COLLECTION OF STORIES IS A COMPILATION OF RELATED ARTICLES.
IN 1995, LAXMAN MANE PUBLISHED A MAGAZINE, ‘BAND DARWAJA’. IT HIGHLIGHTED GOVERNMENT POLICIES, SOCIAL PROBLEMS, LITERATURE CULTURE, POLITICS, SOCIETY, FINANCE, FARMERS’ ISSUES, ADIVASI AND DEPRIVED PEOPLE’S PROBLEMS, ETC. THOUGH IT WAS WRITTEN 25 YEARS BACK, THE ISSUES AND CONCERNS STILL LINGER, MAKING THE BOOK READABLE AND CONTEMPLATIVE.
‘उपरा`कार लक्ष्मण माने चळवळीतील विचारवंत. माने यांनी वेळोवेळी समजत जाणवणारे प्रश्न आणि समस्या यावर भाष्य असणारे स्फुटलेखन प्रसंगानुरूप केलेले आहे. तत्कालीन समस्या आणि प्रश्न यांना लेखनाच्या माध्यमातून वाचा फोडून ते प्रश्न लोकांसमोर आणायचे काम केलेले आहे. `खेळ साडेतीन टक्क्यांचा` या लेखसंग्रहात अशाच स्वरूपातील लेखांचे संकलन केलेले आहे.
१९९५ च्या दरम्यान लक्ष्मण माने हे ‘बंद दरवाजा` नावाचे साप्ताहिक चालवत असत. सरकारी धोरणे, सामाजिक प्रश्न, साहित्य-संस्कृती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी-वंचित घटकांसाठीचे प्रश्न या साप्ताहिकातून त्यांनी मांडले. ते प्रश्न लोकांसमोर मांडण्याचे काम हे या लिखाणातून झालेले आपल्याला पाहायला मिळते. हे लिखाण साधारणतः २५ वर्षांपूर्वीचे असले तरीही आजच्या काळातही तेच मुद्दे आणि प्रश्न तसेच असल्याचे जाणवते त्यामुळेच हे पुस्तक वाचनीय आणि चिंतनीय अशा प्रकारात मोडते.