* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665260
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 76
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`PLAYING GAMES` IS A PERMANENT FEATURE OF CHILDREN. CHILDREN ARE FASCINATED BY TOYS FROM THE TIME THEY CRAWL. AND IF YOU ASK THEM TO MAKE THIS TOY THEMSELVES? CAN YOU IMAGINE HOW HAPPY THEY WILL BE? `I CAN DO THIS; THIS BOOK HAS TRIED TO GIVE DUE SCOPE TO THE CLASSIC ACT `I DID IT`. IT IS UP TO THE READERS TO DECIDE HOW SUCCESSFUL THIS ATTEMPT WAS.
`खेळ खेळणे` हा लहान मुलांचा स्थायीभाव आहे. अगदी रांगायला लागल्यापासून मुलांना खेळण्यांचे आकर्षण असते. आणि ही खेळणी त्यांना स्वत:लाच करायला सांगितली तर? त्यांना किती आनंद होईल याची कल्पना करू शकाल? `मी हे करू शकतो; मी हे केले` या अभिजात कृतीला योग्य वाव देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. हा प्रयत्न किती सफल झाला, हे वाचकांनीच ठरवायचे आहे.
राज्य पुरस्कार २००४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KHELANICHKHELANI #KHELANICHKHELANI #खेळणीचखेळणी #SCIENCE #MARATHI #D.S.ITOKAR #डी.एस.इटोकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 22-05-2005

    सृजनशीलतेला संधी… लहान मुलांच्या अंगी असलेल्या सृजनशीलतेला संधी मिळावी यासाठी या पुस्तकात विशेष प्रयत्न करण्यात आला आहे. कागद, पुठ्ठे, बांबूच्या कामट्या, थर्माकोलचे तुकडे आदी वस्तूंपासून खेळणी कशी तयार करावीत, याची माहिती बालदोस्ताना या पुस्तकातून दण्यात आली आहे. या मार्गदर्शपर पुस्तकामुळे सुट्टीच्या दिवसात आगपेटीचे घर, घोडागाडी, चिमणीचे घर, तीन चाकाची गाडी, चालणारी बाहुली, बदक व कमहे, गाजराचे झाड, दोऱ्याचे घर, आंब्याच्या कोयीची नाव अशा विविध वस्तू बनविण्याचा आनंद मुलांना लुटता येईल. त्याशिवाय रिकाम्या वेळेचा सदुपयोगही होईल. इतकेच नव्हे तर ‘हस्तव्यवसाय’ हा विषय शिकविणाऱ्या शिक्षकांनाही हे पुस्तक संदर्भासाठी उपयुक्त ठरू शकेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more