KON-TIKI IS THE RECORD OF AN ASTONISHING ADVENTURE—A JOURNEY OF 4,300 NAUTICAL MILES ACROSS THE PACIFIC OCEAN BY RAFT. INTRIGUED BY POLYNESIAN FOLKLORE, BIOLOGIST THOR HEYERDAHL SUSPECTED THAT THE SOUTH SEA ISLANDS HAD BEEN SETTLED BY AN ANCIENT RACE FROM THOUSANDS OF MILES TO THE EAST, LED BY A MYTHICAL HERO, KON-TIKI. HE DECIDED TO PROVE HIS THEORY BY DUPLICATING THE LEGENDARY VOYAGE.
ON APRIL 28, 1947, HEYERDAHL AND FIVE OTHER ADVENTURERS SAILED FROM PERU ON A BALSA LOG RAFT. AFTER THREE MONTHS ON THE OPEN SEA, ENCOUNTERING RAGING STORMS, WHALES, AND SHARKS, THEY SIGHTED LAND—THE POLYNESIAN ISLAND OF PUKA PUKA.
‘‘मग तू स्वतःच हा प्रवास करून का पाहत नाहीस?’’ प्रश्न आव्हानात्मक होता. आणि आव्हाने घ्यायची, धाडस करायची वृत्तीच मुळी त्या तरुण संशोधकाच्या अंगी भिनली होती.
थॉर हेयेरडाल या तरुण संशोधकाने तराफ्यावरून हजारो सागरी मैलाचा प्रवास करून प्रशांत महासागरापल्याडचा पोलिनेशिया गाठायचा, हे ठरविले. अर्थातच अनेकांनीR त्याला वेड्यात काढले; पण तो ठाम राहिला. कारण त्याच्या सिद्धान्तानुसार कैक हजार वर्षांपूर्वी- अश्मयुगात असेच एका संस्कृतीचे स्थानांतरण झाले होते. मग त्याने अनेक अडथळ्यांवर मात करून, त्या लोकांसारखाच तराफा सिद्ध केला.
ही कहाणी, या ‘वेड्या’, अद्भुत वाटाव्या अशा साहसी प्रवासाची... ही कहाणी मानवी संस्कृती, निसर्ग, समुद्री जीवन, जलचर, वादळवारे यांची; मानवी इच्छाशक्तीची, एका शोधाची आणि एका तराफ्याची– ‘कॉन-टिकी’ची!