"IN THE NOVEL `KRANTICHYA WATEWAR`, THE STORY OF RAMESH, A PATRIOT, IS TOLD AGAINST THE BACKDROP OF THE PRE-INDEPENDENCE ERA. WHILE WANDERING AWAY FROM HOME, RAMESH AND KAMAL MEET. THEY MARRY; BUT KAMAL DIES DUE TO FEVER. AFTER HER DEATH, RAMESH STARTS WORKING AS A TEACHER IN A SCHOOL IN THANE. HE ALSO STARTED A HINDI SCHOOL. MANGALA MOGHE MET ON THIS WAY IS IN LOVE WITH RAMESH. HE LATER RESIGNS FROM HIS JOB AND DECIDES TO JOIN THE ARMED STRUGGLE OF THE REVOLUTION. MANGAL IS LONELY AFTER THE DEATH OF HER FATHER. SHE EXPRESSES HER DESIRE TO MARRY RAMESH; BUT RAMESH DOES NOT RESPOND TO HER. LATER HE GOES TO AHMEDABAD FOR NATIONAL SERVICE; BUT AFTER GOING THERE, HE MISSES MANGALE INTENSELY AND COMES TO BOMBAY FROM AHMEDABAD WITH THE THOUGHT OF CONFESSING HIS LOVE TO MANGALE; BUT THE POLICE ARREST HIM AT THE STATION ITSELF. DID MANGAL MEET HIM? DOES HE FOLLOW THE PATH OF REVOLUTION OR LOVE?
"‘क्रांतीच्या वाटेवर’ या कादंबरीत स्वातंत्र्यपूर्व काळाच्या पार्श्वभूमीवर रमेश या देशभक्ताची कहाणी सांगितली आहे. घर सोडून भटकत असताना रमेशची आणि कमलची भेट होते. ते विवाह करतात; पण तापाचं निमित्त होऊन कमलचा मृत्यू होतो.
तिच्या मृत्यूनंतर ठाण्यातील एका शाळेत रमेश शिक्षकाची नोकरी करायला लागतो. शिवाय एक हिंदी विद्यालय सुरू करतो. या वाटेवर भेटलेली मंगला मोघे रमेशच्या प्रेमात असते. नंतर नोकरीचा राजीनामा देऊन तो क्रांतीच्या सशस्त्र लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतो. वडिलांच्या मृत्यूने मंगल एकाकी झालेली असते. ती रमेशशी लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित करते; पण रमेश तिला प्रतिसाद देत नाही. नंतर देशसेवेसाठी तो अहमदाबादला जातो; पण तिथे गेल्यावर त्याला मंगलेची तीव्रतेने आठवण यायला लागते आणि मंगलेकडे जाऊन प्रेमाची कबुली द्यायची, या विचाराने तो अहमदाबादहून मुंबईला येतो; पण स्टेशनवरच पोलीस त्याला अटक करतात. मंगलची आणि त्याची भेट होते का? तो क्रांतीच्या वाटेवर जातो की प्रीतीच्या?
"