* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386342201
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK DONE BY BHAGINI NIVEDITA IN THE FIELD OF EDUCATION, LITERATURE, ARTS AND SPIRITUALITY IS ASTOUNDING. YET, MUCH OF IT IS STILL UNVEILED. HER SUPPORT TO THE ARMED REVOLUTION IS NOW COMING TO SURFACE. SWAMI VIVEKANANDA HAD HIMSELF HAD HER TESTED BEFORE ALLOWING HER TO SHOULDER THE RESPONSIBILITY OF WORK RELATED TO FREEDOM OF COUNTRY RATHER THAN BEING STUCK AT FREEDOM OF SELF. SHE DID NOT HESITATE TO EMBRACE THE WAY OF ARMED REVOLUTION. HER LOGISTIC SUPPORT HELPED INDIANS PROFUSELY IN THE FREEDOM FIGHT.
जन्माने आयरिश असणा-या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे होते. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील टायरन प्रांतातील डनगॅनन या लहानशा शहरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्ती, परोपकार यांचेच संस्कार झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मार्गारेट आपले कुटुंब, घर सोडून देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने भारतात आली आणि इथल्या मातीशी, समाजाशी, समाजाच्या सुखदुःखांशी एकरूप झाली. हिंदू धर्मातील आचार-विचारांचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. हिंदू धर्माचे उगमस्थान असणाNया भारतावर तिचे नितांत प्रेम होते. या राष्ट्रप्रमेमाची ओळख हे पुस्तक घडवते. स्वत: इंग्रज असूनही ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायकारक राज्यपद्धतीविषयी ती नाराज होती. त्यामुळेच ‘भगिनी निवेदिता’ झालेली मार्गारेट स्वातंत्र्यलढ्याकडे ओढली गेली. भगिनी निवेदितांच्या कार्याने प्रभावित होऊन जगदीशचंद्र बसू यांनी त्यांना लेडी ऑफ लॅम्प म्हणून गौरविले. भगिनी निवेदितांनी सातत्याने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार केला.भारतासाठी त्यांनी जे महान कार्य केले त्याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
MARGARET ELIZABETH NOBEL# IRELAND# BANGAL# KOLKATA# SWAMIJI# BHAGINI# BRAMHO SAMAJ# SWAMI VIVEKANAND# NIVEDITA# RELIGION# EDUCATION# SHARDAMATA# HIMALAYA# AAMARNATH# LADY OF LAMP# VAJRA# KALI THE MOTHER# JAGADISHCHANDRA BASU# BODHGAYA
Customer Reviews
  • Rating StarKausthubh Nimbarte

    जन्माने आयरिश असणा-या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे होते. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील टायरन प्रांतातील डनगॅनन या लहानशा शहरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्ती, परोपकार यांचेच संस्कार झाले होे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मार्गारेट आपले कुटुंब, घर सोडून देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने भारतात आली आणि इथल्या मातीशी, समाजाशी, समाजाच्या सुखदुःखांशी एकरूप झाली. हिंदू धर्मातील आचार-विचारांचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. हिंदू धर्माचे उगमस्थान असणाNया भारतावर तिचे नितांत प्रेम होते. या राष्ट्रप्रमेमाची ओळख हे पुस्तक घडवते. स्वत: इंग्रज असूनही ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायकारक राज्यपद्धतीविषयी ती नाराज होती. त्यामुळेच‘भगिनी निवेदिता’ झालेली मार्गारेट स्वातंत्र्यलढ्याकडे ओढली गेली. भगिनी निवेदितांच्या कार्याने प्रभावित होऊन जगदीशचंद्र बसू यांनी त्यांना लेडी ऑफ लॅम्प म्हणून गौरविले. भगिनी निवेदितांनी सातत्याने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार केला.भारतासाठी त्यांनी जे महान कार्य केले त्याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 31-08-2018

    क्रांतियोगिनी!... साहित्य, शिक्षण, कला, अध्यात्म या क्षेत्रातील एक अग्रणी आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या म्हणून भगिनी निवेदिता यांची ओळख आहे. त्या जन्माने आयरिश, नागरिकत्व ब्रिटिश, पण मनाने पूर्णत: भारतीय होत्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस््र क्रांतीला त्यांचे असलेले पाठबळ आजवर दुर्लक्षित राहिले किंवा फारसे समोर आले नाही. मात्र त्यांच्या अन्य कार्याबरोबरच स्वातंत्र्यलढ्यातील हे योगदानही तेवढेच महत्त्वाचे असून भारतीय क्रांतिकारकांना नेहमीच त्यांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळाले. अशा या अलौकिक आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आणि कार्य मृणालिनी गडकरी यांनी ‘क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता’ या चरित्र ग्रंथातून उलगडले आहे. निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबल. भारतात येण्यापूर्वी त्यांचा आयर्लण्डच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग होता. स्वामी विवेकानंद यांची भेट होण्यापूर्वी भगिनी निवेदिता यांनी शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, लेखक म्हणून नाव मिळवले होते. पण त्या समाधानी नव्हत्या. १८९५मध्ये स्वामी विवेकानंद यांचे लंडन येथे लेडी मार्गेसन यांच्या निवासस्थानी व्याख्यान झाले. या कार्यक्रमासाठी मार्गेसन यांनी भगिनी निवेदिता यांनाही बोलावले होते. हे व्याख्यान ऐकून त्या प्रभावित झाल्या. पुढे स्वामी विवेकानंद यांची व्याख्याने अमेरिका, न्यू यॉर्क, इंग्लड या ठिकाणी झाली. त्यांच्या प्रत्येक व्याख्यानाला भगिनी निवेदिता उपस्थित राहत होत्या. स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म हा उदार, कर्मकांडात गुंतून न पडणारा, जातिभेदापासून दूर असलेला, अन्य कोणत्याही धर्माचा अनादर न कराणारा, प्रगतिशील आणि राष्ट्रीयतेला प्राधान्य देणारा, नवीन जरूर शिकावे, पण जुन्याला तिलांजली देऊ नये असे सांगणारा होता. फक्त तरुणांनीच नव्हे तर स्त्रियांनीही या चळवळीत सहभागी होणे त्यांना अपेक्षित होते. स्वामी विवेकानंद यांची झालेली भेट, त्यांची ऐकलेली व्याख्याने यातून निवेदिता यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला वाहून घेण्याचा, त्याच्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. शंकरीप्रसाद बसू यांनी ‘निवेदिता लोकमाता’ या पाच खंडात्मक चरित्र ग्रंथात निवेदिता यांच्या क्रांतिकार्याबाबतचे ठोस पुरावे दिले आहेत. निवेदिता यांनी लिहिलेली पत्रे दोन खंडांत बसू यांनी प्रकाशित केली. या पत्रांशिवाय बसू यांना सुमारे १०० पत्रे मिळाली होती. यातील अर्धवट जळालेली किंवा फाडलेली पत्रे त्यांनी प्रकाशित केली नाहीत. मात्र त्याचा योग्य तो उपयोग बसू यांनी या चरित्रलेखनात केला ही पत्रे निवेदिता यांच्या बहिणीकडून निवेदिता यांचे फ्रेंच चरित्रकार लिझेल रेमँ यांना आणि नंतर रेमँ यांच्याकडून स्वामी अनिर्वाण यांच्यामार्फत बसू यांना मिळाली. या पत्रांच्या आधारे आणि अन्य लिखित पुराव्यावरून निवेदिता यांचे क्रांतिकारत्व सिद्ध केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळायलाच हवे, तो भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे, हे पटवून देण्यासाठी निवेदिता यांना कोणताही मार्ग वर्ज्य नव्हता. त्यांनी नेमस्तांना आणि जहालांना दोघांनाही जवळ केले. गोपळ कृष्ण गोखले यांच्याबरोबरच लोकमान्य टिळक, खापर्डे यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. लोकजागृतीसाठी लेखन, व्याख्याने याचाही त्यांनी उपयोग करून घेतला. अनेक तरुणांचे त्या प्रेरणास्थान होत्या. भारताचे आत्मिक बळ वाढवून भारताला स्वावलंबी करण्यासाठी त्यांना स्वदेशीची चळवळ जशी आवश्यक वाटली तसेच क्रांतिकार्यासाठी लागणारे शिक्षणही त्यांना गरजेचे वाटत होते. अशा या क्रांतियोगिनीने दार्जिलिंग येथे अखेरचा श्वास घेतला. स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी माणसाची ‘माणूस’ म्हणून ओळख करून दिली तर स्वामी विवेकानंद यांनी यातून ‘माणूस’ घडवला आणि निवेदिता यांनी ‘राष्ट्र घडवायचा’ प्रयत्न यशस्वी केला. निवेदिता यांचा भारतातील कार्यकाळ खूप कमी होता. त्या १८९८ मध्ये भारतात आल्या आणि १९९१ मध्ये त्यांचे निधन झाले. भारतात आल्यानंतर स्वामी विवेकानंद आणि अन्य मान्यवर मंडळीकडून निवेदिता यांना भारतीय संस्कृती, परंपरा, साहित्य, कला, राष्ट्रप्रेम अशा विषयांवर मार्गदर्शन मिळाले. पुढे एका विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे नामकरण निवेदिता असे केले. ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडत नव्हत्या त्या काळात त्यांनी कोलकाता येथील बागबाजारसारख्या कर्मठ लोकांच्या वस्तीत भारतीय परंपरेशी आधुनिक शिक्षणाची सांगड घालून शाळा सुरू केली. त्यांची ही शाळा बंगालमधील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून ओळखली जाते. स्वदेशीची चळवळ सुरू होण्याआधी कितीतरी वर्षे ही शाळा स्थापन केली होती. भागिनी निवेदिता अर्थात मार्गारेट एलिझाबेथ नोबल यांचे बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, १९व्या शतकातील बंगालमधील सामाजिक, राजकीय परिस्थिती, निवेदिता यांनी तयार केलेला आणि १९०६ मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात फडकविण्यात आलेला भारताचा राष्ट्रध्वज तसेच निवेदिता यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनांची माहिती ग्रंथातील वेगवेगळ्या प्रकरणांमधून करून देण्यात आली आहे. ग्रंथाच्या अखेरीस निवेदिता यांचा संपूर्ण जीवनपट, ठळक घडामोडी, महत्त्वाच्या व्यक्तींची नामनिर्देश सूची ही परिशिष्ट स्वरूपात देण्यात आली आहे. भगिनी निवेदिता यांच्या एकूण जीवनाचा समग्र मागोवा मृणालिनी गडकरी यांनी घेतला असून विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासाठी तो महत्त्वाचा दस्तऐवज आहे. –शेखर जोशी ...Read more

  • Rating StarDivya Marathi 5-5-17

    भगिनी निवेदिताचे शिक्षण, साहित्य, कला, अध्यात्म या क्षेत्रातील कार्य क्रांतिकारक अाहे, मात्र कार्य बरेचसे ज्ञात अाहे. इतके दिवस अज्ञात हाेते ते तिचे सशस्त्र क्रांतीला असलेले सहकार्य. स्वामी विवेकानंदांनी पारखून निवडलेल्या या `सिंहिणी`ला स्वत:च्या अातमिक मुक्तीपेक्षा भारताची पारतंत्र्यातून मुक्ती महत्त्वाची वाटत हाेती अाणि त्यासाठी सनदशीर वा सशस्त्र क्रांती असा कुठलाच मार्ग तिला वर्ज्य नव्हता. तिचा `लाॅजिस्टिक सपाेर्ट` भारतीय क्रांतिकारकांना मिळाला म्हणूनच भारतीय क्रांतिकार्य प्रभावी झाल्याचे मत लेखिका मृणालिनी गडकरी यांनी पुस्तकाच्या मलपृष्ठावर मांडले अाहे. २०११ साल हे भगिनी निवेदिितेचे स्मृतिशताब्दी वर्ष हाेते. या निमित्ताने त्यांचे समग्र चरित्र मराठीत लिहिले जावे असा अाग्रह ज्ञानप्रबाेधिनीच्या संस्थापक-संचालक मंडळातील एक ज्येष्ठ सदस्य यशवंतराव लेले यांनी केल्याने हे पुस्तक पुढे अाकारास अाले. भगिनी निवेदितेला महाराष्ट्राबद्दल, विशेषत: पुण्याबद्दल अाणि त्या काळातील लाेकमान्य टिळक, नामदार गाेखले, दादासाहेब खापर्डे अशांसारख्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल अत्यंत अादर हाेता. महाराष्ट्राला तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. तिची हातांच्या बाेटावर माेजता येतील एवढीच चरित्रे पूर्वी लिहिली गेलेली दिसतात. बंगाली अाणि इंग्रजी भाषेत तिच्यावर लिहिले अाहे. पण मराठीत नव्हते. निवेदिता लाेकमाता हे शंकरीप्रसाद बसूंनी चार खंडात लिहिलेले बंगाली भाषेतील चरित्र वाचल्यानंतर निवेदिताचे जीवन कळत गेले अाणि हे पुस्तक अाकार घेत गेल्याचे गडकरी सांगतात. निवेदिताचे भारतप्रेम, निष्ठा, गुरुभक्ती, त्याग अशा बाबींसह तिच्यातील शिक्षणतज्ज्ञ, क्रांतीकार्य, तीची साैदर्यदृष्टी, तिच्यातील अाई हे सगळं या पुस्तकातून सापडतं. निवेदितेचे व्यक्तिमत्व अनेकावधानी अाहे. त्यामुळेच की, काय प्रा. बसूंनी तिचे चार खंडात विस्तृत चरित्र लिहिताना, चरित्राचा नेहमीचा रूपबंध अजिबात पाळलेला नाही. असेही गडकरी म्हणतात. ...Read more

  • Rating StarDaily Sakal-Saptrang 16-4-17

    इतिहास एखाद्या विशिष्ट कालखंडात असं काही वळण घेतो, की अभ्यासकांना पुन: पुन्हा तो काळ खुणावत राहतो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गवसल्याची जाणीव होते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा संधिकाल हे त्याचं एक उदाहरण. वेगवेगळ्या वैचारिक प्रवाहांची घुसळण सुरू ाली ती याच काळात. स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेलं राष्ट्रीय-सांस्कृतिक-धार्मिक पुनर्जागरण हाही त्यातला एक ठळक प्रवाह होता. त्यांच्या कार्यात सहभागी झालेल्या एक पाश्चात्त्य विदुषीची ओघवत्या शैलीत कथन केलेली ही जीवनकहाणी. या विदुषीचं नाव मार्गारेट नोबल अर्थात भगिनी निवेदिता. उत्तर आयर्लंडमध्ये जन्मलेल्या मार्गारेटला घरातूनच देशभक्तीचं बाळकडू मिळालं होतं. आयरिश स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेलं हे घराणं होतं. मार्गारेटच्या बालपणीची विस्तृत माहिती देऊन पुढं ती भारतीय राष्ट्रीय जाणिवांशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी समरस होण्याची बीजं या वातावरणात कशी होती, याचं सूचन लेखिका करते. मार्गारेटला अध्यात्माचं आकर्षण होतं; परंतु प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर तावून-सुलाखून घेतल्याशिवाय स्वीकारत नसे. स्वामी विवेकानंदांचं अनुयायित्व स्वीकारतानादेखील अनेक विषयांवर त्यांच्याशी तिच्या चर्चा झडल्या. शंकांचं निराकरण होईपर्यंत ती स्वस्थ बसत नसे आणि एखादी गोष्ट पटली, की मात्र त्यात सर्वस्व झोकून देऊन काम करत असे. हे चरित्र वाचताना तिच्या या वैशिष्ट्याचा ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. विवेकानंदांनीदेखील आपली मतं लादण्याचा प्रयत्न न करता मार्गारेटच्या वैचारिक प्रवासात मार्गदर्शकाची भूमिका कशी निभावली, हे लेखिकेनं दाखवून दिलं आहे. गुरू-शिष्यातल्या नात्याचे हे वेगवेगळे पैलू पुस्तकातून समोर येतात. विज्ञानानं माणसाच्या आयुष्यात जे क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणलं होतं, त्याचा परिचय भारतात ब्रिटिश राजवटीमुळं झाला. आधुनिक शिक्षण मिळालेल्या पहिल्या पिढीचे लोक त्यानं प्रभावित झाले नसते तरच नवल. त्यांचे डोळे दिपून गेले; पण याचा एक परिणाम असाही झाला की, भारतातल्या हजारो वर्षांच्या परंपरेविषयी काहींच्या मनात सरसकट तिटकारा निर्माण झाला. तिच्याकडं पाठ फिरवल्याशिवाय आधुनिकतेच्या प्रकाशाला सामोरं जाता येणार नाही, असं त्यांना वाटू लागलं. स्वामी विवेकानंदांना हे अजिबात मान्य नव्हतं. त्यांना या समाजाचा आत्मविश्वास पुन:स्थापित करायचा होता. भारतीय सांस्कृतिक परंपरेच्या नितळ-निखळ रूपाला उजाळा देत या समाजाची पुनर्रचना व्हायला हवी, असा त्यांचा प्रयत्न होता. तिथपर्यंत पोचण्यासाठी वाटेतील अंधश्रद्धांचा बुजबुजाट, मुरलेल्या हितसंबंधांचं शेवाळ हटवायला हवं, हे तर उघडच होतं. भारतीयांचं मनोबल खच्ची करू पाहणार्या साम्राज्यवाद्यांशीही त्यांचा झगडा होता. एका पाश्चात्त्य विदुषीनं या कार्याचं, त्यामागच्या भूमिकेचं मर्म ओळखणं, एवढंच नव्हे तर या कार्याला आजन्म वाहून घेणं, ही घटना एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल. ते सारं अनोखेपण या चरित्राच्या रूपानं प्रभावीपणे मांडलं गेलं असल्यानं हे केवळ चरित्र न राहता त्या मंतरलेल्या काळाची एक झलकही त्यातून प्रतीत होते. भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी निवेदितांनी खूप परिश्रम घेतले. हे करताना त्यांना अनेक आव्हानांना आणि संकटांना सामोरं जावं लागलं. दुसऱ्या बाजूला वैचारिक आघाडीवरही त्यांना संघर्ष करावा लागला. त्याचं तपशीलवार वर्णन मृणालिनी गडकरी यांनी केलं आहे. त्यासाठी बंगालीसह विविध भाषांतील संदर्भस्रोत त्यांनी मिळवले. आठवणी, तत्कालीन कागदपत्रं, पत्रव्यवहार अशा अनेक साधनांचा वापर करून त्यांनी ही चरितकहाणी सिद्ध केल्यानं तिचं मोल वाढलं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more