* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KSHITIJSPARSH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662771
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TOUCH OF THE HORIZON THIS COLLECTION IS THE LATTER HALF OF V. S. KHANDEKAR`S METEORS. THE HARMONIOUS WEAVING OF NATURE AND HUMAN LIFE IS THE CHARACTERISTIC FEATURE OF A METEOR. THESE METEORS WILL OVERPOWER THE READERS WITH THEIR TECHNIQUE AND UNDERSTANDING. THEY WILL ENGULF THE READERS IN THEIR ARTISTIC THOUGHTS. EVERY SINGLE WORD IN THIS METEOR MIRRORS THE UNIVERSAL HOLY GATHERING. THEY ALL HAVE THE CAPACITY TO TOUCH THE HORIZONS OF HUMAN AUSPICIOUSNESS. EACH POSSESSES THOUSAND IMPULSES. EACH IS WILLING TO TOUCH THE HUMAN MORALS. EVERY SINGLE METEOR EVOKES THE ARDOUR TO LIVE, EVERY SINGLE METEOR EXPLAINS THE LIVING OF A HUMAN BEING AND EVERY METEOR IS ITSELF A"MAHAMANTRA` TO MULTIPLY THE ANXIETY FOR LIVING LIFE.
‘क्षितिजस्पर्श’ हा वि. स. खांडेकरांच्या रूपककथांचा उत्तररंग. निसर्ग नि मनुष्यजीवनाची सुंदर बांधणी हे रूपककथेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. खांडेकरीय रूपककथांचं तंत्र नि मंत्रप्रौढत्व घेऊन येणाया या कथा वाचकांना आपले विचार नि कलात्मकतेनं दिङ्गमूढ करतात. साया सृष्टीचं सुमंगल संमेलन प्रतिबिंबित करणाया या कथांत मानवी मांगल्याचं क्षितिज स्पर्शण्याच्या शतशत ऊर्मी शब्दागणिक प्रत्ययास येतात. माणसाचं जगणं समजावीत वाचकांत जगण्याची आस्था जागविणाया या कथा म्हणजे जीवन विकासाचा महामंत्रच!

No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #क्षितिजस्पर्श
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVARASHTA - JANUARY 2018

    हस्तिदंती छोटा ताजमहाल... मराठी साहित्य क्षेत्रात असे अनेक साहित्यिक होऊन गेले ज्यांच्या लेखणीतून सकार झालेल्या साहित्यकृतींनी मराठी भाषेचे वैभव वाढविले. आपल्या या मराठी भाषेमध्ये शब्दरूपी रत्नांची खाण उधळून देणारे जे अनेक साहित्यिक आहेत त्यात वि. स खांडेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे खांडेकर हे स्वत: एक मोठे शब्दांचे विद्यापीठ होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी प्रत्येक साहित्य प्रकारात विपूल लेखन केले आहे. वि. स. खांडेकर यांच्या रूपककथांचा ‘क्षितिजस्पर्श’ हा संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. एका मोठ्या साहित्यिकाच्या लेखनाची समीक्षा करण्याचा आजच्या लेखाचा हेतू नाही. तर जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे... इतकाच या लेखाचा हेतू. क्षितिजस्पर्श या पुस्तकात खांडेकर यांच्या पूर्वी विविध ठिकाणी प्रकाशित झालेल्या निवडक ४६ रूपककथांचा समावेश आहे. यातल्या अनेक कथा तर खूप छोट्या-छोट्या आहेत. पण आजही त्या वाचकाला खूप मोठा अर्थ समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदाहरणार्थ – खांडेकर यांची दोन प्रवासी की रूपककथा यात दोन प्रवासी अमावस्येच्या रात्री निर्जन मार्गाने चालले आहेत. यात पहिला प्रवासी तरुण आहे तर दुसरा प्रवासी वृद्ध आहे. तरुणाला आशा, स्वप्ने, प्रीती आणि यौवन वेगाने पुढे नेत होती. तो गीत गुणगुणत चालला आहे. तर वृद्ध प्रवासी निराशा, स्वप्नभंग, एकलेपण आणि वार्धक्य यांच्या भाराने वाकून तो ओणवा झाला होता. तो कण्हत इतकी मंद पावले टाकीत होता की, तो पुढे जात आहे की नाही हेच कळत नव्हते. पहिला तरुण एकदम थांबतो आणि मागे वळून म्हणतो की, ‘‘किती सुंदर मार्ग आहे. हा! नाही? जिकडंतिकडं चांदण्याच चांदण्या.’ मागे राहिलेला वृद्ध प्रवासी त्याला उत्तर देताना म्हणतो की, काय भयंकर रस्ता हा. जिथंतिथं काटेकुटें आणि खाचखळगे!’’ इथे ही कथा संपते. याच्यातून तुम्ही काय घ्यायचे आणि काय समजायचे हा निर्णय वाचकावर सोडलेला असतो. आता या कथेमधून निघाणारे अर्थ शोधायचे झाल्यास माणसाच्या दृष्टिकोनातला फरक ही कथा आपल्याला सांगते- हा झाला एक अर्थ. तर दुसरीकडे तारुण्य आणि वार्धक्य यावरही ही कथा भाष्य करते. ऐन उमेदीचा काळ आणि दुसरी मरणासन्न अवस्था जिथे जगण्याचा आधारच उरलेला नाही. कमी पण प्रभावी अशा शब्दांत वि. स. खांडेकर यांच्या रूपककथा आपल्याला खूप काही सांगून जातात. फक्त ते शब्दांच्या पलीकडले समजून घेण्याची वाचकाची वृत्ती हवी. खांडेकर एक उत्कृष्ट लेखक होते याचे दाखले आपल्याला त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून मिळत राहतात. नदी, चंद्र, इंद्रधनुष्य, सूर्य, समुद्र इत्यादी निसर्गप्रतिमांचे सुंदर वर्णन आणि शब्दांचा अचूक वापर करत एखादा प्रसंग सुंदर पद्धतीने लोकांसमोर मांडणे किंवा उभा करणे ही कला प्रत्येक लेखकाने शिकण्यासारखी आहे. रूपककथांना खांडेकर ‘हस्तिदंती छोटा ताजमहल’ का म्हणत असतील हे या पुस्तकावरून कळते. -साधना दीपक राजवाडकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 14-09-2003

    अंतर्मुख करणाऱ्या रूपक कथा... रूपक कथा हा काहीस दुर्लक्षित पण महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे. मराठी साहित्यात या प्रकारात फार मोठे लेखन झालेले नाही. रूपक कथाकार असे स्वतंत्र बिरूद कोणी लेखक मिरवत नाही. लघुत्तम कथेच्या प्रकारासारखा हा लेखनप्रकार आहे. परा. प्र. ना. कवठेकर याला ‘ध्वनिकथा’ म्हणतात. रूपक कथा ध्वनिकथा जरूर आहेत. ध्वनी व ध्वन्यर्थ हे त्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. अल्पाक्षरत्व हेही महत्त्वाचे लक्षण आहे. विष्णू शर्मा, इसाप, खलील जिब्रान, चॉसर, स्पेन्सर इत्यादींची परंपरा त्याला आहे. वि.स. खांडेकर यांचे वर्णन ‘हस्तिदंती छोटा ताजमहाल’ असे करतात. त्यांचा ४६ रूपक कथांचा संग्रह क्षितिजस्पर्श या नावाने डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रकाशझोत केला आहे. प्रत्येक रूपक कथा हा खांडेकरांना घडलेला साक्षात्कार आहे. खांडेकरांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्शवाद त्यांच्या बहुतेक लेखनांतून स्पष्ट झालेला आहे. मानवी जीवनाचा मागोवा घेताना ते जीवनाचा अर्थ, नैतिक भूमिका, सामाजिक मूल्य, आध्यात्मिक अनुभव हे त्यांच्या चिंतनाचे विषय मानतात. त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीत हे चिंतन स्पष्ट आणि विस्तृत स्वरूपात प्रकट झाले. मला वाटते या कादंबरी लेखनाच्या पूर्वी त्यांनी हे सर्व चिंतन रूपक कथात प्रकट करण्याचा, सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ययाति’ हे या सर्व चिंतनाचे सार आणि उच्च बिंदू म्हटले तर ते वावगे न ठरावे. रूपक कथात जीवनाचा अनेक अंगावरचा, मानवी विचारांचा आलेख स्फूट स्वरूपात प्रकट होतो. समाज जीवनातील विविध आंदोलने आणि त्यात प्रकट होणाऱ्या मानवी कृती यांचा खोल विचार रूपक कथांतून ध्वनित होतो. प्रत्यक्ष उपदेश करणे किंवा प्रवचन देणे यापेक्षा ते ध्वनित केले तर त्याचा खोल ठसा मानवी मनावर उमटेल असे खांडेकरांना वाटले असावे. बहुतेक रूपक कथांचा विषय मानवी जीवनमूल्यांचा विचार ध्वनित करण्याचा आहे. त्यासाठी त्यांना सृष्टीतील कुठलीही सजीव वा निर्जिव वस्तू वर्ज्य नाही. दगडधोंडे, पशुपक्षी, झाडे, देव, दैव वा नियती, परमेश्वरसुद्धा त्यांच्या रूपक कथेत येतो. त्यांचा परमेश्वरावर फारसा विश्वास नसला तरी ‘श्रीकृष्ण’ त्यांच्या रूपक कथेत येतो. नारदमुनी, कुबेर यांसारख्या देवता येतात. पण सर्वांतून आशय प्रकट होतो तो मानवी जीवनाच्या चिंतनातून काढलेल्या नवनीताचा. एक छोटीशी रूपक कथा गगनाला गवसणी घालणारा आशय सूचित करते. खांडेकरांच्या भाषेचा विचार केला तर त्यांच्या उत्तुंग कल्पना, उपमा अलंकार यांनी अलंकृत होत जाणारी कथा हा एक अमोल ठेवा आहे. संपादन करताना लवटे यांनी खूप परिश्रम घेतले आहेत याचा प्रत्यय येतो. संशोधकांच्या वृत्तीने त्यांनी या कथा संपादन केल्या आहेत. खांडेकरांच्या एकूणच रूपक कथांचा आढावा घेत घेत त्यांनी अप्रसिद्ध अशा रूपक कथांना वाचकांसामोर आणले आहे. त्यांच्या कथांतून सूर्याला सल्ला देणाऱ्या घड्याळाचेही कौतुक वाटू लागते. तर बुद्ध, खिस्त, गांधी आज आले आणि त्यांनी आजचा समाज पाहिला तर काय होईल, त्यांना काय वाटेल, याची कल्पना अंतर्मुख करणारी आहे. प्रत्येक रूपक कथेचा ध्वनित आशय स्पष्ट करीत बसण्यापेक्षा त्या वाचकांनी प्रत्यक्षच वाचाव्यात. या ध्वनिकथांचा आशय स्पष्ट करण्यास विस्तृतच लिहावे लागेल. केवळ या रूपक कथा कालानुक्रमाने लावल्या तर खांडेकरांच्या मनात काय वादळे उठत होती याचा मागोवा घेता येईल. ते काम मोठ्या संशोधनाचे आहे. आहेत त्या क्रमाने जरी त्या कथा वाचल्या तरी त्यातूनही खांडेकर अखेर अखेर कसे अस्वस्थ होत होते याचे दर्शन होईल. सामाजिक मूल्ये ढासळताना आपण अगतिक आहोत याची जाणीव येथे सूचित होते. मानवी मंगळ ढासळत आहेत असे त्यांच्या अनेक कथांतून सूचित होते. यावेळी ते निराशावादी होतात की काय, अशी शंकाही येते. पण या रूपक कथा आपल्याला अंतर्मुख करतात हे नाकारता येणार नाही. ‘क्षितिजस्पर्शा’बरोबरच खांडेकरांच्या इतर रूपककथा वाचण्यास हे पुस्तक प्रवृत्त करेल. -डॉ. रोहिणी टकले ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more