* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789392482144
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2022
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN THIS EXCITING STORY COLLECTION MR.G.B.DESHMUKH TAKES US ON THE THRILLING JOURNEY OF THE FOREST IN MELGHAT. THOUGH MELGHAT FOREST IS KNOWN FOR THE EXISTENCE OF THE GREAT INDIAN TIGER, IT IS NOT EASY TO CATCH HIM IN A JUNGLE TOUR. EVEN FOREST OFFICERS TRAVEL MANY MILES, DAY & NIGHT TO HAVE A GLANCE OF THE TIGER. FOREST OFFICER RAVINDRA WANKHEDE SHARES & MR.DESHMUKH PENS IT DOWN SUCH NUMEROUS & HILARIOUS EXPERIENCES DURING HIS POSTING IN MELGHAT IN THIS UNPUTDOWNABLE BOOK.
कोरकु भाषेत ‘कुला’ म्हणजे वाघोबा. मेळघाटच्या जंगलातला हा कुलामामा जेवढा काळजात धडकी भरवणारा, तितकीच त्याच्याबद्दलची उत्सुकताही अधिक. रानवाटा तुडवत कुलामामाचं दर्शन घेताना इथं वनअधिकाऱ्यांनाही जद्दोजहद करावी लागते...पण त्यातूनच काही खुसखुशीत प्रसंग, पेचप्रसंग निर्माण होतात. असेच हे ‘कुलामामाच्या देशातले’ रंगतदात प्रसंग. वनाधिकारी रवींद्र वानखडे यांच्या सुरस जंगलकथा आणि जी.बी. देशमुख यांच्या खुमासदार लेखनशैलीचा हा अद्भुत मिलाफ.

No Records Found
No Records Found
Keywords
#KULAMAMACHYADESHAT #G.B.DESHMUKH #MELGHATFOREST #THEGREATINDIANTIGER #RAVINDRAWANKHEDE #MARATHISTORIES #MEHTAPUBLISHINGHOUSE #SHORTSTORIES #कुलामामाच्यादेशात #जीबीदेशमुख #रविंद्रवानखेडे #मराठीविनोदीकथा #भारतीयवाघ #मेळघाट #जंगलकथा #मराठीपुस्तके #मेहतापब्लिसिंगहाऊस
Customer Reviews
  • Rating Star...गणेश जोशी, पुणे.

    मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

  • Rating Starअशोक वासुदेव बक्षी सातारा

    आजच आपले ज्येष्ठ वनाधिकारी श्री रवींद्र वानखडे यांच्या अनुभवावर आधारित ` कुलामामाच्या देशात` हे पुस्तक वाचले वाचून आनंद झाला. सेंट्रल एक्साईज चा खाजगी नोकरीत काम करताना माझा २५ वर्षे संबंध आला. या काळात अनेक अधिकाऱ्यांशी अगदी शिपायापासून ते अपीलेट मिशनर पर्यंत अनेक लोक पाहिले. पण आपल्या सारखा रसिक लेखक एकही पाहण्यात आला नाही. आपण अशा रुक्ष खात्यात काम करूनसुद्धा आपली रसिकता जोपासली आणि तिचा आनंद वाचकांना आपण विविध पुस्तकांद्वारे आणि दैनिकातील लेखांद्वारे दिलात या बद्दल आपले अभिनंदन आणि आभार. २०११ साली मी कुपोषणासाठी काम करणाऱ्या एका NGO ने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी १० दिवस मेळघाटात राहिलो होतो. त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. मेळघाट, तिथले प्राणी, तिथली माणसे आपण अगदी आपल्या लेखणीतून जिवंत केली आहेत. पुस्तक वाचल्यावर कुलामामाबद्दल आम्हाला प्रेम वाटू लागले. पुस्तकातली रेखाटने खूपच सुंदर आहेत आणि ती लेखाच्या परिणामकारकतेत भरच घालतात. पुस्तक वाचताना जणू काही श्री वानखडे साहेब आमच्याशी गप्पा मारताहेत असेच वाटत होते. वानखडेसाहेब आपल्या लेखणीतून आमच्याशी बोलले असेच श्री वानखडे साहेबाना आपण बोलते करून हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. श्री वानखडे साहेबाना सुद्धा आमचे धन्यवाद सांगा. असेच लिहीत राहा आणि वाचकांना आनंद देत राहा. ...Read more

  • Rating Starमिहीर गोगटे, पुणे

    गेल्या आठवड्यात जर्मनीला आलो. येताना `कुलामामांना...` बरोबर घेऊन आलो. आत्ताच पुस्तक वाचून झालं. प्रस्तावने पासूनच लिखाणशैली भावली आणि गोष्टींची अनोखी मजा आली. वनसेवक / वनरक्षक व त्यांचे कार्य अतीमोलाचे असून सामन्यांना त्याची काहीच जाणीव नाही ही खरी ुखःद गोष्ट आहे. वानखेडे साहेब व त्यांनी कौतुकाने उल्लेख केलेल्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या कर्तव्या पलीकडील वन आणि वन्यजीव प्रेमापोटी व जागरूक जबाबदारीनं केलेली व करत असलेल्या कार्यास मनापासून सलाम. सर्वच गोष्टी जरी रोचक असल्यातरी वानखेडे साहेबांची संवेदनशीलता `बानाढाप`, `हिरुबाई..` आणि `महाकाय आकांत`नी हलवून टाकलं. पुस्तक खूप आवडलं. अजून खूप लोकांपर्यंत पोचवायला हवं. ...Read more

  • Rating Starश्री. दीपक पांडे

    `कुलामामाच्या देशात ....` उत्कंठावर्धक व्याघ्रकथा श्री. रवींद्र वानखडे यांनी स्व- अनुभवावरून सांगितलेल्या वाघांसंबंधीच्या चित्तथरारक अनुभवकथांचे हे संकलन श्री. जी. बी. देशमुख यांच्या समर्थ लेखणीतून आपल्याला जंगलसफारी घडवून आणते व आजपर्यंत वाघ न पाहिेल्यांना `आपणसुद्धा व्याघ्र दर्शन करावे` हे कुतूहल मनात उत्पन्न करते. लेखक स्वतः अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे अभ्यासक असल्यामुळे अमिताभ यांच्या चित्रपटातील डायलॉग्जचा विशेष उल्लेख पुस्तकात दिसून येतो. यातील मला सर्वात जास्त आवडलेल्या दोन कथा म्हणजे `आज्ञाधारक बच्चू` आणि `खुश रहना मेरे यार... `आज्ञाधारक बच्चू` या कथेत एका प्रसंगात वाघिणीचं पिल्लू एकाच जागेवर उभं राहतं. आज्ञाधारकपणा मनाला भावतो व त्यातून मानवप्राण्याने सुद्धा बोध घ्यावा अशी ही कथा आहे. प्रत्येक कथेत मानवाने प्राण्यांकडून शिकण्यासारखे काहीतरी आहेच. `खुश रहना मेरे यार....` या कथेतील हत्तीच्या हातून चुकून झालेल्या आपल्या सवंगड्याची (माहुताची) हत्या त्याला अस्वस्थ करते आणि थोड्याच कालावधीत त्याचा सुद्धा करुण अं होतो. हे त्यांच्यातील मैत्रीचे अतूट नाते वाचकाला डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. `कुलामामाच्या देशात` या पुस्तकातील कथेच्या दीर्घकथा करण्याच्या मोहात न अडकता मोजक्या शब्दांत मांडणी करून ह्या लघुकथा आपल्याला खिळवून धरतात. कमीत कमी शब्दांत लेखांची मांडणी ही जी. बी. देशमुख यांची हातोटी सर्व पुस्तकांतून दिसून येते. अ- अमिताभचामध्ये सुद्धा त्यांनी हे कौशल्य दाखवले आहे. श्री. रवींद्र वानखेडे यांनी त्यांची चित्तथरारक, साहसी अनुभवांची पोतडी सामान्य वाचकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आणि लेखकांचे विशेष आभार ! -- ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.