* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KUNTI
  • Availability : Available
  • Translators : SUDHIR KAUTHALKAR
  • ISBN : 9789386888570
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 524
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KUNTI (NAME CHANGED) IS A TRUE STORY OF A STRONG MINDED WOMAN, BORN IN AN SOMEWHAT ORTHODOX FAMILY. SHE IS VERY MUCH FOND OF DANCE AND MUSIC. HER FATHER DR. GAJENDRAPRASAD IS TOTALLY AGAINST HER HOBBIES. HE DOES NOT ALLOW KUNTI TO GO OUT OF THE HOUSE. BUT DOCTOR HIMSELF IS FOND OF WINE AND WOMAN. HE LOSES HIS WIFE WHEN KUNTI WAS 18. YOUNG BUT SELFISH MANIBHADRA IS APPOINTED AS A COMPOUNDER BY DOCTOR. HE IS ATTRACTED TOWARDS YOUNG AND BEAUTIFUL KUNTI. BOTH COME TOGETHER. HE TAKES DISADVANTAGE OF SIMPLE KUNTI. SHE BECOMES PREGNANT. SHE IS AFRAID OF HER HOT TEMPERED FATHER. REQUESTS MANIBHADRA TO MARRY HER. BUT HE LEAVES KUNTI AND FLEES AWAY FROM HOME. REJECTED KUNTI SECRETLY LEAVES HER HOUSE, THINKING TO COMMIT SUICIDE – REACHES THE CENTRAL CITY LAKE. BUT THINKING ABOUT THE CHILD IN THE WOMB, SHE CHANGES HER MIND, DECIDES TO BRING UP THE CHILD. SHE TAKES RESCUE OF MAHILA ASHRAM IN THE CITY. ASHRAM CHIEF SARALABEN KNOWS KUNTI AS SHE WAS ONCE A FRIEND OF KUNTI’S MOTHER, ADMITS HER IN THE ASHRAM. THERE KUNTI MEETS A SAINT NAMED HARIRAJSWAMI. SHE IS HIGHLY IMPRESSED BY HIS PERSONALITY. KUNTI UNDERGOES PREMATURE DELIVERY AND GIVES BIRTH TO A SON WHO IS NAMED AS KARNA. HE IS A HEALTHY CHILD. AS PER ASHRAM RULES ANY CHILD BORN BEFORE MARRIAGE HAS TO BE GIVEN FOR ADOPTION. KARNA BECOMES 6 MONTHS OLD. SARALABEN EXPLAINS THE RULE TO KUNTI. SHE STRONGLY OPPOSES KARNA’S ADOPTION. A SWEDISH COUPLE VISITS ASHRAM TO ADOPT A CHILD. COUPLE LIKES KARNA. SEEING KUNTI’S FIRM STAND AGAINST ADOPTION, SARLABEN SENDS KUNTI OUT OF THE TOWN UNDER PRETEXT TO FIND HER ONLY LOVER. WITH GREAT EAGERNESS KUNTI LEAVES THE ASHRAM WITH HIMMAT. HE IS STRAIGHTFORWARD AND FAITHFUL SERVANT IN SURAJMAL’S MILL. SHETH IS ALSO ONE OF THE TRUSTEES OF ASHRAM. BEFORE KUNTI RETURNS, THE ADOPTION CEREMONY OF LITTLE KARNA TAKES PLACE. THE COUPLE IMMEDIATELY LEAVES FOR SWEDEN WITH KARNA. HON. GOVERNER, HARIRAJSWAMI WERE PRESENT FOR CEREMONY. KUNTI RETURNS TO ASHRAM NOT FINDING MANIBHADRA. SHE IS TERRIBLY SHOCKED TO SEE EMPTY CRADLE OF KARNA. COMES TO KNOW WHAT HAS HAPPENED. SARLABEN TRIES TO CONSOLE HER. KUNTI IN SHOCKING GRIEF CANT SPEEK A SINGLE WORD. SHE WRITES TO THE GOVERNOR AND ALSO TO THE PRESIDENT OF INDIA. BUT SHE RECEIVES STEREOTYPE ANSWERS. AFTER SOME DAYS ON THE ADVICE OF HARIRAJSWAMI AND SARLABEN SHE AGREES TO MARY HIMMAT. HE, KNOWING HER PAST AND ABOUT KARNA, ACCEPTS HER AS A WIFE. HE ALSO TRIES TO FINDOUT KARNA’S WHEREABOUTS. BOTH ARE HAPPY IN ONE WAY BUT NEVER FORGET KARNA. AS TIME GOES ON KUNTI GIVES BIRTH TO HER SECOND SON ARJUN. THE SEARCH FOR KARNA IS ON. SARLABEN KNOWS THE ADDRESS OF KARNA, BUT CANNOT DISCLOSE IT TO KUNTI AS A PROMISE GIVEN TO SWEDISH COUPLE. SARLABEN MEETS WITH A FETAL CAR ACCIDENT NEAR BARODA AND ADMITTED IN THE HOSPITAL. SHE CONSTANTLY RECALLS KUNTI. HARIRAJSWAMI CALLS KUNTI. BOTH HIMMAT AND KUNTI RUSH TO THE HOSPITAL. KUNTI IS STRICKEN WITH GRIEF SEEING SARLABEN’S HORRIBLE CONDITION. BEFORE TAKING HER LAST BREATH, SARLABEN GIVES KARNA’S ADDRESS IN SWEDEN. COMING BACK TO AHAMADABAD HARIRAJSWAMI WRITES LETTER TO HIS FRIEND DHIREN GANDHI IN FALOON (SWEDEN). HE ASSURES SWAMIJI TO FIND OUT KARNA. WITH GREAT EFFORTS DHIRENBHAI CONTACTS KARNA, MANAGES KUNTI’S TRAVEL TO SWEDEN. KUNTI ARRIVES AND STAYS WITH GANDHI FAMILY. SHE DENIES EVEN FOOD UNLESS MEETS KARNA. DHIRENBHAI IN THAT STORMY NIGHT MANAGES A MEETING WITH KARNA. BOTH MEET NEAR HIS APARTMENT. SHE OVERWHELMED WITH LOVE, TRIES TO EXPLAIN HER REAL MOTHERHOOD. BUT KARNA HAS BECOME PERFECT SWEDISH AND REJECTS TO ACCEPT HER AS REAL MOTHER. KUNTI’S WISH TO MEET HER SON IS FULFILLED. SHE RETURNS TO INDIA BUT NOT ALONE. KARNA’S WIFE KORIN IS ALSO OF INDIAN ORIGIN AND ADOPTED BY A GUJARATI COUPLE IN SWEDEN. SHE IS PREGNANT AND COMES TO KNOW ABOUT KUNTI. SHE DECIDES TO GO WITH KUNTI TO INDIA FOR HER FIRST DELIVERY. KUNTI FEELS MOTHERLY LOVE FOR HER AND BOTH COME TO MOTHERLAND. AT THE END, ALL COME TOGETHER INCLUDING DR. GAJENDRAPRASAD. AS EVERYTHING SET ON A RIGHT TRACK, HARIRAJSWAMI DECIDES TO GO BACK TO BATALA, HIS NATIVE PLACE. ALL GATHER ON RAILWAY STATION TO SAY GOODBYE TO SWAMIJI.
दृढनिश्चयी वृत्तीच्या, महत्त्वाकांक्षी स्त्रीची ही सत्यकथा आहे. `कुंती` (नाव बदलले आहे.) काहीशा सनातनी वातावरण असलेल्या परिवारात जन्म. लहानपणापासून नृत्य-संगीताची आवड. पण तिचे वडील डॉ. गजेंद्रप्रसाद त्याविरुद्ध. त्यासाठी कुंतीला घराबाहेर जायलाही मज्जाव करणारे डॉक्टर स्वतः मात्र स्त्रीसहवासाचे शौकीन. मद्यपानाचीही सवय. आपण पसंत करू त्याच्याशीच तिने लग्न केले पाहिजे हा अट्टाग्रह. मणिभद्र नामक तरुण गजेंद्रप्रसादांचा कम्पाउन्डर. बराच छेलबटाऊ. कुंती अठरा वर्षांची असतानाच कुंतीची आई निधन पावलेली. त्यामुळे घरातले सर्व व्यवहार कुंतीच पाहते. डॉ. चा राग, मद्यपान सहन करते. तरुण, देखण्या कुंती त व मणिभद्रमध्ये घनिष्ट संबंध निर्माण होतात. त्यातून तिला दिवस जातात. ती भयंकर घाबरते. मणिभद्रला लग्नाबद्दल सुचवते; पण लुच्चा मणिभद्र गुपचूप पळून जातो. निराश होऊन कुंती न सांगता घर सोडते व जीव देण्यासाठी शहरातल्या तलावाकडे निघते. पण उदरातील गर्भाच्या विचारात तिचे मन पालटते. अपत्याला जन्म देऊन वाढवण्याचा निर्धार करते. शहरातल्याच महिला आश्रमात आधार घेते. संचालिका सरलाबेन- कुंतीच्या आईची खास मैत्रीण. त्या तिला आश्रय देतात, तिची काळजी घेतात. आश्रमाचे एक उदार आधारस्तंभ अशा हरिराजस्वामींची कुंतीशी भेट होते. हरिराजस्वामींच्या तेजस्वी व्यक्तीमत्त्वाने व विलक्षण आपुलकीमुळे ती भारावून जाते. ठरल्या दिवसापेक्षा काही काळ आधीच कुंती मुलाला जन्म देते. नाव ठेवते `कर्ण`– अपुऱ्या दिवसांचा असूनही कर्ण प्रकृतीने चांगला असतो. आश्रमाच्या नियमानुसार विवाहापूर्वी झालेले बालक मातेजवळ ठेवता येत नाही, दत्तक द्यावेच लागते. पण सरलाबेन कर्ण सहा महिन्यांचा होईतोपर्यंत थांबतात. अखेरीस नियम सांगतात. कुंती कडाडून कर्णाला दत्तक देण्याबाबत विरोध करते. एक स्वीडिश जोडपे दत्तकासाठी आश्रमात येते. त्यांना कर्णच जास्त आवडतो. कुंतीचा विरोधही कळतो. `आपण तिची समजूत घालू` असे आश्वासन सरलाबेन देतात. एक दिवस कुंतीला `तिचा प्रियकर एका गावी लग्नाला आलाय, त्याला गाठ’ असे खोटेच सांगून हिंमतभाईसह दूर गावी पाठवले जाते. हिंमत सूरजमल शेठजींच्या मिलमध्ये नोकर. तसाच हरिराजस्वामींचा विश्वासू सेवक. इकडे कुंतीला कल्पना न देताच कर्णाचे दत्तकविधान आटोपले जाते. त्याचे स्वीडिश माता-पिता लगेचच मायदेशी परततात. निराश होऊन परतताच कुंतीला सर्व प्रकार कळतो. तिला विलक्षण धक्का बसतो. रागही येतो. सरलाबेन निरनिराळ्या तऱ्हेने समजूत घालायचा प्रयत्न करतात, पण कुंती कर्णाला परत आणण्याचा कृतनिश्चय करते. न्याय मागण्यासाठी ती राज्यपालांपासून राष्ट्रपतीपर्यंत अर्ज करीत राहते; पण तिला सरकारी छापील उत्तरे मिळतात. मध्यंतरी हरिराजस्वामी व सरलाबेन यांच्या सल्ल्यामुळे व मध्यस्थीमुळे कुंतीचा हिंमतभाईशी विवाह होतो. हिंमतला कुंतीच्या जीवनातील घटनेची कल्पना असूनही तो तिचा स्वीकार करतो; इतकेच नव्हे तर कर्णाला परत आणण्यासाठी मदतीचे आश्वासन देतो. काही दिवसांनी सरलाबेनना जीवघेणा अपघात होतो. हिंमत व कुंती बडोद्याला हॉस्पिटलात भेटायला जातात. `आपण जगणार नाही` हे लक्षात येताच सरलाबेन कुंतीला, आतापर्यंत लपवलेला कर्णाचा (आता अ‍ॅलनचा) पत्ता देतात. त्या मृत्यू पावतात. आता कुंती व हिंमत स्वबळावर कर्णाचा पत्ता हुडकून त्याला आणण्याचे प्रयत्न सुरू करतात. कुंतीचा दुसरा मुलगा `अर्जुन`ही मातेच्या मदतीस तत्पर होतो. कुंतीला कर्णभेटीचे वेड लागते. हरिराजस्वामींच्या संदेशामुळे फालूनला राहणारे धीरेन गांधी महत्प्रयासाने कर्णाला शोधून फोनवर संपर्क साधतात. इतकेच नव्हे तर कुंतीच्या स्वीडन प्रवासाचीही व्यवस्था करतात. कुंती त्यांच्या घरीच राहते. `कर्णाला भेटल्याशिवाय मी अन्न घेणार नाही` असे कुंती ऐकवते. त्या रात्री मोठ्या मुश्किलीने, हिमवर्षाव असताना धीरेनभाई तिला कर्णाकडे नेतात... पण तो कुंतीला `अस्सल माता` म्हणून मान्य करत नाही. तो पूर्ण स्वीडिश बनला आहे. धीरेनभाई त्याला सर्व समजवतात, तेव्हा कुंतीला तासाभरानंतर भेटतो– पण पूर्ण त्रयस्थपणे. मुलगा भेटला यावरच समाधान मानून कुंती परतीच्या प्रवासाला निघते. आश्चर्यकारकरीत्या कर्णाची पत्नी `कोरीन`- ही पण गुजराती दाम्पत्याला दत्तक गेलेली– सासूसह पहिल्या बाळंतपणासाठी भारतात यायला निघते. सर्व एकत्र येतात. सगळे व्यवस्थित झाले हे पाहून हरिराजस्वामी कायमसाठी आपल्या गावी पंजाबात, बटाल्याला जायला निघतात. कुंती, हिंमत, गजेंद्रप्रसाद इ. कुणाच्याच आग्रहाला ते मानत नाहीत. अखेर स्टेशनवर त्यांना सर्व जण साश्रू नयनांनी निरोप देतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#KUNTI#RANJIKUMARPANDYA#SUDHIRKAUTHALKAR#SWISSAIRFLIGHTNOSR185#FLIGHTNOSR416#
Customer Reviews
  • Rating StarVidya Jadhekar

    आजुबाजूच्या नकारात्मकतेतुन स्वतःला थोड लांब ठेवण्यासाठी म्हणून वाचनालयातून पुस्तक आणायला गेले वपुंची फॅन असल्याने वपृुर्झा वाचावे अस ठरवल. पण नेमकच ते न सापडल्याने व तिथल्या कर्मचार्याला घाई असल्याने त्यांनी टेबलावर ठेवलेल हे कुंती पुस्तक माझ्या हाता दिल, "हे घे हे परत पतत नाही भेटायच खुप सुंदर पुस्तक हे ने बिनास्त" अस सांगितलं आणि मीही याच ग्रुप वर कुंती पुस्तकाबद्दल वाचल होत मला वाटल चला महाभारतातील एक पात्र अजुन चांगल समजेल... पुस्तकाच्या कवर वरच `एका सामान्य मातेच्या जीवघेण्या , असामान्य संघर्षाची कहाणी ` हे वाचुनच पुस्तक वाचायचा मुड गेला कारण हलक फुलक वाचण्याची इच्छा असताना संघर्ष वैगेरे हातात आलेल. पण आता आणलचे तर वाचु नाहीच आवडल तर देउ उद्या परत हा साधा विचार करुन पुस्तक सुरु केल पुस्तकाच्या अगदी सुरूवातीलाच वाचणारा पुस्तकाच्या कथेत अडकून जातोय या कुंतीचा तिच्या इच्छेविरुद्ध स्वीडनला पाठवलेला कर्ण ती कशी मिळवते याचा सस्पेन्स अगदी शेवटच्या पानापर्यंत टिकतो. आईची माया तिच अपत्य तिच्यापासून कितीही लांब गेल आणि कितीही परिस्थिती बदलली तरीही कमी होत नाही. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक संकटांचा अडचणींचा सामना करत ती माता आपल्या पुत्राला कशी मिळवते हे वाचताना अगदी एक भाग संपल्यावर पुढे काय झाले असेल याची उत्कंठा वाढतेय. कुती राहीलेला आश्रम, त्यांच्या प्रमुख सरलाबेन हरिराजस्वामी तिचे वडील गजेंद्र प्रसाद, तिचा प्रियकर मनिभद्र नवरा हिंमत त्याची बायको पु्ष्पा आई रतनभद्रा ही सर्वच्या सर्व पात्र अत्यंत सुंदरतेने मांडलीयत पुस्तक वाचताना ती जणु डोळ्यासमोर उभी राहतात विशेष म्हणजे हे सर्व वाचताना सुरुवातीला पडलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर भेटत जातात. अगदी शेवटच्या पानावर कुंतीला तिच्या संघर्षातुन समाधान भेटल्याच समाधान वाचकालाही नक्कीच मिळतय. एकवेळ अवश्य वाचा!!! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more