* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LAJJA
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177660050
  • Edition : 13
  • Publishing Year : 1994
  • Weight : 250.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL WRITTEN BY TASLIMA NASREEN, A CITIZEN OF BANGLADESH REVEALS THE STAUNCH RELIGION AND THE INHUMAN TREATMENT BY ONE MAN TO ANOTHER. DUTT FAMILY IS THE CITIZEN OF BANGLADESH. IT INCLUDES SUDHAMAY BABU, KIRANMAYEE, AND THEIR TWO CHILDREN SURANJAN AND MAYA. IN BANGLADESH ALL THE HINDUS UNDERGO SEVERE TORTURE FROM THE MAJORITY, BUT THIS HINDU FAMILY STANDS FIRMLY AGAINST IT AND PREFERS NOT TO LEAVE THEIR MOTHERLAND. SUDHAMAY BABU IS AN ATHEIST, BUT A PERSONALITY FULL OF PATRIOTISM, HOPES AND IDEALS. HE RELIES ON THE FEELING THAT HIS MOTHERLAND WILL NEVER DITCH HIM. ON 6TH DECEMBER 1992, SOME RELIGIOUS PEOPLE BURNT BABARI MASJID IN INDIA. THE WORLD PROTESTED AGAINST IT. BUT, THE EFFECTS IN THE NEIGHBOURING COUNTRY BANGLADESH WERE DEVASTATING. THEY FOUND A REAL REASON FOR THE TORTURE OF HINDUS. DUTT FAMILY FALLS PREY TO THIS TORTURE. THEIR FAMILY IS SHATTERED; THEIR SMALL UNIVERSE IS TURNED UPSIDE DOWN AFTER THIS. THIS NOVEL IS BASED ON THE HARSH TRUTH OF THE BLOODY MENTALITIES OF THE SO CALLED FUNDAMENTALISTS. IT REVEALS THE TRUE STORY OF TERRORISM IN THIS MODERN AGE. IT MAKES US INTROSPECT OURSELVES.
तसलिमा नासरिन या बांग्लादेशी लेखिकेची ही कादंबरी धार्मिक कट्टरवाद व माणसानं माणसाला दिलेली अमानुष वागणूक या दोन्हींवर कोरडे ओढते. दत्त कुटुंबीय– सुधामयबाबू, किरणमयी आणि त्यांची दोन मुलं, सुरंजन आणि माया– हे बांग्लादेशचे रहिवासी आहेत. बांग्लादेशात हिंदू ह्या अल्पसंख्याक जमातीचा समाजातील बहुसंख्याकांकडून अनन्वित छळ केला जात असतो, पण हे हिंदू कुटुंब मात्र या छळाला तोंड देत आपल्या मातृभूमीवरच राहणं पसंत करतं. आपल्या इतर आप्तस्वकीयांप्रमाणे ते आपला देश सोडून जायला तयार नसतात. सुधामयबाबू हे एक नास्तिक.. देशप्रेमानं, आशावादानं, आदर्शवादानं भरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. आपली मातृभूमी आपल्याकडे पाठ फिरवणार नाही, आपल्याशी प्रतारणा करणार नाही, या भोळ्याभाबड्या आशेवर ते विसंबून राहिले आहेत. आणि मग... ६ डिसेंबर, १९९२ रोजी भारतात काही धार्मिक मूलतत्त्ववाद्यांनी बाबरी मशिदीचा विनाश केला. साNया जगानं या घटनेचा निषेध केला. पण या कृत्याचे पडसाद शेजारी राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात मात्र फार तीव्रतेनं उमटले. हिंदूंच्या छळासाठी आणखी एक निमित्त मिळालं... दत्त कुटुंबीयांवरही संकटाची कुहाड कोसळते. ते भरडले जाऊ लागतात. त्यांचं जीवन, त्यांचं छोटंसं विश्व उद्ध्वस्त होतं. अत्यंत प्रखर वास्तववादावर आधारित अशी ही कादंबरी मूलतत्त्ववाद्यांची रक्तपिपासू वृत्ती आणि आधुनिक काळातील हिंसाचाराचं प्रत्ययकारी चित्रण करते आणि वाचकाला अंतर्मुख करते.
राज्य पुरस्कार १९१३-९४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarSiddharth More

    या पुस्तका बद्दल जास्त काही बोलू शकत नाही एवढच म्हणू शकतो कि नाटकी सेंक्यूलर माणसांच्या तोंडावर सणसणीत चपराक.

  • Rating StarHrushikesh Honrav

    दोन दिवसांपूर्वीच "लज्जा" कादंबरी वाचून पूर्ण केली. तस्लिमा नासरीन यांची लेखनशैली ही अत्यंत ज्वलंत आहे हे मला "फेरा" वाचल्यावर कळालच होत, पण त्या धार्मिक कट्टरवाद तसेच मुलतत्ववाद्यांची रक्तपिपासू वृत्ती या विषयावर पण एवढ्या प्रखरपणे कोरड ओढतील हे लज्जा" वाचल्यासच कळत. कादंबरीचे मुख्य पात्र आहे. -दत्त कुटुंबीय. मूळचे बांग्लादेशचे रहिवासी असणारे हे कुटुंब. सुधामयबाबू, किरणमयी यांची दोन मुलं सुरंजन आणि माया. बांगलादेशात हिंदू ह्या अल्पसंख्याक जमातीवर समाजातील बहुसंख्याक जमातीकडून छळ केला जातो असतो. पण दत्त कुटुंबीय ह्या सर्व संकटांना, छळाना तोंड देत आपल्या मातृभूमीतच राहणं पसंद करतात. सुधामयबाबू हे नास्तिक... देशप्रेम व आदर्शवादान भारलेलं व्यक्तिमत्त्व. परंतु... ६ डिसेंबर १९९२ रोजी भारतात बाबरी मशिदीचा विनाश केला, आणि पडसाद साऱ्या जगभर पसरले. पण या कृत्याची दखल शेजारी राष्ट्र बांगलादेशाने मात्र फार तीव्रतेने घेतली. हिंदूंचा छळ करायला अजून एक निमित्त भेटलं. अत्यंत प्रखर वास्तववादावर आधारित अशी ही कादंबरी ९०च्या दशकातील अमानुष छळ आणि आधुनिक काळातील हिंसाचाराच प्रत्ययकारी चित्रण करते. कादंबरीतील काही आवडते वाक्य...👇 सुरंजनच्या मनात एक मूक प्रश्न घर करून राहिला होता. पहाट व्हायला आली होती. खिडकीच्या फटीतून सूर्याचे किरण आत येत होते. सुधामयबाबू म्हणाले, "चल, आपण इथून निघून जाऊ या." सुरंजनला आश्चर्य लपवता येईना. तो म्हणाला, " आपण कुठं जायचं, बाबा ? " सुधामयबाबू म्हणाले, " भारतात. " -आणि लज्जेने त्यांचा आवाज चिरकला होता. पण त्यांनी अखेर ते शब्द उच्चारले होते, जिवाच्या कराराने ते बाहेर पडले होते. आपण इथून निघून जाऊ, अस म्हणायला त्यांनी स्वतःला भाग पाडल होत आणि त्याशिवाय दुसरा ईलाज नाही, हेही त्यांना कळून चुकलं होत, कारण त्यांनी आपल्या मनात उभा केलेला प्रचंड पर्वत दिवसेंदिवस खचत चालला होता. #लज्जा 😐 ...Read more

  • Rating StarGanesh Dhure

    हृदय पिळवटून टाकणारी आहे.

  • Rating StarKanchan Kathe

    डोकं आणि मन दोन्ही सुन्न करणारी कादंबरी..... २० वर्षां पूर्वी वाचली

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more