* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LOST HORIZON
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184984521
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ORIGINALLY PUBLISHED IN 1933, LOST HORIZON GAINED UNRIVALED POPULARITY FROM COAST TO COAST, PARTICULARLY AFTER FRANK CAPRA`XS SPELLBINDING 1937 FILM INTRODUCED AUDIENCES NATIONWIDE TO ITS STUNNING TALE OF REVOLUTION, UTOPIA, EMOTION, AND ADVENTURE SET IN A HIDDEN MOUNTAINTOP ESCAPE KNOWN ONLY AS SHANGRI-LA. WHEN AN UPRISING IN BASKUL FORCES A SMALL GROUP OF ENGLISH AND AMERICAN RESIDENTS TO FLEE, THEIR PLANE CRASH-LANDS IN THE FAR WESTERN REACHES OF THE TIBETAN HIMALAYAS. THERE, THE BEWILDERED PARTY FINDS THEMSELVES STRANDED OUTSIDE THE PROTECTIVE BORDERS OF THE BRITISH EMPIRE, AND DISCOVERS ACCESS TO A PLACE BEYOND THE BOUNDS OF THE IMAGINATION&MDASHXA LEGENDARY PARADISE, THE MYSTIC MONASTERY SHANGRI-LA. NEW P.S. EDITION FEATURING AN ESSAY BY KENNETH C. DAVIS, AUTHOR OF DON`XT KNOW MUCH ABOUT®X HISTORY AND TWO-BIT CULTURE: THE PAPERBACKING OF AMERICA.
जिथं काळ निश्चल राहतो! हिमालयीन पर्वतांच्या उंच िंभती असलेल्या एका दूरवरच्या तिबेटियन दरीत स्वप्नातीत असा शांग्रिलाचा मठ आहे. भारतातून अपहरण करून आणलेलं विमान कोसळल्यावर, ह्यूज कॉन्वेला त्या शांग्रिलाच्या मठात आणलं जातं. तिथे त्याला काहीतरी गूढपणा जाणवतो. हे उड्डाण कोणी नियोजित केलं होतं? असं कोणतं रहस्य होतं जे त्या आदरणीय लामाने दडवून ठेवलं होतं? पियानोसारखं वाद्य वाजवणारी ती सुंदर चिनी मुलगी ह्या अशा विचित्र जागी कशी आली? हळूहळू कॉन्वेला ते असंभवनीय सत्य कळतं... तुम्ही ‘लॉस्ट होरायझन’ ह्या पुस्तकात पार गुंगून जाल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #LOSTHORIZON #LOSTHORIZON #लॉस्टहोरायझन #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SNEHALJOSHI #स्नेहलजोशी #JAMESHILTON
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMNA 16-6-2013

    अनुवादित पुस्तकांच्या जगात सध्या अमाप पीक आले आहे.मराठी वाचकांना वेगळ्या अनुभवांनी मंत्रमुग्ध करणारे हे साहित्य जितके चित्तथरारक आहे तितकेच ते अंतर्मुख करते. त्यापैकीच ‘बेस्ट होरायझन’ ही कादंबरी आहे. जेम्स हिल्टन हा लेखक १९०० ते १९५४ या काळात झालेला ्रिटिश माणूस. ‘गुडबाय, मिस्टर चिप्स!’ हा त्याचा गाजलेला चित्रपट १९२० मध्ये त्याची ‘कॅथरिन हरसेल़्फ’ ही कादंबरी प्रकाशित झाली. १९४२ मध्ये ‘मिस्टर मिनिव्हर’ या चित्रपट कथेस त्याला अकॅडमी अ‍ॅवॉर्ड मिळाले. स्नेहल जोशींनी केलेल्या अनुवादाचे वैशिष्ट्य हेच आहे की, एका रहस्यमय गोष्टीची उकल करताना एक स्वतंत्र मराठी कादंबरीचा आस्वाद घेतल्याचा आनंद देतो. हिमालयाच्या हिमपर्वतांच्या रांगा, तिबेटच्या एका दरीत शांग्री-ला नामक मठ आहे. त्याचे गुपित समजल्यावर वाचक चक्रावतो. हिदुस्थानातून अपहरण केलेल्या एका विमानास चुकून (?) अपघात होतो आणि ह्यूज कॉन्वे नामक नायकास त्या मठात आणले जाते. पुढे अनेक प्रश्न उभे राहतात. हे विमानोड्डाण केले कुणी? त्यामागे कुणाचे कटकारस्थान आहे? लामासारख्या साधू माणसाला ते गूढ कायम ठेवून काय साधायचे आहे? त्यात एका चिनी सुंदरीचा काही सहभाग आहे का? हे जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तक वाचायला हवे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more