* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE HISTORY OF MAHABHARATA IS LIKE A MYTH YET IT IS A STORY OF A ROYAL FAMILY. IF WE TRY TO CONSIDER IT AS A STORY, THEN IT APPEARS TO BE AN EPIC, AND WHEN WE APPLY THE RULES OF EPIC TO IT, IT APPEARS TO BE AN APPREHENSIVE JUDGMENT. THIS EPIC MAY APPEAR TO BE DECEITFUL BUT ITS BEAUTY LIES IN ITS PECULIARITY. MAHABHARAT GIVES US THE TRUE PICTURES OF FOUR RIGHTEOUS CHARACTERS ON THE FOUR WALLS OF THE TEMPLE OF RELIGION. EACH WALL WILL PROUDLY REVEAL THE `KARMAYOGI` KRISHNA, `KARMAVEER` BHISHMA, `KARMANURAGI` YUDHISTHIR AND `KARMASANYASI` VIDUR RESPECTIVELY. THEY ALL HOLD DIVINE QUALITIES. MAHABHARATA IS SUCH A SENSITIVE TOPIC, MUCH HAVE BEEN WRITTEN ABOUT IT AND MUCH MORE WILL BE WRITTEN ABOUT IT. WHEN WE READ THIS EPIC, IT BRINGS DIFFERENT UNKNOWN ASPECTS TO CONSIDER OVER AND OVER AGAIN. IT SHOWS EACH INCIDENT IN NEW LIGHT, NEW PERSONALITIES, NEW FORMAT, NEW COLOURS..
महाभारताला इतिहास म्हणावे तर ते पुराण वाटते आणि पुराण म्हणू जावे तर ती राजघराण्याची कहाणी वाटते. एक कथा म्हणून त्याचे मूल्यांकन करावे तर ते विलक्षण असामान्य काव्य वाटते आणि काव्याच्या भिंगातून त्याच्याकडे पाहिल्यास तो दर्शनशास्त्राचा ग्रंथ आहे असे प्रतीत होते. पहिल्या दृष्टिक्षेपात महाभारताचे शास्त्रीय रूप फसवे भासले, तरी त्याचे सौंदर्यही त्याच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण असण्यातच आहे. महाभारतात ज्या धर्माचा बोध आहे, ज्या धर्माचे प्रयोजन आहे त्या धर्माची एखाद्या मंदिराच्या आकारात कल्पना केली तर त्या मंदिराच्या चार भिंतींवर चार वेगवेगळ्या धर्मपुरुषांचे दर्शन होते. एका भिंतीवर कर्मयोगी श्रीकृष्ण धर्माचे अगदी अभिनव रूप धारण करून उभे आहेत. दुसया भिंतीवर कर्मवीर भीष्म उभे आहेत. भीष्मांच्या धर्मतत्त्वात अवगाहन करणे म्हणजे आकाशाला मापण्यासारखे होईल. तिसया बाजूला उभा आहे कर्मानुरागी युधिष्ठिर. युधिष्ठिर स्वत:च धर्माचा अंश आहे. चौथ्या भिंतीवर मात्र साक्षात धर्म स्वत:च उभा आहे, हा धर्म म्हणजेच कर्मसंन्यासी महामना विदुर! महाभारताबद्दल मधूनमधून सारखे लिहिले जात आहे आणि यापुढील काळातही लिहिले जाईल. त्याचे कारण प्रत्येकवेळी नव्याने वाचताना महाभारताचे प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना सूर्योदयाप्रमाणे, भरतीच्या लाटांप्रमाणेच नव्या रूपाचे, नव्या रंगाचे, स्वच्छ, निरभ्र आकाशासारखे दर्शन घडवत मर्मज्ञांपुढे हजर होते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #ANKRAHITSHUNYANCHIBERIJ #RAMAYANATILPATRAVANDANA #ANJANINARAVANE #SUSHMAKAROGAL
Customer Reviews
  • Rating StarVijay Bhadane

    मला भावलेले पुस्तक महाभारतातील पितृवंदना ! महाभारतातील मातृवंदना ! लेखक :--,दिनकर जोशीं मराठी अनुवाद :-- सुषमा शाळिग्राम रामायण ,महाभारत हे आपले आद्य,पुरातन,पूज्य महान ग्रंथ,अक्षर व अक्षय असे वाङमय ! लहानपण ते किशोर अवस्थे र्यंत त्यातील गोष्टी, कथा मनावर संस्कार कर तात,मनाचे मनोरंजन करतात. वाढत्या वयाबरोबर बुद्धी प्रगल्भ झाल्यावर मात्र या अभि जात साहित्यकृतीत गूढार्थ, विषयाची व्यापकता,मानवी जीवनातील भावभावनां या सगळ्यांचे उत्कट,समग्र,सर्वां गीण असे दर्शन घडते कृष्ण द्वैपायन महर्षी व्यास मुनींच्या सर्वस्पर्शी,ओजस्वी व त्रिकालापलीकडचा वेध घेणाऱ्या दिव्य,अद्वितीय लेखणीतून महा भारताचा विशाल पट मांडला गेला आहे. अनेक विचारवंत,ज्ञानमहर्षी, सारस्वतानी आपापल्यापरीने महाभारताचा व्यासांना अभि प्रेत असलेला अर्थ उलगडून दाखवतांना दर्जेदार ग्रंथांची पुस्तकांची निर्मिती केली आहे सुप्रसिद्ध गुजराथी लेखक दिनकर जोशी यांनी गुजराती त लिहिलेलीव सुषमा शाळी ग्राम यांनी मराठीत अनुवाद केलेली" महाभारतातील मातृवंदना व महाभारतातील पितृवंदना ही दोन वेगवेगळी पुस्तक माझ्या वाचनात आली आणि आपण महाभार तावर काहीतरी खूप वेगळे वाचल्याचा अनुभव आला, महाभारतातील व्यासनिर्मित स्त्री पुरुष पात्रांच्या स्वभावाचे मनोविश्लेषण लेखकाने किती खुबीने केले आहे याची प्रचिती ही दोन वेग वेगळी पुस्तके वाच ताना आली.वाचनानंद आला पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रस्तावनेत लेखकाने खूप सुंदर वैचारिक प्रकट चिंतन करून वाचकाला अंतर्मुख केले आहे. त्यात महाभारताचा खरा नाय क कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे.भीष्म,द्रोण,कौरव पांडव हे सारे नायकपदी त्याच्यातील त्रुटी,वैगुण्या मुळे बसू शकत नाही .कारण पुत्रा ला अवैधरित्या जन्म देऊन त्यांचे संगोपनाची जबाबदारी स्वपत्नीवर टाकून ते नामनिराळे झाले आहेत.त्यामुलांचे संगोपन करताना या स्त्रीयांनी खूप कष्ट घेतले.परिस्थितीशी संघर्ष केला सत्यवती,गांधारी,कुंती,उत्तरा यांनी ही अग्निपरीक्षा दिली तरी त्या दुर्भागी ठरल्या!महाभारता च्या नायिका त्या नायिका शोभ ल्या असत्या परंतु त्यांच्यातील काही त्रुटींमुळे त्या होउ शकल्या नाही किंवा आपण नेमकी तशी भूमिका घेउ शकत नाही. महाभारतातील मातृवंदनेत गंगा सात्यकी,,कुंती,गांधारी, अशा स्रियांची व पितृवंदनेत श्रीकृष्ण,भीष्म धर्म,अर्जुन,द्रोणाचार्य,दुर्योधन कर्ण, शकुनी या पुरुषांची नियतीने रचलेली अदभुत, रोमहर्षक अशी जीवनगाथा आहे ,शूरवीर, महान योद्धे असूनही अहंकार,मोह,लोभ, द्वेष,असूया,वैर यासारख्या षडरिपुनी व्यक्ती तसेच समिष्टी ग्रासली असेल तर त्याची परिणीती कुलविनाशात ,समाज विनाशत कशी होते हेच महाभार कार दाखवून देतात.ही मातृ पितृ वंदना त्यातील स्त्री पुरुष पात्रांच्या स्वभावातील विविध पैलूंचे दर्शन घडविते ! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 20-01-2008

    महाभारतातील जीवन कहाण्यांचा वेध... ‘महाभारतातील पितृवंदना’ या पुस्तकात महाभारतातील प्रमुख पुरुष पात्रांच्या जीवनकहाण्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. पितामह भीष्म, आचार्य द्रोण, राजा धृतराष्ट्र, महामना विदुर, धर्मराज युधिष्ठिर, दुरात्मा दुर्योधन, मृतयुंजय कर्ण, सव्यासाची अर्जुन, अश्वत्थामा, पांचालराज द्रुपद आणि महाभारताचा नायक म्हणता येईल असा पूर्णपुरुष श्रीकृष्ण या सर्वच व्यक्तिरेखांची जीवने विविध घटनांनी आणि संघर्षानी भरलेली आहेत. विशिष्ट जीवनमूल्ये आणि प्रसंगोत्पात नीतिमूल्यांबाबत घेतलेल्या वैचित्रपूर्ण भूमिका यामुळे या व्यक्ती गेली दोन-तीन हजार वर्षे भारतीयांना वीरपुरुषांचे आणि पुरुषार्थाचे सकारात्मक किंवा अनर्थकारक आदर्श वाटत आल्या आहेत. कौरव आणि पांडव यांच्यातील भाऊबंदकी लाभलेले युद्धाचे स्वरुप या दोहोंच्या वंशसंहाराला कारण ठरते. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ असे म्हणतात. महाभारतात जे व्यक्तींचे आणि नीतिमूल्यांच्या कसोटीचे प्रसंग आले आहेत, त्यांचीच पुनरावृत्ती मानवी जीवनात पुन: पुन्हा होत असते, तेच चिरंतन संघर्ष आजही आपल्याला भेडसावत असतात. असेही म्हणता येते. गुजराती लेखक दिनकर जोषी यांच्या महाभारतातील पितृवंदना या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी मूळ गुजराती शैलीच्या काही लकबी कायम ठेवून केले आहेत. महाभारतातील हे पुरुष महान आहेत, आकाशाला भिडणारे आहेत. त्यांना समजून देण्यात आपणच कुठेतरी उणे पडण्याची शक्यता आहे, असे म्हणतात. परंतु असे असूनही या पुरुषांच्या वर्तनातील विसंगती वा खटकणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करावे असे नाही, अशी शहामृगी वृत्ती ज्ञानयात्रेला बाधक आहे असे ते मानतात आणि लेखकाचा अधिकार वाचकांनी मान्य करून या सहयात्रेत सामील व्हावे, नितांत निर्मळ चिदाकाश सोबत असू द्यावे असे आवाहन करतात. महाभारताचे मर्म ही त्यांची प्रस्तावना या भूमिकेचे स्पष्टीकरण करते; तसेच महाभारताबद्दल काही मार्मिक निरीक्षणांचीही नोंद करते. महाभारत हा ग्रंथ कृष्णद्वैपायन व्यास नामक एका मानवाचेच सृजन आहे; परंतु ही निर्मिती मानवीय मर्यादांच्या पलीकडे जाऊन पोहोचते. महाभारताशी बरोबरी करील असा एकही ग्रंथ विश्वसाहित्यात नाही. कृष्ण-भीमापासून अश्वत्थामा-अभिमन्यूपर्यंत कुठलीही पात्रे घ्या. त्यांच्या ठिकाणी भव्यता आहे, पण त्याचबरोबर प्रश्नही काही कमी नाहीत. दुर्योधन हा बदनाम व दुर्जन. पण तोही महायुद्धाच्या भीषण क्षणी सात्यकीला म्हणतो, ‘आपण परममित्र. पण परस्परांचे शत्रू बनून जीवावर उठलो. धिक्कार असो आपल्या क्षात्रधर्माचा, आपल्या अहंकाराचा आणि मोहाचा! दुर्जनाचाही हा प्रामाणिकपणा व्यासमुनी दाखवतात. धर्मराज युधिष्ठिर द्यूत खेळून ‘मी कौरवांचे राज्य हिरावून घेऊ पाहत होता’ अशी कबुली देतो. पराक्रमी भीष्म द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना ‘समर्थ माणूस म्हणेल तोच धर्मज म्हणून अगतिकपणे बघ्याची भूमिका घेतो. आशीर्वाद मागायला आलेल्या युधिष्ठिराला आपण दुर्योधनाचे मिंधे आणि नपुंसक आहोत असे दिनपणे म्हणतो. धर्माचे उत्तुंग शिखर असणारा श्रीकृष्ण निद्रावस्थेतील द्रौपदीच्या पाच पुत्रांची अश्वत्थामाकडून होणारी हत्या रोखू शकत नाही. ही उदाहरणे देऊन जोषी आपण या व्यक्तींकडे ‘वास्तव’ द्दष्टीने बघण्याचा प्रयत्न कसा करीत आहोत याची प्रचिती दिली आहे. महाभारतातील बरीच पात्रे पिता म्हणून अवैध जन्म देऊन लगेच अद्दश्य होताना दिसतात. पुत्रजन्माचाच काय पुत्रसंगोपनाचा सगळा भार, सगळा संघर्ष हा स्त्रीपात्रांनाच सहन करावा लागतो, असेही विधान ते करतात. धृतराष्ट्र आणि पांडू यांना झालेली संतती ही सर्वसामान्य नाही. सत्यवती पराशराच्या संबंधातून व्यासाला जन्म देते आणि पराशराच्या वरदानाने ती कुमारीच राहते. यासारख्या घटनांतील तर्कसंगती लावणे कठीण जाते. भीष्म काशी कन्यांशी स्वयंवरात जाऊन त्यांचे बलपूर्वक हरण करतो. पण जिंकलेल्या अंबालिका व अंबिका यांच्याशी स्वत: लग्न न करता, विचित्रवीर्याशी त्यांचे लग्न लावून देतो. तिसरी राजकन्या अंबा शाल्वावर प्रेम आहे असे म्हणून भीष्माकडून ‘मुक्ती’ मिळवू पाहते. पण शाल्व तिला स्वीकारत नाही तेव्हा भीष्माने आपल्याशी लग्न करावे असे परशुरामाकरवी भीष्माला सुचवते. परशुराम हे भीष्माचे गुरु. पण ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा भीष्माला गुरुच्या आज्ञेचे पालन करण्याच्या आड येते. त्यांचे युद्ध होते. अंबा तपश्चर्या करून भीष्माचा वध करण्याचा वर मागते. शिखंडीच्या रुपात पुनर्जन्म घेते. अशा कितीतरी अतर्क्य, अनोख्या घटना या पात्रांच्या जीवनात घडतात. आजही त्या घटनांचे असामान्यत्व आपल्याला थक्क करते. जलकन्या उलुपी अर्जुनावर मोहीत होते. कामतृप्तीसाठी ती लग्नाचा प्रस्ताव मांडते. अर्जुनालाही तिचे आकर्षण वाटते; परंतु तो म्हणतो, ‘ब्रह्मचर्यपालनाच्या वचनाने मी बांधला गेलो आहे. तेव्हा उलुपी त्याची समजूत काढते, हे ब्रह्मचर्यपालन द्रौपदीच्या संदर्भात आहे. अर्जुन कामभावनेला शरण जाऊन प्रतिज्ञेला मुरड घालतो. तिच्याशी लग्न करतो. त्या रात्री त्यांचा सहवास घडतो. तिला गर्भ राहतो. पुढे पुत्र होतो. त्याचे नाव इरावान. तो तिच्याजवळच राहतो. अर्जुनाशी त्या रात्रीनंतर उलुपीचा संबंध येत नाही. परंतु उलुपी मात्र आमरण त्या विवाहाशी एकनिष्ठ राहते. हा पुत्र कुरुक्षेत्रावर पांडवांकडून लढतो. वनवासाच्या शेवटच्या टप्प्यातही अर्जुनाची भ्रमर वृत्ती दिसून येते. कृष्णाची बहीण सुभद्रा हिला बघून तो कामविव्हल होतो. कृष्ण त्याला सुभद्रेला पळवून नेण्याचा सल्ला देतो. तशी व्यवस्था करतो. कृष्ण असे का करतो? अर्जुनावर अंकुश ठेवण्यासाठी तो बहिणीचे निमित्त करतो, असे म्हणणे तर्कसंगत वाटते. अर्जुनाने नंतर अन्य स्त्रीचा विचार केला नाही ही वस्तुस्थिती आहे. दोनदा संधी असूनही अर्जुनाने परस्त्रीचा अंगीकार करण्याचे टाळले. इंद्राच्या दरबारात उर्वशीने त्याच्याशी शारीरिक संबंधाची इच्छा प्रकट केली. तेव्हा अर्जुनाने म्हटले, तुम्ही मला मातेसमान आहात. पुरुरवा या आमच्या पूर्वजाची पत्नी आहात. तुम्ही मला वंदनीय आहात. अर्जुनाने कृष्णप्रेम आणि दूरदृष्टी या दोन्हींचे उदाहरण म्हणून युद्धापूर्वी एका बाजूला नि:शस्त्र श्रीकृष्ण आणि दुसऱ्या बाजूला यादवांची सर्व सेना असा पर्याय असताना अर्जुनाने व् कृष्णाची निवड केली याकडे बोट दाखवायला हवे. युद्ध निरर्थक आहे. मला लढायचेच नाही. भाऊबंदांचा संहार करुन विजय मिळवण्यात मला गम्य नाही असे अर्जुन म्हणतो तेव्हा त्यांचा विचार हा ऊर्ध्वीकरण पावून गीतेचा योग बनतो, युद्धाच्या अखेरीसही श्रीकृष्ण भस्मसात झालेल्या रथातून अर्जुन उतरल्यानंतरच जळू देतो व अर्जुनाला वाचवतो. जोषी या प्रमुख व्यक्तींच्या वर्तनातील अशा विसंगतींचा अन्वयार्थ लावू पाहतात. लाक्षागृहाला दुर्योधन आग लावून पांडवांना जाळून टाकण्याचा बनाव रचतो. तेव्हा युधिष्ठिर भोजनाच्या निमित्ताने लाक्षागृहात आलेल्या स्त्रीला आणि तिच्या पाच पुत्रांना मद्य पाजून झोपायला लावतो आणि लाक्षागृहाला आग लावून पांडवांना भुयारी मार्गाने बाहेर काढतो. ही राजकीय लबाडीच होय असे जोशी स्पष्ट करतात. सहा निर्दोष अतिथींचा बळी देणे हे तर्कसंगत वाटत नाही. हे कृत्य युधिष्ठिराने केले म्हणून ते मनाला जास्त टोचते. युधिकष्ठराला मग धर्मराज का म्हणायचे? हा त्यांचा प्रश्न. युधिष्ठिराचे द्रौपदी स्वयंवराच्या वेळचे वर्तन, हस्तिनापुरात द्युत खेळण्याच्या वेळचे वर्तन आणि पत्नीला पणाला लावणे, हे बुचकळ्यात टाकणारे आहे. ‘होय, अश्वत्थामा मेला’ असे सांगून द्रोणाचार्यांना नामोहरम करण्याच्या वेळचे युधिष्ठिराचे वाक्य त्याच्या सत्यनिष्ठेबाबत साशंकता निर्माण करते. त्याबाबत ‘नरो वा कुंजरो वा’ असा श्लोक उद्घृत केला जातो. परंतु महाभारतात हा शब्दप्रयोग नाही असा खुलासा दिनकर जोशी करतात. हे स्पष्टवक्तेपण कधीकधी आपल्याला धक्कादायक वाटते. परंतु सत्य हे सत्यच असते. अर्थात युधिष्ठिरांच्या न्यायशील, सत्यनिष्ठ व धर्मनिष्ठ वर्तनाचेही अनेकविध प्रसंग आहेतच. असे प्रत्येक व्यक्तीबाबत बारकाईने जोषी यांनी विश्लेषण केले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more