* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHRI DINKAR JOSHI IS NOW A FAMILIAR AND WELL-KNOWN NAME FOR READERS OF MARATHI LITERATURE. DINKAR JOSHI PIONEERED THE INTRODUCTION AND ESTABLISHMENT OF THE GENRE OF BIOGRAPHICAL FICTION INTO THE WORLD OF GUJARATI LITERATURE. HE HAS FICTIONALIZED THE LIVES OF VARIOUS MEN OVER DIFFERENT TIME PERIODS, EACH WITH THEIR DISTINCTIVE STYLES AND PERSONALITIES, SUCH AS ACHARYADRONA, TATHAGATHA BUDDHA, GURUDEV RABINDRANATH TAGORE, KAVI NARMAD, MOHAMMED ALI JINNAH AND MAHATMA GANDHI’S SON ,HARILAL GANDHI . IN “MAHAMANAV”, THE READER GETS A DETAILED GLIMPSE INTO THE LIFE WORK OF SARDAR VALLABHBHAI PATEL. A SUCCESSFUL BARRISTER, SARDAR PATEL WAS ONLY DISTANTLY AWARE OF THE INDIAN POLITICAL SCENE TILL THE AGE OF 42. SPELLBOUND BY MAHATMA GANDHI’S TOWERING PERSONALITY, HE ENTERED POLITICS. AFTER DOING SO, HE DEVOTED HIS LIFE TO THE INDIAN FREEDOM STRUGGLE AND INDIAN POLITICS. THE WRITER HAS WELL CHARACTERIZED HIM AS A LOVING FATHER, RESPONSIBLE BROTHER, UPRIGHT FEARLESS POLITICIAN AND PRINCIPLED LEADER THROUGH VARIOUS INCIDENTS IN THE NARRATIVE. DINKAR JOSHI HAS SUCCINCTLY CAPTURED THE VARIOUS FACETS OF HIS PERSONALITY AND RENDERED TO THE READER A NARRATIVE WHICH DEFINES A MULTI-TALENTED MAN, A MAN WHO HAD A KEEN INSIGHT INTO THE NATIONAL AND GLOBAL SOCIO-POLITICAL CLIMATES, AND A PASSIONATE ZEAL FOR THE BETTERMENT OF HIS NATION AND FELLOW INDIANS. JOSHI GIVES US A CLEAR PICTURE OF THE MAN WHO VERY WELL DESERVED THE TITLE “ MAN OF IRON” – A TITLE THAT WAS SEEMINGLY AT ODDS WITH HIS VERY SENSITIVE NATURE BELYING HIS FORMIDABLE ‘IRON CLAD’ EXTERIOR. SARDAR PATEL WAS COMPLETELY AWARE AND CONVINCED THAT UNLESS ALL THE 562 PRINCELY STATES IN POST PARTITION INDIA ACCEDED INTO THE UNION, THERE COULD BE NO ONE AND FREE INDIAN NATION. THE SUCCESSFUL ACCESSION OF ALL THE PRINCIPALITIES INTO FREE AND UNITED INDIA WAS THE BRIGHTEST FEATHER IN THE SARDAR’S CAP. DINKAR JOSHI HAS SUPERBLY CAPTURED THIS NARRATIVE OF THE VARIOUS MEANS PATEL EMPLOYED IN ORDER TO CAJOLE, COAX AND AT TIMES SHOW GREAT DIPLOMACY , TACT AND PRINCIPLED RIGOUR WHILE BRINGING ABOUT THE ACCESSION OF ALL PRINCELY STATES INTO THE UNION. ON MANY OCCASIONS IN THE NARRATIVE, DINKAR JOSHI HAS CREATIVELY DEPICTED SARDAR PATEL’S DIFFERENCE OF OPINIONS WITH BOTH JAWAHARLAL NEHRU AND MAHATMA GANDHI, AND HOW THOSE DIFFERING IDEOLOGICAL POSITIONS NEVER IMPACTED HIS TRUE AND GENUINE PERSONAL RELATIONS WITH EITHER OF THE TWO MEN. THE EASE WITH WHICH HE RELINQUISHED A SURE AND CERTAIN PRIME-MINISTERSHIP AT MAHATMA GANDHI’S BEHEST IS PROOF OF HIS DEPTH OF CHARACTER. DINKAR JOSHI HAS HITHERTO PORTRAYED HISTORICAL-BIOGRAPHICAL FICTIONALIZED NARRATIVES OF MOHAMMED ALI JINNAH IN “ PRATINAYAK” AND HARILAL GANDHI IN “PRAKASHACHISAWLI”. “MAHAMANAV” IS JUST SUCH A WORK OF BIOGRAPHICAL FICTION.
श्री. दिनकर जोषी यांचे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचे झाले आहे. ‘चरित्रात्मक कादंबरी’ हा साहित्यप्रकार गुजराती साहित्यविश्वात त्यांनी प्रथमच आणला आणि रूढ केला असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. आचार्य द्रोण, तथागत बुद्ध, गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूर, कवी नर्मद, महंमद अली जीना, महात्मा गांधीपुत्र हरिलाल गांधी अशा वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या स्वभावप्रकृतीच्या व्यक्तींचे कादंबरीच्या आकृतिबंधातून केलेले चरित्रचित्रण मराठी वाचकांनी यापूर्वी अनुभवलेले आहे. महामानव कादंबरीतून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचे जीवितकार्य वाचकांपुढे ठेवले आहे. यशस्वी बॅरिस्टर असलेल्या वल्लभभाई झवेरभाई पटेलांचा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षापर्यंत भारतातील राजकारणाशी दुरून परिचय होता; परंतु थेट संबंध आला नव्हता. गांधीजींच्या प्रभावी व्याQक्तमत्त्वाने भारावून जाऊन ते काहीशा अनपेक्षितपणे राजकारणात उतरले. त्यानंतर मात्र त्यांनी तनमनधनाने भारतासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्यातला प्रेमळ पिता, कर्तव्यदक्ष बंधू, कणखर, निर्भीड राजकारणी, तत्त्वनिष्ठ नेता लेखकाने विविध प्रसंगांतून रंगवला आहे. देशातील तसेच जगातील राजकीय आणि सामाजिक परिाQस्थतीची त्यांची विलक्षण जाण, देशबांधवांसाठीची आणि देशाच्या कल्याणासाठीची आंतरिक तळमळ, गांधीजींच्या ठायी असलेली त्यांची निष्ठा आणि त्यातून आलेला, त्यांच्या ‘लोहपुरुष’ प्रतिमेशी वरकरणी सुसंगत न वाटणारा अति हळवेपणा यांचे अत्यंत प्रभावी चित्रण लेखकाने केले आहे. फाळणी स्वीकारून मिळालेल्या विभाजित भूभागातून सार्वभौम भारत राष्ट्राची निर्मिती होणे शक्य नाही; देशभर विखुरलेली ५६२ संस्थाने जोपर्यंत स्वतंत्र भारतात विलीन होत नाहीत, तोपर्यंत भारत हा एकसंध देश, एक राष्ट्र म्हणून कधीच आQस्तत्वात येऊ शकणार नाही, या गोष्टीचे त्यांना सर्वांगीण भान होते. संस्थानांचे विलीनीकरण हा त्यांच्या कार्यातील मानाचा तुरा ठरला. या विलीनीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, अमलात आणलेले डावपेच, दाखवलेला मुत्सद्दीपणा, धोरणी दीर्घदृष्टी, प्रसंगी कारवाई करण्याचे त्यांचे धाडस इत्यादी पैलू लेखकाने निरनिराळ्या प्रसंगांतून सविस्तरपणे वर्णिले आहेत. जवाहरलाल नेहरू आणि गांधीजी यांच्याशी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरदारांचे तात्विक मतभेद झाले असले, तरी या दोघांविषयीचा त्यांचा आंतरिक जिव्हाळा किती सच्चा होता, हे लेखकाने अनेक प्रसंगांतून चित्रित केले आहे. हातातोंडाशी आलेला पंतप्रधानकीचा प्याला गांधीजींच्या इच्छेखातर त्यांनी अत्यंत सहजपणे सोडून दिला, हे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याला साजेसेच होते.

No Records Found
No Records Found
Keywords
#MAHAMANAVSARDARPATEL#DINKARJOSHI#BRITISHINDIA#ROYALINDIAN NAVY#POLITICALDEPARTMENT#BIRLA HOUSE# CENTRALLEGISLATIVEASSEMBLY#CABINETMISSIONPLAN#BENNWEDGWOOD#CONRADCORFIELD#
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 30-11-2018

    ‘सरदारत्वा’ची साकल्याने मांडणी... सरदार वल्लभभाई पटेल हे अत्यंत वास्तववादी, व्यवहारवादी आणि स्पष्टव्यक्ते होते. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संतांचे गुण नव्हते, असा त्याचा अर्थ नाही. पण त्यांचे निष्ठावंत अनुयायी त्यांना सरदार म्हणत. महात्मा वा मामानव असे म्हणत नसत. याचा अर्थ कोमल असूनही कठोर, तत्त्वनिष्ठ, उत्तुंग व्यक्तिमत्त्व असूनही पाय सदैव जमिनीवरच ठेवणारे, दीर्घदृष्टीचे नेते म्हणून ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात होते. एखाद्या सर्वोच्च नेत्याला स्तुतिपाठक भरपूर मिळतील. लोकमान्यता मिळेल, पण सरदारांना त्यांच्या माघारी त्यांचे राजकारण आणि संघटना बांधणीमागचे सूत्र समजून सांगणारे आणि त्याचे समर्थन करणारे अनुयायी मिळाले. काँग्रेस संघटनेवरील त्यांची विलक्षण पकड, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही त्यांची वैशिष्ट्ये. त्या कारणांमुळेच स्वातंत्र्यपूर्व काळातील महान नेत्यांच्या तुलनेत सरदार यांना अधिक निष्ठावंत अनुयायी मिळाले. पण या अनुयायांच्या मनात सरदार यांच्याविषयी काही ठाम समज आहेत. ते असे की सरदार यांच्यावर स्वातंत्र्यपूर्व काळात अन्याय झाला. म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाचा मान चालून आला असताना, तो स्वीकारण्याची पूर्ण तयारी झाली असताना सरदारांना त्या पदापासून दूर जावे लागले. अध्यक्षपदाचा प्याला सरदार यांच्या ओठांपासून दूर करण्यात आला. पण ‘असे झाले असते तर वा तसे झाले असते तर’ अशा वाक्यांना तथ्यावर आधारलेल्या इतिहासलेखनात किंमत नसते वा जागा नसते. नेमका हाच मोह आवरून ज्येष्ठ गुजराती साहित्यिक दिनकर जोशी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर ‘महामानव सरदार पटेल’ ही कादंबरी लिहिली आहे. म्हणजे ऐतिहासिक तथ्यांवर आधारलेली ही कादंबरी आहे. म्हणजे जोशी यांनी सरदार यांच्यातील ‘सरदारत्व’ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकाच्या मते १९२८ च्या बारडोली लढ्याने वल्लभभाई पटेल यांना सरदार बनवले आणि त्यानंतर सरदारांचे काँग्रेस संघटनेतील महत्त्व असाधारण राहिले. परंतु लेखकाने या पुस्तकात सरदारांविषयी लिहिण्याऐवजी सरदारात्वाविषयी लिहिले आहे. या कादंबरीत १९४५ ते १९५० च्या दरम्यानच्या सरदारांच्या आयुष्यातील घटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. कादंबरीला सुरुवात होण्याआधी लेखकाने सरदार आणि नेहरू यांच्यातील सुप्त संघर्षाची उदाहरणे दिली आहेत. तरीही सरदारांचे व्यक्तिचित्र कुठेही एककल्ली होणार नाही किंवा ते कोणाचे विरोधक होते, असा वाचकांचा समज होईल, असा कोणताही संदर्भ त्यांनी आत येऊ दिलेला नाही. पहिल्या भागात कादंबरीची सुरुवात महात्मा गांधींनी फाळणीला मान्यता दिल्याच्या घटनेने होते. फाळणीच्या वार्तेने सरहद्द गांधी एखाद्या लहान मुलासारखे रडत होते. त्यांना समजावण्यासाठी गांधी तिथे जातात आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवतात. तेव्हा सरहद्द गांधी असे उद्गारतात की, बापू आम्हाला लांडग्यांच्या तावडीत दिलंत! केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर दिल्लीतील उद्योगपती बनवारीलाल सरदारांना भेटतात आणि मंत्री असूनही अद्याप कारभारासाठी सरकारी निवासस्थान न मिळालेल्या सरदारांना ते स्वत:चा औरंगजेब रोडवरील बंगला कार्यालयासाठी देतात. उद्योगपती बनवारीलाल यांना भारतीय राजकारणात रस निर्माण झाला होता आणि मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची ऊठबस होती. या एका घटनेतून असे प्रतीत होते की, उद्योगपतींनी राजकारणात रस घेतला होता तो देशाच्या हितासाठी. समाजकारणासाठी. त्यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. या कादंबरीतील सर्वच घटनांमधून लेखकाने हेच दाखवून दिले आहे की पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधीपासूनच लोकांच्या मनात ‘पंतप्रधान’ असलेले जवाहरलाल नेहरू यांच्यात आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात मतभेद होते. अगदी तीव्र मतभेद होते. परंतु त्याचा देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीवर कोणताही परिणाम त्यांनी होऊ दिला नाही. प्रश्नाकडे क्षमाशील औदार्याने पाहिले पाहिजे आणि नवे वातावरण निर्माण होईल अशी भाषा वापरली पाहिजे, यावर साऱ्याच नेत्यांचे एकमत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मनात जवाहरलाल यांच्याबद्दल किती आदर होता, हा प्रसंग या कादंबरीत आहे. फाळणीनंतर पाकिस्तानचे पहिले हाय कमिशनर म्हणून नियुक्त झालेले श्रीप्रकाश सरदारांच्या भेटीला येतात. फाळणीनंतर पाकिस्तानच्या दोन्ही भागांतून चिंताजनक बातम्या येत होत्या. हजारो निर्दोष आणि बिगरमुसलमानांच्या अगदी ठरवून कत्तली केल्या जात होत्या. काश्मीर गिळंकृत करण्यासाठी पाकिस्तान सरकारनं युद्ध आरंभलं होतं. श्रीप्रकाशांना याबद्दल काय माहीत आहे हे सरदारांना जाणून घ्यायचं होतं, ठरल्यानुसार श्रीप्रकाश अगदी वेळेवर आले. सरदारांनी विचारलं, ‘श्रीप्रकाश, लियाकत सरकार दंगे रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतंय असं वाटतंय का तुम्हाला?’ ‘अजिबात नाही, श्रीप्रकाश म्हणाले.’ ‘असं असेल तर मग काश्मीर प्रश्नावर जीनांनी जे युद्ध पुकारलंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?’ ‘काय वाटेल ते झालं तरी स्वत:चा अंकुश टिकवून ठेवण्यासाठी जीना प्रसंगी कोणताही धोका पत्कारायला मागेपुढे पाहणार नाहीत. काश्मीर मिळविण्यापेक्षासुद्धा हिंदुस्थानला जास्तीत जास्त अडचणीत आणण्यात जीनांना अडचणीत आणण्यात जीनांना अधिक स्वारस्य आहे.’ ‘ते तुम्हाला कसं कळलं श्रीप्रकाश? मी भेटलो होतो जीनांना, लियाकत आणि त्यांचे साथीदार, त्या सगळ्यांबद्दल जीनांच्या मनात तीव्र असंतोष दाटलाय. मुंबईतल्या मलबार हिलवरच्या त्यांच्या बंगल्याची काळजी घ्यायला त्यांनी मला खास सांगितलं आहे.’ ‘हे! हे सगळं तुम्ही पंतप्रधान जवाहरलालांना सांगितलंत?’ ‘हो,’ श्रीप्रकाश उत्तरले, ‘पण जवाहरलाल हे मुळीच मान्य करायला तयार नाहीत. काश्मीर प्रकरणात सगळं काही आपल्या नियंत्रणाखाली आहे आणि पाकिस्तानच्या अल्पसंख्याकांचं रक्षण करायला लियाकत सक्षम आहेत, असं त्यांना वाटतं. माफ करा सरदार. पण मला वाटतं जवाहरलाल खोटारडे आहेत. खोटं बोलतात ते!’ तसं नाहीय श्रीप्रकाश जवाहरलाल खोटारडे (liar) नाहीत, तर चुकीचं (untrue) बोलणारे आहेत. त्यांना याविषयीची माहिती पुरविणारे चुकीची माहिती पुरवत आहेत. म्हणून नेहरू चुकीचे बोलत आहेत. ते खोटारडे नाहीत... असे अंतर्मुख करणारे अनेक प्रसंग या पुस्तकात आहेत. सरदार पटेलांच्या जीवनाच्या उत्तरार्धातील केवळ पाच वर्षांच्या कालावधीतील प्रसंग केंद्रस्थानी ठेवून त्यातून प्रकटणाऱ्या सरदार या कादंबरीतील हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे. हे करताना लेखक दिनेश जोशी यांनी स्वत:मधील कादंबरीकाराला इतिहासावर स्वार होऊ दिलेले नाही. या पुस्तकात जोशी यांची कथनशैली वाचकाला इतिहासात नेते. काळाच्या ओघात काही उजेडात न आलेल्या गोष्टी या पुस्तकातून उलगडत जातात. हे पुस्तक एकाच वेळी गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत प्रकाशित झाले. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी केला आहे. –गोविंद डेगवेकर ...Read more

  • Rating Starदिव्य मराठी १५ जून १८

    वल्लभभाई पटेलांच्या जीवनावर `महामानव सरदार पटेल` ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चरित्रांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. ४२व्या वर्षी राजकारणात आलेल्या वल्लभभाई पटेलांच्या जीवनातील १९४-१९५० हा कालखंड संघर्षमय होता. सुरुवातीला महात्मा गांधींच्या राजकीय नीतीला नावं ठेवणारे सरदार नंतर गांधीजींच्याच प्रभावाने राजकारणात आले. बारडोलीच्या सत्याग्रहाने वल्लभभाईंना `सरदार` अशी ओळख मिळवून दिली. गांधी आणि सरदार यांच्यातील नातं गुरू-शिष्याचं होतं. काही वेळेला सहमत नसतानाही वल्लभभाईंनी गांधींचे निर्णय शिरोधार्य मानले. `खिलाफत` चळवळीला वल्लभभाईंचा विरोध असतानाही त्या चळवळीचं समर्थन करणाऱ्या गांधीजींच्या बाजूने ते उभे राहिले. १९४६मध्ये दोन महत्त्वाच्या घटना वल्लभभाईंच्या जीवनात घडल्या. याच वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी काँग्रेसच्या पंधरा समित्यांपैकी बारा समित्यांनी अध्यक्ष म्हणून पटेलांचं नाव सुचवलं होतं; तोच अध्यक्ष पंतप्रधान होणार, हे नक्की होतं; पण गांधींनी जवाहरलाल नेहरूंचं नाव सुचवल्यामुळे वल्लभभाईंनी पंतप्रधानपद नाकारलं. केवळ पटेलांच्या राजकीय जीवनालाच नव्हे तर भारताच्या इतिहासालाही कलाटणी देणारी ही घटना होती. याच वर्षी घडलेली आणखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भारतीय नौदलातील हिंदी सैनिकांनी, ब्रिटिशांनी चालवलेल्या वर्णद्वेषामुळे बंडाचे निशाण उभारले. हातात बंदुका घेतल्या आणि तोफांची तोंडं फिरवली; पण वल्लभभाईंनी त्यांची समजूत घालून ते बंड शमवलं. वल्लभभाईंचं हे कामही फार महत्त्वाचं आहे; कारण हे बंड जर शमवलं गेलं नसतं तर हातातोंडाशी आलेल्या स्वातंत्र्यप्राप्तीत अडसर निर्माण झाला असता. मुस्लिम लीगने गृहमंत्रिपद मागितलं होतं; पण पंतप्रधानपदावर पाणी सोडलेल्या वल्लभभाईंनी गृहमंत्रिपद सोडण्यास मात्र ठाम नकार दिला. त्यांचा हाही निर्णय नंतर झालेल्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय विधायक ठरला. वल्लभभाईंची आणखी एक कामगिरी देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली, ती म्हणजे संस्थानांचं विलीनीकरण. हे कार्य जर वल्लभभाईंंनी केलं नसतं तर भारताचं शेकडो विभागांमध्ये विभाजन झालं असतं. वल्लभभाईंंचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल यांची नेताजी सुभाषचंद्रांशी वैचारिक जवळीक होती. आपल्या मृत्युपत्राद्वारे त्यांनी सुभाषबाबूंसाठी सव्वा लाख रुपयांची तरतूद केली होती; पण विठ्ठलभाईंच्या निधनानंतर वल्लभभाईंनी यासंदर्भात कोर्टात केस दाखल केली आणि विठ्ठलभाईंच्या नावे एक ट्रस्ट स्थापन करून ते पैसे काँग्रेस समितीला देण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली. वल्लभभाई ही केस जिंकले; पण त्यांच्यात आणि सुभाषबाबूंमध्ये त्यामुळे वितुष्ट आलं. काँग्रेस समितीचे इतर सदस्यही सुभाषबाबूंच्या विरोधात होते. त्यामुळे सुभाषबाबू काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर वल्लभभाईंंसह सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात असहकार पुकारला. त्यामुळे सुभाषबाबूंना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. १९३९मध्ये ब्रिटनने भारताला दुसऱ्या महायुद्धात सामील करून घेतलं. काँग्रेसला हे अमान्य असल्यामुळे एकूण काँग्रेसी मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. अर्थात वल्लभभाईंंना राजीनामा द्यावा लागला तरी राजीनाम्याच्या आदेशपत्राशी ते सहमत नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गृह खात्याची जबाबदारी सांभाळत असताना चीनविषयी धोक्याचा इशारा त्यांनी जवाहरलाल नेहरूंना दिला होता; पण नेहरूंनी त्याचा गांभीर्याने विचार केला नाही. थोडक्यात, समतोलपणे विचार करण्याची शक्ती असूनही अन्य महत्त्वाच्या लोकांच्या दुराग्रहामुळे, एककल्लीपणामुळे सरदारांना इच्छा असूनही स्वतंत्र भारताचं सुनिश्चित आणि चांगलं भविष्य घडवण्यापासून वंचित राहावं लागलं. एकूणच, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही सरदारांनी घेतलेले काही निर्णय त्या त्या वेळच्या परिस्थितीला सकारात्मक कलाटणी देणारे ठरले आणि भविष्याच्या दृष्टीनेही लाभकारक ठरले. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर ४१ वर्षांनी त्यांना `भारतरत्न` देऊन घेतली. सरदारांच्या जीवनातील महत्त्वाच्या कालखंडाचं प्राधान्याने चित्रण करणारी ही चरित्रात्मक कादंबरी वाचनीय आणि अभ्यासनीय आहे. या चरित्राला कादंबरीचं स्वरूप जरी दिलं असलं तरी इतिहासाशी प्रामाणिक राहूनच दिनकर जोषींनी लेखन केलं आहे. अभ्यासकांबरोबर सर्वसामान्यांनाही पटेलांच्या चरित्राच्या निमित्ताने भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या कालखंडाविषयी संदर्भ माहिती मिळते. या पुस्तकाची प्रस्तावना त्या दृष्टीने महत्त्वाची ठरावी. सुषमा शाळिग्राम यांनी केलेला अनुवाद उत्तम. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 07-01-2018

    कर्मयोगी संन्यासी... गुजराथी भाषेतील ख्यातनाम लेखक दिनकर जोषी यांनी नवभारताचे शिल्पकार आणि निर्माते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर लिहिलेली ‘महामानव सरदार’ ही कादंबरी गुजराथी, हिंदी आणि इंग्रजी भाषात एकाचवेळी प्रसिद्ध झाली. सरदार पटेल यांच्या तयागी जीवनाचा वेध घेणाऱ्या या कादंबरीचा मराठी अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी सुलभपणे केला आहे. सरदार पटेल यांच्या जीवनातील अंतिम पाच वर्षांच्या कालावधीचे चित्रण असलेल्या याच महत्त्वपूर्ण कालखंडाने जगाच्या इतिहासाला नवे वळण दिले. ब्रिटिशांनी भारत सोडून जायचा निर्णय घेतल्यावर, स्वतंत्र भारताच्या निर्मितीत आलेल्या अनेक समस्या सोडवत ब्रिटिशांनी घातलेले राजकीय कोलदांडे तेव्हा उपपंतप्रधान आणि गृहमंत्री असलेल्या वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत कठोरपणे मोडून काढत फाळणीनंतरचा भारत निर्धाराने अखंड केला. देशातल्या संस्थानांचे विलीनीकरण घडवताना राजकोटचा दिवाण वीर बाळा, जुनागडचे नबाब आणि हैद्राबादचा कासिम रझवी यांच्या फुटीरतावादी कारवायाही मोडून काढल्या. ही कादंबरी वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्राला समर्पित केलेल्या जीवनाचा वेध घेणारी असल्यामुळेच ती पटेल यांच्या जीवनाबाबत फारशा माहिती नसलेल्या घटनांवरही प्रकाशझोत टाकते. वाचकांना अज्ञात असलेल्या अनेक घटना जोषी यांच्या या कादंबरीमुळेच देशवासीयांसमोर आल्या आहेत. सरदार पटेल यांच्या जीवनावरची ही कादंबरी असली, तरी या कलाकृतीचे लेखन करताना जोषी यांनी इतिहासाची मोडतोड तर केलेली नाहीच उलट खरा इतिहास अनेक घटनांद्वारे अत्यंत ओघवत्या शब्दात लिहिला आहे. पटेल यांच्या ऐतिहासिक आणि युगप्रवर्तक, राष्ट्रसंजीवक कार्याचा सन्मान काँग्रेसच्या केंद्र सरकारने केला नाही. उलट त्यांच्या स्मृती संपवायचाच प्रयत्न केला. नेहरूंनी जिवंतपणीच १९५४ मध्ये आपल्यालाच भारतरत्न किताब अर्पण करून घेतला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे तैलचित्र संसदेत लावले गेले. पण पटेल यांचे तैलचित्र संसदेत लावावे, असे नेहरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटले नाही. ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन पटेल यांचे तैलचित्र संसदेत लावण्याची व्यवस्था केली. आपल्या खर्चाने हे चित्र तयार करून घेतले आणि तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावले. त्या कार्यक्रमात पटेल यांना श्रद्धांजली वाहताना शिंदे यांनी म्हटले होते. "Here is the man whom I once hated. Here is the man of whom I was afraid. Here is the man whom I admire and love." स्वातंत्र्योदयाच्या प्रारंभकाळी सरदारांवर श्रद्धा ठेवून ज्यांनी आपलं अस्तित्व संपुष्टात आणलं आणि ज्यांना सरदारांनी दिलेलं तनख्याचे पवित्र वचन केवळ दोनच दशकात ते निरर्थक करून टाकले. प्रजा म्हणून आपल्या त्या सामूहिक पापाच्या प्रायश्चितार्थ हे पुस्तक देशी संस्थानिकांच्या इतिहासाला अर्पण करीत आहे, अशा शब्दात जोषी यांनी अर्पण पत्रिका लिहिली आहे आणि ते वास्तवही आहे. संस्थानिकांचे तनखे विलीन करीत आपण गरिबांचे तारणहार आहोत असा डांगोरा पिटणाऱ्या, केंद्रातल्या- राज्यातल्या सत्तेवर एक काळ मिरासदारी-जहागीरदारी निर्माण करणाऱ्या काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करून शेकडो-हजारो कोटी रुपयांची साम्राज्ये निर्माण केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर जोषी यांची खंत वास्तवच ठरते. –वासुदेव कुलकर्णी ...Read more

  • Rating Starरसिक साहित्य जानेवारी, २०१८

    सरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण गुजराथी भाषेत चरित्रांची संख्या कमी आहे. वल्लभभाई पटेलांच्या जीवनावर ‘महामानव सरदार पटेल’ ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चारित्र्यांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवद केला आहे. बेचाळीसाव्या वर्षी राजकारणात आलेल्या वल्लभभाई पटेलांच्या जीवनातला १९४५-१९५० हा कालखंड संघर्षमय होता. कादंबरीत या संघर्षमय कालखंडाचं चित्रण प्राधान्याने करण्यात आलं आहे. समतोलपणे विचार करण्याची शक्ती असूनही अन्य महत्त्वाच्या लोकांच्या दूराग्रहामुळे, एककल्लीपणामुळे सरदारांना इच्छा असूनही स्वतंत्र भारताचं सुनिश्चित आणि चांगलं भविष्य घडवण्यापासून वंचित राहावं लागलं. एकूणच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही सरदारांनी घेतलेले काही निर्णय त्या त्या वेळेच्या परिस्थितीला सकारात्मक कलाटणी देणारे आणि भविष्याच्या दृष्टीने लाभकारक ठरले. उदाहरणार्थ, नौदलांच्या सैनिकांचं शमवलेलं बंड, संस्थानांचं विलीनीकरण, गृहमंत्री पदावरून न हटण्याचा निश्चय अशा त्यांच्या या कार्यकर्तृत्वाबद्दल भारत सरकारनं त्यांच्या मृत्यू नंतर ४१ वर्षांनी त्यांना भारत रत्न देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली. उशिरा का होईना त्यांच्या कार्याचं स्मरण भारत सरकारला झालं म्हणून आनंद मानायचा का त्यांच्या कार्याचं महत्त्व इतक्या उशिरा आपल्या राज्यकत्र्यांच्या लक्षात आल्याबद्दल खेद वाटून घ्यायचा हा प्रश्चन आहे. तर सरदारांच्या जीवनाला रूढार्थानं न भिडता त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या कालखंडाचं प्राधान्यानं चित्रण करणारी ही चरित्रात्मक कादंबरी वाचनीय आणि अभ्यासनीय आहे. या चारित्र्याला कादंबरीचं स्वरूप जरी दिलं असलं; तरी इतिहासाशी प्रामाणिक राहूनच दिनकर जोषींनी लेखन केलं आहे. अभ्यासकांबरोबर सर्व सामान्यांनाही वल्लभभाई पटेलांच्या चारित्र्याच्या निमित्ताने भारतीय इतिहासातल्या एका महत्त्वाच्या कालखंडाविषयी संदर्भात्मक माहिती मिळते. या पुस्तकाची प्रस्तावना त्या दृष्टीने महत्त्वाची ठरावी. सुषमा शाळिग्राम यांनी केलेला उत्तम अनुवाद! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more