* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357200424
  • Edition : 2
  • Publishing Year : MAY 2023
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 460
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IN THIS THRILLING NOVEL VISHVAS PATIL TAKES US INTO THE MOST ENGAGING ERA OF THE MARATHA HISTORY. THE GREAT WARRIOR CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HAS SHOWN THE WORLD THE TRUE MEANING OF RANKHAINDAL. AFTER ZANZAVAT, THIS IS THE SECOND PART OF THE SERIES, MAHASAMRAT, BASED ON SHIVAJI MAHARAJ. "IN THIS THRILLING NOVEL VISHVAS PATIL TAKES US INTO THE MOST ENGAGING ERA OF THE MARATHA HISTORY. THE GREAT WARRIOR CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HAS SHOWN THE WORLD THE TRUE MEANING OF RANKHAINDAL. AFTER ZANZAVAT, THIS IS THE SECOND PART OF THE SERIES, MAHASAMRAT, BASED ON SHIVAJI MAHARAJ. THE THRILL OF PAWANKHIND, THE LOOTING OF SURAT, THE DISARMAMENT OF THIRTY THOUSAND MOGLI FORCES IN UMBARKHIND, THE CONQUEST OF SHAHISTEKHAN, THE GREAT WAR OF KUDAL AND THE ETERNAL DREAM OF CREATING SINDHUDURG IN THE HEART OF THE SEA! SHIVRAI AT HIS 35 WEILDING `RANKHAINDAL`!"
पावनखिंडीतला थरार, सुरतेची महालूट, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीत केलेले निशस्त्रीकरण, शाहिस्तेखानाला वेसण, कुडाळचे महायुद्ध आणि सागराच्या पोटातले सिंधुदुर्ग निर्मितीचे अचाट स्वप्न! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MAHASAMRAT #RANKHAIDAL #VISHWASPATIL #CHATRAPATI #NOVEL #SHAHAJIMAHARAJ #JIJAU #ZANZAVAT #SHIVAJI #HISTORICALNOVEL #HISTORY #छत्रपती #शिवाजी #शिवाजीमहाराज #विश्वासपाटील #रणखैंदळ #महासम्राट #कादंबरी #ऐतिहासिककादंबरी #इतिहासपरकादंबरी "
Customer Reviews
  • Rating Starसुनील माने, हडपसर

    पुणे प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. त्याच्या सोबत असलेल्या फौजेची दाणादाण उडवली. आदिलशाहीची भरपूर दौलत, हत्ती-घोडे मिळाले. आणि बरोबर तीन दिवसांनी विजापूरच्या तटबंदीवर मराठ्यांची सेना “हर हर महादेव” च्या ललकारीने जबरदस्त धडकली! नेताी पालकरांनी सात हजार फौजेनिशी एकशेसाठ मैलांचे अंतर दिनरात न थांबता विजापूर गाठले. जोरदार हल्ला चढवला. पण अभेद्य तटबंदीमुळे विजापूर वाचले. विजापूरची हरलेली वीस हजार फौज परत जवळ आल्यामुळे नेताजींना माघार घ्यावी लागली. अशी जबरदस्त सुरूवात आहे श्री विश्वास पाटील यांच्या “महासम्राट” या महाकादंबरीच्या दुसऱ्या खंडाची, म्हणजे “रणखैंदळ”ची! या कादंबरी मालिकेतला पहिला खंड “झंझावात”ने खळबळ उडवल्यानंतर बहुप्रतिक्षित दुसरा खंड दि २१-०५-२०२३ रोजी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसने दिमाखदार सोहळ्यात खासदार श्री अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशित केला. या कार्यक्रमाचे पाटील सरांनी निमंत्रण पाठवले होते. तिथे जमलेल्या अफाट गर्दीत माझी ओळख सांगताच शेजारी बसवून पुस्तकावर स्वाक्षरी दिली. महासम्राटच्या पहिल्या खंडाचा (झंझावात) परिचय मी तिसऱ्या सत्रात करून दिला होता. तो पुस्तक परिचय कृष्णा सरांनी पाटील सरांना पाठवला. तो त्यांना आवडला व त्यांनी फोनवर माझे अभिनंदन केले. लगेच ते या समूहाचे सदस्यही झाले. आणखी सांगायचे म्हणजे विश्वास पाटील सरांची अॅानलाइन मुलाखत “लेखक आपल्या दारी” यामधे घेण्याचे भाग्य मला लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतरच्या काळापासून ही कादंबरी सुरू होते. विजापूरचा एव्हढा मोठा सरदार मारला गेल्यामुळे माजलेली खळबळ. बंकापूरातून बंडाची तयारी करणारी मोठी मराठी फौज. शहाजीराजांचा ही असाच डाव, विजापूरची बडी बेगम वेळीच मोडते. इकडे शिवाजी राजांनी विजापूराचे नाक असलेला पन्हाळा जिंकलेला. म्हणून चिडलेल्या सुलतानाने कर्नूलच्या सिद्दी जोहरला चाळीस हजारांची सेना, अनेक सरदार देऊन पन्हाळा पुन्हा जिंकण्यास व शिवाजी राजांना कैद किंवा मारावयास पाठविले. पन्हाळ्यास पडलेला विशाल वेढा आणि अडकलेले शिवाजी राजे. त्याच वेळेस दिल्लीपती औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखानास जवळपास सव्वा लाख फौजफाटा देऊन मराठ्यांचा बिमोड करण्यास पाठविले. आणि तो पुण्यात येऊन लालमहालात ठाणं मांडून बसला. त्याने चाकणचा किल्ल्यावर हल्ला केला. तर इकडे पन्हाळ्याचा पाडाव करण्यासाठी आदिलशाही फौजेला मदत म्हणून इंग्रज राजापुरहून मोठी तोफ घेऊन येतात. पावसाळा सुरू होतो. आषाढातल्या मुसळधार पावसाला न जुमानता जोहर वेढा अजून बळकट करतो. पन्हाळ्याहून सुटका कशी करायची याचा खल सुरू होतो. बाजी प्रभू, फुलाजी, शिवा काशिद, शंभुजी जाधव, सिद्दी हिलाल, त्र्यंबक पंत, आणि इतर सर्व सरदारांमधे चर्चा होऊन महाराज तिथून कसे निसटतात, मुसळधार पावसात जंगलातून, पहाडांतून, नद्यानाल्यातून, पाठीवर दुश्मनांची फ़ौज घेऊन पन्हाळा ते विशालगढ हे अंतर फक्त सातशे सौनिक बरोबर घेऊन कसे पार करतात आणि घोडखिंडीतला चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन अप्रतिम केलंय. कारण लेखकाने ही संपूर्ण पायवाट भर पावसात नऊ वेळा अनुभवली आहे! या कार्यात बलिदान देणारे शिवा काशिद, बाजी प्रभू, फुलाजी, शंभुजी आणि बांदल सेना यांनी पावन केलेली ती पावनखिंड! इकडे शाहिस्ताखानाने पुण्याच्या लालमहालात टाकलेला डेरा आणि तसेच चाकणचा किल्ला ही जिंकला होता. त्याच्यापर्यंत शिवरायांच्या पन्हाळगडावरची कामगिरी पोहोचली होती. औरंगझेब ही पत्रांतून सारखा दबाव टाकत होता. शाहिस्तेखानाने राजगडावर सरळ हल्ला करण्यापेक्षा कोकणावर हल्ला करण्यासाठी कारतलबखान व रायबागन यांना तीस हजार फौज व लाखोंचा खजिना देऊन पाठवले. शिवरायांनी चतुराईने त्या फौजेला उंबरखिंडीत उतरायला भाग पाडले. तहानभुकेने बेजार झालेल्या सैन्यावर घनदाट जंगलातून त्यांच्या नजरेआडून बाणांचा, दगडगोट्यांचा हल्ला चढवला. रणभेऱ्या व तुताऱ्यांनी जंगल हादरवून सोडले. कारतलबखानाला शरण येण्यास भाग पाडले. नेसत्या वस्त्रांनिशी त्याची सुटका केली. अवघ्या बाराशे मावळ्यांना हाताशी घेऊन तीस हजार सैन्यावर गनिमी कावा वापरून मिळवलेला विजय इतिहासात प्रथमच असेल! शिवराय तेथून कोकणात उतरतात. दापोली-पालवणच्या जशवंत दळवी आणि श्रृंगारपूरच्या सूर्यराव सुर्व्यांचा बिमोड करतात. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून उध्वस्त करतात कारण ते पन्हाळ्यावर असताना याच वखारीतील रेव्हिंगटनने मोठी तोफ आणुन किल्ल्यावर डागली होती. सर्व इंग्रजांना पकडून कैदेत टाकतात. कोकणची किनारपट्टी स्वराज्यात आणायची, मजबूत किल्ले व बंदर बनवायचे, जहाजांचे कारखाने आणि स्वराज्याचे आरमार बनविण्याच्या तयारीला लागतात. ही केव्हढी दूरदृष्टी होती शिवरायांची! याच सुमारास जवळपास बावीस वर्षांनंतर आपल्या मातृभूमीत आलेले त्यांचे पिता शहाजीराजांची भेट जेजुरी गडावर होते. अनेक गोष्टींवर चर्चा करतात. राजगडाला परतताना स्वराज्यातील बदल पाहून हरखून जातात. आपल्या शूर पुत्राचे कर्तृत्व पाहून सुखावून परततात बेंगरूळाला पुन्हा न भेटण्यासाठी! शाहिस्तेखानही शिवाजी महाराजांवर हल्ला करायच्या तयारीस लागतो. काही फौज कोकणात तर काही फौजा स्वराज्यात धुमाकूळ घालायला पाठवतो. राजगडावर शिवरायांना जेरबंद करायचा आराखडा तयार करतो. तो आपल्यावर कोसळण्यापूर्वीच महाराज शाहिस्त्याचा बंदोबस्त करायचे ठरवतात. सिंहगडावरचे फितुरीचे कारस्थान मोडून तिथूनच पुण्यातील लालमहालावर हल्ला करायचा जबरदस्त मोहीम आखतात. बाराशे मावळ्यांना बरोबर घेऊन शिवराय रात्रीच्या अंधारात कसे लालमहालात शिरतात व हमाधुमीत शाहिस्त्याची तीन बोटे कलम करतात, त्याचा जावई व पुत्राला ठार करतात आणि निसटतात. त्यांच्या मागावर येणाऱ्या सैन्याला गुमराह करण्यासाठी कात्रजच्या घाटात तीनशे बैलांच्या शिंगांना मशाली बांधून जंगलात पळवतात. गनिमी काव्याचे हे दुसरे उदाहरण- जगातील एकमेव! या हल्ल्यानंतर शाहिस्ता तीन दिवसात चंबुगबाळे गुंडाळून पुणे सोडून पळाला होता. शिवरायांचे मोठे स्वप्न साकार करण्यासाठी अपार धनराशीची गरज होती. किल्ले बळकट करणे, सागरी किनारा व आरमार बळकट करणे, शस्त्रे व दारूगोळा जमविणे, इत्यादी अनेक कामासाठी लागणारा पैसा कसा गोळा करायचा? यासाठी शिवरायांनी गुप्त मोहिम ठरवली. त्याची जोरदार तयारी सुरू केली जशी-राजगडाखाली कातड्यांच्या पखाली शिवणे, नवे दमदार सैन्य भरती करणे, नव्या दमाचे घोडे जमविणे. लोहगडाजवळ चार हजार घोडे जमा केले, राजगडाहून दहा हजार सैन्य निघाले. चौदा हजार घोडे रात्रीच्या अंधारात पळायचे व दिवसा जंगलात लपायचे. त्र्यंबकच्या किल्लेदाराने चारशे दमदार बैल जमा केले होते. राजगडापासून साडेतीनशे मैल दूर असलेली सोन्याची लंका लुटण्याचं ते स्वप्न! सुरतेची बदसुरत करायची ती योजना! सर्व प्रवास दुश्मनाच्या मुलखातून करायचा होता. आणि अपेक्षेपेक्षा कमी वेळात शिवाजी महाराज सुरतेला पोहोचतात. तिथला सुभेदार इनायतखान व सुरतेतील बड्या व्यापाऱ्यांना खंडणी देण्यासाठी स्वार पाठवतात. पण ते दाद देत नाहीत असे पाहून नेताजींसह लुटालुट करायला सुरूवात करतात. सुरतेची संपूर्ण माहिती बहिर्जींनी एक वर्षांपासून गोळा केली होती. इंग्रजांची वखार सोडून सर्व सुरत लुटून, जाळून चार दिवसांनंतर परतीच्या प्रवासाला निघतात. मोघलांची फौज जवळ येण्यापूर्वीच आपल्या मुलुखात परततात. घेऊन करोडो रूपयांची लूट! जसे राजे राजगडावर येतात तसे त्यांना आपले पिता शहाजीराजांच्या अपघाती निधनाची वार्ता कळते. जिजाऊसाहेब सती जाणार असतात. त्यांना बड्या मुश्कीलीने थांबवतात! आनंदाच्या क्षणांत दुःखाचा पहाड कोसळतो! आपल्या हातातून कोकणची किनारपट्टी शिवाजीराजे घेत असलेले पाहून आदिलशाह चवताळून जातो. वजीर खवासखान व बाजीराव घोरपडे यांना शिवरायांवर संयुक्त हल्ला करण्यास कुडाळला पाठवतो. खवासखान वीस हजार फौज घेऊन पोहोचतो आणि बाजीराव मुधोळहून दहा हजार फौज घेऊन येणार असतो. या बाजीरावाने शहाजीराजांना अटक करण्यात, पन्हाळ्यावर सिद्दिला मदत करण्यात मोठा हात असतो. त्याच्या मनांत शिवरायंविषयी जहरी तिरस्कार भरलेला. कुडाळच्या रणांगणावर खवासखानाला गाफील ठेऊन शिवराय मुधोळवर हल्ला करून बाजीरावास ठार करतात आणि त्याच भागातून येऊन खवासखानावर दुहेरी हल्ला करतात आणि जबरदस्त हानी करून पळवून लावतात. शिवाजी महाराज ठरवतात की जंजिऱ्याच्या तोडीचा सागरीकिल्ला बांधायचा व डच, इंग्रज, सिद्दि यांचेवर वचक ठेवायचा. त्यासाठी त्यांना मालवणच्या किनारी समुद्रात एक बेट सापडतं-कुरट्याचे बेट. चारी बाजूने पहाणी करून एक अभेद्य किल्ला बनविण्याचे आदेश देतात. पायभरणीच्या महापूजेसाठी अनपेक्षितपणे राजगडाहून जिजाऊसाहेब व सर्व राणीवसा तिथे येतो. समुद्रात वसविली जाते शिवलंका… म्हणजेच सिंधुदुर्ग! छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे- विजापूरच्या तटबंदीवर हल्ला, पावनखिंडीतला थरार, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीतले निःशस्त्रीकरण, शाहिस्तेखानावर थेट हल्ला करून पळवून लावणे, सुरतेची महालूट, मुधोळच्या बाजीरावाचा वध, कुडाळचा महासंग्राम, कोकणचा किनारा स्वराज्यात आणणे आणि सिंधुदुर्गाचे निर्माण, असा विशाल पट “महासम्राट”च्या दुसऱ्या खंडात “रणखैंदळ” मधे विश्वास पाटीलांनी आपल्या जबरदस्त लेखणीने रंगवला आहे. मुख्य म्हणजे या कादंबरीतली भाषा ही बखरीतली न वाटतां आजची भाषा आहे म्हणून लगेच वाचकांच्या मनाची पकड घेते. शिवरायांच्या या सर्व कामगिरीमध्ये नेताजी पालकरांचा प्रत्यक्ष सहभाग प्रथमच दाखवला गेला आहे. विश्वास पाटील यांनी शिवरायांवर भरपूर अभ्यास करून जवळपास इतिहासातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. या कादंबरीत पिता-पुत्र, माता-पुत्र यांचे जिव्हाळ्याचा संबंध, शिवरायांचे त्यांचे सहकारी नेताजी, तानाजी, बाजी प्रभू, बहिर्जी, विश्वास दिघे आणि इतरांबरोबर असलेले जिवाशिवाचे नाते यावरही सुंदर प्रकाश टाकण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. अप्रतिम कादंबरी. आता प्रतिक्षा आहे या कादंबरी मालिकेतील तिसरा खंड “अस्मान भरारी” याची! ...Read more

  • Rating Starगंधार

    नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

  • Rating Starसुनील माने

    प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. त्याच्या सोबत असलेल्या फौजेची दाणादाण उडवली. आदिलशाहीची भरपूर दौलत, हत्ती-घोडे मिळाले. आणि बरोबर तीन दिवसांनी विजापूरच्या तटबंदीवर मराठ्यांची सेना “हर हर महादेव” च्या ललकारीने जबरदस्त धडकली! नेताजी पाकरांनी सात हजार फौजेनिशी एकशेसाठ मैलांचे अंतर दिनरात न थांबता विजापूर गाठले. जोरदार हल्ला चढवला. पण अभेद्य तटबंदीमुळे विजापूर वाचले. विजापूरची हरलेली वीस हजार फौज परत जवळ आल्यामुळे नेताजींना माघार घ्यावी लागली. अशी जबरदस्त सुरूवात आहे श्री विश्वास पाटील यांच्या “महासम्राट” या महाकादंबरीच्या दुसऱ्या खंडाची, म्हणजे “रणखैंदळ”ची! या कादंबरी मालिकेतला पहिला खंड “झंझावात”ने खळबळ उडवल्यानंतर बहुप्रतिक्षित दुसरा खंड दि २१-०५-२०२३ रोजी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसने दिमाखदार सोहळ्यात खासदार श्री अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतरच्या काळापासून ही कादंबरी सुरू होते. विजापूरचा एव्हढा मोठा सरदार मारला गेल्यामुळे माजलेली खळबळ. बंकापूरातून बंडाची तयारी करणारी मोठी मराठी फौज. शहाजीराजांचा ही असाच डाव, विजापूरची बडी बेगम वेळीच मोडते. इकडे शिवाजी राजांनी विजापूराचे नाक असलेला पन्हाळा जिंकलेला. म्हणून चिडलेल्या सुलतानाने कर्नूलच्या सिद्दी जोहरला चाळीस हजारांची सेना, अनेक सरदार देऊन पन्हाळा पुन्हा जिंकण्यास व शिवाजी राजांना कैद किंवा मारावयास पाठविले. पन्हाळ्यास पडलेला विशाल वेढा आणि अडकलेले शिवाजी राजे. त्याच वेळेस दिल्लीपती औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखानास जवळपास सव्वा लाख फौजफाटा देऊन मराठ्यांचा बिमोड करण्यास पाठविले. आणि तो पुण्यात येऊन लालमहालात ठाणं मांडून बसला. त्याने चाकणचा किल्ल्यावर हल्ला केला. तर इकडे पन्हाळ्याचा पाडाव करण्यासाठी इंग्रज राजापुरहून मोठी तोफ घेऊन येतात. पावसाळा सुरू होतो. आषाढातल्या मुसळधार पावसाला न जुमानता जोहर वेढा अजून बळकट करतो. पन्हाळ्याहून सुटका कशी करायची याचा खल सुरू होतो. बाजी प्रभू, फुलाजी, शिवा काशिद, शंभुजी जाधव, सिद्दी हिलाल, त्र्यंबक पंत, आणि इतर सर्व सरदारांमधे चर्चा होऊन महाराज तिथून कसे निसटतात, मुसळधार पावसात जंगलातून, पहाडांतून, नद्यानाल्यातून, पाठीवर दुश्मनांची फ़ौज घेऊन पन्हाळा ते विशालगढ हे अंतर फक्त सातशे सौनिक बरोबर घेऊन कसे पार करतात आणि घोडखिंडीतला चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन अप्रतिम केलंय. कारण लेखकाने ही संपूर्ण पायवाट भर पावसात नऊ वेळा अनुभवली आहे! या कार्यात बलिदान देणारे शिवा काशिद, बाजी प्रभू, फुलाजी, शंभुजी आणि बांदल सेना यांनी पावन केलेली ती पावनखिंड! इकडे शाहिस्ताखानाने पुण्याच्या लालमहालात टाकलेला डेरा आणि चाकणचा किल्ला ही जिंकला होता. त्याच्यापर्यंत शिवरायांच्या पन्हाळगडावरची कामगिरी पोहोचली होती. औरंगझेब ही पत्रांतून सारखा दबाव टाकत होता. शाहिस्तेखानाने राजगडावर सरळ हल्ला करण्यापेक्षा कोकणावर हल्ला करण्यासाठी कारतलबखान व रायबागन यांना तीस हजार फौज व लाखोंचा खजिना देऊन पाठवले. शिवरायांनी चतुराईने त्या फौजेला उंबरखिंडीत उतरायला भाग पाडले. तहानभुकेने बेजार झालेल्या सैन्यावर घनदाट जंगलातून त्यांच्या नजरेआडून बाणांचा, दगडगोट्यांचा हल्ला चढवला. रणभेऱ्या व तुताऱ्यांनी जंगल हादरवून सोडले. कारतलबखानाला शरण येण्यास भाग पाडले. नेसत्या वस्त्रांनिशी त्याची सुटका केली. अर्ध्या बाराशे मावळ्यांना हाताशी घेऊन तीस हजार सैन्यावर गनिमी कावा वापरून मिळवलेला विजय इतिहासात प्रथमच असेल! शिवराय तेथून कोकणात उतरतात. दापोली-पालवणच्या जशवंत दळवी आणि श्रृंगारपूरच्या सूर्यराव सुर्व्यांचा बिमोड करतात. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून उध्वस्त करतात कारण ते पन्हाळ्यावर असताना याच वखारीतील रेव्हिंगटनने मोठी तोफ आणुन किल्ल्यावर डागली होती. सर्व इंग्रजांना पकडून कैदेत टाकतात. कोकणची किनारपट्टी स्वराज्यात आणायची, मजबूत किल्ले व बंदर बनवायचे, जहाजांचे कारखाने आणि स्वराज्याचे आरमार बनविण्याच्या तयारीला लागतात. ही केव्हढी दूरदृष्टी होती शिवरायांची! याच सुमारास जवळपास बावीस वर्षांनंतर आपल्या मातृभूमीत आलेले त्यांचे पिता शहाजीराजांची भेट होते. आपल्या पुत्राचे कर्तृत्व पाहून सुखावून परततात पुन्हा बेंगरूळाला पुन्हा न भेटण्यासाठी! शाहिस्तेखानही शिवाजी महाराजांवर हल्ला करायच्या तयारीस लागतो. काही फौज कोकणात तर काही फौजा स्वराज्यात धुमाकूळ घालायला पाठवतो. राजगडावर शिवरायांना जेरबंद करायचा आराखडा तयार करतो. तो आपल्यावर कोसळण्यापूर्वीच शाहिस्त्याचा बंदोबस्त करायचे ठरवतात. सिंहगडावरचे फितुरीचे कारस्थान मोडून तिथूनच पुण्यातील लालमहालावर हल्ला करायचा जबरदस्त मोहीम आखतात. बाराशे मावळ्यांना बरोबर घेऊन शिवराय रात्रीच्या अंधारात कसे लालमहालात शिरतात व हमाधुमीत शाहिस्त्याची तीन बोटे कलम करतात, त्याचा जावई व पुत्राला ठार करतात आणि निसटतात. त्यांच्या मागावर येणाऱ्या सैन्याला गुमराह करण्यासाठी कात्रजच्या घाटात तीनशे बैलांच्या शिंगांना मशाली बांधून जंगलात पळवतात. गनिमी काव्याचे हे दुसरे उदाहरण- जगातील एकमेव! या हल्ल्यानंतर शाहिस्ता तीन दिवसात चंबुगबाळे गुंडाळून पुणे सोडून पळाला. शिवरायांचे मोठे स्वप्न साकार करण्यासाठी अपार धनराशीची गरज होती. किल्ले बळकट करणे, सागरी किनारा व आरमार बळकट करणे, शस्त्रे व दारूगोळा जमविणे, इत्यादी अनेक कामासाठी लागणारा पैसा कसा गोळा करायचा? यासाठी शिवरायांनी गुप्त मोहिम ठरवली. त्याची जोरदार तयारी सुरू केली जशी-राजगडाखाली कातड्यांच्या पखाली शिवणे, नवे दमदार सैन्य भरती करणे, नव्या दमाचे घोडे जमविणे. लोहगडाजवळ चार हजार घोडे जमा केले, राजगडाहून दहा हजार सैन्य निघाले. चौदा हजार घोडे रात्रीच्या अंधारात पळायचे व दिवसा जंगलात लपायचे. त्र्यंबकच्या किल्लेदाराने चारशे दमदार बैल जमा केले होते. राजगडापासून साडेतीनशे मैल दूर असलेली सोन्याची लंका लुटण्याचं ते स्वप्न! सुरतेची बदसुरत करायची ती योजना! सर्व प्रवास दुश्मनाच्या मुलखातून करायचा होता. आणि शिवाजी महाराज सुरतेला पोहोचतात. तिथला सुभेदार इनायतखान व सुरतेतील बड्या व्यापाऱ्यांना खंडणी देण्यासाठी स्वार पाठवतात. पण ते दाद देत नाहीत असे पाहून नेताजींसह लुटालुट करायला सुरूवात करतात. सुरतेची संपूर्ण माहिती बहिर्जींनी एक वर्षांपासून गोळा केली होती. इंग्रजांची वखार सोडून सर्व सुरत लुटून, जाळून चार दिवसांनंतर परतीच्या प्रवासाला निघतात. मोघलांची फौज जवळ येण्यापूर्वीच आपल्या मुलुखात परततात. घेऊन करोडो रूपयांची लूट! जसे राजे राजगडावर येतात तसे त्यांना आपले पिता शहाजीराजांच्या अपघाती निधनाची वार्ता कळते. जिजाऊसाहेब सती जाणार असतात. त्यांना बड्या मुश्कीलीने थांबवतात! आनंदाच्या क्षणांत दुःखाचा पहाड कोसळतो! आपल्या हातातून कोकणची किनारपट्टी शिवाजीराजे घेत असलेले पाहून आदिलशाह चवताळून जातो. वजीर खवासखान व बाजीराव घोरपडे यांना शिवरायांवर संयुक्त हल्ला करण्यास कुडाळला पाठवतो. खवासखान वीस हजार फौज घेऊन पोहोचतो आणि बाजीराव मुधोळहून दहा हजार फौज घेऊन येणार असतो. या बाजीरावाने शहाजीराजांना अटक करण्यात, पन्हाळ्यावर सिद्दिला मदत करण्यात मोठा हात असतो. त्याच्या मनांत शिवरायंविषयी जहरी तिरस्कार भरलेला. कुडाळच्या रणांगणावर खवासखानाला गाफील ठेऊन शिवराय मुधोळवर हल्ला करून बाजीरावास ठार करतात आणि त्याच भागातून येऊन खवासखानावर दुहेरी हल्ला करतात आणि जबरदस्त हानी करून पळवून लावतात. जंजिऱ्याच्या तोडीचा सागरीकिल्ला बांधायचा व डच, इंग्रज, सिद्दि यांचेवर वचक ठेवायचा. त्यासाठी त्यांना मालवणच्या किनारी समुद्रात एक बेट सापडतं-कुरट्याचे बेट. चारी बाजूने पहाणी करून एक अभेद्य किल्ला बनविण्याचे आदेश देतात. पायभरणीच्या महापूजेसाठी अनपेक्षितपणे राजगडाहून जिजाऊसाहेब व सर्व राणीवसा तिथे येतो. समुद्रात वसविली जाते शिवलंका… म्हणजेच सिंधुदुर्ग! छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे- विजापूरच्या तटबंदीवर हल्ला, पावनखिंडीतला थरार, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीतले निःशस्त्रीकरण, शाहिस्तेखानावर थेट हल्ला करून पळवून लावणे, सुरतेची महालूट, मुधोळच्या बाजीरावाचा वध, कुडाळचा महासंग्राम, कोकणचा किनारा स्वराज्यात आणणे आणि सिंधुदुर्गाचे निर्माण, असा विशाल पट “महासम्राट”च्या दुसऱ्या खंडात “रणखैंदळ” मधे विश्वास पाटीलांनी आपल्या जबरदस्त लेखणीने रंगवला आहे. मुख्य म्हणजे या कादंबरीतली भाषा ही बखरीतली न वाटतां आजची भाषा आहे म्हणून लगेच वाचकांच्या मनाची पकड घेते. शिवरायांच्या या सर्व कामगिरीमध्ये नेताजी पालकरांचा प्रत्यक्ष सहभाग प्रथमच दाखवला गेला आहे. विश्वास पाटील यांनी शिवरायांवर भरपूर अभ्यास करून जवळपास इतिहासातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. या कादंबरीत पिता-पुत्र, माझा-पुत्र यांचे जिव्हाळ्याचा संबंध, शिवरायांचे त्यांचे सहकारी नेताजी, तानाजी, बाजी प्रभू, बहिर्जी, विश्वास दिघे आणि इतरांबरोबर असलेले जिवाशिवाचे नाते यावरही सुंदर प्रकाश टाकण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. आता प्रतिक्षा आहे या कादंबरी मालिकेतील तिसरा खंड “अस्मान भरारी” याची! *सुनील माने* ०४-०८-२०२३ ...Read more

  • Rating Starसदानंद कदम

    शिवरायांच्या पार्थ पराक्रमाची गाथा : रणखैंदळ ---------------------------------------------------------- राजा शिवछत्रपती. मऱ्हाष्ट्र राज्याचा इतिहासही आणि वर्तमानही. इथल्या मातीत जन्मलेल्या हरेक जीवाचा श्वासही आणि कित्येकांचा आयुष्यभराचा ध्यासही. मरठ्यांच्या इतिहासातली ही एकमेव अशी व्यक्तिरेखा आहे की तिनं भूत, वर्तमान आणि भविष्यावरही आपल्या असीम कर्तृत्वाची छाप टाकली आहे. तिच्या पार्थ पराक्रमाची गाथा तर इतिहासाच्या पानापानांवर. वर्तमानातल्या हरेक पक्षाच्या हरेक नेत्याला आजही त्यांच्याच नावाचा आश्रय घ्यावा लागतो, तर भविष्यातही कुणी त्यांच्या जयजयकाराशिवाय आपले पाय इथल्या राजकारणात घट्ट रोवून उभा राहील अशी स्थिती नाही... ती कधी निर्माणही होणार नाही. स्थल, काल, भाषा आणि प्रांतांच्या सीमा ओलांडून गेलेलं हे या देशीचं नेतृत्व. हयातीतच त्यानं परदेशस्थ माध्यमांतही जागा मिळवलेली. राजा शिवछत्रपती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनानी. भारतीय आरमाराचे जनक. इथल्या भूमीत स्वत्व आणि स्वाभिमानाचं रोपटं रुजविणारे. त्यांच्या कर्तृत्वाच्या नौबती चहुदिशात घुमल्या. त्यांच्या पराक्रमाचे डंके सर्वदूर वाजत राहिले. त्याच्या पाऊलखुणा इथल्या दऱ्याखोऱ्यात उमटल्या. सह्याद्रीतल्या गडकोटांच्या तटाबुरुजांवर विसावल्या. त्याचा धांडोळा घेत या देशीचा हरेक पुत्र इथल्या मावळभूमीत दौडतोय. गेली साडेतीनशे वर्ष. यात इथली तरुणाई आहे, इथले प्रतिभावंत आहेत, इथले कलावंत आहेत आणि इतिहासानं झपाटलेले बुजुर्गही. इथल्या कलावंतांनी त्यांना रुपेरी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला,तर इथल्या प्रतिभावंतांनी त्यांची शब्दपूजा बांधली. शाहिरांनी त्यांचे पवाड गायिले, तर तुम्हीआम्ही हरेक श्वासाबरोबर त्यांचा जयजयकार केला... आजही करतोय. गेल्या पिढीतल्या कवींनी त्यांच्यावर खंडकाव्यं लिहिली, नाटककारांनी नाटकं लिहिली तर लेखकांनी कादंबरीमाला लिहिल्या. खंडीत झालेली ती परंपरा पुन्हा सुरू केलीय विश्वास पाटील यांनी. `महासम्राट` या नावानं ते शिवाजीराजांचा जीवनपट उलगडून सांगताहेत. तोही चार खंडात. त्यातला पहिला खंड `झंझावात` गेल्या वर्षी प्रसिद्ध झाला आणि तो हिंदी, इंग्रजी, कन्नडमध्येही गेला. आता त्या कादंबरीमालेतला दुसरा खंड नुकताच प्रकाशित झालाय... `रणखैंदळ` ! नावातच सर्वकाही सांगून जाणारी ही कादंबरी. पावनखिंडीतला थरार, सुरतेची लूट, तीस हजार मोगली फौजेचं उंबरखिंडीत केलेलं नि:शस्त्रीकरण, शाहिस्तेखानला वेसण, कुडाळचं युध्द आणि सागराच्या पोटातलं `शिवलंका` सिंधुदुर्ग निर्मितीचं अचाट स्वप्न ! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली `रणखैंदळ` हा या कादंबरीचा पट. हा पट मांडताना लेखकानं समकालीन साधनांचा धांडोळा घेतल्याचं पानोपानी जाणवत राहतं. सरदेसाई यांची मराठी रियासत, मराठीतील बखर वाङ्मय, शिवकालीन पत्रसारसंग्रह, सुरतकर इंग्रजांचा कंपनीशी झालेला पत्रव्यवहार, परदेशी इतिहासकारांनी केलेल्या नोंदी या साऱ्यांचा पुरेसा धांडोळा घेतल्याचंही प्रत्ययास येतंं. शिवाय शिवचरित्रातील या घटना जिथं घडल्या त्या परिसरात तर गेली दहा-बारा वर्षं लेखकाची भटकंती सुरूच होती आणि आहे. हे सगळं असूनही `रणखैंदळ`ची भाषा बखर वाङ्मयाच्या जवळ जाणारी नसून ती आधुनिक मराठी आहे, आजच्या वाचकाला सहज समजणारी आणि ओघवती आहे. काही नवख्या वाचकांना या कादंबरीत आलेले... तेही अगदी थोडकेच तत्कालिन शब्द समजणं सोपं जावं म्हणून त्यांच्या अर्थाचं परिशिष्ट शेवटी द्यायला हवं होतं ते मात्र दिसत नाही. १० नोव्हेंबर, १६५९ या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या `जनीच्या टेंब्या`वर शिवाजीराजांनी अफझलखानाची भेट घेतली आणि त्याचा कोथळा काढला. या एकाच घटनेनंतर त्यांचं नाव देशभरात तर गेलंच, शिवाय ते परदेशातही पोहोचलं. या घटनेनं स्वराज्याचं बळ चहुअंगानी वाढलं. त्यानंतर अठराव्या दिवशीच शिवाजीराजांनी पन्हाळगड हस्तगत केला. विजापूरकरांची ही दक्षिणेतली राजधानी... शहानबीदुर्ग. यामुळं आदिलशाही सत्ता हादरली, पण तिला जास्त धक्के बसले ते नेताजी पालकरांनी विजापूरवर केलेल्या चढाईनं. अफझलखानाच्या वधानंतर चौथ्या दिवशी नेताजींनी `दारुल सल्तनत` विजापूरच्या भिंतीला दिलेली धडक आदिलशाहीच्या काळजातच कळ उठवून गेली या घटनेनं `रणखैंदळ`ची सुरुवात होते. अवघ्या वीस-पंचवीस हजारांच्या नेताजींच्या तुकडीनं दीड-दोन दिवसातच विजापूरची भिंत खिळखिळी केली आणि अवघं विजापूर हादरून गेलं. गंमत म्हणजे नंतर औरंगजेबाच्या दोन-अडीच लाखाच्या फौजेनं याच भिंतीला वर्ष-सव्वावर्ष टक्कर दिली होती. तरीही त्याला यश मिळालं नव्हतं. नेताजींचा हा पराक्रम विश्वास पाटलांच्या शब्दांत वाचताना वेगळंच स्फुरण चढतं. नेताजींच्या या पराक्रमाविषयी आजवर फारसं लिहिलं गेलं नव्हतं. ती उणीव `रणखैंदळ`नं भरून काढली आहे. एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असा हा नेताजी पालकरांचा पराक्रम. वाचकाला खिळवून ठेवणारा. सिद्दी जौहरचा वेढा आणि पन्हाळ्यावर १३३ दिवस अडकून पडलेले शिवाजीराजे, वेढ्यातून निसटून जाताना भर पावसात त्यांनी केलेली ती रात्रीची दौड, बाजी-फुलाजी आणि बदलांच्या सैन्यानं गाजवलेला गजापूरच्या खिंडीतला तो पराक्रम, शिवा काशिद, बाजी-फुलाजी आणि सिद्दी वाहवाहचं बलिदान यांचं वर्णन केवळ अंगावर काटा आणणारं. पन्हाळगड ते विशाळगड... पडत्या पावसात राजांनी केलेला तो थरारक प्रवास अनुभवण्यासाठी आजची तरुणाई धावत असते. लेखकानंही कित्येकदा हा अनुभव त्याच तिथीला घेतलेला असल्यानं तो वाचतांना त्यांनी लिहिलेले शब्द जिवंत होतात, अंगावर रोमांच उभे राहतात. उत्कंठा, भीती, कुतूहल... भावनांची दाटी होते. दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांची `पावनखिंडीचा गाझी` ही कविता आठवते आणि खिंडीतला तो रणसंग्राम नजरेसमोर उभा राहतो. या रणसंग्रामाचं वर्णन मराठी वाचकानं आजवर अनेकदा वाचलेलं असतं, पण सिद्दी वाहवाह आणि सेनापती धनाजी जाधवांचे वडील शंभुजी जाधव यांचा कागदपत्रातच सीमित राहिलेला पराक्रम क्वचितच वाचलेला असतो. इतिहासाच्या पानातच राहिलेली अशी अनेक मंडळी `रणखैंदळ`च्या पानापानांवर भेटत राहतात... सिद्दी वाहवाह, दोरोजी फाकडे, `हेर` विश्वासराव दिघे... अशा अनेकांच्या कर्तृत्वाला `रणखैंदळ`नं न्याय दिला आहे. उंबरखिंडी`तली लढाई आणि कारतलबखान-रायबाघनशी लढण्यासाठी शिवाजीराजांनी आखलेले डावपेच आणि प्रत्यक्षातील लढाई यांचं वर्णन केवळ अप्रतिम. खरंतर या एवढ्या एकाच विषयावर युद्धपट काढता येईल. ही लढाई सर्वार्थानं वेगळी आणि जगभरातल्या लढायांच्या इतिहासात उठून दिसणारी. ती तितक्याच समर्थ शब्दांत आपल्यासमोर उभी राहते. त्यापाठोपाठ राजापूरच्या इंग्रजांना दिलेला जबरदस्त तडाखा वाचायला मिळतो. शाहिस्तेखानावरील हल्ल्यापूर्वी नेताजींवर झालेला हल्ला, रुस्तुमेजमाननं त्यांना दिलेला मदतीचा हात आणि जखमी अवस्थेतही नेताजी पालकर शाहिस्तेखानावरील हल्ल्यावेळी आंबील ओढ्यावर जातीनं उपस्थित असल्याचा निर्वाळा देणारी पत्रं या गोष्टींकडं जसं आजवर दुर्लक्ष झालं, तसंच शहाजी-शिवाजी या पितापुत्रांनी विजापूरवर संयुक्तपणे हल्ला करण्यासाठी केलेल्या नियोजनाकडेही. `रणखैंदळ`मध्ये ही सारी हकीकत विस्तारानं वाचायला मिळते. शहाजी-शिवाजी या पितापुत्रांनी आखलेला तो डाव यशस्वी झाला असता तर चित्र बदललं असतं... पण तसं घडलं नाही याची हुरहूर लागून राहते. सुरतेची लूट म्हणजे शिवाजीराजांनी केवळ औरंगजेबाला नव्हे, तर इंग्रजांनीही दिलेला तडाखाच होता. या लुटीची नोंद तर लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या `लंडन गॅझेट`नं पान एकवर घेतलेली. `सुरत वॉज ट्रंबल्ड बाय द नेम ऑफ शिवाजी` ही त्यांच्या गव्हर्नरची नंतरच्या काळातील नोंद म्हणजे नेमकं काय हे `रणखैंदळ` मधली सुरतेची लूट वाचताना कळतं. वीरजी व्होरा लुटला गेला त्याची झालेली लूट तर त्यानं स्वत:च नोंदवून ठेवलेली. या सगळ्या समकालीन साधनांचा धांडोळा आणि वापर पाटलांनी आपल्या लेखनात मुक्तहस्तानं केला आहे. तळकोकणात झालेली कुडाळची लढाई आजवर तशी दुर्लक्षितच राहिलेली. ती लढाई आणि ती संपल्यानंतर अवघ्या वीस दिवसांनी राजांनी सुरू केलेली सिंधुदुर्गाची बांधणी या दोन्ही घटना रोमहर्षक आणि अभिमानास्पद. शिवाजीराजांच्या उद्यमशीलतेचा आणि धाडसाचा दाखला देणाऱ्या. `रणखैंदळ`च्या अखेरच्या पर्वात आहे शिवाजीराजांची मुधोळवरची स्वारी आणि `शिवलंका` सिंधुदुर्गाची पायाभरणी. मुधोळचे बाजीराजे घोरपडे हे भोसल्यांच्याच कुळीचे. शिवाजीराजांचे आप्तच. पण मराठ्यांत असलेल्या अंगभूत भाऊबंदकीनं पछाडलेले. त्यांनी शहाजीराजांना अनेकदा अडचणीत आणलेलं. त्याचा सूड घ्यावा अशी मनीषा शहाजीराजांनी व्यक्त केलेली आणि जिजाऊंनी तर तशी आज्ञाच राजांना केलेली. त्यांच्यावर शिवाजीराजांनी केलेल्या स्वारीचं वर्णन वाचताना पुन्हा दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांनी १९२८मध्ये लिहिलेली कविताच आठवली. `जरि असाल अमुचे पुत्र, भोसले मर्द वंशाचे बाजीला शासन द्यावे, आमुच्या प्राण-वैराचे` कर्णांत शब्द हे घुमती, पूज्य त्या जन्मदात्याचे बाजूच्या गृहवासाची साधून संधी मोलाची भ्रुकुटी चढली शिवबाची डहुळला सिंधु कोणाचा, घेतला सूड जनकाचा... वळवाचे जैसे मेघ, उसळती नभी एकाकी वैशाख ऋतूचे पूर, आकस्मिक सिंधु तटाकी ठाकली मुधोळा पुढती, मावळी फौजही बाकी होऊन परांचे दास स्वजनांच्याही कंठास लाविती नीच जे फास गाठला समूह तयांचा, घेतला सूड जनकाचा... तरवारी घोरपड्यांच्या, जणु मृत्यू मुखांतिल रसना कोषांतुनि बाहिर आल्या, की क्रुद्ध भुजंगम ललना इकडे तर घेइ भरारी, गरुडाची केवळ सेना ढालीस लागली ढाल नाचले तीक्ष्ण करवाल एकेक पडे घायाळ घातला सडा रुधिराचा, घेतला सूड जनकाचा... शिव-शंकर दोघांमध्ये, कांहीही नव्हता भेद पाहवे न मुख रायाचे, सूडाचा नयनी क्रोध एकेक गजासुर योद्धा, गाठून करी तद्भेद खड्गाच्या घाटावरचे पाणी जे प्याले साचे रणशूर मुधोळावरचे केला नि:पात तयांचा, घेतला सूड जनकाचा... `तो कुठे? जयाने धरिले, निजजनकाला कपटाने लाविली गळ्याला चीप, भोसलेकुल-द्वेषाने` शोधीत फिरे जो भूप, ठाकला तोहि शौर्याने उसळले हात दोघांचे शौर्यात चपलता नाचे यश थोर जिजापुत्राचे लाविला टिळा रक्ताचा, घेतला सूड जनकाचा... हा भाऊ घोरपड्यांचा, हा भाचा घोरपड्यांचा हा कुमार हा तो पुतण्या, ठेवला वंश सापाचा तीनशे मारिले खासे, केला उच्छेद खलांचा वैऱ्यांचे झाले सत्र वाचला एकचि पुत्र तेथे तो नव्हता मात्र हा प्रभाव शिवकोपाचा, घेतला सूड जनकाचा... जीवितही तृण मानावे, जननि जनक यांच्यासाठी तळ हातावर शिर घ्यावे, आपुल्या जन्मभूसाठी काळासह झुंज करावी, प्राणप्रिय धर्मासाठी हा क्षत्रिय-धर्म पवित्र गाववी यदीय चरित्र तो पूज्य असे सर्वत्र पाळिला धर्म पुत्राचा, घेतला सूड जनकाचा... मुधोळच्या स्वारीनंतर सिंधुदुर्गाच्या उभारणीची कथा `रणखैंदळ`मध्ये येते. सिंधुदुर्गाच्या पायाभरणीसाठी शिवाजीराजांबरोबरच जिजाऊसाहेब आणि राजांचा बहुतेक सर्व राणीवसा उपस्थित होता असं पाटील यांनी दाखवलं आहे. असेच काही नवे मुद्दे `रणखैंदळ`मधून पुढे आणले आहेत. कोल्हापुरच्या लढाईत परमानंद नेवासकरांची उपस्थिती, बडी बेगम आणि शहाजीराजे यांच्यातील भावसंबंध, शिवा काशीद आणि सिद्दी जौहरची भेट, खंडोजी खोपडेंसाठी हैबतराव शिळीमकरांची रदबदली असे. शिवा काशिदचा पाठलाग सिद्दी मसूदनं केल्याचं आजवर वाचलेलं. पण इथं त्याची शिवा काशिदशी झालेली भेट येते आणि तोच त्यांना सिद्दी जौहरच्या तळाची वाट दाखवतो. ( पृष्ठ १६१ ) खंडोजीसाठी कान्होजी जेध्यांनी केलेली सर्वज्ञात रदबदली येतेच, पण आधी त्यासाठी हैबतराव शिळीमकर येतात. पृष्ठ २०४ व २०७ वर `राज्यसभा` वाचायला मिळते. तिथं `राजसभा` हवं. रुस्तुमेजमाननं शिवा काशिदला ओळखणंही तसं नवंच. आजवर ही ओळख पटवण्याची कामगिरी अफझलखानाचा पुत्र फाजलखानानं केल्याचं वाचनात आलेलं. या सगळ्या घटना लिहिताना पन्हाळ्याच्या घेरातल्या सगळ्या रानवाटा आणि वाड्यावस्त्यांची नोंद अतिशय बारकाईनं केली आहे. अर्थात याचं श्रेय या सगळ्या परिसरात लेखकानं केलेल्या भटकंतीलाच द्यायला हवं. अफझलखान वध, सुरतेची लूट अशा काही घटनांनी शिवाजीराजांभोवती एक वलय निर्माण केलेलं आहे. या वलयामुळं एतद्देशियांइतकेच परकीयही अचंबित झालेले. त्याच्या नोंदी परकीयांच्या पत्र व्यवहारातून आणि शिवकाळात इथं येऊन गेलेल्या परकीय प्रवाशांच्या लेखनातून आढळतात. त्याची दखल घेत केलेलं हे लेखन. इतिहासाच्या रुमालात दडून राहिलेल्या अनेक व्यक्तिरेखांना समोर आणणारं. दारोजी फाकडे, मल्हारी मोरे, विश्वासराव दिघे अशी एरवी न दिसणारी पण प्रत्यक्षात असणारी पात्रं इथं भेटतात. `रणखैंदळ` शिवचरित्रातील काही प्रसंगांची नवी मांडणी करते. शिवरायांच्या पार्थ पराक्रमाची गाथा सांगते. शिवाजीराजाचं सह्याद्रीशी असणारं नातं नव्यानं उलगडते. खरंतर राजांच्या इतर सेनानायकांसारखाच आणि तितकीच मोलाची कामगिरी पार पाडणारा सह्याद्री इथं वाचकाला उराउरी भेटतो. शिवाजीराजांचं व्यक्तिमत्त्व आणि त्याभोवती असलेलं वलय आजवर मोजक्या चार-पाच घटनांवर आधारलेलं. `श्रीमानयोगी`बाबत रणजित देसाईंना नरहर कुरुंदकरांनी जे पत्र लिहिलं होतं, त्यातही याकडं लक्ष वेधलेलं. जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या त्या मोजक्या घटना म्हणजेच शिवाजीराजांचं कर्तृत्व असं समजून लोक लिहीत राहिले. पण त्याहीपलिकडं जात, शोध घेत विश्वास पाटील यांनी `रणखैंदळ`चा पट मांडलाय. तो विलोभनीय तर आहेच, शिवाय नवं काहीतरी हाती देणाराही आहे. `रणखैंदळ` आपल्या हाती देऊन पाटील यांनी शिवकाळाचा एक महत्त्वाचा तुकडा आपल्यापुढं उभा केला आहे. आता प्रतिक्षा आणि उत्सुकता आहे ती `महासम्राट`च्या तिसऱ्या खंडाची... `अस्मानभरारी`ची. `रणखैंदळ` अर्पण केली आहे संयुक्त महाराष्ट्र आणि मायमराठीच्या अस्तित्वासाठी असामान्य झुंज दिलेल्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना. `रणखैंदळ`चं देखणं आणि समर्पक मुखपृष्ठ केलं आहे विजयराव बोधनकर यांनी तर `महासम्राट`च्या कादंबरी चतुष्ट्याचे प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे. `रणखैंदळ` ही त्यांचीच देखणी निर्मिती. © सदानंद कदम, सांगली. ९४२०७९१६८० ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more