* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHE WAS A VERY BEAUTIFUL LADY, BUT WAS BORN TO A POOR SCHOOL MASTER. HE WAS A VERY HANDSOME DOCTOR, FROM A VERY RICH AND NOBLE FAMILY. HE MARRIED HER AGAINST EVERYONE`S WISH. BUT WITHIN A FEW MONTHS AFTER MARRIAGE SHE GOT WHITE SPOTS ON HER BODY, LEUKODERMA. EVERYONE GOT SCARED OF HER UGLINESS AND THEY THREW HER OUT OF THE HOUSE, THEY SENT HER BACK TO HER PARENT`S HOUSE, AS IF SHE WAS A PIECE OF GARBAGE. SHE BUILT UP HER OWN UNIVERSE, BUT HE WAS CURSING HIMSELF. WHAT IF HE HAD SUFFERED WITH THE SAME DISEASE? WOULD SHE HAVE DISCARDED HIM LIKE A PIECE OF GARBAGE? WHAT CAN BE THE END OF SUCH STORIES? SUDHA MURTHY HAS GIVEN AN INSIGHT TO A SIMPLE WOMAN FROM A TRADITIONAL FAMILY. THE WOMAN IS SHATTERED WITH THE DISEASE BUT YET SHE COMES OUT OF IT. SHE SHAPES HER LIFE WELL. THE NOVEL HAS FOUND SOME DEPTH BECAUSE OF THE AUTHOR`S MATURED THOUGHTS AND HER ATTEMPTS TO CORRELATE WITH THE MODERN LIFE. THIS NOVEL HAS BEEN TRANSLATED IN MANY OF THE INDIAN LANGUAGES. WE ARE SURE THAT THIS MARATHI TRANSLATION WILL BE ABLE TO TOUCH THE HEARTS AND MAKE THEM THINK OVER.
ती अनुपम लावण्यवती,गरीब शाळामास्तरांची मुलगी. तो एक देखणा डॉक्टर – घरंदाज,लक्ष्मीपुत्र. सर्वांच्या मर्जीविरुद्ध त्यानं तिच्याशी लग्न केलं. परंतु दुर्दैवानं काही महिन्यांतच तिच्या अंगावर कोडाचा पांढरा डाग उमटला आणि साया घरादारानं त्या अभद्राला घाबरून, किळसून तिला माहेरी हाकलून लावलं — कचराकुंडीत घाण फेकावी, तसं !.... .... पुढे तिनंही आपलं स्वतंत्र अवकाश उभारलं. मात्र काही काळानं तो आतल्या आत तडफडू लागला – ‘तिच्याऐवजी आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिनं आपल्याला असंच टाकून दिलं असतं का?....’ काय असते या वास्तवातली तडफड?... काय असू शकतो अशा गोष्टींचा शेवट?.... कन्नड साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी या कादंबरीत पारंपरिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाया संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन, स्वत:च्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केलं आहे. लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी,यामुळे या कादंबरीला गहनता प्राप्त झाली आहे. अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालेल्या या कादंबरीचा हा उत्कृष्ट मराठी अनुवाद वाचकांना चटका लावेल व विचारास प्रवृत्त करेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarPrajakta Wagh

    महाश्वेता कादंबरी आजच वाचून पूर्ण झाली. कादंबरीचे reviews या ग्रुपवर वाचलेले होते, त्यामुळे त्याचवेळी ठरवलं होतं ही कादंबरी वाचायची. सुधा मूर्ती लिखित ही कादंबरी खूप आवडली, अणि मनाला पण भावली. लेखिकेने कथेच खूप छान सादरीकरण केलेले आहे अणि लिखाणच कौशलय पण खूप छान आहे. मला वाचताना कुठेच कंटाळा नाही आला. प्रत्येक वेळी उत्कंठा होती की पुढे काय असेल. ही कादंबरी वाचून सुधा मूर्ती यांच्या अजून कादंबरी व कथा वाचायला नक्की आवडतील. ...Read more

  • Rating StarPawan Chandak

    खूप दिवसापासून बहुप्रतिक्षित अशी अनेक मित्रांकडून ऐकलेली पण आजवर न वाचलेली अशी सुधा मूर्ती लिखित व उमा कुलकर्णी अनुवादित अप्रतिम कादंबरी `महाश्वेता` एका बैठकीतच वाचून झाली. ही कादंबरी वाचल्यावर एक पुरुष म्हणून मला वारंवार काही प्रश्न पडले, मला वाते ती प्रतिक्रिया या लिहीत आहे. तुमच्या दृष्टीने सौंदर्य म्हणजे काय ? संपूर्ण कादंबरी याच प्रश्नावर आणि त्याच्या उत्तरावर केंद्रित आहे असे मला वाटते आणि मला त्यातील आवडलेले काही संदर्भ येथे देत आहे सृष्टीच सौंदर्याचा गुरु, माता ! किती प्रकारची फुलं निसर्गात फुलत असतात ! मानवाच्या कल्पनेतही येणार नाहीत इतक्या विविध रंगांची उधळण असते. किती विविध, मनाला खेचून घेणारे आकार ! निळ्या आकाशात पांढर्‍या शुभ्र ढगांची मनमोहक नृत्य! पावसाळ्यात सर्वत्र हिरव्या विविध रंगाची छटा ! त्यात सुंदर पशू-पक्षी-फुलपाखरे, कीटक, सगळेच माणसांच्या दृष्टीने कल्पनातीत आहे मानव स्वतःला सौंदर्याचा उपासक मानून नटतो, पण मानवी सौंदर्य तारुण्य काळाशी सीमित आहे. भर तारुण्यात सौंदर्याच्या मस्तीत वावरणारे आणि तारुण्य सरलं की पडलेले दात, पांढरे केस, सुरकुतलेली कातडी, ओसरलेला बांधा यामुळे सौंदर्यविहिन होऊन जातात. माणसांचं सौंदर्य त्याच्या रूपापेक्षा गुणांवर अवलंबून असतं. कुठे आणि कसे जन्मयचं, हे कुठे आपल्या हातात आहे ? तसेच गोरा रंग आणि रूप हे आपल्या हातात नाही. मग शुद्ध निष्कल्मश मन आपल्याकडे असले पाहिजे. कथेतील नायिका अनुपमा - एक सर्वसामान्य कुटुंबातील गरीब शाळा मास्तरांची विद्याविभूषित व नाटक अभियानात तज्ञ. तर या कथेतील डॉक्टर आनंद सौदर्योपासक, घरंदाज कुटुंबातील असा हा लक्ष्मीपुत्र. एका नाटकात अनुपमा व आनंदाची भेट होते तिच्या सौंदर्यावर भाळून आनंद अनुपमा कडे लग्नाची मागणी घालतो. पुढे त्या दोघांचे लग्न थाटात उरकून तिला घरी आणून काही दिवसांनी उच्च शिक्षणासाठी आनंद अनुपमेला सासूबाई राधक्का कडे सोपवून लंडनला रवाना होतो. राधक्का म्हणजे जुन्या विचारांच्या घरंदाज, कर्मकांडात रमणारी स्त्री. दुर्देवाने काही महिन्यातच अनुपमा च्या अंगावर पांढरे डाग उमटू लागतात. आजवर अनुपमाची तिचे `सौंदर्य` हाच गुण मांडल्या गेलेल्या त्या घरात अंगावरील कोड यामुळे तिची ओळखच मिटवून टाकली जाते. तिला आलेल्या पांढ-या डागाला घाबरून कीळसून तिच्या सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर हाकलून अर्थात बहिष्कृत करून टाकतात. पुढे ती माहेरी आल्यावर देखील तिची अशाच प्रकारे कुचंबणा होत राहते, घरी येणाऱ्या प्रत्येक दुःख, चढ उत्तरास, अडचणींसाठी तिलाच जबाबदार धरले जाते. पुढे तिची अशी अवस्था होते की समाजात पावलोपावली केवळ त्या पांढऱ्या डागामुळे होणाऱ्या अपमान, कुचुंबना यामुळे तिला जगावे की मरावे असा विचार येतो. पण ती जगण्यास प्राधान्य देते आणि अर्थपूर्ण व स्वावलंबी जगण्यासाठी मुंबईत येते. ती स्वतःच्या मेहनतीवर आणि कौशल्यावर, ज्ञानावर आपले स्वतंत्र अवकाश उभारते. स्वतःच्या शिक्षणाचा आधार घेऊन ती आयुष्यात पुन्हा उभी राहते तसेच स्वतःच्या पायावर व समर्थपणे स्वतःची मित्र-मैत्रिणींचे विश्व निर्माण करते. या संपूर्ण परिस्थितीमध्ये केवळ तिच्या अंगावर पांढरे डाग आहे म्हणून तिच्या सासू, सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले नाही तितका तिला दोष दिला. इतकेच नाही तर तिचा नवरा आनंद देखील तिला स्वीकारत नाही, तिने लंडनला त्याला पाठवलेल्या पत्राचे उत्तर न देता केवळ त्या क्षुल्लक पांढऱ्या डागामुळे तिला स्वीकारत नाही. या परिस्थितीमध्ये असेच एकदा काही काळानंतर आनंद आतल्याआत तडफडू लागतो की "तिच्या ऐवजी जर आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिने देखील आपल्याला असं टाकून दिलं असतं का ? काय असते या वास्तवातील तडफड ? काय असू शकते अशा गोष्टींचा शेवट ? या कादंबरीत मला आवडलेले पात्र म्हणजे डॉ वसंत. डॉ वसंत तिच्या कोडा सकट तिला स्वीकारायला तयार असूनही नवरा, प्रेम संसार निरर्थक वाटुन आधुनिक सुसंस्कृत, तडफदार नायीका साकारण्यात ती यशस्वी होते. या पुस्तकात कर्नाटक संगीत, यक्षगान, संस्कृत साहित्यातील विविध संदर्भ यामुळे या कादंबरीची कलात्मक मूल्य वाढले आहे असे मला वाटते. आनंदला होणारी वास्तवातील तडफड,अनुपमानी स्वतःच्या मेहनतीवर उभारलेले स्वतंत्र आकाश ही सर्व परिस्थिती सुधा मूर्तींनी आपल्या लिखाणातून अप्रतिम मांडली आहे. या कादंबरीत पारंपारिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचे यथोचित भान देऊन, स्वतःच्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केले आहे. या लिखाणातून लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी यामुळे या कादंबरीला घनता प्राप्त झाले आहे. मी काही सांगण्यापेक्षा मला वाटते आपल्या सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारी अशी ही महाश्वेता कादंबरी एकदा वाचावी ...Read more

  • Rating Starविनोद गजानन कारवे

    `महाश्वेता` कादंबरीची नायिका अनुपमा सुंदर आहे, अभिजात अभिनयकला तिच्यात आहे, संस्कृत तज्ञ आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी संस्कारांनी श्रीमंत आहे. पण दुर्दैवाने लग्नानंतर तिच्या शरीरावर कोड फुटते आणि सासरी व माहेरी, आजारामुळे तिची पुरती ओळख मिटवन टाकली जाते. ही मिटवून टाकलेली ओळख अनुपमा ज्या ताकदीने आयुष्याचा स्वीकार करत पुन्हा मिळवत जाते, त्याची ध्येर्यकथा म्हणजे `महाश्वेता` ही सुधा मूर्ती यांची कादंबरी होय. कादंबरीची सुरुवात आनंद आणि अनुपमा यांच्या विवाहाने होते. अनुपमा अत्यंत सुंदर, पण एका शाळा मास्तरची मुलगी आणि आनंद अत्यंत हुशार, गर्भश्रीमंत डॉक्टर. विषम आर्थिक परिस्थितींमुळे दोघांचं लग्न होणे कठीण; पण सर्वांचा विरोध असूनही त्यांचं लग्न होतं. तीन महिन्यांनंतर पुढील शिक्षणासाठी आनंद इंग्लंडला रवाना होतो. तो गेल्यावर सर्वस्वी एकट्या अनुपमाला ऐश्वर्याचा गर्व असलेली सासू व नणंद यांच्याकडून मिळणारी वागणूक अपमानाची असते. त्यातच पायावर निखारा पडल्याचे निमित्त होते आणि अनुपमाच्या पायावर पांढरा डाग उमटतो. तो वाढतच जातो नि कोड फुटल्याचे निदान डॉक्टर करतात. त्यामुळे अनुपमाला सासरी तुच्छ लेखले जाऊ लागते. या सगळ्यात तिला आशा असते पती आनंदकडून; पण तिच्या पत्राला आनंदकडून जराही प्रतिसाद मिळत नाही. अनुपमा माहेरी परतते. तिच्या व्यंगामुळे तिच्या बहिणीचे ठरलेले लग्नही मोडते. त्यामुळे वडिल-बहिणही अंतरतात. सर्वांकडून अपमानित झालेली अनुपमा मुंबईत येते. मैत्रिणीकडे राहून एका कॉलेजात संस्कृत विषयाची प्राध्यापक म्हणून नोकरी करु लागते. हळूहळू अनुपमा स्वतःला सावरून आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करते आणि इतरांना जगण्याची नवी दिशा देते. पुढे तिला पती आनंद न्यायला येतो, तिची माफी मागतो, तिच्या व्यंगासकट तिला स्वीकारु पाहतो. पण आता कोडाने `महाश्वेता` झालेल्या अनुपमाला ओढ असते ती फक्त तिच्या कलेची, अभिनयाची. घर-संसार यापासून मनाने दूर झालेली अनुपमा आनंदला चांगलंच सुनावते व त्याच्यासोबत जाण्यास नकार देते. `महाश्वेता` कादंबरीचे प्रत्येक पान आपल्याला बांधून ठेवते. भाषा भारदस्त असून अलंकारिक सुवचने, उपमांचा वापर यांमुळे कादंबरी वाचनीय झालेली आहे. या पुस्तकातील अनुपमा व डॉ. सत्यप्रकाश आणि अनुपमा व आनंद यांच्यातील संवाद केवळ अप्रतिम आहेत. - श्री. विनोद गजानन कारवे (टिटवाळा) ...Read more

  • Rating StarPriyanka Shah Sancheti

    एका स्त्रीला लग्नानंतर शारिरीक व्यंग उद्भवल्यास त्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आणि त्याचे भोगावे लागलेले परिणाम व तिने त्याला कसं तोंड दिले... याचे वर्णन.. अप्रतिम कादंबरी...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more