`MAHATMA`, A BIOGRAPHIC NOVEL WRITTEN BY DR. RAVINDRA THAKUR, IS A WELL-RESEARCHED NARRATIVE OF THE LIFE AND TIMES OF MAHATMA JYOTIRAO PHULE, A RENOWNED SOCIAL REFORMER, THINKER, AND WRITER FROM PRE-INDEPENDENCE MAHARASHTRA.
१९व्या शतकातील थोर कृतिशील विचारवंत आणि भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा पुÂले यांचे कार्य इतके बहुआयामी स्वरूपाचे आहे की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा चरित्रात्मक कादंबरीच्या रूपाने वेध घेणे, हेच मोठे आव्हानात्मक होते. परंतु डॉ. रवींद्र ठावूÂर यांनी सतत सात वर्षे अथक परिश्रम करून हे कार्य तडीस नेले आहे. म्हणूनच ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली आणि बहुचर्चित ठरली. अभ्यासक्रमातही तिचा समावेश झाला.