TO BE A SURGEON IS TO STAND, WITHOUT FLINCHING, IN THE SEA OF HUMAN SUFFERING AND USE ONES ENTIRE RESOURCE OF KNOWLEDGE, SKILL AND INTELLIGENCE TO BATTLE IT.AN INTERN MAKES HIS FIRST CUT AND IS RIDICULED BY HIS TUTOR. AN OLD WOMAN IS BROUGHT BACK TO LIFE AGAINST HER WILL, ONLY FOR THE UNEXPECTED TO STRIKE A WEEK LATER. A NOTORIOUS SURGEON IS DRIVEN CRAZY BY A MASSIVE BRAIN TUMOUR. THE MOTHER OF A LEUKEMIARIDDEN CHILD IS DRIVEN TO DESPERATION IN THIS COMPELLING AND BEAUTIFULLY WRITTEN IMPRESSIONISTIC MEMOIR, MOHAMED KHADRA RECOUNTS STORIES FROM HIS LIFE AS A SURGEON, FROM THE GRUELLING YEARS OF TRAINING TO THE DEBILITATING SLEEPLESS NIGHTS ON CALL. HE LOOKS BACK AT THE DOCTORS AND PATIENTS WHO SHAPED HIS CAREER; AT THE ENDLESS STREAM OF HUMANITY COURAGEOUS, PITIFUL, ADMIRABLE AND DISLIKABLE WHO PASSED UNDER HIS KNIFE, AS HE RECALLS SHOCKING TALES OF MISTAKES IN THEATRE AND THE SHATTERED LIVES OF DOCTORS DEFEATED BY THE STRESSES OF THE JOB.DOCUMENTING THE DAMAGING POLITICS IN OUR HEALTHCARE SYSTEM, THE SOULDESTROYING CHOICES MADE FOR PATIENTS AND THE MISPLACED HOPE SO COMMON IN THE FACE OF DEATH, HIS DRAMATIC ACCOUNT OF A SURGICAL LIFE SHOWS WHAT HAPPENS WHEN EXTRAORDINARY EVENTS OVERTAKE EVERYDAY LIVES INCLUDING, EVEN, HIS OWN.
सर्जन असण्याचा अर्थ असतो, मानवी यातनांच्या सागरात अविचल उभं राहणं. आपलं ज्ञान, कौशल्य आणि बुद्धिमत्ता पणाला लावून त्याच्याशी झुंज देणं.
एक इंटर्न, त्याचा पहिला छेद घेतो आणि शिक्षक त्याची खिल्ली उडवतात. आठवड्यानंतर,
एका वृद्धेच्या इच्छेविरुद्ध तिचा जीव वाचवण्याची अनपेक्षित घटना घडते. मेंदूच्या कर्करोगामुळे
एका कुप्रसिद्ध सर्जनला वेड लागतं. ल्युकेमिया झालेल्या मुलाची आई अगतिक होऊन जाते.
या खिळवून ठेवणाऱ्या अप्रतिम स्मृतिचित्रांमधून, मोहम्मद खाद्रा सर्जन म्हणून त्यांचं आयुष्य उलगडून दाखवतात. खडतर प्रशिक्षणापासून ते निद्रानाश करणाऱ्या अविरत कामापर्यंत. त्यांचं आयुष्य घडवणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णांच्या स्मृती ते जागवतात. मानवतेचा अखंड ओघ – धैर्यवान, केविलवाणी, कौतुकास्पद, तिरस्कार उत्पन्न करणारी अशा अनेक माणसांच्या या कहाण्या आहेत. ऑपरेशन थिएटरमध्ये घडणाऱ्या धक्कादायक चुकांच्या आणि तणावामुळे उद्ध्वस्त झालेल्या डॉक्टरांचे हे कथानक आहे.
राजकारणामुळे आरोग्यसेवेची झालेली दैना आपल्याला इथे दिसते. मृत्यु समोर दिसत असताना; रुग्णांनी घेतलेले आत्मनाशी निर्णय, बाळगलेल्या वेड्या आशा दिसतात. त्यांच्या स्वत:च्याही दैनंदिन आयुष्यात घडलेल्या असाधारण घटनांमुळे
निर्माण होणारं नाट्य इथे दिसतं.