LIKE SIMILES AND METAPHORS, YADAVS POEMS SPEAK THE LANGUAGE OF IMAGERY. THENCE IS BORN A ROBUST POEM LIKE SAPNA PADTYAAT. CLODS OF EARTH FIND FEET, TURN THEIR BACKS AND START WALKING. THEY ACQUIRE EYES LIKE THE LUSTROUS, MOIST ONES OF BULLOCKS. WITHIN HIDES A STORY. THE CLODS CANNOT SPEAK, SO THEY SHED SILENT TEARS THROUGH SHUT EYES. YADAVS POETRY DOES NOT REVEAL THE ANGST BROUGHT ON BY HARDSHIPS AND POVERTY; NOR HAS IT TAKEN BIRTH TO DISPLAY THE PENURIOUS AND POVERTYSTRICKEN VILLAGE LIFE FOR ALL TO SEE, IN THE NAME OF SOCIAL AWARENESS. RATHER, THE TRAVAILS AND TRAGEDIES OF THAT LIFE ARE AS MUCH A PART OF HIS EXPERIENCES, AS ARE THE BEAUTY OF THE LUSCIOUS, SWAYING FIELDS FULL OF GRAIN, AND THE FEELINGS AND LIVES OF THOSE HARDWORKING FOLK. AND THEREFORE ONE GETS A GENUINE AND PROPER INSIGHT INTO RURAL LIFE THROUGH THIS SMALL COLLECTION OF POEMS. ANURADHA POTDAR.
उपमारूपकांप्रमाणे यादवांची कविता प्रतिमांच्या भाषेत बोलू लागते. आणि मग ‘सपनं पडत्यात’ सारखी समर्थ कविता निर्माण होते. रानातल्या ढेकळांना पाय फुटून ती गुमान पाठमोरी होऊन चालू लागतात. त्यांनाही बैलाच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यांसारखे डोळे फुटतात. त्यात एक कहाणी भरलेली असते. जिभा पुटत नाहीत म्हणून बापडी ढेकळंही डोळे मिटून पाणी गाळतात. खडतर दारिद्र्याच्या अनुभवानेही यादवांची कविता जशी विखारलेली नाही, तशीच सामाजिकतेच्या सहेतुक वाटेने, खेड्यातील दैन्यदारिद्र्याचं दुखणं वेशीवर टांगण्यासाठीही ती जन्मलेली नाही. शेतमळ्यातील तरारून वर आलेल्या पिकाच्या रसरसत्या सौंदर्याप्रमाणेच, त्यात जगणाऱ्या, राबणाऱ्या माणसांच्या भावभावना, सुखदु:ख आणि त्याचं दारिद्र्य हेही सारं त्यांच्या अनुभवाचं अविभाज्य अंग आहे. म्हणून या छोटेखानी संग्रहातही ग्रामीण जीवनाचं एक अस्सल आणि सम्यक्दर्शन घडत आहे. –अनुराधा पोतदार