* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745446
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 48
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :R. V. SHEVADE GURUJI COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"INDIA; A LAND OF GREAT PEOPLE; SAINTS AND PATRIOTS; SAGES AND SOCIAL WORKERS; IN THE STRUGGLE OF FREEDOM, ENDLESS NUMBER OF PEOPLE SACRIFICES THEMSELVES COMPLETELY AND TOTALLY; MANY REMAIN ANONYMOUS TODAY; THE GREAT LEADERS SHOULDERED THE RESPONSIBILITY OF LEADING THE COMMON PEOPLE AND IGNITE THEIR MINDS WITH UNCOMMON WILL TO FIGHT FOR THE FREEDOM; NEITHER THE COMMON MEN, NOR THE WOMEN, THE CHILDREN OR THE LEADERS HESITATE TO OFFER THEIR LIVES AT THE FEE OF MOTHER INDIA, IN AN ATTEMPT TO FREE HER FROM THE CLUTCHES OF THE BRITISH. WE OWE THE INDEPENDENCE, PROSPERITY AND HERITAGE TO THEM. THIS BOOK ALLOWS US TO MEET SOME OF THESE LEADERS; IT ALSO BRINGS IN RENOWNED WORLD-FAMOUS PERSONALITIES ACROSS NATIONS. I AM SURE THAT YOU ARE EAGERLY WAITING TO INTERACT WITH THEM. "
"भारत देश ही अनेक थोरवीरांची, संतांची, स्वातंत्र्यसैनिकांची आणि समाजसेवकांची भूमी आहे. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या देशाला यांसारख्या अनेक नेत्यांनी प्राण पणाला लावून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्यामुळेच आपला देश समृद्ध व संपन्न झाला. या पुस्तकांमधून हे सगळेजण खास तुमच्या भेटीला येत आहेत, इतवंÂच नाही, तर आपल्या देशाबरोबर जगातल्याही काही थोर व्यक्तींना आपण भेटणार आहोत. मग या जगावेगळ्या माणसांची भेट घ्यायला तुम्ही तयार आहात ना!"

No Records Found
No Records Found
Keywords
MAMATECHI MURTY MOTHER TERESA, R.V.SHEVADE GURUJI, CHILDREN LITERATURE, BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    थोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून लहान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. युगोस्लाव्हिया देशात लहानपण गेलेल्या अ‍ॅग्नेसची मदर तेरेसापर्यंतची आणि त्यांच्या कार्याची कहाणी ‘ममतेची मूर्ती’ या पुस्तकात आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more