AN UNSATISFIED ADAM WHO WAS FAILING IN HIS MARITAL AND PROFESSIONAL LIFE, WANTED TO TURN HIS LIFE UPSIDE DOWN. HE WANTED TO GIVE SOME MEANING TO HIS LIFE. BUT HE COULDN`T FIND HIS PURPOSE UNTIL ONE DAY ON A PLANE RIDE. ON THAT RIDE, HE SAW THE FILM `ON A CLEAR DAY`, BASED ON A SWIMMER`S ATTEMPT TO CROSS ENGLAND’S CREEK, AND FOUND HIS PURPOSE. LATER, WHILE SURFING THE INTERNET HE FOUND SEVEN CHALLENGING SWIMMING SPOTS IN THE OCEAN, SOME OF THE MOST DIFFICULT IN THE WORLD, LAID DOWN BY AN AMERICAN SWIMMER ‘STEVE MUNATONES`, WHICH HE CHOSE BASED ON HIS KNOWLEDGE AND EXPERIENCE, WHICH CAN BE COMPARED TO CLIMBING THE SEVEN HIGHEST PEAKS IN THE FIELD OF MOUNTAINEERING, AND ADAM FOUND HIS EXACT GOAL. THIS IS THE STORY OF ADAM WALKER`S PERSEVERANCE, HIS SEVEN THRILLING SEA ADVENTURES, AND A UNIQUE EXPERIENCE.
"वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात अपयशी, असमाधानी असणार्या अॅडमला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची ईर्ष्या होती. जीवनाला काहीतरी अर्थ द्यायचा होता; पण त्याला त्याचे ध्येय सापडत नव्हते आणि एका विमान प्रवासामध्ये अचानक त्याला ते सापडले. विमानप्रवासामध्ये ‘ ON A CLEAR DAY’ हा एका जलतरणपटूच्या इंग्लंडची खाडी पोहून जाण्याच्या प्रयत्नावर आधारित सिनेमा त्याच्या बघण्यात आला आणि त्याला त्याचे ध्येय सापडले. त्यानंतर इंटरनेटवर शोध घेत असताना ‘स्टीव्ह मुनाटोन्स’ या अमेरिकन जलतरणपटूने त्याच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर निवडलेल्या जगातील सर्वांत अवघड अशा, ज्याची तुलना गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील सात उत्तुंग शिखरे चढून जाण्याशीच होऊ शकेल, अशा समुद्रातील सात आव्हानात्मक पोहण्याच्या जागांचा त्याला शोध लागला आणि त्याला त्याचे नेमके ध्येय सापडले.
ही अॅडम वॉकरच्या जिद्दीची, सात समुद्री साहसांची, उत्कंठावर्धक आणि एक वेगळाच अनुभव देणारी कहाणी आहे.
"