* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357201513
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2023
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HUMANS ARE SELFISH, GREEDY, LUSTFUL, AND EVIL. HUMANS HAVE INFINITE QUALITIES SUCH AS PRESERVING HUMANITY, LOVING, WORRYING, GRIEVING, FEELING THE PAIN OF OTHERS, LAUGHING AND EVEN CRYING. NISHIKANT WHO IS A MILLIONAIRE WITH TURNER SYNDROME PROBLEM AND IS CAUGHT BETWEEN WEALTH AND HUMANITY, IS MARRIED TO AMRUTA. ANAMIKA IS SOMEONE WHO IS SOLD BY HER OWN HUSBAND AS A SEX WORKER.A STORY OF AN UNKNOWN MAN WHO, EVEN IN HIS OLD AGE, STILL LIVES IN THE MEMORIES OF HIS COLLEGE FRIEND KUMUD. URMILA IS SOMEONE WHO CANNOT FATHOM THE PRESENCE OF A MYSTERY WOMAN WHO WAS PRESENT DURING HER HUSBAND’S DEATH. ALSO A STORY OF MANOHAR AND MADIRA, WHO TAKE DOWN TWO DANGEROUS GOONS. SAVITA WHO IS A DIVORCEE, CAUGHT IN A STORM OF EMOTIONS AND THOUGHTS. ASHOK, WHO IS OVERWHELMED BY THE DAILY GRIND. TWO YOUNG WOMEN , GAURI AND SANVI, WHO MEET EACH OTHER ON A JOURNEY. VITTHAL ,WHO STILL ATTENDS AN INTERVIEW WEARING A TORN SHIRT EVEN AFTER BEING CAUGHT BY THE POLICE. THIS BOOK TALKS ABOUT HOW PEOPLE ARE MULTI-COLORED AND HOW THEIR STORIES ARE MULTI-FACETED.
माणसं...स्वार्थी...लोभी... वासनांध...दुष्ट...माणसं...माणुसकी जपणारी, प्रेम करणारी, िंचतावणारी, खंतावणारी, दुसर्‍याचं दु:ख जाणणारी, हसणारी आणि रडणारीही...अनंत परी माणसांच्या...टर्नर सिंड्रोमची समस्या असलेल्या कोट्यधीश अमृताशी लग्न करून संपत्ती की माणुसकी या कात्रीत सापडलेला निशिकांत...नवर्‍याकडूनच कुंटणखान्यात विकली गेलेली अनामिका...वार्धक्यातही कॉलेजमधल्या कुमुदची आठवण मनाशी जपणारा ‘तो’...नवर्‍याच्या अपघाती मृत्यूच्यावेळी त्याच्या बरोबर असणार्‍या तरुणीविषयीचं गूढ उलगडू पाहणारी ऊर्मिला...दोन खतरनाक गुंडांचा खात्मा करणारे मनोहर आणि मदिरा...भावनांच्या आणि विचारांच्या वादळात सापडलेली घटस्फोटित सविता...रोजच्या धावपळीने उबगलेला अशोक...प्रवासात एकमेकींना भेटलेल्या दोन तरुणी, पारंपरिक गौरी आणि आधुनिक सान्वी...पोलिसांनी पकडलेलं असतानाही फाटलेला शर्ट घालून इन्टरव्ह्यूला पोचणारा विठ्ठल...माणसं बहुरंगी आणि त्यांच्या कथा बहुढंगी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठी साहित्य #कथासंग्रह #माणसं अशी आणि तशी #रवींद्र भगवते # मराठी पुस्तक # मेहता पब्लिशिंग हाऊस #MARATHI LITERATURE #STORYBOOK #MANSA ASHI ANI TASHIHI #RAVINDRA BHAGVATE #MARATHI BOOK # MEHTA PUBLISHING HOUSE
Customer Reviews
  • Rating Starठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

    कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more