* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BIG CITY LITTLE BOY
  • Availability : Available
  • Translators : VYANKATESH MADGULKAR
  • ISBN : 9788184983906
  • Edition : 7
  • Publishing Year : AUGUST 1998
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 128
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I WAS LUCKY TO BORN ON AN ISLAND. I WAS BORN ON THE ISLANDS OF MANHATTAN IN NEW YORK. IT WAS A SMALL WORLD. I WAS BORN HERE AND WAS IMMENSELY IN LOVE WITH IT. AS I GREW UP I REALIZED THAT THIS PLACE BELONGS TO ME AND I BELONG TO IT. THEREAFTER I NEVER HESITATED TO MOVE ALONG ANYWHERE IN MANHATTAN. I ROAMED TO PLEASE MYSELF. I WATCHED WHAT I DESIRED AND WISHED. I ENQUIRED ABOUT THE THINGS I WANTED TO KNOW ABOUT. OF COURSE, WHILE I WAS YOUNG I DID NOT GO FAR AWAY. BUT AS I GREW IN A REAL SENSE, I GATHERED COURAGE. I STARTED EXPLORING IT. I WALKED DOWN THROUGH EVERY LANE OF NEW YORK.
जन्माला यावे, ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्यूयॉर्कमधल्या ‘मॅनहटन’ या रम्य बेटावर माझा जन्म झाला. ‘मॅनहटन’ म्हणजे एक लहानसे जगच होते. अशा या जगात मी जन्माला आलो आणि अगदी सुरुवातीपासून त्याच्यावर माझा जीव जडला. कळू लागल्यापासून मला वाटू लागले की, हे गाव माझे आहे आणि मी या गावचा आहे. ...आणि मग या माझ्या गावात मोकळ्या अंगाने कुठेही हिंडायला मला कधी काही वाटले नाही. मन मानेल तसे भटकावे, पाहिजे ते बघावे, पाहिजे त्याची चौकशी करावी. अर्थात नाकळता होतो तेव्हा मी फार लांब भटकत नव्हतो; पण लवकरच मी कळता झालो. धीट झालो आणि न्यूयॉर्कची गल्लीन्गल्ली पालथी घातली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarVinamra Bhabal

    जन्माला यावे, ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्युयॉर्कमधल्या `मॅनहॅटन` या रम्य बेटावर माझा जन्म झाला. `मॅनहॅटन` म्हणजे एक लहानसे जगच होते. अशा या जगात मी जन्माला आलो आणि अगदी सुरवातीपासून त्याच्यावर माझा जीव जडला. कळू लागल्यापासून मा वाटू लागले की, हे गाव माझे आहे आणि मी या गावचा आहे ...आणि मग या माझ्या गावात मोकळ्या अंगाने कुठेही हिंडायला मला कधी काही वाटले नाही. मन मानेल तसे भटकावे, पाहिजे ते बघावे, पाहिजे त्याची चौकशी करावी. अर्थात नाकळता होतो तेव्हा मी फार लांब भटकत नव्हतो; पण लवकरच मी कळता झालो. धीट झालो आणि न्युयॉर्कची गल्लीन् गल्ली पालथी घातली. - पुस्तकामागून २० व्या शतकाच्या सुरवातीचा काळ एका लहान मुलाच्या नजरेतून मांडणारी ही कादंबरी. प्रत्येक गोष्ट आयुष्यात पहिल्यांदा पाहताना, अनुभवताना, शिकताना, जगताना नायकाची अवस्था तुम्हाला तुमच्या अनुभवांशी सांगड घालू पाहते. त्याच्यासाठी त्याचं हे गाव जगातलं सुंदर गाव आहे. तेच त्याच विश्व असतं पण मग जागतिक घडामोडिंनी त्याला जगाची होणारी ओळख, तेव्हाच त्याचं स्वत्वाचा शोध घेण खुपच रंजक आणि गुंतवून ठेवणारं आहे. ही कादंबरी नायकाच्या नजरेतून मंतरलेल्या बेटाची नक्कीच सफर घडवून आणते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more