* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANTRA SHRIMANTICHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665451
  • Edition : 6
  • Publishing Year : FEBRUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SHYAM BHURKE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`MANTRA SHRIMANTICHA` WRITTEN BY SHYAM BHURKE `HOW TO BE RICH` THE BOOK PROVIDES KEY, `HOW TO BECOME RICH` MANOHAR, SCHOOL GOING STUDENT HAD STRONG DESIRE TO BE WEALTHIER. HOWEVER HIS FATHER PROF. BUDDHIVANT ADVISED HIM TO CONCENTRATE ON STUDIES AND SEE THAT HIS NAME APPEARS IN MERIT LIST OF TOP SUCCESSFUL STUDENT. CONTRARY TO THIS IDEOLOGY A FRIEND OF THE STUDENT`S FATHER MR. DHANESHWAR ADVISED HIM NOT TO USE ALL THE ENERGY FOR SCHOOL AND COLLAGE STUDIES. DO STUDY TO GET THROUGH THE EXAMINATION. SET PROMOTED TO NEXT STANDARD. AT THE SAME TIME LEARN ART OF EARNING MONEY. INVITED OF EARNING MONEY, ARE OF EARNING MONEY HAS BEEN MORE IMPORTANT. MANOHAR LEARNT THE ART. EACH RUPEE THAT HE EARNED USE TO EARN NEXT RUPEE. THIS HAS BEEN DESCRIBED IN THE BOOK. THE READER OF THIS BOOK WILL HAVE DESIRE TO BE RICH. HE WILL BE MARCH TOWARDS THE PATH OF WEALTH. HE WILL BE ENRICHED WITH THE KNOWLEDGE OF BECOMING RICH. EVEN, THORE WHO ARE EMPLOYEES WILL THINK OF BECOMING RICH. UNPLOYED YOUTH WILL ACQUIRE ENTEREPRENEURSHIP QUALITIES. THEY WILL KNOW THE STORIES OF RICH PERSONS AND FOWWOW THE SAME PATH. THERE WILL BE MORE AND MORE ENTEREPREUEURS.
या पुस्तकात दडलाय श्रीमंत होण्याचा मंत्र! प्रा.बुद्धिवंत म्हणतात, ``खूप अभ्यास कर. गुणवत्ता यादीत ये," तर त्यांचेच धनेश्वर सांगतात, " परीक्षेत उत्तीर्ण होण्याइतपत अभ्यास पुरेसा आहे. लवकरात लवकर पैसे कमविण्याची कला शिक. पैसे मिळविण्यापेक्षाही पैसे कमविण्याची कला प्राप्त होणे हे महत्वाचे." मनोहरनं ही कला कशी प्राप्त केली, येणारा प्रत्येक रुपया पुढील रुपया कमवायला कसा वापरला, हे इथं उलगडून दाखवलंय. हे पुस्तक वाचेल त्याला आपण श्रीमंत व्हावे असे वाटेल. तो गरिबीतजन्माला आला असेल तरीही श्रीमंतीचा मार्ग धरेल. जर हे पुस्तक श्रीमंतानेच वाचले तर आपण अधिक श्रीमंत होण्यासाठी कोणते मार्ग चोखाळायला हवेत, याचे त्याला ज्ञान होईल. जे नोकरीच्या चक्रात अडकले आहेत.त्यांनाही आहे या परिस्थितीतश्रीमंत कसे व्हावे, याचा मार्ग सापडेल. नोकरी ण मिळाल्यामुळे हताश झालेल्या युवकामध्ये उद्योजकता निर्माण होईल. यशस्वी उद्योजकांच्या कथा वाचताना त्याच्या अणूरेणूत चैतन्य सळसळेल. तो श्रीमंतीच्या वाटेकडे आकर्षित होईल. सर्वदूर उद्योजकांची मांदियाळी दिसू लागेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MANTRASHRIMANTICHA #MANTRASHRIMANTICHA #मंत्रश्रीमंतीचा #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #MARATHI #SHYAMBHURKE #श्यामभुर्के "
Customer Reviews
  • Rating Starनंदकिशोर कि. उमक

    ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे पुस्तक खूपच आकर्षक झाले आहे. त्यातील अक्षरही खूपच सुंदर आहे. तसेच टाइपही स्पष्ट समजेल असाच आहे. आपणास असंख्य शुभेच्छा.

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 23-07-2005

    शून्यातून यशाचा किनारा गाठण्यासाठी... इंग्रजीत ‘हाऊ टू डू इट’ पुस्तकांची नेहमीच चली असते. त्यातला दादा माणूस म्हणजे डेल कार्नेजी. त्याची ‘हाऊ टु विन् फ्रेंड्स अँड एनफ्ल्यूयन्स पीपल’ किंवा ‘हाऊ टू स्टॉप वरीइंग’ ही पुस्तके शेक्सपिअरच्या नाटकाइतकीच लोक्रिय आहेत. त्यातच पोहणे, क्रिकेट, बुद्धिबळ वगैरे शिकविणारी अनेक खेळ वा व्यवसायांची पुस्तकं सारखी प्रसिद्ध होत असतात. मराठीतही शेअर बाजार, संगणकापासून ‘मजेत जगावं कसं’ यांसारख्या पुस्तकांस कथा-कादंबऱ्यांपेक्षा अधिक मागणी आहे. आध्यात्मिक विषयावरच्या पुस्तकांचीही चलती आहे. श्याम भुर्के यांचं ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे त्यातलंच एक पुस्तक. ते मूळचे कॉमर्सचे अभ्यासक; पण त्यांना साहित्य, कला, नाट्य यांचीही आवड आहे. त्यांनी त्यावर हजारभर जरी उभारण्यानं दिली. शेवटी प्रत्येकाला कुठं सांगणार, म्हणून आपल्या अनुभवांना त्यांनी चक्क कादंबरीचं स्वरूप दिलं आहे. अर्थात त्यात कादंबरीचे घटक नावालाच आहेत. धनेश्वर आणि मनोहर या दोन गुरू-शिष्य संबंधांवर आधारित दोन व्यक्तिरेखांच्या आधारे त्यांनी श्रीमंतीचं रहस्य सांगितलं आहे. अर्थात अशा पुस्तकाचं मर्यादित स्वरूप लक्षात घेऊनच हा श्रीमंत होण्याचा मंत्र प्रत्यक्षात आणायला हवा. शेवटी ‘पोहावे कसे’ वाचून काही पोहता येत नाही. त्यासाठी पाण्यातच उडी ठोकावी लागते. मनोहर बुद्धिवंत याचे वडील अत्यंत बुद्धिवंत, पीएच. डी., एका विद्यापीठात विषय विभागप्रमुख. त्यामानाने धनेश्वर सामान्य त्यात आज ते अमाप श्रीमंतीचे धनी. ही किमया कशी घडली? त्याचे कारण आजचे शिक्षण हे कारकुनी घडविणारे आहे. त्यासाठी नोकरीच्या ‘स्कूटर रेस’मध्ये न पडता व्यवसाय केला पाहिजे. त्यासाठी अनेक वाटा आहेत. शाळेत शिकत असतानाच फटाके विकणे, स्टेशनरी शॉप चालविणे यांतून मनोहर स्वत:ची कमाई करतो. त्यातूनच धनेश्वर एकेक रहस्ये उघड करीत जातात. यशस्वी व्हायचं असेल तर परिश्रमांना, कष्टांना पर्याय नाही, हा धनेश्वरांचा मुख्य मंत्र आहे. ‘खावी बहुतांची अंतरे’ हा दुसरा आणि दोन कारखाने चालवायचे हा तिसरा. त्यातला एक बर्फाचा नि दुसरा साखरेचा. म्हणजे डोकं थंड ठेवणं नि गोड बोलणं. यामुळेच ग्राहक राजा प्रसन्न होतो. मग गुंतवणुकीची विविध क्षेत्रं खुली होतात. त्यात बँका, मार्केटिंग, पर्यटन, ट्रेकिंग, चित्रकला वगैरे दिशा त्यांनी दाखविल्या आहेत. संगणक हा तर आज एक कल्पवृक्ष आहे. आणखी एक म्हणजे श्रीमंत स्वत: कधीच काम करीत नाहीत. ते फारसा कर भरत नाहीत. ते पंचतारांकित हॉटेलांत पाट्याग झोडत असतात. खरं काम त्यांचे पगारी नोकर करतात. कर कमीत कमी भरावा म्हणून ते तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घेतात. त्यांच्या सगळ्या बिलांचा अंतर्भावही ते कंपनी खर्चत करून उत्पन्न व कर कमी दाखवतात. पगारदार मात्र स्वत: कर भरतात. त्यांची ओढाताण होते. श्रीमंत कधीही पैशासाठी काम करीत नाहीत. पैसाच त्यांच्यासाठी काम करतो, हे सत्य आहे. चिकाटी, श्रम, आळसाचा अभाव हे तीन मंत्रही महत्त्वाचे. त्याच जोरावर पुढं सिंधी मारवाड्यांपुढं गेले. जेवतानाही गिऱ्हाईक आलं तर ते पाटावरून उठतील. दुपारी एक ते चार दुकानाला विश्रांती देणारा माणूस त्याला कायमच विश्रांती देतो, हे धनेश्वरांचं निरीक्षण आहे. अ‍ॅसेट्स हे नेहमीच अ‍ॅसेट्स कसे नसतात, हे त्यांनी एका स्वतंत्र प्रकरणात नफा-तोटा, ताळेबंद, बॅलन्सशीट यांच्या उदाहरणांनी स्पष्ट केलं आहे. श्रीमंत पैसा मिळविण्यासाठी संपत्ती खर्च करतात. गरीब फक्त खर्चच करतात. मध्यमवर्गीय जी संपत्ती समजून खरेदी करतात ती अखेर लायबिलिटी ठरते. ती कशी टाळावी, हेही लेखकानं सांगितलं आहे. व्यवसायाला चिंतन, मनन याप्रमाणेच वाचनाची ही गरज आहे. त्यासाठी शंतनुराव किर्लोस्कर, टाटा कुटुंबीय, कॅमलचे दांडेकर, कल्याणी पगडीचं आत्मकथन, सिपोरेक्सचे बाबूराव शिर्के, तसेच अनेक पाश्चात्त्य यशस्वी उद्योगपतींच्या पुस्तकांची लेखकाने यादी दिली आहे. अशा प्रकारे नोकरीच्या मागे लागता श्रीमंत कसं व्हावं, हे अनेक किस्से, विनोद, हकिगती व प्रसंगांच्या रूपानं सांगितलं आहे. त्यामुळे हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. ...Read more

  • Rating Starप्रमोद पो. डोसा

    ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे पुस्तक वाचले. आपण आपल्या पुस्तकात अनेक गोष्टींचे ज्ञान, व्यवहार कुशलता, श्रीमंत होण्यासाठी लागणारी तळमळ, कष्ट करण्याची तयारी अशा अनेक गोष्टीचा योग्य पद्धतीने मांडणी केली आहे. हे पुस्तक वाचून माझ्या मनात माझ्या व्यवहारात अनेक बद घडले आहेत. मी आपल्या पुस्तकाचा आधार घेण्याचे ठरवले आहे. आलेला रुपया मी पुढील रुपया कमवण्यासाठी वापरणार आहे. मला या पुस्तकाच्या रूपाने गुरू मिळाला आहे. मला खात्री आहे की आपले पुस्तक माझ्या जीवनात एक क्रांती घडवणार आहे. आपण पुस्तक लिहिल्यामुळे अनेक गरीब श्रीमंतीचा अभ्यास करणार आहे. या पुस्तकामुळे तुमचे कोटी कोटी आभार मानत आहे. ...Read more

  • Rating Starप्रवीण निलजकर

    दि. ४ जानेवारी २०११ रोजी शहरातील पुस्तक प्रदर्शनास गेलो असता तेथे आपले `मंत्र श्रीमंतीचा` हे पुस्तक खरेदी केले, मला आपल्या पुस्तकातील मनोगत आणि कथा आवडली. माझ्या मनात व्यवसाय करण्याची इच्छा होती ती आणखीन तीव्र झाली. आशा करतो की अशाच प्रकारची आपली मा्गदर्शक पुस्तके आपणाकडून मिळत राहतील. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more